Skip to main content

Corona Series Part 94 : कोरोना आणि कोरोनील, श्वासारी वटी


Corona Series Part 94

नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. https://ajinkya1030.blogspot.com/

 

कोरोना आणि कोरोनील, श्वासारी वटी

 भारतामध्ये zydus, Gelenmark, Cipla यांच्या Hydrocychloroquin, Favipiravir आणि Remdesivir या अॅलोपॅथी (इंग्लिश) औषधास भारत सरकारच्या ड्रग्स नियंत्रण विभागा कडून मान्यता मिळाली आहे. तसेच प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून अरसेनिक अल्बम आणि आयुर्वेदिक काढा तसेच डॉक्टरी सल्ल्याने Hydrocychloroquin आणि ईतर काही उपायास मान्यत दिली आहे. परंतु भारतीय ड्रग्स नियंत्रण विभागा कडून आतापर्यन्त कोणत्याही आयुर्वेदिक युनानी, किंवा होमिओपॅथी औषधास अशी मान्यत मिळाली नाही. अश्वगंधा बाबतीत काही संशोधन झाले आहे भाग ७०  मध्ये या बाबतीत माहीत उपलब्ध आहे परंतु अधिकारीकरित्या मान्यता नाही.

असे असताना पतंजलीजे आचार्य बालकृष्ण यांनी काल सांधयकाळी ६ते ७ दरम्यान ट्वीट केले दिनांक २३ जुन रोजी पुराव्यावर आधारित पहिले कोरोना वरील आयुर्वेदिक औषध प्रक्षेपीत होईल त्यामुळे आज बाबा रामदेव यांचा समूहाकडून काय कोणती घोषणा होणार यांकडे त्याचे शुभचिंतक, विरोधक, कोरोना पासून बाधित आणि सर्वच नागरिकाना उत्सुकता लागली होती. आणि अपेक्षेप्रमणे आज दुपारी १२ वाजता पत्रकार परिषद घेऊन बाबा रामदेव यांचा समूहाने कोरोनील श्वासारी वटी हे आयुर्वेदिक औषध प्रक्षेपीत केले. बाबा रामदेव यांचा दाव्यायानुसार श्वासारी वटीच्या अनेक वैद्यकीय चाचण्या झाल्या आहेत आणि त्यात कोरोना विषाणूची वाढ रोखली जाते असे संशोधन समोर आले आहे. पतंजलीच्या म्हणण्यानुसार श्वासारी वटीच्या सेवनाने ६९% रुग्ण ३ दिवसात कोरोनाच्या विळख्यातून बरे झाले आहेत तर ७ दिवसात १००% रुग्ण बरे झाले आहेत. तसेच पुढे जाऊन नियंत्रित वैद्यकीय चाचण्या केल्या जाणार आहेत.

मुळात या वटी मध्ये असणारे औषधी कोणत्या आहेत आणि त्याचे कार्य काय असेल याची माहीत देण्यात आली. अश्वगंधा (व्हीटानीया सोम्निफेरा) अधिक माहिती साठी भाग ७० वाचा, अश्वगंधा विषाणूचे रिसेप्टर बाइंडिंग डोमेन आणि मानवी पेशीमधील ACE- २ एन्झाइम यांचा होणार संपर्क टाळतो.

गुळवेल (अमृता, मधुपर्णी, टिनोस्पोरा कॉर्डिफोलिया) गुळवेल एक नैसर्गिक अमृतकुंभ ...!!!" असा उल्लेख या वनस्पतीबाबत बऱ्याच ऋषींनी केलेला आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये आढळतो. एक संदर्भ असा ही आहे की, राम आणि रावण यांच्या युध्दानंतर देवांचा राजा इंद्र देवाने अमृता पाऊस पाडून राक्षसांमुळे मारल्या गेलेल्या वानरांना पुर्नजीवन दिले. पुर्नजीवन दिलेल्या वानरांच्या अंगावरील अमृताचे थेंब थेंब जिथे जिथे पडले तिथे गुळवेल वनस्पती उगवली.  गुळवेलाला आयुर्वेदात अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणूनच आयुर्वेदामध्ये गुळवेलाला अमृता असं नाव देण्यात आलं आहे. अगदी नावानुसार ही बहुगुणी वनस्पती अमर आहे रोगप्रतिकार शक्तिची वाढ, रक्त वाढ, खोकला, मधुमेह, पचनास मदत अशी विविध रोगांवर गुणकारी आहे. जमिनीमधील पाण्याची पातळी कितीही कमी झाली तरी ही वनस्पती सुकत नाही. गुळवेलमुळे औषधाच मानवी शरीररावर कोणताही नकारात्मक परिणाम होत नाही.

