Corona Series Part 61
नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा
प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती
करण्याचा प्रयत्न करत आहे. https://ajinkya1030.blogspot.com/
कोरोना, आणि जगाची चीनमध्ये विशेष तपासणीची मागणी
अमेरिका,
जपान, आणि ऑस्ट्रेलिया या
देशांनी चीन मधील वुहाण लॅब मध्ये विशेष तपासणीची मागणी लावून धरली आहे. आंतरराष्ट्रीय
वाढता दबाव पाहता मागील आठवड्यात डब्ल्यूएचओ ने एक संकल्प पारित केला. या संकल्पा
पाठोपाठ यूरोपियन युनियन देखील या तीन देशाच्या सुरात सुर मिळवत आहे. या सार्या
भानगडीमध्ये चीन पहिल्यापासून विरोध करत आला आहे तसेच विविध देशांना धमकावण्याचा
प्रयत्न करत आहे. मुळात कोरोनाच्या बाबतीतत चीनमध्ये तपासणी होणे का महत्वाचे आहे
हे समजून घेणे गरजेचे आहे.
१) चीन मधून येणारा ही पहिली महामारी नाही. २००२
मध्ये आलेला सार्स, आणि
मर्स या दोन्ही विषाणूमुळे निर्माण झालेली महामारी आणि आता कोरोना एकाचा देशातून
असे मोठे विषाणू का निर्माण होत आहेत. २००२ मध्ये देखील चीन मधील नागरिकांनाचा विरोध चीनी
कम्यूनिस्ट सरकारने मोडून काढला. एकाच चूक सतत होत असेल तर ती चूक मुदामून केली
गेली असेल असे वाटणे साहजिक आहे.
२) कोरोना संदर्भात महत्वाची माहिती चीन कडून लपवली
गेली. २३ जानेवारीच्या आसपास वुहाण मधून सार्या घरगुती विमान सेवा बंद करण्यात
आली होतो परंतु आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक मात्र सुरळीत चालू होती असे करण्याचे
कारण आपल्या लक्षात आले असेल. चीनी नववर्षाचा दरम्यान वुहाण मधून ५० लाख लोक बाहेर
पडले होते आता घरगुती विमान सेवा बंद आणि आंतरराष्ट्रीय चालू असेल तर जास्तीत
जास्त लोक हे चीन सोडून जाताना हा विषाणू घेऊन सार्या जगात गेले. तेव्हा चीनने
सार्या जगाला या विषाणूचा धोका सांगितला का नाही !
३) चीन मध्ये चालू असनारे सारे संशोधन संस्था, संशोधक याना ताकीत देण्यात आली आहे कम्यूनिस्ट
सरकारला कल्पना दिल्या शिवाय कोणतेही संशोधान कुठेही प्रसारित करण्यास मनाई केली
गेली.
अमेरिका सुरवाती पासून चीनकडे चीन मधील कोरोना विशानूचे जिवंत नमुना मागत आहे
परंतु कोणत्याही प्रकारची मदत चीन कडून केली जात नाही.
४) मार्च मध्ये जेव्हा वैश्विक महामारीची घोषणा
झाली त्याचा आधी पासून चीनने सार्या जगाकडुन मास्क, रेस्पिरेटोर ईत्यादी वस्तूंची निर्यात करून घेतली. अमिरिकेकडून ५६ लाख मास्क घेण्यात आले. सार्या
वस्तूंचा निर्यात करून साठा केला. पुढे जाऊन या विषाणू पासून वाचण्यासाठी याच
वस्तु चीन कडून जगाला विकात घावे लागतील असे वाटले नव्हते कारण जगाला या विषाणूची
महत्व चीन ने समजूच दिले नाही.
५) चीन मध्ये देखील चीनी कम्यूनिस्ट सरकारचच्या
विरोधात बोलणार्याचा आवाज दाबला जात आहे. कोरोना विषाणूच्या बाबतीत चीनी
नागरिक कम्यूनिस्ट सरकार विरोधात कोणत्याही प्रकारची याचिका दाखल करू शकत नाही, कोणताही वकील या याचिकेचा भाग होत नाही कारण पोलिस आणि कम्यूनिस्ट पक्षाचे चेले नागरिक आणि
वकिलांना धमकावत आहेत.
या सार्या बाबी पहिल्या की आपल्या लक्षात येईल काहीतरी
गडबड नक्कीच आहे. चीन सारे पुरावे नष्ट करू पाहत आहे. तसेच तपासणीची मागणी करणार्या
देशाला चोराच्या उलट्या बोंबा या उक्ती प्रमाणे चीन सरकार संदेश देत आहे. आता
अश्या तपासणी करत बसण्यापेक्षा प्रत्येकाने आपल्या देशात काय चालू आहे ते पहावे.
चीनच्या या धोरणाचा विरोध जागतिक स्तरावर होणे गरजेचे
असले तरी त्यासाठी पुरावे असणे आवशक्य आहे म्हणून चीन मध्ये तपासणी करणे अत्यंत महत्वाचे
आहे.
प्रा डॉ अजिंक्य अजित पत्रावळे,
रसायनशास्त्र विभाग
विवेकानंद कॉलेज कोल्हापूर
https://ajinkya1030.blogspot.com
Correct ahe sir.... nice information 👍 thanks sir 👍👍....
ReplyDeleteNice information sir thank you
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDelete