Corona Series Part 97
नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे
सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती
करण्याचा प्रयत्न करत आहे. https://ajinkya1030.blogspot.com/
कोरोना आणि वर्ल्ड बँक
वर्ल्ड बँक International Bank of Reconstruction & Development (IBRD) आणि International Development Association (IDA), International Finance Carporation (IFC) अश्या विविध वित्तीय संस्थाची मिळून बनली आहे. विकसनशील देशअंतर्गत कोरोनाशी लढा
देण्यासाठी वर्ल्ड बँकने मदत म्हणून १.९ अब्ज डॉलर २५ देशांना देऊ केले आहेत, या मध्ये सर्वात मोठा वाटा भारताला १ अब्ज डॉलर
मिळाला आहे. वर्ल्ड बँकेचचे प्रमुक डेविड मालपास यांनी कोरोनाच्या काळातील वर्ल्ड बँकची
भूमिका स्पष्ट केली ही रक्कम मदत म्हणून गरीब आणि ज्या देशात कोरोनाशी लढण्यासाठी
वैद्यकीय सेवा कमी आहेत अश्या देशांना देण्यात येत आहे. या आधी ६५ देशात वर्ल्ड बँकमार्फत
मदतकार्य चालू झाले आहे. प्रामुख्याने दक्षिण आशियाई देश जसे भारत १ अब्ज डॉलर, पाकिस्तान २०० दशलक्ष डॉलर, श्रीलंका १२८ दशलक्ष डॉलर, अफगाणिस्थान १००
दशलक्ष डॉलर, मांगोलीय, याच बरोबार साऊथ अफ्रीका आणि दक्षिण अमेरिका मधील विकसनशील देश जिथे दाट
मनुष्य वस्ती आहे अश्या देशांना मदत केली आहे.
ही मदत कशी वापरावी याचे सर्व अधिकार त्या त्या देशाच्या
सरकारवर अवलंबून आहे. भारत सरकारने आधीच १.७३ लाख करोड रुपयाची मदत जाहिर केली आहे
त्यामुळे ही आलेली मदत प्रामुख्याने पीएम केअरच्या माध्यमातून कोरोनाचे निदान
लावणार्या लॅब तयार करण्यासाठी तसेच तपासणी चाचण्या, विलगीकरण आणि क्वारन्टाइन कक्ष बनवन्यासाठी वापण्यात येणार आहे. पाकिस्तान मध्ये हीच मदत कोरोनामुळे सर्वसामान्या लोकांची
अडचणीत आलेली अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी वापरली जाणार आहे. लॉकडाउनमध्ये नागरिकांना
खाद्य पुरवणे, १५ दशलक्ष डॉलर शिखणावर खर्च केले जाणार
आहेत. घाना सारख्या देशात ज्या लोकांचे लॉकडाउनमध्ये नोकरी गेली आहे त्यांना आर्थिक
मदत केली जानार आहे.
वर्ल्ड बँक कोरोना पूर्वी देखील १.७ अब्जं डॉलर ची मदत करत होते ती मदत आता कोरोनासाठी करण्यात
येणार आहे. वर्ल्ड बँकेच्या International Finance Corporationचा मधायमातून अडचणीत आलेल्या व्यवसायांना ८ अब्जं डॉलर कर्ज
स्वरुपात देण्यात येऊन IBRD च्या माध्यमातून
६ अब्जं डॉलर वैद्यकीय सेवा उपलब्ध करणायसाठी देण्यात येणार आहेत. तसेच पुढील १५ महिन्यामध्ये
१६० अब्जं डॉलर खर्च करण्याची तयारी ठेवली आहे. वर्ल्ड बँकच्या या वित्तीय आधारामुळे
विकसनशील देशांना कोरोना पासून मुक्त होण्याचा कालावधी कमी होईल.
प्रा डॉ अजिंक्य अजित पत्रावळे,
रसायनशास्त्र विभाग
विवेकानंद कॉलेज कोल्हापूर
New information read krayla bhetli tyat gk khup ch increase hot ahe sirr...so thanku very much sir 👍👍
ReplyDelete