Skip to main content

Corona Series Part 102 : कोरोना आणि ब्ल्युबोनिक प्लेग

Corona Series Part 102

नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे.

 

कोरोना आणि ब्ल्युबोनिक प्लेग

कोरोन सोबत अनेक विषाणूचा फैलाव कमी अधिक प्रमानात होत आहे परंतु १३००च्या दशकातील महाभयंकर रोग ब्ल्युबोनिक प्लेग जो जिवाणू मुळे होतो त्याचा फैलावा होतानाची काही उदाहरणे समोर आली आहेत. १३००च्या काळात युरोप  खंडामधील अर्ध्याहून अधिक लोकसंख्या या प्लेग मुळे नाहीशी झाली (जवळपास ५ करोड ) म्हणूनच याला ब्लॅक डेथ असे म्हंटले जाते. एकदा का प्लेग झाला की व्यक्ति जास्तीतजास्त ४८ तास जगत असे.

२०२० साली हा आजार पुन्हा बळावला आहे आणि साहजिकच या आजारचा केंद्र बिन्दु दूसरा तिसरा कोणताही देश नसून चीनच आहे. चीन म्हणजे रोगराई पसरवणार्‍या जिवाणू विषाणू चे माहेर घरच आहे. १९४९ साली माऊ जिदोंगने रोगराई मुक्त चीन हे चीनसाठी पाहिलेले स्वप्न साकारत चीन ने आपल्या दारातील रोगराईची घाण दुसर्‍याच्या दारात अलगद सरकवण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यात ते यश मिळवत आहेत.

चीन मधील इंनर मंगोलीया नावाचा स्वायत प्रदेश आहे त्यामध्ये बायानूर नावाचा शहरामध्ये ब्ल्युबोनिक प्लेगचे काही रुग्ण आढळून आले आहेत त्यामुळे सपूर्ण चीन मध्ये रेड अलर्ट जारी केला आहे. इंनर मंगोलीया शेजारील देश मंगोलीया मध्ये देखील या रोगाचे रुग्ण नक्कीच असणार आहेत. मंगोलीया मधील खुवाद भागात जुलै २०२०मध्ये २७ आणि १७ वर्षीय दोन व्यक्तिच मृत्यू मारमोट मीट ख्याल्यामुळे झाला.

मुळात प्लेग होतो कसा रोडेंट विशेषत: उंदरावर असणार्‍या फ्ली किडे हा आजार उंदरांपासून मनुष्यापर्यंत पोहोचोवतात. येरसिनिय पेसटीस नामक जिवाणू मुळे ब्ल्युबोनिक प्लेग होतो आणि पुढे मानसा-मानसा मधून पसरतो. प्रामुख्याने काखेत,जांघेत अश्या ठिकाणी गाठी होणे, सूज येणे, ताप, अंगदुखी, लिंफ नोड, थंडी, आणि शरीर काळे पडणे आही याची काही लक्षणे आहेत. कोणत्याही वयामध्ये प्लेग ची लागण झाली की ४८तासात मृत्यू अट्ळ असायचा. या सर्वतून फक्त अॅंटी बायोटिक्स मानवास वाचवू शकतात जे 1१३००च्या दशकात शक्य नव्हते पण विज्ञानात झालेल्या प्रगतिच्या आधारावर आज आणि अश्या जीवघेण्या जिवाणू वर विजय मिळवू शकतो. असे जरी असले तरी अधून मधून हा जिवाणू आपले डोके वर काढण्याचा प्रयत्न करतो आहे २००० सालापासून दक्षिण अमेरिकेमध्ये ७ रुग्ण/ वर्ष आढळून आले आहेत, २००६ मध्ये सर्वात जास्त १७ रुग्ण सापडले होते. सपूर्ण जगात २०१० पासून ३२००रुग्ण सापडले असून ६०० रुग्ण दगावले आहेत परंतु खास करून कोरोना सारख्या वैश्विक महामारीत असे रुग्ण सापडणे खूप मोठी धोक्याची घंटा आहे आता हा धोका नियंत्रित करणे चीन च्या कम्यूनिस्ट पार्टी च्या हातात आहे. नेहमीप्रमाणे जगाने चीनला विचारले असता चीन कधीच याची खरी उत्तरे देत नसून पोकळ प्लेगच जिवाणू नियंत्रित आणण्यासाठीची खोटी आसवासणे देत आहे. ब्लॅक डेथ सारखी परिस्थिती आज जरी नसली तरीही सार्‍या जगात याचा फैलाव होऊ नये या साठी चीनने प्रामाणिक प्रयत्न करणे फार गरजेचे आहे.

