Skip to main content

Posts

Corona Series Part 102 : कोरोना आणि ब्ल्युबोनिक प्लेग

Corona Series Part 102 नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे.   कोरोना आणि ब्ल्युबोनिक प्लेग कोरोन सोबत अनेक विषाणूचा फैलाव कमी अधिक प्रमानात होत आहे परंतु १३००च्या दशकातील महाभयंकर रोग ब्ल्युबोनिक प्लेग जो जिवाणू मुळे होतो त्याचा फैलावा होतानाची काही उदाहरणे समोर आली आहेत. १३००च्या काळात युरोप   खंडामधील अर्ध्याहून अधिक लोकसंख्या या प्लेग मुळे नाहीशी झाली (जवळपास ५ करोड ) म्हणूनच याला ब्लॅक डेथ असे म्हंटले जाते. एकदा का प्लेग झाला की व्यक्ति जास्तीतजास्त ४८ तास जगत असे. २०२० साली हा आजार पुन्हा बळावला आहे आणि साहजिकच या आजारचा केंद्र बिन्दु दूसरा तिसरा कोणताही देश नसून चीनच आहे. चीन म्हणजे रोगराई पसरवणार्‍या जिवाणू विषाणू चे माहेर घरच आहे. १९४९ साली माऊ जिदोंगने रोगराई मुक्त चीन हे चीनसाठी पाहिलेले स्वप्न साकारत चीन ने आपल्या दारातील रोगराईची घाण दुसर्‍याच्या दारात अलगद सरकवण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यात ते यश मिळवत आहेत. चीन मधील इंनर मंगोलीया नावाचा स्वायत प्रदेश आहे
Recent posts

Corona Series Part 101 : कोरोना आणि G4 विषाणू

Corona Series Part 101 नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे.   कोरोना आणि G4 विषाणू जवळपास महिनाभराच्या अंतराने आज पुन्हा थोडा लिहावास वाटल. महिन्याभराच्या कलावधीत बरच पाणी पुलाखालून वाहून गेले कोरोना विषाणू त्याची लस जागतिक याबादल जागतिक घडामोडी झाल्या. ग्लोबल कोरोना आता घरच्या शेजार पाजारी येऊन ठेपला. कोरोना विषाणू उन्माद कमी होणारा नाही याचा अंदाज होताच पण रोज मरे त्याला कोण रडे अशी या कोरोना ची अवस्था झाली आहे. म्हणून लेख लिहायचे कामास दुसरे प्राधान्य ठेवून वाचकाची भूमिका स्वीकारली राष्ट्रीय , अंतरराष्ट्रीय , स्थानिक वृतपत्राचे वाचन आणि इंटरनेट च्या माध्यमातून काय चालू आहे ह्यावर लक्ष होतेच म्हंटलं योग्य वेळ आली की वाचनाच्या भूमिकेतून लिखाणाच्या भूमिकेत जाऊया. साधारत: कोरोना विषाणूच्या काळात नव नवीन विषाणू ची साथ येऊ लागली आहे. याडा-याडा , हंटा विषाणू ईत्यादी महिन्याभरापूर्वीच स्वाइन फ्लू च्या कुटुंबामध्ये नव्याने जन्माला आलेला जी४-ईए-एच१एन१ फ्लूचा विषाणू पुन्हा ची

पुन्हा कधीही कोरोना सारख्या महामारीमुळे लेख लिहायची वेळ येऊ नये हीच ईश्वर चरणी प्रार्थना

नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे आज काय लिहावे आणि काय नको समजेनासे झाले आहे. तरी धाडस करून लिहित आहे. काही चुकले तर समजून घ्यावे ही विनंती.   मार्च महिन्यामध्ये जगात नवीन विषाणू ने धुमाकूळ घातला होता सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. शास्त्रज्ञ , संशोधक , मीडिया , नेते , उद्योजक , आणि सामान्य जनता सर्वच नागरिकांना पुढे काय वाहून ठेवले आहे याची कल्पना नव्हती. परिस्थितीचे आकलन होण्याचा आतच लॉकडाउन झाला तेव्हा सुट्टीचा आनंद घेऊया असे समजून काही नागरिक मस्त मजेत होते. हळू हळू परिस्थिती बदलून गंभीर झाली , पण नेमके काय चालू आहे काय करावे आणि काय करू नये याचा अंदाज लागेना. मीडिया मध्ये रोज के भीतीदायक बातमी येऊ लागली कधी विषाणू वर असलेले उपाया येऊ लागले पण शास्त्रीय माहिती सजत नसल्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण होऊ लागले . अश्या मध्ये रसायनशास्त्राचा विद्यार्थी म्हणून कोरोना विषाणूच्या विरोधात   काही काम करावे असे वाटत होते परंतु संशोधन करण्यासाठी काही मर्यादा होत्या याचे भान होते पण शांत बसून चालणार नाही हे लक्षात आले होते. म्हणून मनातून ठरवले आज या संकटकाळी समजासाठी आपलाखरीचा व

