Skip to main content

पुन्हा कधीही कोरोना सारख्या महामारीमुळे लेख लिहायची वेळ येऊ नये हीच ईश्वर चरणी प्रार्थना

नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे आज काय लिहावे आणि काय नको समजेनासे झाले आहे. तरी धाडस करून लिहित आहे. काही चुकले तर समजून घ्यावे ही विनंती.  

मार्च महिन्यामध्ये जगात नवीन विषाणू ने धुमाकूळ घातला होता सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. शास्त्रज्ञ, संशोधक, मीडिया, नेते, उद्योजक, आणि सामान्य जनता सर्वच नागरिकांना पुढे काय वाहून ठेवले आहे याची कल्पना नव्हती. परिस्थितीचे आकलन होण्याचा आतच लॉकडाउन झाला तेव्हा सुट्टीचा आनंद घेऊया असे समजून काही नागरिक मस्त मजेत होते. हळू हळू परिस्थिती बदलून गंभीर झाली, पण नेमके काय चालू आहे काय करावे आणि काय करू नये याचा अंदाज लागेना. मीडिया मध्ये रोज के भीतीदायक बातमी येऊ लागली कधी विषाणू वर असलेले उपाया येऊ लागले पण शास्त्रीय माहिती सजत नसल्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण होऊ लागले. अश्या मध्ये रसायनशास्त्राचा विद्यार्थी म्हणून कोरोना विषाणूच्या विरोधात  काही काम करावे असे वाटत होते परंतु संशोधन करण्यासाठी काही मर्यादा होत्या याचे भान होते पण शांत बसून चालणार नाही हे लक्षात आले होते. म्हणून मनातून ठरवले आज या संकटकाळी समजासाठी आपलाखरीचा वाटा देता येईल का. असा विचार करत असताना वाटले आपल्या बुद्धीला सजून उमगेल त्या गोष्टी शब्दात मांडूया आणि सोशल मीडियाच्या मार्फत जनजागृती करूया. असे ठरवून लिहायला घेतले पण नेमके काय लिहावे कसे लिहावे समजत नव्हते तरीही धाडस करून जे वाचनात येईल आणि मनातून सुचेल तसे मांडू पुढे ठरवू लिखाण पाठवायचे काय नाही. सर्व सामान्य व्यक्तिला ज्या गोष्टी सुचतील त्याच गोष्टी मलाही सुचल्या फक्त त्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला. 25 मार्च ला पहिलं लिखाण सुरवातीला फक्त विद्यार्थ्यांना पाठवते. मुलांना आवडले काहींनी पुढे काय होणार, औषध कधी येणार, कोरोना कधी जाणार, लक्षणे काय असे प्रश्न विचारले. यांचे समाधान करण्यामध्ये लेख मालिका सुरू झाली. हळू हळू सामाजिक, आर्थिक स्थितिवर, पर्यावरणवर वर परिणाम दिसू लागले आणि लेख मालिकेत शास्त्रीय विषया बरोबर सामाजिक, आर्थिक, पर्यावरण हे विषय आले.

सर्वात महत्वाचे म्हणजे लिखाणाला आपण सर्वांनी दिलेला प्रतिसाद. लिखाणात वाक्य रचना, वेलांटी उकारचा चुका असताना मुळ विषय आपणा समजून घेऊन भावार्थ समजून घेतला म्हणूंनच आज 100 भागाची लेखमालिका पूर्ण केली.

या कोरोनाचा लिखाणामुळे घरात बसूनच बर्‍याच नवीन लोकांशी संपर्क आला खूप नवीन मित्र झाले. आर्थिक, वैद्यकीय, पर्यावरण रसायन, जीव रसायन, जीवशास्त्र, समाजशास्त्रातील बरेच तज्ञ मंडळीशी संपर्क आला त्यांचाकडून वेलोवेळी सूचना आल्या कशावर भर द्यावा कुठे नको ईत्यादी. मीडिया हाऊस आणि पोलिस खात्यातील बरेच लोक चांगले मित्र बनले.

