Skip to main content

Corona Series Part 96 : कोरोना आणि दिल्ली

Corona Series Part 96


नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. https://ajinkya1030.blogspot.com/

 

कोरोना आणि दिल्ली

मार्च एप्रिल मध्ये युरोप, चीन, अमेरिका किंबांहून सर्व ठिकाणी कोरोना बधितांची संख्या झपाट्याने वाढत चालली असताना भारतात लॉकडाउनची झालेली कडक अमलबजाबवणी आणि त्याच बरोबर कमी प्रमानात झालेल्या तपासण्या या दोन्हीही कारणामुळे बाधितांची संख्या कमी दिसून येत होती आणि म्हणूनच जागतिक क्रमवारीत भारत शेवटी कुठे तरी दिसत होता. पण हळू हळू लॉकडाउनमध्ये आलेली शिथिलता आणि तपासनीचा वाढता आलेख यामुळे भारतता संक्रमितांची संख्या अतिशय वेगाने वाढत असलेली आपण पाहत आहोत.

देशात २० जूननंतर सलग सहाव्या दिवशी १४,००० पेक्षा जास्त कोरोना विषाणूचे रुग्ण नोंदले गेले आहेत. २१ जून ला १५,४१३, २२ जून (१४,८२१), २३ जून (१४,९३३) आणि २४ जून (१५,९६८) होते. २० जूनपासून एकूण ९२,५७३ आणि या महिन्यात १ जूनपासून २.८२ लाख रुग्ण आढळले आहेत.

देशाची राजधानी दिल्ली मध्ये गेल्या काही दिसापासून लक्षणीय वाढ झालेली दिसत आहे. दिल्लीत सध्या ७०,००० पेक्षाजास्त कोरोनाग्रस्त प्रकरणे आहेत, त्यापैकी जवळजवळ ४०,००० प्रकरणे गेल्या दोन आठवड्यांत सापडली आहेत. दररोज अंदाजे ३ ते ४ हजार रुग्ण संक्रमित सापडत आहेत. अपेक्षेप्रमाणे दिल्लीने बुधवारी मुंबईवर मात करून देशातील कोरोनाव्हायरस संक्रमितांच्या यादीत अव्व्ल स्थान मिळवले. सुरवातीला दिल्ली मध्ये ५ ते ७ हजार तपासण्यामधून १५०० पर्यन्त संक्रमितानची संख्या येत होती पण सध्या १७ ते २०००० हजार तपासणी होऊ लागली आहे आणि त्यातून ३ हजारहून अधिक बाधित रुग्ण आढळून येत आहेत. रॅपिड अॅंटीबॉडी टेस्टला आईसीएमआर कडून मान्यत मिळाल्यामुळे तपासणीचा आकडा वाढवता आला. पण ही परिस्थिती कायमची राहण्याची शक्यता नाही, दिल्लीनेमध्ये ही रोगनिदान लवकर शोधून काढण्याचे आणि संसर्ग कमी करण्यासाठी घरोघरी तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई काही प्रमाणात हा सराव करत आहे आणि त्याला काही प्रमाणात यश मिळाले आहे. घरोघरी नजर ठेवून लवकर संभाव्य संसर्ग ओळखण्यास मदत होते आणि या सरावामुळे दिल्लीतील केसेसची वाढ मंदावण्याची शक्यता आहे.सध्या आलेख चडता असला तरी तपासणीचा वेग वाढत गेला की बाधीतांचा आलेख हळू हळू खाली यायला लागेल.

दुसरीकडे मुंबई दररोज ४,००० ते ४५००फारच मर्यादित चाचण्या घेत आहे. पण मुंबईही आता एक लाख रॅपिड अॅंटिजेन किट मागवत आहे. या चाचण्या ंचा वापर सुरू झाला की मुंबईच्या केस नंबरमध्येही वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबई ने आपल्या चाचणीचे जाळे अगदी निवडक केले आहे, फक्त संसर्ग झालेल्या ंना आणि ज्यांना संसर्ग होण्याचा धोका आहे अशाची तपासणी करण्याचे लक्ष्य आहे अशी टीका आधीच झाली आहे. मुंबईत प्रत्यक्ष केसेसची संख्या खूप मोठी असू शकते, पण चाचण्या कमी असल्याने ते सापडले नाही.

दिल्ली मुंबई सारख्या प्रमुख शहरामधून सहजासहजी कोरोना हटणार नाही पण ही शहरे देशाची आर्थिक केंद्रे आहेत त्यामुळे आज ना उद्या सर्व गोष्टी पूर्वा पदावर आणाव्या लागतील हे करत असताना प्रत्येक व्यक्ति ने स्वतहून काळजी घेणे आत्यात गरजेचे आहे.  

