Skip to main content

Corona Series Part 92 : कोरोना आणि Favipiravir

Corona Series Part 92


नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. https://ajinkya1030.blogspot.com/

 

कोरोना आणि Favipiravir

सुरवातीच्या काळात चीन पाठोपाठ सिंगापूर, जपान, कोरिया या देशात कोरोंनाचे संक्रमण झालेली आपल्याळ दिसून येईल. तेव्हा पासूंनच चीन, सिंगापूर, जपान, कोरिया आणि जपान कोरोनापासून बचाव करण्यासाठी आपल्या तंत्रज्ञान आणि विविध शास्त्रामधील तज्ञ शास्त्रज्ञानाचा वापर करत नवीन संशोधन करत आहेत. या मधील Hydrocychloroquin, Remdesivir, Favipiravir, Lopinavir, Ritonavir ड्रग्स बरेच चर्चेत होते कारण या ड्रग्स ची चाचणी काहीअंशी यशस्वी होताना दिसत होती. भाग 3, 47, आणि 52 मध्ये या ड्रग्स बाबतीत सविस्तर उल्लेख केला आहे.

फूजीफिल्मजी पूर्वी कॅमेरा मधील रोल बनवत होते त्यांचीच Toyama Chemicals कंपनीमरफट  जपानमध्ये सर्वात प्रथम Favipiravir बनवण्यात आले. दिनांक १८ मार्च २०रजी वुहाण मध्ये सर्वप्रथम Favipiravir (Pyarzine derivative) ची ३४० रुग्णांवर (clinical trials) करणात आली आणि सर्वपरिणाम उत्तम आले होते. तसे पाहता Favipiravir प्रामुख्याने २०१४ साली इंफ्लुएंजा टाइप A,B आणि C, Japanese Flu, MERS आणि २०१६ साली अफ्रिका मध्ये ११,००० हजार लोकांचा मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या ईबोला वर वापरण्यात येत होते हा ड्रग्स वापरल्यानंतर मृत्यूदर ३०% वरुण १५% वर आला. इंफ्लुएंजा विषाणू आणि कोरोनाच्या विषाणू मध्ये साम्य असल्याचे आढळून आले आहे. जपान मध्ये २० ते ९० वर्ष असणार्‍या २२०० कोरोना रुग्णांवर Favipiravir वापरण्यात आले त्यामध्ये ८८% रुग्णांमध्ये विषाणूची जलद कपात झाल्याचे आढळून आले. आज ३००० रुग्णांनावर १८ क्लिनिकल ट्रायल्स चालू आहेत.

 

म्हणजे Favipiravir आता १००% कोरोना विषाणूचे औषध बनले का ? याचे उत्तर  आणशिक होय आणि नाही असे आहे.  कारण Favipiravir औषध फक्त अति सौम्य किंवा सौम्य लक्षणे असणार्‍या रुग्णांनावर गुणकारी ठरले आहे जे रुग्ण अतिदक्षता विभागात वेंटिलेटरवर आहेत असणे रुग्णामद्धे Favipiravir उपयुक्त नाही. Favipiravir आणि Remdesivir च्या काम करणायची पद्धत सारखीच आहे. कोरोना विषाणू सर्वप्रथम मानसाच्या शरीरातील पेशीमध्ये प्रवेश करतो आणि त्यांनतर स्वत:ची प्रतिकृती बनवतो. या प्रतिकृती बनवण्याच्या कार्यात त्याला RNA-dependent RNA polymerase (RdRP) नामक एन्झाइमची मदत घ्यावी लागते. Favipiravir आणि Remdesivir हे औषध या एन्झाइमची जागा घेते आणि ईथेच कोरोना विषाणूची फसगत होते. विषाणू औषध आणि एन्झाइम या मधला फरक समजून घेण्यास असमर्थ ठरत आणि विषाणूची प्रतिकृती बनायची प्रक्रिया थांबते. या मुळे होणारी बाधा वाढत नाही पुढे आपली रोगप्रतिकारक शक्ति या विषाणूला ओळखून अॅंटीबॉडीज बनवते आणि विषाणूचा नायनाट होऊन आपणास बरे वाटते.

 असे असले तरी फक्त Favipiravir ड्रग्स ला भारत सरकारने मान्यता दिली आले. कारण ग्लेनमार्क कंपनी मार्फत Favipiravir भारतामध्ये तयार केले जाणार आहे. तसेच हे औषध रुग्ण स्वतः घेऊ शकतो Remdesivir चे injection द्यावयास लागते तर Favipiravir गोळी च्या माध्यमातून देण्यात येते.

भारतामध्ये Central Drug Standerd Control Organization जी Diecetor Genral of Health Service and Minstery of Health and Family यांचा अधिपत्याखाली विविध ड्रग्स ना मानता देण्याचे काम करते. भारता बरोबर इटली, फ्रांस, यूके, अमेरिका, कॅनडा, ने देखील या ड्रग्सला मान्यता दिली आहे. येणार्‍या आठवड्या पासून हे औषध ईस्पितळ आणि औषध दुकानामध्ये fabiflu आणि avifavir या जेनेरीक नावाने १०३रुपये/गोळी असे ३४ गोळ्यांचे पाकीट ३५००रुपयाला उपलब्ध असले.  

