Corona Series Part 95 नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. https://ajinkya1030.blogspot.com/ कोरोना , स्वाइन फ्लू समानता २०१५साली कोरोना सारखी वैश्विक महामारी नसली तरी स्वाइन फ्लू सारखी रोगराई पसरली होती. तेव्हा देखील कमी प्रमाणात असेच वातावरण निर्माण झाले होते. सार्स , मर्स असो वा स्वाइन फ्लू यापासून होणार्या आजारपनामध्ये काही समानता दिसून येत आहेत. चांगली किंवा वाईट कोणतीही गोष्ट ही अचानक एक दिवसात / काही महिन्यात तयार होत नाही ती हळू हळू वाढत असते आणि आचानक रोद्र रूप धारण केले की आपले नजरेस दिसू लागते. मानवाने निसर्गा मध्ये बरीच ढवळाढवळ केली आहे वेळो वेळी निसर्ग आपल्याला सूचना देत असतो पण आपण पाहून न पहिल्या सारखे करतो आणि मग आपण म्हणतो जसे सो सुनार की एक लोहार की तसे एकदाच सुनामी , महापुर किंवा अशी वैश्विक महामारी येते आणि माणसाने केलेले सर्व प्रगती खुंटुन जाते. निसर्गाने दिलेले संकेत ओळखून आपण त्यावर उपाया योजले नाहीत तर काय होत हे पाहत आहोत. कोरोना ज्...