Skip to main content

Corona Series Part 91 : कोरोना आणि नोकरी

Corona Series Part 91

नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. https://ajinkya1030.blogspot.com/

 

कोरोना आणि नोकरी

मार्च महिना भारतामध्ये आर्थिक वर्ष समाप्तीचा महिना लहान, मोठे व्यापारी कर भरण्यात तर नोकरदार मूल्यांकनचा फॉर्म भरण्यात गुंग असतात जेणे करून केलेल्या कामाचे मूल्यांकन होऊन पगार वाढ मिळेल. कोरोनाच्या महामारी आली आणि सगळं गणितच बिघडून गेले. पगार वाढ सोडाच आहे ही नोकरी राहते की जाते अशी अवस्था माध्यम वर्गीय लोकांची झाली आहे. व्यापारी कर्जाचे हफ्ते कसे फेडू याचा विचार करत डोक्याला हात लावून बसला आहे. शेतकरी देखील पिकलेल्या मालाल किंमत नसल्यामुळे कवडी मोल विकून संसाराचा रहाट गाडा चालवत आहे. येणार्‍या पावसाळ्यात पुराचा धोका समोर दिसत आहे. एकूणच सर्वच वर्गाच्या मनात चिंता घर करून बसली आहे. चिंता करण्यासर्खा विषय आहेच.

साधारणपाने 1 आठवड्या पूर्वी इंडियन एक्सप्रेस दैनिका मध्ये कोणत्या नोकर्‍या, कुणाच्या नोकर्‍या (स्त्री, पुरुष, आणि जात) किती लोक बेरोजगार होणार या आधारावर एक विषय मांडला होता. आज या आर्टिकल मधील काही भागावार आपण थोडी चर्चा करूया. Center for Monitoring Indian Economy सारख्या खाजगी संस्था Consumer Pyramid Household Survey च्या माध्यमातून सर्वेक्षण चा एक नमुना करण्यात आला. सपूर्ण भारततमध्ये घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले नसले तरीही एक नमूना जो मांडला आहे त्याता चिंताजनक चित्रा समोर येत.

मार्च २०१९ ते मार्च २० भारतामध्ये एकूण ४०करोड व्यक्तिनकडे खाजगी, सरकारी, कंत्राटी, अश्या प्रकारच्या नोकरी होती. आज मार्च२० लॉकडाउन नंतर ३०% नोकर्‍यांवर गंडातर आले आहे. केलेल्या सर्वेक्षणनुसार २८ करोड नागरिक नोकरी करत आहेत म्हणजे जवळपास १२ करोड लोकांचा उदरनिर्वाचा मोठा प्रश्न निर्माण झाला. प्रामुख्याने रोजनदारी, हमाली, तसिका तत्वावरील कामगारांची नोकरीवर सर्वात जास्त आघात झाला आहे ९ करोड नागरिक या वर्गात आहे ज्यांचाकडे आज कोणत्याही प्रकारचा उत्पन्नाचा स्रोत नाही. लहान उद्योजक आणि त्यांचा कामगार समूह असे १.८२ करोड आणि पगारी नोकरदार कंत्राटी, आंशिक कायमस्वरूपी असे १.७८करोड नागरिकांची नोकरी गेली आहे. विशेष म्हणजे या मध्ये ग्रामीण महिला आणि दलित वर्गातील लोकांचा नोकर्‍या अधिक गेल्या आहेत असे निरीक्षण या सर्वेक्षण करणार्‍या कंपनीला मिळाले आहे.  काही वेळेस असे दिसून आले आहे नोकरी अशी आहे जिथे सर्वात जास्त कोरोनाचे संक्रमण होण्याची भीती आहे जसे की सफाई, आशा वर्कर ईत्यादी. कोरोनाचे संकट दूर झाले तरीही पुन्हा ४० करोडची संख्या ओलांडणे हे खरे मोठे आव्हान आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे नोकर्‍या आहेत त्यांना त्या वाचवन्यासाठी आणि ज्यांचा नोकर्‍या गेल्या त्यांना त्या पुन्हा मिळवण्यासाठी आटोकाट प्रयन्त करावे लागतील.