 

कितीही गुणकारी असले तरीही स्वत: ठरवून औषध घेतल्यास जीवितास धोका होऊ शकतो. म्हणून डॉक्टरांचा चिठ्ठी शिवाय दिले जाणार नाही तसेच डॉक्टरांना देखील रूग्णाला पूर्व कळपाण देऊन मान्यता घेणे बंधनकारक आहे.

क्लिनिकल ट्रायल्स मध्ये स्टेज ३ मध्ये हा ड्रग्स उत्तम प्रतिसाद देत असला तरी अजून पूर्ण अभ्यास झाला नाही म्हणूनच भारत सरकारने गेल्न्मर्क कंपनीला Post Marketing Surveillance Trials करण्याच्या सूचना केल्या आहेत कारण हा ड्रग्स Teratogenic आई कडून अर्भकाकडे जानारा आहे. गर्भअवस्थेमध्ये मनुष्य प्राण्याची सर्वात जास्त वाढ होत असते असण्या वेळी जर हे औषध वापरले तर गर्भाची वाढ खुंटू शकते.  

Favipiravir सोबत सध्या क्लिनिकल ट्रायल्समध्ये Umifenovir (Arbidol), ACQH आणि Mycobacterium W जो Anti-Leprocy Drug आहे याची तपासणी चालू आहे भविष्यात हे देखील Favipiravirपेक्षा आधिक गुणकारी ठरावेत अशी आशा करूया.

प्रा डॉ अजिंक्य अजित पत्रावळे,

रसायनशास्त्र विभाग

विवेकानंद कॉलेज कोल्हापूर

 


Comments

  1. Very nice information sir 👍👍 thanks sir 👍👍

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Corona Series Part 76 : कोरोना, आणि एन-९५ मास्कचा इतिहास

Corona Series Part 76 नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. https://ajinkya1030.blogspot.com/   कोरोना , आणि एन-९५ मास्कचा इतिहास कोरोनाचा संसर्ग होऊ नये या करिता मास्क वापरणे अनिवार्य झाले आहे. कोरोना योद्धा मास्क आणि पिपिई किट दोन्हीचा वापर करतात. भारतामध्ये मास्कचा वापर सध्या मार्च पासून वाढला असला तरी मास्कचा ईतिहास जवळपास ३०० वर्षापासूनचा आहे. मानव मास्क कसा , कशासाठी वापरू लागला. याची माहिती घेऊया. १७२०च्या दरम्यांन मारसेलीसच्या चित्रामध्ये मास्कचा वापर केलेला आढळून येतो मास्क म्हणण्यापेक्षा तोंडावर कापड लावलेले दिसून येते. अंदाजे त्यावेळी बुबोणिक प्लेग आला होता लाखो लोकांचा मृत्यू होत होते परंतु मृत्युचे कारन समजण्यापलीकडे होते . कारण त्याकाळी अजूनही विषाणू/ जिवाणूची संकल्पना अस्थित्वात नव्हती. मरणोत्तर मानवी शरीराला येणार वास आणि त्यामुळे हवा खराब होत आहे अशी एक धारणा होती हवा ही या रोगास कारणीभूत आहे असे वाटू लागले त्याला मियासमा म्हंटले जात. या मियासमा संकल्पन

Corona Series Part 1 : Clinical Trails starts on Corona

Corona Series Part 1 Corona धोका लक्षात घेता social media द्वारे जनजागृती करणे गरजेचे झाले आहे त्या माध्यमातून एक प्रयत्न करत आहे कृपया msg पूर्ण वाचून आपल्याला योग्य वाटल्यास पुढे पाठवा कोरोना जनजागृती मोहीम Clinical Trails starts on Corona जवळपास जगामध्ये 20 संस्था ह्या आजारावर vaccine बनवण्याचा प्रयन्त करत आहेत . जानेवारी 2020 मध्ये चीन मध्ये शास्त्रज्ञांनी कोरोना virus चे genetic मटेरियल चे sequencing चे decoding केले , अमेरिकेतील सरकारी संस्थामधील शास्त्रज्ञानी ह्या अभ्यासच फायदा घेत पुढे कांम चालू केले   1) (NIAID) National Institute of Allergy and Infection 2) Moderna Inc ह्या दोन संस्था मागील काही वर्षे MERS,   SARS- 1 वर काम करत आहेत त्यांना जेव्हा sequencing of gentic information of corona 2   मिळाली त्यांनी vaccine बनवण्याचे काम अहो रात्र चालू केले. अमेरिकेतील north washington जिथे मायक्रोसॉफ्ट चे बिल गेट्स व अनेक it कंपनीच्या चे केंद्र स्थान आहे अश्या शहरामध्ये Kiaser Permannente Washington Health Reseaech Institute (KPWHRI) मध्ये संशोधकांनी mRNA 1273 न