Skip to main content

Corona Series Part 100 : कोरोना आणि DRDO

Corona Series Part 100

नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. https://ajinkya1030.blogspot.com/

 

कोरोना आणि DRDO

१९५८ मध्ये तांत्रिक विकास संस्था आणि भारतीय आयुध निर्मिती संचालनालयाच्या संरक्षण विज्ञान संस्थेमध्ये या संस्थेची स्थापना करण्यात आली. हे भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) जी लष्कराच्या संशोधन आणि विकासाची संस्था आहे. एकूण ५२ प्रयोगशाळां, ज्याद्वारे एरोनॉटिक्स, आर्मेट्स, इलेक्ट्रॉनिक्स, लँड कॉम्बॅट इंजिनिअरिंग, जीवन विज्ञान, साहित्य, क्षेपणास्त्रे आणि नौदल प्रणाली अशा विविध क्षेत्रांचा समावेश असलेले संरक्षण तंत्रज्ञान विकसित करण्यात गुंतलेले आहे. या संघटनेत संरक्षण संशोधन आणि विकास सेवा (डीआरडीएस) चे सुमारे ५,००० शास्त्रज्ञ आणि इतर २५,००० वैज्ञानिक, तांत्रिक आणि सहाय्यक कर्मचारी यांचा समावेश आहे. अशी नावा रूपाला आलेली लष्करी संस्था कोरोंना सारख्या महामारीत देखील देशसेवेचे आपले कर्तव्य बाजावत आहे.

डीआरडीओने विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर करत कोरोना वरील संकट दूर करण्यासाठी अनेक उपकरने बनवली आहेत. या आधी अति नील किरणे वापरुन निर्जंतुकरण कसे केले जाते याची माहिती भाग ४६मध्ये पहिले आहे. प्रामुख्याने डीआरडीओने कमी खर्चात अधिक चांगली तंत्रज्ञानाने युक्त अशी हाय प्रोटेक्षण फेस मास्क, Multi Patient Ventilator, Sanitizer, DRUVE, सुमेरु पॅक अशी उपकरणे बनवली आहेत.

UV Blaster: वाचा भाग ४६

सुमेरु पॅक: जगभरात कोरोना योद्धे बहुतांश डॉक्टर, वैद्यकीय सहायक, कर्मचारी यांना कोरोंना संक्रमित रुग्णांवर उपचार करत असताना बाधा होऊ नये म्हणून पीपीई किट वापरावे लागते. या किटमुळे कोरोनापासून बचाव होतोय परंतु हे किट वापरणे सोईचे नाही एकदा किट घातले की कमीत कमी ५-६ तास तरी किट कडता येत नाही त्यामुळे अनेक अडचण निर्माण होत आहेत. घाम येणे, शरीररातील पाणी कमी झाल्यामुळे चक्कर येणे, घाम साठून फंगल इन्फेकशन होणे, त्वचेवर पुरळ अश्या व्याधी वाढू लागल्या आहे. त्यामुळे तज्ञ डॉक्टरांच्या सल्ला आणि मागणीनुसार डीआरडीओने आवाहन स्वीकारले. आणि सुमेरु पॅक शोडून काढले. हे पॅक पाठीवर अडकवले जाते आणि या मधून बाहेरील हवा खेचून डोक्यापासुन गळा पर्यंत ऑक्सिजन आणि बाहेरील हवा पोहोचवली जाते. या मधून घाम येणे कमी होऊन अनेक व्याधी कमी होतात.

Dubbed Defence Research UV Sanitizer (DRUVE): प्रामुख्याने चलनी नोटा आणि मोबाईल निर्जंतुक करण्यासाठी या बॉक्सचा वापर करता येतो. कोणताही व्यक्ति या बॉक्स च्या जवळ आला तर या बॉक्स उघडतो त्यामुळे अतिनील किरणाचा संपर्क व्यतिगत होत नाही.

Ultra Swatch: निर्जंतुक करण्यासाठी एक चेंबर बनवण्यात आला आहे. या मध्ये ओझोन आणि पानी याचा वापर करून निर्जंतुक करण्यात येते. विमानतळ, मेट्रो, जास्तीत जास्त लोक जिथे असतील तिथे याचा वापर शक्य आहे. असे अनेक गोष्टी डीआरडीओ बनवत आहे. देशासाठी समर्पित असणारी ही एक अग्रणी संस्था आहे त्याचा आम्हाला अभिमान आहे.

 

 

प्रा डॉ अजिंक्य अजित पत्रावळे

रसायनशास्त्र विभाग

विवेकानंद कॉलेज कोल्हापूर

 


Comments

  1. Very interesting article sir 😊

    ReplyDelete
  2. Consecutive 100 series of Corona related info ...GRATE work sir..

