Skip to main content

Corona Series Part 95 : कोरोना, स्वाइन फ्लू समानता


Corona Series Part 95

नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. https://ajinkya1030.blogspot.com/

 

कोरोना, स्वाइन फ्लू समानता

२०१५साली कोरोना सारखी वैश्विक महामारी नसली तरी स्वाइन फ्लू सारखी रोगराई पसरली होती. तेव्हा देखील कमी प्रमाणात असेच वातावरण निर्माण झाले होते. सार्स, मर्स असो वा स्वाइन फ्लू यापासून होणार्‍या आजारपनामध्ये काही समानता दिसून येत आहेत. चांगली किंवा वाईट  कोणतीही गोष्ट ही अचानक एक दिवसात / काही महिन्यात तयार होत नाही ती हळू हळू वाढत असते आणि आचानक रोद्र रूप धारण केले की आपले नजरेस दिसू लागते. मानवाने निसर्गा मध्ये बरीच ढवळाढवळ केली आहे वेळो वेळी निसर्ग आपल्याला सूचना देत असतो पण आपण पाहून न पहिल्या सारखे करतो आणि मग आपण म्हणतो जसे सो सुनार की एक लोहार की तसे एकदाच सुनामी, महापुर किंवा अशी वैश्विक महामारी येते आणि माणसाने केलेले सर्व प्रगती खुंटुन जाते. निसर्गाने दिलेले संकेत ओळखून आपण त्यावर उपाया योजले नाहीत तर काय होत हे पाहत आहोत.

कोरोना ज्या पद्धतीने भारतता पसरत आहे त्यात आणि स्वाइन फ्लू या मध्ये काही समानता आहेत का हे पहिले तर समजून येते २००२. २०१३, २०१५ साली निसर्गाने मानवास काही सिग्नल दिले होते परंतु आपण त्याचा कडे काना डोळा केला. भारतात महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, तमिनाडू आणि राजस्थान या ५ राज्यात जावपास ७०% कोरोंना संक्रमितांची संख्या दिसून येईल. याच राज्यामध्ये स्वाइन फ्लू चे रुग्ण अधिक आढळून आले होते. केरळ देखील होते पण केरळ प्रशासनाने वेळीच पावले उचलत परिस्थिति आटोक्यात आणली. या ५ राज्यात कोरोना आणि स्वाइन फ्लू सारखे विषाणू पसरण्याची काही कारणे आहेत का जाणून घेऊया.

आरोग्य मंत्रालया मार्फत काम करणारी नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल संस्थेच्या डेटा प्रमाणे २०१९ साली राजस्थान, गुजरात, दिल्ली, महाराष्ट्र आणि तमिळनाडू या राज्यात ५४% स्वाइन फ्लू चे रुग्ण होते. तसेच २०१८साली तमिळनाडू, महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात आणि दिल्ली, या राज्यात ६५% स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळून आले. आणि आज २०२० मध्ये देखील याच ५ राज्यात कोरोनाचे रुग्ण अधिक आहेत. याचे प्रमुख कारणं म्हणजे भारतात सर्वात जास्त   औद्योगिकीकरण, आणि आर्थिक हालचाली घडणारी आणि अत्यंत दाट लोकसंख्या असनारी राज्ये आहेत. तुलनेने उत्तर प्रदेश, आणि बिहार देखील जास्त लोकसंखा असणारी राज्ये आहेत पण कोरोना आणि स्वाइन फ्लूचा फैलाव अधिक नाही कारण औद्योगिकीकरण आणी आर्थिक घडामोडी कमी आहेत. यूपी, बिहार मध्ये बाहेर जाणारे आणि वरील ५ राज्यात उच्च, मध्यम आणि मजरू यांचे येणारे असे सर्वाचे स्थलांतर अधिक आहे. आणि म्हणूनच औद्योगिकीकरना बरोबर सफाई आणि ईतर बाबाईन वर पडलेला तान, आरोग्य वरील दुर्लक्ष यामुळे रोगराई चालून आली आहे.

स्वाइन फ्लू आणि कोरोंना, दोन्ही आजार रोगकारक विषाणूकडून मानवात येताता. दोन्ही विषाणूचा स्त्रोत हे मनुष्य विहरीत आहेत दोन्ही ही विषाणू zoonotic पद्धतीने स्थलांतरित झाले. दोन्ही विषाणू जरी वेगवेगळ्या कुटुंबातून असले तरीही दोन्ही विषाणू श्वसनसंस्थे वर आघात करतता. दोन्ही फुफ्फुसात घुसखोरी करतात आणि फुफ्फुसाला संसर्ग करतात. दोन्ही विषाणूची पसरण्याची पद्धत सारखीच आहे. मृत्यूचे प्रमाण थोडेफार कमी अधिक आहे. स्वाइन

फ्लूचा विषाणू कोरोना विषाणू पेक्षा अधिक बळकट आहे कारण मृत्यूचे प्रमाण अधिक आहेच आणि निरोगी, तरुण व्यक्तीस बाधा करतो. ६० वर्षा खालील लोकांके मृत्यू प्रमाण अधिक होते. तर कोरोनामध्ये हाच धोका ६० वर्षा वरील लोकाना आहे आणि निरोगी व्यक्ति पेक्षा मधुमेह, हृदय, श्वसनसंस्थेचा विकारणे आजारी व्यक्तीस धोका अधिक आहे. कोरोना विषाणू नवीन आहे त्यामुळे अजून त्यावर संशोधन चालू आहे. स्वाइन फ्लू आणि कोरोनाची बाधा झाली आहे किंवा नाही हे पाहण्यसाठीची सुविधा त्यांनतरची आरोग्य सुविधा पण तुरळक आहे.