तिसरा घटक म्हणजे तुळस. तुळसीचे गुणधर्म माहीत नसनारे भारतात क्वचित काही लोक असतील. तुळस Favipiravir आणि Remdesivir जे काम करते तेच काम करते. म्हणजेच RNA-dependent RNA polymerase (RdRP) नामक एन्झाइम जे विषाणूच्या प्रजननास मदत करते त्याचे काम बिघडवते. पतंजली समुहाचे हे कार्य अमेरिकेच्या अंतरराष्ट्रीय जर्नल Biomedicine Pharmacotherepy मध्ये प्रसिद्ध झाले आहे.

चौथा घटक श्वासारी चा रस कोरोनाचा संक्रमनामुळे होणारा घट्ट कफ बणण्याची प्रक्रिया थांबवतो आणि बनलेला कफ शरीरातून बाहेर टाकण्यास मदत करतो. आणि फुफुसला आलेली सूज व दाह कमी करण्यास मदत करतो.  

पुढच्या आठवड्यामध्ये या औषधाचे किट फक्त ५४५ रुपयाला सर्व पतंजली स्टोअर्स मध्ये उपल

ब्ध होणार असून प्ले स्टोअरवर एक अॅप्लिकेशन प्रक्षेपीत होणार आहे जेणेकरून घर बसल्या हे औषध मागवता येईल.  

सध्याचा आठवड्यामध्ये पुष्कळ औषधे समोर आली आहेत अजूनही काही औषधे मान्यत मिळण्याचा प्रक्रियेमध्ये आहेत परंतु कोरोनाचा जगभरातील विळखा पहिला तर झालेले संशोधन फार मोठे नाही त्यामुळे या औषधास त्यांचा कंपन्या किती चांगले औषध म्हणत असतील तरीही कोरोनाचे रामबाण औषध म्हणता येणार नाही. यामधील बरीच औषधे केवळ प्रतिबंधात्मक आहेत हे सहसा सामान्या लोकांना समजून येत नाही सर्व काही विपणन, जाहिरातबाजी चा खेळ असतो म्हंटल जात भित्यापोती भ्रम्हराक्षस घाबरला की औषधाचा भडिमार केला जातो काही ठिकाणी असे घडते हा वेगळा विषय आहे असो परंतु आयूर्वेदामध्ये असे मोठे संशोधन भारतात होणे ही खूप मोठी सकारात्माक बाब आहे. भविषयत होणार्‍या संशोधनात कोरोनील, (श्वासारी वटी) आयूर्वेद यशस्वी होवो ही अपेक्षा.

प्रा डॉ अजिंक्य अजित पत्रावळे,

रसायनशास्त्र विभाग

विवेकानंद कॉलेज कोल्हापूर


Comments

  1. A really great achievement in response to PM Midi's slogan of "Aatmanirbhar Bharat "...👍

    ReplyDelete
  2. Very nice information sir 👍👍 thanks sir 👍👍...

