Skip to main content

Corona Series Part 93 : कोरोना आणि अमेरिका

Corona Series Part 93

नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. https://ajinkya1030.blogspot.com/

 

कोरोना आणि अमेरिका

जगाची आर्थव्यवस्था सांभाळणारा, महासत्ता, विज्ञान आणि तंत्रज्ञानमध्ये सर्वात पुढे असणारा असा नावलौकिक मिळवलेला देश म्हणजे अमेरिका. खर तर नावलौकिका प्रमाणे कोरोनाव्हीआर अमेरिकेमध्ये लवकर नियंत्रण मिळवेल अशी अपेक्ष होती परंतु विपरीत परिस्थिती अमेरिकेमध्ये दिसत आहे आज रोजी बधितांची संख्या २३,५७,३२३ आणि मृत्यू १,२२,२५९ झाले आहेत, संख्या जास्त असण्याचे प्रमुख कारण म्हणजे चाचणी आता पर्यन्त २,८५,०५,६६१ चाचन्या झाल्या आहेत. तसेच या बाबतीत अधिक विश्लेषन करावयाचे झाले तर प्रमुख कारण समोर येते ते नोहेंबरमध्ये असनारी निवडणूक, अति-आत्मविश्वास, अति-तंत्रज्ञानावर अवलंबून राहणे, भोगोलिक परिस्थिती, पर्यटन, वर्ण भेद, लॉक डाउन उठवन्यासाठी आंदोलने अशी कारणे समोर येतील. बहुधा सर्वच प्रगतदेशात कोरोनाचा फैलाव होण्याची काही कारणे सारखीच आहेत.

अमेरिकेचे अध्यक्ष मा. डोनाल्ड ट्रम्प यांनी २०१६ साली सत्ता मिळवली तेव्हा पासून अमेरिका प्रथम, चांगली अर्थव्यवस्था, अधिक नोकऱ्या आणि उत्तम शेअर बाजार अशी अश्वासन दिली आणि त्या दृष्टीने वाटचाल करत ४ वर्ष उलटली आणि निवडणुकीचे बिगुल वाजले असता अचानक कोरोनाची महामारी आली आणि ट्रम्प यांची सारी मेहनत त्यांच्या डोळ्या देखत पाण्यात जाऊ लागली. अर्थव्यवस्था, अमेरिकन शेअर बाजार गडगडला आणि नवीन नोकरी सोडा आहे याच नोकर्‍या सांभाळणे कठीण होऊन बसले. भारताचा तुलनेत अमेरिकन नागरिकांची म्युच्युअल फंड मध्ये अधिक गुंतवणूक आहे शेअर बाजार गडगडला की मिळणारे उत्पन्न घटते. कोरोना आला शेअर बाजार गडगडला त्यामुळे राष्ट्रअध्यक्ष सहित सामान्य जनता निराश नकारात्म विचारा कडे झुकली. यातच संपूर्ण जगात कोरोनामुळे २.५ करोड नोकरी वर गंडातर येनार असून अमेरिकेमध्ये ४०लाख नोकर्‍या गमवल्या आहेत. २००८-०९ च्या मंदीमध्ये २.२ करोड नोकर्‍या गेल्या होत्या. या सार्‍याचा परिणाम कोरोनाचे रुग्ण संख्या आधिक होण्यात झाली.

दुसरे प्रमुख कारण म्हणजे पर्यटन, ईटली, फ्रांस, स्पेन, चीन, अमेरिका, पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेत ते कोरोंनाच्या रुग्न्संखेत देखील पहिल्या ५ मध्ये आहेत. अमेरिका- चीन मध्ये असनार व्यापार त्या निमित्ताने होणारा प्रवास या मुले अमेरिकेत रुग्ण संख्या वाढली. सूक्ष्मपातलीवर पहिले तर अमेरिकेतील न्यू-यॉर्क शहर संक्रमण होण्यामध्ये प्रथम क्र्मांकावर आहे. न्यू-यॉर्क शहरामध्ये होणरा व्यापार, पर्यटन आणि डाउन उठवन्यासाठी आंदोलने अशी प्रमुख कारणे कोरोना वाढीस कारणीभूत ठरली आहेत. तसेच संशोधनामध्ये असे आढळून आले आहेत जिथे तापमान ५ ते १२C च्या दरम्यान आहे तिथे संक्रमण होण्याच धोका अधिक आहे म्हणून टेक्सस पेक्षा अधिक रुग्ण न्यू-यॉर्क, न्यू-जर्सी, वॉशिंगटन ई. मध्ये आहेत. अमेरिकेत ज्या राज्यात अंदाजे १५C किंवा आधिक तापमान आहे तिथे संक्रमण कमी आहे. तसेच न्यू-यॉर्कमध्ये लोकसंख्या देखील अधिक आहे एका अर्थाने भारतामधील मुंबई प्रमाणेच अवस्था आहे.

निवडणुका जवळ असल्याने राजकीय आरोप-प्रत्यारोपच्या फेर्‍या मध्ये कोरोनाचा विषाणू अडकला आहे. खरतर सत्ताधारी आणि विरोधी दोन्ही पक्षांनी मिळून काम करणे गरजेचे असताना कोरोनाचे भांडंवल करण्यात येत आहे. या मध्ये कोरोंनाचा जनक चीन देखील दखल घेत डोनाल्ड ट्रम्प यांना अडचणीत आणत आहेत. या सार्‍या भानगडी मध्ये सामान्य जनता होरपळत आहे त्याची दाखल कोण घेणार.....!  

