Skip to main content

Corona Series Part 99 : कोरोना आणि बेल्ट अँड रोड

Corona Series Part 99

नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. https://ajinkya1030.blogspot.com/

 

कोरोना आणि बेल्ट अँड रोड

२०१३ साला पासून बेल्ट अँड रोड (बिआरआय) चीनचा मोठा महत्वकांक्षी प्रकल्पची सुरवात झाली होती. प्रामुख्याने चीनची अर्थव्यवस्था निर्यातीवर अवलंबून आहे. निर्यात लवकर व्हावी म्हणून बिआरआयचा प्रकल्प केला आहे. चीनचे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे आहेत. बिआरआयचा प्रकल्प म्हणजे व्यापाराचे निमित्या सांगून ईतर देशाच्या जमिनी हडप करायची सावकारकी आहे. चीन कधीच या प्रकल्पाचा उद्देश सांगत नाही त्यामुळे भारत कधीच समर्थन देत नाही. बिआरआयच्या निमिताने अफ्रीका आणि यूरोप खंड चीनशी जोडण्याचे प्रयत्न केला गेला आहे जवळपास 70 देश या प्रकल्पाच्या निमिताने चीनच्या सावकारी पाशात अडकले आहेत. कोरोनापूर्वी पर्यन्त ५४५ अब्ज डॉलरची गुंतवणूक मुख्यत: रस्ते, पूल, रेल्वे लाइन या मध्ये गुंतवणूक केली आहे. प्रगत देशामध्ये देखील मागणी नुसार कमी खर्चात रस्तेबांधून देण्याचे काम चीनने केले आहे. ही सर्व परिस्थिती चीन ने जगाला दिलेल्या कोरोंना विषाणूच्या आधीची आहे.

 कोरोना विषाणूच्या महामारी मुळे जगात परिस्थिती बदलू लागली आहे. या महामारीने जगाला कनेक्टिव्हिटीमुळे झालेले दुष्परिणाम दाखवून दिले आहे. या विषाणूच्या मुळे बिआरआय सारख्या प्रकल्पाला नक्कीच झळ बसेल. चीनची अर्थव्यवस्थेला देखील फार मोठा फटका बसला आहे. सध्या आर्थव्यवस्था नकारात्मक प्रगति दाखवत आहे. २०१९ मध्ये देखील ६.१% ग्रोथ रेट असून जानेवारी पासून लॉकडाउन मुळे सारे बंद आहे त्यामुळे अर्थव्यवस्था डळमळीत झाली आहे.  जगात आयात निर्यात थांबली असल्याने चीनच्या अर्थव्यवस्थेला धक्का बसला आहेच तसेच अंतर्गत आर्थव्यव्स्थेमध्ये जून पर्यन्त ५ दशलक्ष नोकर्‍या चीनी नागरिकांनी गमावल्या असून डिसेंबरपर्यन्त हा आकडा ९ दशलक्ष होईल असा अंदाज आहे. बेरोजगारीचा दर ६.२% वर गेला आहे. २०१०ला २०२० साली चीनची जीडीपी दुप्पट करण्याचे एक ध्येय बाळगले होते परंतु कोरोनामुळे चीन या ध्येयापासून लांब गेला आहे.आत चीन कडे दोन मार्ग सअसणार आहे एक तर कोरोनाचा विषय संपवुन महासत्ता होणे किंवा चीनी मध्यमवर्गीय नागरिकांचा विचार करून त्याची अर्थव्यवस्था मजबूत करण्याठी प्रयत्न करणे. आपणास आता समजलेच असेल चीनी कम्यूनिस्ट सरकार कोणता मार्ग स्वीकारत आहेत. अडचणितली अर्थव्यवस्थ घेऊन बिआरआय प्रकल्प राबवणे चीनला जड जाऊ शकते. कम्यूनिस्ट सरकार या प्रकल्पामध्ये गुंतवणूक करण्यासाठी काशी गळ घालतात हे पाहाव लागेल. कारण या आधीच चीन ने बिआरआय अंतर्गत चीन चे सहयोगी देशाची अर्थव्यवस्थेवर देखील कर्जाचा बोजा वाढला आहे. पाकिस्तान इकनॉमिक कोरिडोर च्या माध्यमातून ८.२अब्ज डॉलर चीन गुंतवनुक केली आहे आणि जास्तीचे कर्ज पाकिस्तानच्या डोक्यावर बसवले आहे. तसेच बांगलादेश वर ३ अब्ज डॉलर. अफ्रीकान देशाची ही तीच हालात आहे. जे देश बिआरआयचा भाग आहेत ते सर्वच अडचणीत आहेत. हे पाहता चीन सरकार काही कंपनी ज्या कोरोंनामुळे दिवाळखोरीत आहेत त्यान कर्ज देणार आहे पण त्या काही मोजक्याच कंपनी असतील. शी जिंनपिंग यांचा स्वत: आखलेल्या १० गोष्टी आहेत ज्या चीनला महासत्ता बनवतील त्यात बिआरआय मधीळ Terrestial Skil Road आणि Martim Skil Road हे ८ आणि ९ नंबरवर आहेत. कदाचित चीनच्या अडचणी वाढल्या तर काही काळासाठी हे प्रकल्पमागे ठेवले जातील. आणि बिआरआयच्या धोरनात बदल घडवले जातिल. रोड,पूल,रेल्वे लाईन बारोबर 5G तंत्र्ज्ञान या प्रकल्पामध्ये जोडले जाऊ शकते. कोरोनाच्या पड्यामगे मास्क, मेडिकल डिप्लोमॅसी करत बिआरआयचे धोराण चीन पुढे सरकवत आहे. एकूणच काही कलावधीसाठी या बिआरआच्या धोरानात बदल केले जातील काही प्रकल्प तात्पुरती स्थगिती दिली जाईल आणि पुन्हा संधि साधून चीन हे प्रकल्प पूर्ण करेल. जसे भारताने ओळखले आहे हे प्रकल्प देशाच्या सार्वभौमत्व, स्वातंत्रवर धोका निर्माण करू शकतात तसे ईतर देशांनी ओळखणे गरजेचे आहे.

 

प्रा डॉ अजिंक्य अजित पत्रावळे

रसायनशास्त्र विभाग

विवेकानंद कॉलेज कोल्हापूर


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Corona Series Part 76 : कोरोना, आणि एन-९५ मास्कचा इतिहास

Corona Series Part 76 नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. https://ajinkya1030.blogspot.com/   कोरोना , आणि एन-९५ मास्कचा इतिहास कोरोनाचा संसर्ग होऊ नये या करिता मास्क वापरणे अनिवार्य झाले आहे. कोरोना योद्धा मास्क आणि पिपिई किट दोन्हीचा वापर करतात. भारतामध्ये मास्कचा वापर सध्या मार्च पासून वाढला असला तरी मास्कचा ईतिहास जवळपास ३०० वर्षापासूनचा आहे. मानव मास्क कसा , कशासाठी वापरू लागला. याची माहिती घेऊया. १७२०च्या दरम्यांन मारसेलीसच्या चित्रामध्ये मास्कचा वापर केलेला आढळून येतो मास्क म्हणण्यापेक्षा तोंडावर कापड लावलेले दिसून येते. अंदाजे त्यावेळी बुबोणिक प्लेग आला होता लाखो लोकांचा मृत्यू होत होते परंतु मृत्युचे कारन समजण्यापलीकडे होते . कारण त्याकाळी अजूनही विषाणू/ जिवाणूची संकल्पना अस्थित्वात नव्हती. मरणोत्तर मानवी शरीराला येणार वास आणि त्यामुळे हवा खराब होत आहे अशी एक धारणा होती हवा ही या रोगास कारणीभूत आहे असे वाटू लागले त्याला मियासमा म्हंटले जात. या मियासमा संकल्पन

Corona Series Part 1 : Clinical Trails starts on Corona

Corona Series Part 1 Corona धोका लक्षात घेता social media द्वारे जनजागृती करणे गरजेचे झाले आहे त्या माध्यमातून एक प्रयत्न करत आहे कृपया msg पूर्ण वाचून आपल्याला योग्य वाटल्यास पुढे पाठवा कोरोना जनजागृती मोहीम Clinical Trails starts on Corona जवळपास जगामध्ये 20 संस्था ह्या आजारावर vaccine बनवण्याचा प्रयन्त करत आहेत . जानेवारी 2020 मध्ये चीन मध्ये शास्त्रज्ञांनी कोरोना virus चे genetic मटेरियल चे sequencing चे decoding केले , अमेरिकेतील सरकारी संस्थामधील शास्त्रज्ञानी ह्या अभ्यासच फायदा घेत पुढे कांम चालू केले   1) (NIAID) National Institute of Allergy and Infection 2) Moderna Inc ह्या दोन संस्था मागील काही वर्षे MERS,   SARS- 1 वर काम करत आहेत त्यांना जेव्हा sequencing of gentic information of corona 2   मिळाली त्यांनी vaccine बनवण्याचे काम अहो रात्र चालू केले. अमेरिकेतील north washington जिथे मायक्रोसॉफ्ट चे बिल गेट्स व अनेक it कंपनीच्या चे केंद्र स्थान आहे अश्या शहरामध्ये Kiaser Permannente Washington Health Reseaech Institute (KPWHRI) मध्ये संशोधकांनी mRNA 1273 न

Corona Series Part 92 : कोरोना आणि Favipiravir

Corona Series Part 92 नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. https://ajinkya1030.blogspot.com/   कोरोना आणि Favipiravir सुरवातीच्या काळात चीन पाठोपाठ सिंगापूर , जपान , कोरिया या देशात कोरोंनाचे संक्रमण झालेली आपल्याळ दिसून येईल. तेव्हा पासूंनच चीन , सिंगापूर , जपान , कोरिया आणि जपान कोरोनापासून बचाव करण्यासाठी आपल्या तंत्रज्ञान आणि विविध शास्त्रामधील तज्ञ शास्त्रज्ञानाचा वापर करत नवीन संशोधन करत आहेत. या मधील Hydrocychloroquin, Remdesivir, Favipiravir, Lopinavir, Ritonavir ड्रग्स बरेच चर्चेत होते कारण या ड्रग्स ची चाचणी काहीअंशी यशस्वी होताना दिसत होती. भाग 3 , 47 , आणि 52 मध्ये या ड्रग्स बाबतीत सविस्तर उल्लेख केला आहे. फूजीफिल्मजी पूर्वी कॅमेरा मधील रोल बनवत होते त्यांचीच Toyama Chemicals कंपनीमरफट   जपानमध्ये सर्वात प्रथम Favipiravir बनवण्यात आले. दिनांक १८ मार्च २०रजी वुहाण मध्ये सर्वप्रथम Favipiravir ( Pyarzine derivative) ची ३४० रुग्णांवर ( clinical trials) करणात