 

प्रा डॉ अजिंक्य अजित पत्रावळे,

रसायनशास्त्र विभाग

विवेकानंद कॉलेज कोल्हापूर

 


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Corona Series Part 39 : कोरोना, आणि लस निर्मिती मधील भारतीयांचा सहभाग

Corona Series Part 39       नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणू चा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. कोरोना , आणि लस निर्मिती मधील भारतीयांचा सहभाग जगात असा एक ही देश नसेल जिथे ज्ञानाचा भंडार असणारे भारतीय लोक त्या देशाच्या प्रगतिमध्ये सहभागी नाहीत. कोरोनाच्या लढ्यात तरी हे मागे कशी राहतील. सिरम इंडिया लिमिटेड पुणे स्थित जैव तंत्रज्ञानातील अग्रणी कंपनी आहे यां कंपनीचे वैशिष्ट्य म्हणजे या पूर्वी ही hepatitis, पोलीओ , स्वाइन फ्लू इत्यादि आजारामध्ये लस निर्माण करण्याचे महत्वाचे योगदान आहे. वर्षभरात १.५ अब्ज लसीचे डोस अतिशय माफक दरात तयार करण्याची क्षमता असणारी या कंपनीचे उत्पादन यूरोपियन देशात व संशोधन यूनिट पुणे सारख्या शहरात आहे. भारतामध्ये एक ही नोबेल परितोषिक किवा औषधाचा स्वामित्व हक्क नाही तरीही औषध , लस उत्पादन करण्यात प्रावीण्य , विश्वसनीय नावलौकिक मिळवणारा देश आहे. जावपास ८०% लस आफ्रिका सारख्या देशात पुरवेल जातात. कोरोनाची लस निर्माण करण्यासाठी न्यूयॉर्क मधील codagenic या...

पुन्हा कधीही कोरोना सारख्या महामारीमुळे लेख लिहायची वेळ येऊ नये हीच ईश्वर चरणी प्रार्थना

नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे आज काय लिहावे आणि काय नको समजेनासे झाले आहे. तरी धाडस करून लिहित आहे. काही चुकले तर समजून घ्यावे ही विनंती.   मार्च महिन्यामध्ये जगात नवीन विषाणू ने धुमाकूळ घातला होता सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. शास्त्रज्ञ , संशोधक , मीडिया , नेते , उद्योजक , आणि सामान्य जनता सर्वच नागरिकांना पुढे काय वाहून ठेवले आहे याची कल्पना नव्हती. परिस्थितीचे आकलन होण्याचा आतच लॉकडाउन झाला तेव्हा सुट्टीचा आनंद घेऊया असे समजून काही नागरिक मस्त मजेत होते. हळू हळू परिस्थिती बदलून गंभीर झाली , पण नेमके काय चालू आहे काय करावे आणि काय करू नये याचा अंदाज लागेना. मीडिया मध्ये रोज के भीतीदायक बातमी येऊ लागली कधी विषाणू वर असलेले उपाया येऊ लागले पण शास्त्रीय माहिती सजत नसल्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण होऊ लागले . अश्या मध्ये रसायनशास्त्राचा विद्यार्थी म्हणून कोरोना विषाणूच्या विरोधात   काही काम करावे असे वाटत होते परंतु संशोधन करण्यासाठी काही मर्यादा होत्या याचे भान होते पण शांत बसून चालणार नाही हे लक्षात आले होते. म्हणून मनातून ठरवले आज या संकटकाळी समजासाठी आप...

Corona Series Part 38 : कोरोना, आणि चीनी वैद्यकीय उपकरणे

Corona Series Part 38       नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणू चा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. कोरोना , आणि चीनी वैद्यकीय उपकरणे एखाद्या व्यक्तिच्या मजबूरीचा स्वतच्या फायद्यासाठी कसा उपयोग करून घेता येईल याचे सर्वोत्तम प्रशिक्षण चीनमध्ये मिळते. चीन म्हणजे धोखेबाजी , अविश्वास् याचा अनुभव सर्वांनी घेतला आहे तरी देखिल मजबूरी म्हणून काही व्यवहारीक जुगार चीनशी करावे लागत आहेत. त्यातील एक म्हणजे वैद्यकीय उपकरण खरेदी. नोहेंबर ते फेब्रुवारी च्या दरम्यान चीन मध्ये कोरोना चे संक्रमण जोरावर असल्याने चीन मधील काही प्रांत बंद होते , या विषाणूच्या बाबतीतील माहीत सुरवातीपासूंनच लपवण्यात आल्यामुळे चीन व्यतिरिक्त ईतर जग सुरळीत चालू होते , आणि एकदा हा विषाणू चीन मधून सार्‍या जगात पसरला तेव्हा ईतर देशांची या विषाणू च्या विरोधात लडण्याची तयारी नसल्याने विषाणूचे संक्रमण जलत गतीने पसरू लागले. तेव्हा वैद्यकीय उपकरणे जसे मास्क , तपासणी किट , संरक्षक किट , वेंटीलेटर , ईत्यादी उपकरणाची मागणी आणि ...