Corona Series Part 100 : कोरोना आणि DRDO

Corona Series Part 100 नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. https://ajinkya1030.blogspot.com/   कोरोना आणि DRDO १९५८ मध्ये तांत्रिक विकास संस्था आणि भारतीय आयुध निर्मिती संचालनालयाच्या संरक्षण विज्ञान संस्थेमध्ये या संस्थेची स्थापना करण्यात आली. हे भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) जी लष्कराच्या संशोधन आणि विकासाची संस्था आहे. एकूण ५२ प्रयोगशाळां , ज्याद्वारे एरोनॉटिक्स , आर्मेट्स , इलेक्ट्रॉनिक्स , लँड कॉम्बॅट इंजिनिअरिंग , जीवन विज्ञान , साहित्य , क्षेपणास्त्रे आणि नौदल प्रणाली अशा विविध क्षेत्रांचा समावेश असलेले संरक्षण तंत्रज्ञान विकसित करण्यात गुंतलेले आहे. या संघटनेत संरक्षण संशोधन आणि विकास सेवा (डीआरडीएस) चे सुमारे ५ , ००० शास्त्रज्ञ आणि इतर २५ , ००० वैज्ञानिक , तांत्रिक आणि सहाय्यक कर्मचारी यांचा समावेश आहे. अशी नावा रूपाला आलेली लष्करी संस्था कोरोंना सारख्या महामारीत देखील देशसेवेचे आपले कर्

Corona Series Part 99 : कोरोना आणि बेल्ट अँड रोड

Corona Series Part 99 नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. https://ajinkya1030.blogspot.com/   कोरोना आणि बेल्ट अँड रोड २०१३ साला पासून बेल्ट अँड रोड (बिआरआय ) चीनचा मोठा महत्वकांक्षी प्रकल्पची सुरवात झाली होती. प्रामुख्याने चीनची अर्थव्यवस्था निर्यातीवर अवलंबून आहे. निर्यात लवकर व्हावी म्हणून बिआरआयचा प्रकल्प केला आहे. चीनचे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे आहेत. बिआरआयचा प्रकल्प म्हणजे व्यापाराचे निमित्या सांगून ईतर देशाच्या जमिनी हडप करायची सावकारकी आहे. चीन कधीच या प्रकल्पाचा उद्देश सांगत नाही त्यामुळे भारत कधीच समर्थन देत नाही. बिआरआयच्या निमिताने अफ्रीका आणि यूरोप खंड चीनशी जोडण्याचे प्रयत्न केला गेला आहे जवळपास 70 देश या प्रकल्पाच्या निमिताने चीनच्या सावकारी पाशात अडकले आहेत. कोरोनापूर्वी पर्यन्त ५४५ अब्ज डॉलरची गुंतवणूक मुख्यत: रस्ते , पूल , रेल्वे लाइन या मध्ये गुंतवणूक केली आहे. प्रगत देशामध्ये देखील मागणी नुसार कमी खर्चात रस्तेबांधून देण्याचे काम चीनने केले आहे.

