Corona Series Part 62
नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा
प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती
करण्याचा प्रयत्न करत आहे. https://ajinkya1030.blogspot.com/
कोरोना, आणि चीनी कीटक मोहीम
प्रत्येक देशाची विशेष अशी खाद्य संस्कृती असते. भारतामध्ये विविधता असली तरी
कमी अधिक प्रमाणात साम्यता आहे मसाले, तांदूळ गहू, डाळ, दूध असे वस्तु सर्वत्र वापरल्या
जाताता. चीन सारखा देशाची खाद्य संस्कृती काय असेल विचार केला की मैदयाचे नूडल्स
सोबत सगळे जंगली प्राणी, पक्षी, किडे, कीटक आणि त्यांचे सूप नजरेसमोर येतता. याचे कारण
१९५८ साली आमलात आणलेल्या Four
Pest Campaign (४ कीटक मोहीम)
या मोहिमेमध्ये दिसून येईल.
१९०० शकातील सुरवातीचा काळ चीनसाठी फार काही चांगला नव्हता. आज चीन म्हंटले की
जे चित्र उभे राहते ते त्याकाळी स्वप्नात देखील दिसले नसेल. १९४९ साली चीन
मध्ये राजकीय सामाजिक बदल घडायला सुरवात झाली आणि चीन मध्ये कम्यूनिस्ट सरकार
उदयास आले. कम्यूनिस्ट सरकारने जणू काही प्रण केला होता आर्थिक,
सामाजिक, आणि आरोग्य या तिन्ही बाबाबतीत चीनला पुढे घेऊन
जायचे. कम्यूनिस्ट सरकारचा सर्वेसर्वा
माऊ जिदोंग याने शेती बरोबर आरोग्यावर विशेष लक्ष केन्द्रित केले. चीन मध्ये
रोगराई फार मोठ्या प्रमानात बळावलेळी होती. प्लेग, मलेरिया,
कॉलरा, क्षय, सारखे आजार भयंकर पसरत
होते यातून लाखो लोक मृत्यूमुखी पडले होते. या मुळे चीनच आरोग्य सुधारणा आणायची योजना आणली गेली. चीन मध्ये देखील
सुरवातीला पंचवार्षिक योजना आखल्या जायच्या त्यातील पहिली पंचवार्षिक योजना सुरळीत
चालली. परंतु दुसर्या योजनेत मात्र माऊ जिदोंग यांनी खूप मोठी उडी (Great Leap Forword) घेण्याची योजना बनवली. या मध्ये त्यांनी शेती आणि आरोग्यामध्ये आणि औदोगिकरनामध्ये
बदल करण्याचे ठरवले. औदोगिकरना बाबतीत
चर्चा पाहू. गावात प्रत्येक घरात उद्योग सुरू झाला पाहिजे असे धोरण आखले. चीनी
नेतृत्व कधीच कुणाचे म्हणणे ऐकून घेण्याचा मानसिकतेत नव्हते माऊ जिदोंग यांनी
घराघरात स्टील बनवायचे आदेश दिले होते. या योजने मध्ये कोणत्याही तज्ञ मंडळीचे
मत घेण्यात आले नाही. याचे परिणाम विचारात घेतले नाहीत. याच वेळी काम कमी आणि Great Leap Forword जाहिरातबाजी प्रचार, प्रसार जोराने करण्यात आला. परंतु चीन सरकार तोंडावर
आपटले. शेती
आणि आरोग्यच्या बाबतीतही असेच घडले. चीन मध्ये केलेल्या परीक्षणांनामध्ये माऊ जिदोंगना सांगन्यात आले ३ कीटक आणि १ पक्षी
असे आहेत, उंदीर, माशी,
डास आणि चिमणी यामुळे आरोग्य आणि शेती यांना धोका आहे. उंदीर, माशी, डास याच्या मुळे नक्कीच रोगराई पसरते. परंतु, चिमणीचे नाव उपद्रव देणार्यामध्ये
चुकीच्या परीक्षणं मधून बाहेर आले याची किंमत मात आज आपण भोगतोय. १ वर्षा मध्ये
चिमणी ४.५किलो धान्य फस्त करेते तेव्हा संपूर्ण चीन मध्ये किती चिमण्या आहेत किती
धान्य फस्त होते अशी आकडेवारी मांडली गेली, आणि चीन मध्ये फरमान लागू झाला ५ वर्षा वरील चीनी
नागरिकानी चिमणीला मारणे बंधनकारक करण्यात आले. तुलनेने माशी, डास मारणे फार मोठे काम नव्हते आणि उंदीर बिळात जाऊन शोधून काडवे लागत त्यासाठी
स्पर्धा, बक्षिसे देण्यात आली लहान मुले लगोरी, विविध युक्त्या करून ३ कीटक आणि
चिमणी मारण्याचे खेळ करू लागले. प्रत्येक रविवारी चिमणीची शिकार हा विषय बनला.