 म्हणजेच जर आपण स्वाइन फ्लू पासून बोध घेतला असता तर आज कोरोंनाचा कुरापती कमी करून आपण परिस्थिति लवकर नियंत्रणात आणू शकलो असतो. दुर्दैवाने आपण असे केले नाही पण आता तरी आपण सुधारूया.   

 

प्रा डॉ अजिंक्य अजित पत्रावळे,

रसायनशास्त्र विभाग

विवेकानंद कॉलेज कोल्हापूर

 


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Corona Series Part 39 : कोरोना, आणि लस निर्मिती मधील भारतीयांचा सहभाग

Corona Series Part 39       नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणू चा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. कोरोना , आणि लस निर्मिती मधील भारतीयांचा सहभाग जगात असा एक ही देश नसेल जिथे ज्ञानाचा भंडार असणारे भारतीय लोक त्या देशाच्या प्रगतिमध्ये सहभागी नाहीत. कोरोनाच्या लढ्यात तरी हे मागे कशी राहतील. सिरम इंडिया लिमिटेड पुणे स्थित जैव तंत्रज्ञानातील अग्रणी कंपनी आहे यां कंपनीचे वैशिष्ट्य म्हणजे या पूर्वी ही hepatitis, पोलीओ , स्वाइन फ्लू इत्यादि आजारामध्ये लस निर्माण करण्याचे महत्वाचे योगदान आहे. वर्षभरात १.५ अब्ज लसीचे डोस अतिशय माफक दरात तयार करण्याची क्षमता असणारी या कंपनीचे उत्पादन यूरोपियन देशात व संशोधन यूनिट पुणे सारख्या शहरात आहे. भारतामध्ये एक ही नोबेल परितोषिक किवा औषधाचा स्वामित्व हक्क नाही तरीही औषध , लस उत्पादन करण्यात प्रावीण्य , विश्वसनीय नावलौकिक मिळवणारा देश आहे. जावपास ८०% लस आफ्रिका सारख्या देशात पुरवेल जातात. कोरोनाची लस निर्माण करण्यासाठी न्यूयॉर्क मधील codagenic या...

Corona Series Part 56 : कोरोना, आणि ई-शिक्षण

Corona Series Part 56 नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. आजचा विषय विस्तृत मांडला आहे.   या विषया बाबतीत आपण आपले मत ब्लॉगवर जरूर कळवावे ही विनंती.     https://ajinkya1030.blogspot.com   कोरोना , आणि ई-शिक्षण मार्च महिन्यापासन कोरोनाचा प्रभाव दिसू लागला शेवटच्या आठवड्यापासून शाळा , कॉलेज लॉकडाउनच्या काळापासून आज पर्यन्त बंद करण्यात आल्या. भितीदायक वातावरणामध्ये १० , १२वी च्या परीक्षा घेण्यात आल्या. शैक्षणिक वर्ष २०१९-२० चे कार्य संपत आले होते परंतु लेखी आणि मौखिक परीक्षा राहिल्या होत्या . आणि आता यूजीसीच्या मार्गदर्शंनानुसार त्या राहूनच जातील. किंवा काही अंशी तात्पुरती योजना राबवून काही ना काही मार्ग काडला जाईल.   नैसर्गिक आपत्ती महापुर , वैश्विक महामारी मधून शैक्षणिक क्षेत्रा समोर नवीन आव्हान उभे राहिले आहे. खाजगी , काही सरकारी शाळा , कॉलेजने देखील तात्पुरती सोय करण्यासाठी ऑनलाइन तास झूम , गूगल क्लासरूम , गूगल डॉक , यू ट्यूब , व्हाट्स अप...

पुन्हा कधीही कोरोना सारख्या महामारीमुळे लेख लिहायची वेळ येऊ नये हीच ईश्वर चरणी प्रार्थना

नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे आज काय लिहावे आणि काय नको समजेनासे झाले आहे. तरी धाडस करून लिहित आहे. काही चुकले तर समजून घ्यावे ही विनंती.   मार्च महिन्यामध्ये जगात नवीन विषाणू ने धुमाकूळ घातला होता सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. शास्त्रज्ञ , संशोधक , मीडिया , नेते , उद्योजक , आणि सामान्य जनता सर्वच नागरिकांना पुढे काय वाहून ठेवले आहे याची कल्पना नव्हती. परिस्थितीचे आकलन होण्याचा आतच लॉकडाउन झाला तेव्हा सुट्टीचा आनंद घेऊया असे समजून काही नागरिक मस्त मजेत होते. हळू हळू परिस्थिती बदलून गंभीर झाली , पण नेमके काय चालू आहे काय करावे आणि काय करू नये याचा अंदाज लागेना. मीडिया मध्ये रोज के भीतीदायक बातमी येऊ लागली कधी विषाणू वर असलेले उपाया येऊ लागले पण शास्त्रीय माहिती सजत नसल्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण होऊ लागले . अश्या मध्ये रसायनशास्त्राचा विद्यार्थी म्हणून कोरोना विषाणूच्या विरोधात   काही काम करावे असे वाटत होते परंतु संशोधन करण्यासाठी काही मर्यादा होत्या याचे भान होते पण शांत बसून चालणार नाही हे लक्षात आले होते. म्हणून मनातून ठरवले आज या संकटकाळी समजासाठी आप...