Skip to main content

Corona Series Part 98 : कोरोना आणि लॉकडाउन मुळे झालेले मृत्यू

Corona Series Part 98

नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. https://ajinkya1030.blogspot.com/

 

कोरोना आणि लॉकडाउन मुळे झालेले मृत्यू

25 मार्च 20 पासून कोरोनाचा फैलाव होईल या भीतीने देशात लॉकडाउन चालू झाला आहे तो आजही चालूच आहे. आज पर्यन्त १५,८८० भारतीयांचा मृत्यू कोरोनाच्या विषाणूमुळे झाला आहे. या बाबतीत चर्च सर्वत्र होत आहेच पण निव्वळ लॉकडाउनमुळे मागील २ ते ३ महिन्यात ३०० लोकांचा बळी गेला आहे याच्याकडे कुणाचे लक्ष नाही कारण त्यात काही विशेष वाटतं नाही. किंबहुना रस्त्यावरील अपघातता सपूर्ण देशात १ महिन्यात १५ हजारहून अधिक लोक मरण पावतात. आज ही प्रदूषण, आरोग्य सेवेचा अभाव, विविध आजार, गरीबी, कुपोषण यांनी मारण्याची संख्या जास्त आहे पण यात बातमी होण्या सारखे असे नवीन काही नाही. असो,

 लॉकडाउनमुळे सर्वात जास्त भुकमरी आणि आलेले वित्तीय संकटामुळे आलेले नैराश्य या प्रमुख कारणामुळे मरणार्‍याची संख्या जास्त आहे. Indian psychiatric journal च्या एक संशोधन प्रसिद्ध झाले.या मध्ये काही उदाहरणे दिली आहेत ती पाहू.

भुकमरी, वित्तीय संकट आणि दारू या प्रमुख कारणामुळे मृत्यू झाले आहेत. भारतता केरळ सर्वात सुशिक्षित राज्य असले तरी सर्वात जास्त मद्य पिणारे राज्य आहे. ३.४८ करोड लोकसंख्या मध्ये ३७% नागरिक मद्यसेवन करताता २०१५ च्या माहिती नुसार प्रती वर्षी एक व्यक्ति ८ लिटर मद्य सेवन करतो. ५% लोक अति मद्यपान करतता. लॉकडाउनच्या काळात मद्य न मिळाल्यामुळे बर्‍याच लोकांना भ्रम होणे, भीती वाटणे असे त्रास झाला होऊ लागले आहेत. आणि काही लोकांचे मृत्यू झाले आहेत. तसेच मद्य न मिळाल्यामुळे घरघुती वाद होऊन महिलांवर आत्याचार होण्याचे प्रमान वाढताना दिसून आले आहे.

लॉकडाउनच्या काळात योगी वेळी आरोगी सेवा काही रुग्णाना वेळेत मिळाली नाही. मध्यप्रदेश मधील इंदोर शहरातील एक बातमी आहे. रुग्णवाहिका उपलब्ध होण्यासाठी ३०० मागितले रुगाच्या कुटूबाने देण्याचे मान्य करून पण रुग्णवाहिका उपलब्ध होऊ शकली नाही.

शेतकर्‍यांची आत्महत्या तर देशात काही असले तरी चालूच असते. तमिळनाडू मधून  लॉकडाउनच्या काळात शेतमाळ विकता आला नाही म्हणून शेतकर्‍यांनी आत्महत्या केली. कोल्हापूर मध्ये एका मुलीला आपल्या आईला भेटता आले नाही म्हणून मुलीने आत्महत्या केल्याची बातमी समोर आली. गुजरात मध्ये जामनगर येथील ध्रोन शहरातील माजी भारतीय जनता पार्टीचे आमदाराची कन्या विदेशात शिक्षण घेण्याचे नियोजन लांबणीवर पडले म्हणून गळफास लावून घेतला.

समाजात तंटा आणि मारामारी होणार्‍या अनेक घटना समोर आल्या आहेत. तसेच अनेक मजूर लॉकडाउन च्या काळात स्वतचा घरी जाण्यासाठी चालत प्रवास करण्याची योजना आखली परंतु यामध्ये प्रशासन आणि मजूर यांच्यात वाद होताना दिसलेच तर काही मजूर आणि कुटुंबा मधील  काही लोकं थकवा आणि उपासमारी मुळे घरी पोहोचायच्या आधीच देवा घरी गेले. जालना मधून प्रवासी कामगार आपल्या गावी जात असताना १६ लोक रेल्वे खाली येऊन गेले. अश्या बर्‍याच दुर्दैवी घटना समरो आल्या आहेत आणि त्यातून लोकांना प्राण गमवावे लागले आहेत. केंद्र आणि राज्य सरकार तसेच काही सामाजिक संस्था काम करत आहेत पण असे असून देखील मृत्यू होतच आहेत.

प्रा डॉ अजिंक्य अजित पत्रावळे

रसायनशास्त्र विभाग

विवेकानंद कॉलेज कोल्हापूर


Comments

  1. Gov.che planning vevstit aste tr anek lokan che Life safe rahile aste... political lok ek mekana nave tevnyat ch time vest ghalvatat...hich situation samne mandache Life bad kranesti karni bhut ahe... thanks sir 👍👍 for this information..