 

प्रा डॉ अजिंक्य अजित पत्रावळे,

रसायनशास्त्र विभाग

विवेकानंद कॉलेज कोल्हापूर

 

 


Comments

  1. Thanks sirr 👍 nice information sir 👍👍

    ReplyDelete
  2. Very good information sir..👍👍👍

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Corona Series Part 39 : कोरोना, आणि लस निर्मिती मधील भारतीयांचा सहभाग

Corona Series Part 39       नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणू चा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. कोरोना , आणि लस निर्मिती मधील भारतीयांचा सहभाग जगात असा एक ही देश नसेल जिथे ज्ञानाचा भंडार असणारे भारतीय लोक त्या देशाच्या प्रगतिमध्ये सहभागी नाहीत. कोरोनाच्या लढ्यात तरी हे मागे कशी राहतील. सिरम इंडिया लिमिटेड पुणे स्थित जैव तंत्रज्ञानातील अग्रणी कंपनी आहे यां कंपनीचे वैशिष्ट्य म्हणजे या पूर्वी ही hepatitis, पोलीओ , स्वाइन फ्लू इत्यादि आजारामध्ये लस निर्माण करण्याचे महत्वाचे योगदान आहे. वर्षभरात १.५ अब्ज लसीचे डोस अतिशय माफक दरात तयार करण्याची क्षमता असणारी या कंपनीचे उत्पादन यूरोपियन देशात व संशोधन यूनिट पुणे सारख्या शहरात आहे. भारतामध्ये एक ही नोबेल परितोषिक किवा औषधाचा स्वामित्व हक्क नाही तरीही औषध , लस उत्पादन करण्यात प्रावीण्य , विश्वसनीय नावलौकिक मिळवणारा देश आहे. जावपास ८०% लस आफ्रिका सारख्या देशात पुरवेल जातात. कोरोनाची लस निर्माण करण्यासाठी न्यूयॉर्क मधील codagenic या...

Corona Series Part 56 : कोरोना, आणि ई-शिक्षण

Corona Series Part 56 नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. आजचा विषय विस्तृत मांडला आहे.   या विषया बाबतीत आपण आपले मत ब्लॉगवर जरूर कळवावे ही विनंती.     https://ajinkya1030.blogspot.com   कोरोना , आणि ई-शिक्षण मार्च महिन्यापासन कोरोनाचा प्रभाव दिसू लागला शेवटच्या आठवड्यापासून शाळा , कॉलेज लॉकडाउनच्या काळापासून आज पर्यन्त बंद करण्यात आल्या. भितीदायक वातावरणामध्ये १० , १२वी च्या परीक्षा घेण्यात आल्या. शैक्षणिक वर्ष २०१९-२० चे कार्य संपत आले होते परंतु लेखी आणि मौखिक परीक्षा राहिल्या होत्या . आणि आता यूजीसीच्या मार्गदर्शंनानुसार त्या राहूनच जातील. किंवा काही अंशी तात्पुरती योजना राबवून काही ना काही मार्ग काडला जाईल.   नैसर्गिक आपत्ती महापुर , वैश्विक महामारी मधून शैक्षणिक क्षेत्रा समोर नवीन आव्हान उभे राहिले आहे. खाजगी , काही सरकारी शाळा , कॉलेजने देखील तात्पुरती सोय करण्यासाठी ऑनलाइन तास झूम , गूगल क्लासरूम , गूगल डॉक , यू ट्यूब , व्हाट्स अप...

पुन्हा कधीही कोरोना सारख्या महामारीमुळे लेख लिहायची वेळ येऊ नये हीच ईश्वर चरणी प्रार्थना

नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे आज काय लिहावे आणि काय नको समजेनासे झाले आहे. तरी धाडस करून लिहित आहे. काही चुकले तर समजून घ्यावे ही विनंती.   मार्च महिन्यामध्ये जगात नवीन विषाणू ने धुमाकूळ घातला होता सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. शास्त्रज्ञ , संशोधक , मीडिया , नेते , उद्योजक , आणि सामान्य जनता सर्वच नागरिकांना पुढे काय वाहून ठेवले आहे याची कल्पना नव्हती. परिस्थितीचे आकलन होण्याचा आतच लॉकडाउन झाला तेव्हा सुट्टीचा आनंद घेऊया असे समजून काही नागरिक मस्त मजेत होते. हळू हळू परिस्थिती बदलून गंभीर झाली , पण नेमके काय चालू आहे काय करावे आणि काय करू नये याचा अंदाज लागेना. मीडिया मध्ये रोज के भीतीदायक बातमी येऊ लागली कधी विषाणू वर असलेले उपाया येऊ लागले पण शास्त्रीय माहिती सजत नसल्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण होऊ लागले . अश्या मध्ये रसायनशास्त्राचा विद्यार्थी म्हणून कोरोना विषाणूच्या विरोधात   काही काम करावे असे वाटत होते परंतु संशोधन करण्यासाठी काही मर्यादा होत्या याचे भान होते पण शांत बसून चालणार नाही हे लक्षात आले होते. म्हणून मनातून ठरवले आज या संकटकाळी समजासाठी आप...