अडचणीत आलेल्या वैयक्तिक अर्थव्यवस्थेला व्याखान मालिकेमुळे चालना मिळाली. कोरोनाच्या बाबतीत वेबिनार, एफडीपी कोर्स मध्ये व्याख्यान देण्यास आमंत्रित केले गेले. मनात असताना पण वेळ मिळत नसल्यामुळे लिखाण केले जात नसे पण लॉकडाउनच्या काळात तोडक मोडक लिखाण करता आले ते फक्त आणि फक्त आपण सर्वाचे लाभलेले सहकार्य आणि प्रोत्साहन, त्यामुळे याचे सर्व श्रेय वाचकांना माझ्या महाविद्यालयातील सर्व सहकारी, विद्यार्थी, मित्र, आदरणीय गुरु, आणि माहीत नसणारे सर्वच वाचकांना जाते.

आज जुलैच्या सुरवातीला मार्च महिन्यासारखी परिस्थिती राहिली नाही. कोरोना अजूनही वाढतोय पण वैद्यकीय यंत्रणा सजग झाली आहे सुधारना ही होत आहेत. सामान्य लोकांना विषयाची खोली लक्षात आली आहे काही अजून सुधारले नाहीत पण त आहेत असेच राहतील. हीच योग्या वेळ आहे विराम घेण्याची कुठे तरी विराम देणे गरजेचे असते.

विराम घेतला म्हणजे सगळे बंद झाले असे नाही यापुढे अतिशय महत्वाचे कोरोनावरील शास्त्रीय संशोधन सर्वसामान्य नागरिकाच्या पर्यन्त पोहोचवण्यासाठी आवशक्यत असेल त्यावेळी कुवती प्रमाणे लेख लिहून ब्लॉग वर प्रसिद्ध करावा असा विचार आहे. तर मंडळी आपणास विनंती आहे ब्लॉग वर वेळ मिळेळ तेव्हा या आपण तिकडे भेटू.

पुन्हा कधीही कोरोना सारख्या महामारीमुळे लेख लिहायची वेळ येऊ नये हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

प्रा डॉ अजिंक्य अजित पत्रावळे

रसायनशास्त्र विभाग

विवेकानंद कॉलेज कोल्हापूर


Comments

  1. जेंव्हा पासून करोनाणे जगाला विळखा घालण्यास सुरवात केली तेंव्हापासून social मीडिया platform use करून समाजामध्ये
    त्याबद्दल ची इत्यंमभूत लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करणारे डॉ. अजिंक्य पत्रावळे सर!

    मनामधल्या प्रत्येक शंकांचे निरसन तसेच सर्व लेखांमधून जनजागृती हे अतिशय महत्वाचे काम त्यांनी केले आहे!

    प्रत्येक लेखमधली माहिती ही खप उपयुक्त आणि सहज समजणारी किंबहुना वास्तवाची जाणीव करून देणारी होती तसेच scientific दृष्ट्या अतिशय उपयुक्त होती. तुमच्या सारख्यांची खर तर गरज आहे आजच्या घडीला.

    social media च्या माध्यमातून अनेकांना जगाची आणि वर्तमान काळातील बदलेल्या जीवनाची ओळख या निमित्ताने वाचण्यात आली!

    खूप धन्यवाद आणि पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा💐

    डॉ. रेशमा पाटील

    करोना आणि जग या बद्दल ची संपूर्ण माहिती आपण त्यांच्या blogspot वरती पाहू शकता!

    ReplyDelete
  2. Thansk gor such great series plz continue the writeing

    ReplyDelete
  3. Thank u so much sir for such good information.

    ReplyDelete
  4. सर,आपण corona series च्या माध्यमातून लोकांना अतिशय चांगली आणि उपयुक्त माहिती दिलीत त्या बद्दल आपले खूप खूप आभार.
    एखाद्या नवीन विषयाला हात घालताना लागणारे कौशल्य आपल्यात पुरेपूर आहे आणि त्याला मुळातच असणारी आवश्यक subject knowledge ची जोड आहे.
    आताच्या सोशल मिडियाच्या जगात लोकांना बरेचदा चुकीची व हलक्या दर्ज्याची माहिती सहजपणे पसरत असते.अशावेळी आपल्यासारखी योग्य व्यक्ती समोर येऊन मौल्यवान माहिती देते ते आताच्या काळात खूप आशादायी आणि महत्वाचे आहे.
    शिवाजी लोहार,नावली,पन्हाळा

    ReplyDelete
  5. This information helps us to know all about Covid 19 pandemic tysm sir

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Corona Series Part 76 : कोरोना, आणि एन-९५ मास्कचा इतिहास