 

प्रा डॉ अजिंक्य अजित पत्रावळे,

रसायनशास्त्र विभाग

विवेकानंद कॉलेज कोल्हापूर

 


Comments

  1. Bhartatil condition bari ahe mg tyamanane

    ReplyDelete
  2. Nice information sir 👍👍 thanks sir 👍👍

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Corona Series Part 76 : कोरोना, आणि एन-९५ मास्कचा इतिहास

Corona Series Part 76 नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. https://ajinkya1030.blogspot.com/   कोरोना , आणि एन-९५ मास्कचा इतिहास कोरोनाचा संसर्ग होऊ नये या करिता मास्क वापरणे अनिवार्य झाले आहे. कोरोना योद्धा मास्क आणि पिपिई किट दोन्हीचा वापर करतात. भारतामध्ये मास्कचा वापर सध्या मार्च पासून वाढला असला तरी मास्कचा ईतिहास जवळपास ३०० वर्षापासूनचा आहे. मानव मास्क कसा , कशासाठी वापरू लागला. याची माहिती घेऊया. १७२०च्या दरम्यांन मारसेलीसच्या चित्रामध्ये मास्कचा वापर केलेला आढळून येतो मास्क म्हणण्यापेक्षा तोंडावर कापड लावलेले दिसून येते. अंदाजे त्यावेळी बुबोणिक प्लेग आला होता लाखो लोकांचा मृत्यू होत होते परंतु मृत्युचे कारन समजण्यापलीकडे होते . कारण त्याकाळी अजूनही विषाणू/ जिवाणूची संकल्पना अस्थित्वात नव्हती. मरणोत्तर मानवी शरीराला येणार वास आणि त्यामुळे हवा खराब होत आहे अशी एक धारणा होती हवा ही या रोगास कारणीभूत आहे असे वाटू लागले त्याला मियासमा म्हंटले जात. या मियासमा संकल्पन

Corona Series Part 1 : Clinical Trails starts on Corona

Corona Series Part 1 Corona धोका लक्षात घेता social media द्वारे जनजागृती करणे गरजेचे झाले आहे त्या माध्यमातून एक प्रयत्न करत आहे कृपया msg पूर्ण वाचून आपल्याला योग्य वाटल्यास पुढे पाठवा कोरोना जनजागृती मोहीम Clinical Trails starts on Corona जवळपास जगामध्ये 20 संस्था ह्या आजारावर vaccine बनवण्याचा प्रयन्त करत आहेत . जानेवारी 2020 मध्ये चीन मध्ये शास्त्रज्ञांनी कोरोना virus चे genetic मटेरियल चे sequencing चे decoding केले , अमेरिकेतील सरकारी संस्थामधील शास्त्रज्ञानी ह्या अभ्यासच फायदा घेत पुढे कांम चालू केले   1) (NIAID) National Institute of Allergy and Infection 2) Moderna Inc ह्या दोन संस्था मागील काही वर्षे MERS,   SARS- 1 वर काम करत आहेत त्यांना जेव्हा sequencing of gentic information of corona 2   मिळाली त्यांनी vaccine बनवण्याचे काम अहो रात्र चालू केले. अमेरिकेतील north washington जिथे मायक्रोसॉफ्ट चे बिल गेट्स व अनेक it कंपनीच्या चे केंद्र स्थान आहे अश्या शहरामध्ये Kiaser Permannente Washington Health Reseaech Institute (KPWHRI) मध्ये संशोधकांनी mRNA 1273 न

Corona Series Part 92 : कोरोना आणि Favipiravir

Corona Series Part 92 नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. https://ajinkya1030.blogspot.com/   कोरोना आणि Favipiravir सुरवातीच्या काळात चीन पाठोपाठ सिंगापूर , जपान , कोरिया या देशात कोरोंनाचे संक्रमण झालेली आपल्याळ दिसून येईल. तेव्हा पासूंनच चीन , सिंगापूर , जपान , कोरिया आणि जपान कोरोनापासून बचाव करण्यासाठी आपल्या तंत्रज्ञान आणि विविध शास्त्रामधील तज्ञ शास्त्रज्ञानाचा वापर करत नवीन संशोधन करत आहेत. या मधील Hydrocychloroquin, Remdesivir, Favipiravir, Lopinavir, Ritonavir ड्रग्स बरेच चर्चेत होते कारण या ड्रग्स ची चाचणी काहीअंशी यशस्वी होताना दिसत होती. भाग 3 , 47 , आणि 52 मध्ये या ड्रग्स बाबतीत सविस्तर उल्लेख केला आहे. फूजीफिल्मजी पूर्वी कॅमेरा मधील रोल बनवत होते त्यांचीच Toyama Chemicals कंपनीमरफट   जपानमध्ये सर्वात प्रथम Favipiravir बनवण्यात आले. दिनांक १८ मार्च २०रजी वुहाण मध्ये सर्वप्रथम Favipiravir ( Pyarzine derivative) ची ३४० रुग्णांवर ( clinical trials) करणात