 

प्रा डॉ अजिंक्य अजित पत्रावळे

रसायनशास्त्र विभाग

विवेकानंद कॉलेज कोल्हापूर

 https://ajinkya1030.blogspot.com/

 

 


Comments

Popular posts from this blog

Corona Series Part 39 : कोरोना, आणि लस निर्मिती मधील भारतीयांचा सहभाग

Corona Series Part 39       नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणू चा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. कोरोना , आणि लस निर्मिती मधील भारतीयांचा सहभाग जगात असा एक ही देश नसेल जिथे ज्ञानाचा भंडार असणारे भारतीय लोक त्या देशाच्या प्रगतिमध्ये सहभागी नाहीत. कोरोनाच्या लढ्यात तरी हे मागे कशी राहतील. सिरम इंडिया लिमिटेड पुणे स्थित जैव तंत्रज्ञानातील अग्रणी कंपनी आहे यां कंपनीचे वैशिष्ट्य म्हणजे या पूर्वी ही hepatitis, पोलीओ , स्वाइन फ्लू इत्यादि आजारामध्ये लस निर्माण करण्याचे महत्वाचे योगदान आहे. वर्षभरात १.५ अब्ज लसीचे डोस अतिशय माफक दरात तयार करण्याची क्षमता असणारी या कंपनीचे उत्पादन यूरोपियन देशात व संशोधन यूनिट पुणे सारख्या शहरात आहे. भारतामध्ये एक ही नोबेल परितोषिक किवा औषधाचा स्वामित्व हक्क नाही तरीही औषध , लस उत्पादन करण्यात प्रावीण्य , विश्वसनीय नावलौकिक मिळवणारा देश आहे. जावपास ८०% लस आफ्रिका सारख्या देशात पुरवेल जातात. कोरोनाची लस निर्माण करण्यासाठी न्यूयॉर्क मधील codagenic या...

Corona Series Part 56 : कोरोना, आणि ई-शिक्षण

Corona Series Part 56 नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. आजचा विषय विस्तृत मांडला आहे.   या विषया बाबतीत आपण आपले मत ब्लॉगवर जरूर कळवावे ही विनंती.     https://ajinkya1030.blogspot.com   कोरोना , आणि ई-शिक्षण मार्च महिन्यापासन कोरोनाचा प्रभाव दिसू लागला शेवटच्या आठवड्यापासून शाळा , कॉलेज लॉकडाउनच्या काळापासून आज पर्यन्त बंद करण्यात आल्या. भितीदायक वातावरणामध्ये १० , १२वी च्या परीक्षा घेण्यात आल्या. शैक्षणिक वर्ष २०१९-२० चे कार्य संपत आले होते परंतु लेखी आणि मौखिक परीक्षा राहिल्या होत्या . आणि आता यूजीसीच्या मार्गदर्शंनानुसार त्या राहूनच जातील. किंवा काही अंशी तात्पुरती योजना राबवून काही ना काही मार्ग काडला जाईल.   नैसर्गिक आपत्ती महापुर , वैश्विक महामारी मधून शैक्षणिक क्षेत्रा समोर नवीन आव्हान उभे राहिले आहे. खाजगी , काही सरकारी शाळा , कॉलेजने देखील तात्पुरती सोय करण्यासाठी ऑनलाइन तास झूम , गूगल क्लासरूम , गूगल डॉक , यू ट्यूब , व्हाट्स अप...

पुन्हा कधीही कोरोना सारख्या महामारीमुळे लेख लिहायची वेळ येऊ नये हीच ईश्वर चरणी प्रार्थना

नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे आज काय लिहावे आणि काय नको समजेनासे झाले आहे. तरी धाडस करून लिहित आहे. काही चुकले तर समजून घ्यावे ही विनंती.   मार्च महिन्यामध्ये जगात नवीन विषाणू ने धुमाकूळ घातला होता सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. शास्त्रज्ञ , संशोधक , मीडिया , नेते , उद्योजक , आणि सामान्य जनता सर्वच नागरिकांना पुढे काय वाहून ठेवले आहे याची कल्पना नव्हती. परिस्थितीचे आकलन होण्याचा आतच लॉकडाउन झाला तेव्हा सुट्टीचा आनंद घेऊया असे समजून काही नागरिक मस्त मजेत होते. हळू हळू परिस्थिती बदलून गंभीर झाली , पण नेमके काय चालू आहे काय करावे आणि काय करू नये याचा अंदाज लागेना. मीडिया मध्ये रोज के भीतीदायक बातमी येऊ लागली कधी विषाणू वर असलेले उपाया येऊ लागले पण शास्त्रीय माहिती सजत नसल्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण होऊ लागले . अश्या मध्ये रसायनशास्त्राचा विद्यार्थी म्हणून कोरोना विषाणूच्या विरोधात   काही काम करावे असे वाटत होते परंतु संशोधन करण्यासाठी काही मर्यादा होत्या याचे भान होते पण शांत बसून चालणार नाही हे लक्षात आले होते. म्हणून मनातून ठरवले आज या संकटकाळी समजासाठी आप...