Corona Series Part 98 : कोरोना आणि लॉकडाउन मुळे झालेले मृत्यू

Corona Series Part 98 नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. https://ajinkya1030.blogspot.com/   कोरोना आणि लॉकडाउन मुळे झालेले मृत्यू 25 मार्च 20 पासून कोरोनाचा फैलाव होईल या भीतीने देशात लॉकडाउन चालू झाला आहे तो आजही चालूच आहे. आज पर्यन्त १५ , ८८० भारतीयांचा मृत्यू कोरोनाच्या विषाणूमुळे झाला आहे. या बाबतीत चर्च सर्वत्र होत आहेच पण निव्वळ लॉकडाउनमुळे मागील २ ते ३ महिन्यात ३०० लोकांचा बळी गेला आहे याच्याकडे कुणाचे लक्ष नाही कारण त्यात काही विशेष वाटतं नाही. किंबहुना रस्त्यावरील अपघातता सपूर्ण देशात १ महिन्यात १५ हजारहून अधिक लोक मरण पावतात. आज ही प्रदूषण , आरोग्य सेवेचा अभाव , विविध आजार , गरीबी , कुपोषण यांनी मारण्याची संख्या जास्त आहे पण यात बातमी होण्या सारखे असे नवीन काही नाही. असो ,   लॉकडाउनमुळे सर्वात जास्त भुकमरी आणि आलेले वित्तीय संकटामुळे आलेले नैराश्य या प्रमुख कारणामुळे मरणार्‍याची संख्या जास्त आहे. Indian psychiatric journal च्या एक संशोधन प्रसिद्ध झाले.या म

Corona Series Part 97 : कोरोना आणि वर्ल्ड बँक

Corona Series Part 97 नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. https://ajinkya1030.blogspot.com/   कोरोना आणि वर्ल्ड बँक वर्ल्ड बँक International Bank of Reconstruction & Development ( IBRD) आणि International Development Association ( IDA), International Finance Carporation ( IFC) अश्या विविध वित्तीय संस्थाची मिळून बनली आहे . विकसनशील देशअंतर्गत कोरोनाशी   लढा देण्यासाठी वर्ल्ड बँकने मदत म्हणून १.९ अब्ज डॉलर २५ देशांना देऊ केले आहेत , या मध्ये सर्वात मोठा वाटा भारताला १ अब्ज डॉलर मिळाला आहे. वर्ल्ड बँकेचचे प्रमुक डेविड मालपास यांनी कोरोनाच्या काळातील वर्ल्ड बँकची भूमिका स्पष्ट केली ही रक्कम मदत म्हणून गरीब आणि ज्या देशात कोरोनाशी लढण्यासाठी वैद्यकीय सेवा कमी आहेत अश्या देशांना देण्यात येत आहे. या आधी ६५ देशात वर्ल्ड बँकमार्फत मदतकार्य चालू झाले आहे. प्रामुख्याने दक्षिण आशियाई देश जसे भारत १ अब्ज डॉलर , पाकिस्तान २०० दशलक्ष डॉलर , श्रीलंका १२८ दशलक्ष डॉलर , अफगाणिस्थान १०

Corona Series Part 96 : कोरोना आणि दिल्ली

Corona Series Part 96 नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. https://ajinkya1030.blogspot.com/   कोरोना आणि दिल्ली मार्च एप्रिल मध्ये युरोप , चीन , अमेरिका किंबांहून सर्व ठिकाणी कोरोना बधितांची संख्या झपाट्याने वाढत चालली असताना भारतात लॉकडाउनची झालेली कडक अमलबजाबवणी आणि त्याच बरोबर कमी प्रमानात झालेल्या तपासण्या या दोन्हीही कारणामुळे बाधितांची संख्या कमी दिसून येत होती आणि म्हणूनच जागतिक क्रमवारीत भारत शेवटी कुठे तरी दिसत होता. पण हळू हळू लॉकडाउनमध्ये आलेली शिथिलता आणि तपासनीचा वाढता आलेख यामुळे भारतता संक्रमितांची संख्या अतिशय वेगाने वाढत असलेली आपण पाहत आहोत. देशात २० जूननंतर सलग सहाव्या दिवशी १४ , ००० पेक्षा जास्त कोरोना विषाणूचे रुग्ण नोंदले गेले आहेत. २१ जून ला १५ , ४१३ , २२ जून (१४ , ८२१) , २३ जून (१४ , ९३३) आणि २४ जून (१५ , ९६८) होते. २० जूनपासून एकूण ९२ , ५७३ आणि या महिन्यात १ जूनपासून २.८२ लाख रुग्ण आढळले आहेत. देशाची राजधानी दिल्ली मध्ये गेल्या काही दिसापासून लक