चीनी नागरिकांच्यामध्ये Great
Leap Forword जाहिरातबाजी प्रचार, प्रसारमूळे एक प्रकारचा खोटा जोश
निर्माण झाला होता, विचार न करता अश्या कृती करण्यात आल्या. आश्चर्य वाटेल १ वर्षा मध्ये सरकारी आकड्या नुसार १५ लाख उंदीर, १००० कोटी किलो माशी, १.१ कोटी किलो डास, १ अरब चिमण्याना मारले गेले. उंदीर,
माशी, डास मारल्यामुळे रोगराई नियंत्रणात आली परंतु चिमणी मारणे
यामुळे अन्नसाखळी
प्रचंड मोठा धोका निर्माण झाला. चिमणी चे प्रमुख खाद्य हे जीवजंतु,
नाकतोडे (locust) होते अचानक चिमण्या अन्नसाखळीमधून
गायब झाल्या मुळे locust चे
प्रामान ईतके वाढले की यांनी सारी शेती उधवस्त करून टाकली सारे भुईसपाट झाले. याच बरोबर Great Leap Forwordच्या चुकीचा संभ्रम होता या मुळे १०० किलो उत्पन झाले असेल तर सरकारला लोक
जास्त सांगू लागले त्यामुळे सरकार जास्तीत जास्त धान्य शेतकर्याकडून घेऊ लागले. या
सार्याचा परिणाम १९५९-१९६२ मध्ये असा झाला की सरकारी आकड्या नुसार १.५ करोड
आणि संशोधन आणि खाजगी आकडा ४ ते ४.५ करोड लोक उपासमारीने मरण पावले. शस्त्रिया
अभ्यासा व्यतिरिक्त राजकीय लोकांनी निसर्ग, आरोग्य आणि तंत्रज्ञान
याबाबाति घेतलेले निर्णय कसे अंगलट येतात याचे उदाहरण आहे.
आजच्या कोरोनाशी या ४ कीटाक मोहिमेचा काय नाते असेल?
जेव्हा उपासमारी आणि गरीबी वाढू लागली तेव्हा १९७०च्या दशकात चीनी सरकारने
आधिकारीकरित्या चीनी नागरिकांना सांगितले गेले आपण जंगली प्राणी,
कीटक, पक्षी यांची शिकार करा त्याची विक्री करण्यासाठी मार्केट उपलब्ध करून दिले जाईल. शून्य गुंतवणूक असल्याने चीनी कम्यूनिस्ट सरकारने जोरदार प्रसार
केला. आणि ईथुन या जंगली प्राणी पक्षी, कीटक जसे वाटवाघुळ, साप, झुरळ, पाल, खवले मांजर ईत्यादी खाण्याचे
प्रामान अधिक आधिक वाढले. २००२ मध्ये सार्स सारखा आजार आला तरी देखील चीन या जंगली
प्राण्यांच्या मार्केटवर बंदी आणली नाही. उलट हे सर्व चीनी लोकांच्या खाद्य संस्कृतीचा
एक भागच होऊन गेले. पुढे प्राण्याचे मास कच्चे खाण्यात येऊ लागले. जनावरे तपासणी न
करता पकडली जाऊ लागली, कोणतीही स्वचता बाळगली नाही. जे प्राणी एकमेकांच्या संपर्कात येत नव्हते ते
देखील संपर्कात येऊ लागले आणि या सर्व कारणामुळे जनावरामधील (zoonotic)
विषाणू विविध प्राणी, पक्षी यांच्या मार्फत मानवजातीत mutate होऊन येऊ लागले.
Great Leap Forwor ची
जाहिरातबाजी, चुकीची धोरणे आणि अशास्त्रीय कीटक मोहीम मुळे अन्नसाखळी मधील मानवी हस्तक्षेप
केला गेला नसता, तर
एवढ्या मोठ्या प्रमाणात जंगली मांस खाण्याची पद्धात चीन मध्ये आली नसती. आज कोरोंना सारखा महाभयंकार आजारचा उदय झाला नसता.
कोरोना, सार्स, मार्स या बाबतीत चीनचे कौतुक करावे तेवडे कमीच आहे.
प्रा डॉ अजिंक्य अजित पत्रावळे,
रसायनशास्त्र विभाग, विवेकानंद कॉलेज कोल्हापूर
https://ajinkya1030.blogspot.com
👍👍
ReplyDeleteNice information sir 👍 thanks sir 👍👍
ReplyDelete