    ReplyDelete
  2. Govt tried level best but need to more

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Corona Series Part 39 : कोरोना, आणि लस निर्मिती मधील भारतीयांचा सहभाग

Corona Series Part 39       नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणू चा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. कोरोना , आणि लस निर्मिती मधील भारतीयांचा सहभाग जगात असा एक ही देश नसेल जिथे ज्ञानाचा भंडार असणारे भारतीय लोक त्या देशाच्या प्रगतिमध्ये सहभागी नाहीत. कोरोनाच्या लढ्यात तरी हे मागे कशी राहतील. सिरम इंडिया लिमिटेड पुणे स्थित जैव तंत्रज्ञानातील अग्रणी कंपनी आहे यां कंपनीचे वैशिष्ट्य म्हणजे या पूर्वी ही hepatitis, पोलीओ , स्वाइन फ्लू इत्यादि आजारामध्ये लस निर्माण करण्याचे महत्वाचे योगदान आहे. वर्षभरात १.५ अब्ज लसीचे डोस अतिशय माफक दरात तयार करण्याची क्षमता असणारी या कंपनीचे उत्पादन यूरोपियन देशात व संशोधन यूनिट पुणे सारख्या शहरात आहे. भारतामध्ये एक ही नोबेल परितोषिक किवा औषधाचा स्वामित्व हक्क नाही तरीही औषध , लस उत्पादन करण्यात प्रावीण्य , विश्वसनीय नावलौकिक मिळवणारा देश आहे. जावपास ८०% लस आफ्रिका सारख्या देशात पुरवेल जातात. कोरोनाची लस निर्माण करण्यासाठी न्यूयॉर्क मधील codagenic या...

Corona Series Part 56 : कोरोना, आणि ई-शिक्षण

Corona Series Part 56 नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. आजचा विषय विस्तृत मांडला आहे.   या विषया बाबतीत आपण आपले मत ब्लॉगवर जरूर कळवावे ही विनंती.     https://ajinkya1030.blogspot.com   कोरोना , आणि ई-शिक्षण मार्च महिन्यापासन कोरोनाचा प्रभाव दिसू लागला शेवटच्या आठवड्यापासून शाळा , कॉलेज लॉकडाउनच्या काळापासून आज पर्यन्त बंद करण्यात आल्या. भितीदायक वातावरणामध्ये १० , १२वी च्या परीक्षा घेण्यात आल्या. शैक्षणिक वर्ष २०१९-२० चे कार्य संपत आले होते परंतु लेखी आणि मौखिक परीक्षा राहिल्या होत्या . आणि आता यूजीसीच्या मार्गदर्शंनानुसार त्या राहूनच जातील. किंवा काही अंशी तात्पुरती योजना राबवून काही ना काही मार्ग काडला जाईल.   नैसर्गिक आपत्ती महापुर , वैश्विक महामारी मधून शैक्षणिक क्षेत्रा समोर नवीन आव्हान उभे राहिले आहे. खाजगी , काही सरकारी शाळा , कॉलेजने देखील तात्पुरती सोय करण्यासाठी ऑनलाइन तास झूम , गूगल क्लासरूम , गूगल डॉक , यू ट्यूब , व्हाट्स अप...

पुन्हा कधीही कोरोना सारख्या महामारीमुळे लेख लिहायची वेळ येऊ नये हीच ईश्वर चरणी प्रार्थना

नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे आज काय लिहावे आणि काय नको समजेनासे झाले आहे. तरी धाडस करून लिहित आहे. काही चुकले तर समजून घ्यावे ही विनंती.   मार्च महिन्यामध्ये जगात नवीन विषाणू ने धुमाकूळ घातला होता सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. शास्त्रज्ञ , संशोधक , मीडिया , नेते , उद्योजक , आणि सामान्य जनता सर्वच नागरिकांना पुढे काय वाहून ठेवले आहे याची कल्पना नव्हती. परिस्थितीचे आकलन होण्याचा आतच लॉकडाउन झाला तेव्हा सुट्टीचा आनंद घेऊया असे समजून काही नागरिक मस्त मजेत होते. हळू हळू परिस्थिती बदलून गंभीर झाली , पण नेमके काय चालू आहे काय करावे आणि काय करू नये याचा अंदाज लागेना. मीडिया मध्ये रोज के भीतीदायक बातमी येऊ लागली कधी विषाणू वर असलेले उपाया येऊ लागले पण शास्त्रीय माहिती सजत नसल्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण होऊ लागले . अश्या मध्ये रसायनशास्त्राचा विद्यार्थी म्हणून कोरोना विषाणूच्या विरोधात   काही काम करावे असे वाटत होते परंतु संशोधन करण्यासाठी काही मर्यादा होत्या याचे भान होते पण शांत बसून चालणार नाही हे लक्षात आले होते. म्हणून मनातून ठरवले आज या संकटकाळी समजासाठी आप...