Corona Series Part 64 नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. https://ajinkya1030.blogspot.com/ कोरोना , आणि व्हिएतनाम रुग्णसंखे नुसार देशाना क्रमांक दिला असता अमेरिका प्रथम क्रमांकावर आहे तर व्हिएतनाम १४२ क्रमांकावर आहे एकूण लोकसंख्या १० करोड आहे असून चीनशी सोबत सीमा जोडलेला देश आहे. आज पर्यन्त व्हिएतनाममध्ये फक्त ३२४ कोरोना बाधित रुग्ण सापडले असून त्यातील २६३ बरे झाले एकही मृत्युची नोंद नाही. साधारणपणे १९७५ च्या युद्धमुळे जागतिकस्तरावर वियतनाम चर्चेत आले. दक्षिण आणि उत्तर व्हिएतनाम मिळून नवीन देश निर्माण झाला. नवीन देश झाल्या पासून चीन प्रमाणे एकच पक्षाचे सरकार आहे. व्हिएतनाम चीनचे अनुकरण करणारे कम्यूनिस्ट सरकार असले तरी १९८० पासूनच अर्थव्यवस्था खुली करण्यात आली या मुळे जीडीपी २६१ लाख असून जागतिकस्तरावर ४७ क्रमांकावर आहे. एका अर्थाने व्हिएतनाम प्रगतिपथावर आहे परंतु कोरिया जपान सारखी प्रगति करत नाही. एकूण अर्थव्यवस्थेच्या ५% खर्च आरोग्यवार केला जातो. आरोग्य...