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Corona Series Part 76 : कोरोना, आणि एन-९५ मास्कचा इतिहास

Corona Series Part 76 नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. https://ajinkya1030.blogspot.com/   कोरोना , आणि एन-९५ मास्कचा इतिहास कोरोनाचा संसर्ग होऊ नये या करिता मास्क वापरणे अनिवार्य झाले आहे. कोरोना योद्धा मास्क आणि पिपिई किट दोन्हीचा वापर करतात. भारतामध्ये मास्कचा वापर सध्या मार्च पासून वाढला असला तरी मास्कचा ईतिहास जवळपास ३०० वर्षापासूनचा आहे. मानव मास्क कसा , कशासाठी वापरू लागला. याची माहिती घेऊया. १७२०च्या दरम्यांन मारसेलीसच्या चित्रामध्ये मास्कचा वापर केलेला आढळून येतो मास्क म्हणण्यापेक्षा तोंडावर कापड लावलेले दिसून येते. अंदाजे त्यावेळी बुबोणिक प्लेग आला होता लाखो लोकांचा मृत्यू होत होते परंतु मृत्युचे कारन समजण्यापलीकडे होते . कारण त्याकाळी अजूनही विषाणू/ जिवाणूची संकल्पना अस्थित्वात नव्हती. मरणोत्तर मानवी शरीराला येणार वास आणि त्यामुळे हवा खराब होत आहे अशी एक धारणा होती हवा ही या रोगास कारणीभूत आहे असे वाटू लागले त्याला मियासमा म्हंटले जात. या मियासमा संकल्पन

Corona Series Part 1 : Clinical Trails starts on Corona

Corona Series Part 1 Corona धोका लक्षात घेता social media द्वारे जनजागृती करणे गरजेचे झाले आहे त्या माध्यमातून एक प्रयत्न करत आहे कृपया msg पूर्ण वाचून आपल्याला योग्य वाटल्यास पुढे पाठवा कोरोना जनजागृती मोहीम Clinical Trails starts on Corona जवळपास जगामध्ये 20 संस्था ह्या आजारावर vaccine बनवण्याचा प्रयन्त करत आहेत . जानेवारी 2020 मध्ये चीन मध्ये शास्त्रज्ञांनी कोरोना virus चे genetic मटेरियल चे sequencing चे decoding केले , अमेरिकेतील सरकारी संस्थामधील शास्त्रज्ञानी ह्या अभ्यासच फायदा घेत पुढे कांम चालू केले   1) (NIAID) National Institute of Allergy and Infection 2) Moderna Inc ह्या दोन संस्था मागील काही वर्षे MERS,   SARS- 1 वर काम करत आहेत त्यांना जेव्हा sequencing of gentic information of corona 2   मिळाली त्यांनी vaccine बनवण्याचे काम अहो रात्र चालू केले. अमेरिकेतील north washington जिथे मायक्रोसॉफ्ट चे बिल गेट्स व अनेक it कंपनीच्या चे केंद्र स्थान आहे अश्या शहरामध्ये Kiaser Permannente Washington Health Reseaech Institute (KPWHRI) मध्ये संशोधकांनी mRNA 1273 न

Corona Series Part 92 : कोरोना आणि Favipiravir

Corona Series Part 92 नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. https://ajinkya1030.blogspot.com/   कोरोना आणि Favipiravir सुरवातीच्या काळात चीन पाठोपाठ सिंगापूर , जपान , कोरिया या देशात कोरोंनाचे संक्रमण झालेली आपल्याळ दिसून येईल. तेव्हा पासूंनच चीन , सिंगापूर , जपान , कोरिया आणि जपान कोरोनापासून बचाव करण्यासाठी आपल्या तंत्रज्ञान आणि विविध शास्त्रामधील तज्ञ शास्त्रज्ञानाचा वापर करत नवीन संशोधन करत आहेत. या मधील Hydrocychloroquin, Remdesivir, Favipiravir, Lopinavir, Ritonavir ड्रग्स बरेच चर्चेत होते कारण या ड्रग्स ची चाचणी काहीअंशी यशस्वी होताना दिसत होती. भाग 3 , 47 , आणि 52 मध्ये या ड्रग्स बाबतीत सविस्तर उल्लेख केला आहे. फूजीफिल्मजी पूर्वी कॅमेरा मधील रोल बनवत होते त्यांचीच Toyama Chemicals कंपनीमरफट   जपानमध्ये सर्वात प्रथम Favipiravir बनवण्यात आले. दिनांक १८ मार्च २०रजी वुहाण मध्ये सर्वप्रथम Favipiravir ( Pyarzine derivative) ची ३४० रुग्णांवर ( clinical trials) करणात