    ReplyDelete
  3. 💐💐💐 Great Ajinkya Sir... It's century... 😃...you have been routinely writing knowledgeable articles on Corona relating it's effects on every angle in the society since last three months... It's really not a simple job as it required much resourcing and deep study before writing each article.....Congratulations for this achievement 💐💐💐😊😊😊👍👍👍

    ReplyDelete
  4. Congratulation sir. For . complete century.... nice job sirr..such a great information in all part...once again thanks sir 👍👍 for this all information...

    ReplyDelete
  5. Great sir drdo is best organisation

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Corona Series Part 76 : कोरोना, आणि एन-९५ मास्कचा इतिहास

Corona Series Part 76 नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. https://ajinkya1030.blogspot.com/   कोरोना , आणि एन-९५ मास्कचा इतिहास कोरोनाचा संसर्ग होऊ नये या करिता मास्क वापरणे अनिवार्य झाले आहे. कोरोना योद्धा मास्क आणि पिपिई किट दोन्हीचा वापर करतात. भारतामध्ये मास्कचा वापर सध्या मार्च पासून वाढला असला तरी मास्कचा ईतिहास जवळपास ३०० वर्षापासूनचा आहे. मानव मास्क कसा , कशासाठी वापरू लागला. याची माहिती घेऊया. १७२०च्या दरम्यांन मारसेलीसच्या चित्रामध्ये मास्कचा वापर केलेला आढळून येतो मास्क म्हणण्यापेक्षा तोंडावर कापड लावलेले दिसून येते. अंदाजे त्यावेळी बुबोणिक प्लेग आला होता लाखो लोकांचा मृत्यू होत होते परंतु मृत्युचे कारन समजण्यापलीकडे होते . कारण त्याकाळी अजूनही विषाणू/ जिवाणूची संकल्पना अस्थित्वात नव्हती. मरणोत्तर मानवी शरीराला येणार वास आणि त्यामुळे हवा खराब होत आहे अशी एक धारणा होती हवा ही या रोगास कारणीभूत आहे असे वाटू लागले त्याला मियासमा म्हंटले जात. या मियासमा संकल्पन

Corona Series Part 1 : Clinical Trails starts on Corona

Corona Series Part 1 Corona धोका लक्षात घेता social media द्वारे जनजागृती करणे गरजेचे झाले आहे त्या माध्यमातून एक प्रयत्न करत आहे कृपया msg पूर्ण वाचून आपल्याला योग्य वाटल्यास पुढे पाठवा कोरोना जनजागृती मोहीम Clinical Trails starts on Corona जवळपास जगामध्ये 20 संस्था ह्या आजारावर vaccine बनवण्याचा प्रयन्त करत आहेत . जानेवारी 2020 मध्ये चीन मध्ये शास्त्रज्ञांनी कोरोना virus चे genetic मटेरियल चे sequencing चे decoding केले , अमेरिकेतील सरकारी संस्थामधील शास्त्रज्ञानी ह्या अभ्यासच फायदा घेत पुढे कांम चालू केले   1) (NIAID) National Institute of Allergy and Infection 2) Moderna Inc ह्या दोन संस्था मागील काही वर्षे MERS,   SARS- 1 वर काम करत आहेत त्यांना जेव्हा sequencing of gentic information of corona 2   मिळाली त्यांनी vaccine बनवण्याचे काम अहो रात्र चालू केले. अमेरिकेतील north washington जिथे मायक्रोसॉफ्ट चे बिल गेट्स व अनेक it कंपनीच्या चे केंद्र स्थान आहे अश्या शहरामध्ये Kiaser Permannente Washington Health Reseaech Institute (KPWHRI) मध्ये संशोधकांनी mRNA 1273 न

Corona Series Part 92 : कोरोना आणि Favipiravir

Corona Series Part 92 नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. https://ajinkya1030.blogspot.com/   कोरोना आणि Favipiravir सुरवातीच्या काळात चीन पाठोपाठ सिंगापूर , जपान , कोरिया या देशात कोरोंनाचे संक्रमण झालेली आपल्याळ दिसून येईल. तेव्हा पासूंनच चीन , सिंगापूर , जपान , कोरिया आणि जपान कोरोनापासून बचाव करण्यासाठी आपल्या तंत्रज्ञान आणि विविध शास्त्रामधील तज्ञ शास्त्रज्ञानाचा वापर करत नवीन संशोधन करत आहेत. या मधील Hydrocychloroquin, Remdesivir, Favipiravir, Lopinavir, Ritonavir ड्रग्स बरेच चर्चेत होते कारण या ड्रग्स ची चाचणी काहीअंशी यशस्वी होताना दिसत होती. भाग 3 , 47 , आणि 52 मध्ये या ड्रग्स बाबतीत सविस्तर उल्लेख केला आहे. फूजीफिल्मजी पूर्वी कॅमेरा मधील रोल बनवत होते त्यांचीच Toyama Chemicals कंपनीमरफट   जपानमध्ये सर्वात प्रथम Favipiravir बनवण्यात आले. दिनांक १८ मार्च २०रजी वुहाण मध्ये सर्वप्रथम Favipiravir ( Pyarzine derivative) ची ३४० रुग्णांवर ( clinical trials) करणात