Corona Series Part 76 नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. https://ajinkya1030.blogspot.com/   कोरोना , आणि एन-९५ मास्कचा इतिहास कोरोनाचा संसर्ग होऊ नये या करिता मास्क वापरणे अनिवार्य झाले आहे. कोरोना योद्धा मास्क आणि पिपिई किट दोन्हीचा वापर करतात. भारतामध्ये मास्कचा वापर सध्या मार्च पासून वाढला असला तरी मास्कचा ईतिहास जवळपास ३०० वर्षापासूनचा आहे. मानव मास्क कसा , कशासाठी वापरू लागला. याची माहिती घेऊया. १७२०च्या दरम्यांन मारसेलीसच्या चित्रामध्ये मास्कचा वापर केलेला आढळून येतो मास्क म्हणण्यापेक्षा तोंडावर कापड लावलेले दिसून येते. अंदाजे त्यावेळी बुबोणिक प्लेग आला होता लाखो लोकांचा मृत्यू होत होते परंतु मृत्युचे कारन समजण्यापलीकडे होते . कारण त्याकाळी अजूनही विषाणू/ जिवाणूची संकल्पना अस्थित्वात नव्हती. मरणोत्तर मानवी शरीराला येणार वास आणि त्यामुळे हवा खराब होत आहे अशी एक धारणा होती हवा ही या रोगास कारणीभूत आहे असे वाटू लागले त्याला मियासमा म्हंटले जात. या मियासमा संकल्पन

Corona Series Part 1 : Clinical Trails starts on Corona

Corona Series Part 1 Corona धोका लक्षात घेता social media द्वारे जनजागृती करणे गरजेचे झाले आहे त्या माध्यमातून एक प्रयत्न करत आहे कृपया msg पूर्ण वाचून आपल्याला योग्य वाटल्यास पुढे पाठवा कोरोना जनजागृती मोहीम Clinical Trails starts on Corona जवळपास जगामध्ये 20 संस्था ह्या आजारावर vaccine बनवण्याचा प्रयन्त करत आहेत . जानेवारी 2020 मध्ये चीन मध्ये शास्त्रज्ञांनी कोरोना virus चे genetic मटेरियल चे sequencing चे decoding केले , अमेरिकेतील सरकारी संस्थामधील शास्त्रज्ञानी ह्या अभ्यासच फायदा घेत पुढे कांम चालू केले   1) (NIAID) National Institute of Allergy and Infection 2) Moderna Inc ह्या दोन संस्था मागील काही वर्षे MERS,   SARS- 1 वर काम करत आहेत त्यांना जेव्हा sequencing of gentic information of corona 2   मिळाली त्यांनी vaccine बनवण्याचे काम अहो रात्र चालू केले. अमेरिकेतील north washington जिथे मायक्रोसॉफ्ट चे बिल गेट्स व अनेक it कंपनीच्या चे केंद्र स्थान आहे अश्या शहरामध्ये Kiaser Permannente Washington Health Reseaech Institute (KPWHRI) मध्ये संशोधकांनी mRNA 1273 न

Corona Series Part 92 : कोरोना आणि Favipiravir

Corona Series Part 92 नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. https://ajinkya1030.blogspot.com/   कोरोना आणि Favipiravir सुरवातीच्या काळात चीन पाठोपाठ सिंगापूर , जपान , कोरिया या देशात कोरोंनाचे संक्रमण झालेली आपल्याळ दिसून येईल. तेव्हा पासूंनच चीन , सिंगापूर , जपान , कोरिया आणि जपान कोरोनापासून बचाव करण्यासाठी आपल्या तंत्रज्ञान आणि विविध शास्त्रामधील तज्ञ शास्त्रज्ञानाचा वापर करत नवीन संशोधन करत आहेत. या मधील Hydrocychloroquin, Remdesivir, Favipiravir, Lopinavir, Ritonavir ड्रग्स बरेच चर्चेत होते कारण या ड्रग्स ची चाचणी काहीअंशी यशस्वी होताना दिसत होती. भाग 3 , 47 , आणि 52 मध्ये या ड्रग्स बाबतीत सविस्तर उल्लेख केला आहे. फूजीफिल्मजी पूर्वी कॅमेरा मधील रोल बनवत होते त्यांचीच Toyama Chemicals कंपनीमरफट   जपानमध्ये सर्वात प्रथम Favipiravir बनवण्यात आले. दिनांक १८ मार्च २०रजी वुहाण मध्ये सर्वप्रथम Favipiravir ( Pyarzine derivative) ची ३४० रुग्णांवर ( clinical trials) करणात