Corona Series Part 63
नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे
सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती
करण्याचा प्रयत्न करत आहे. https://ajinkya1030.blogspot.com/
कोरोना, आणि चीनची फसवी आकडेवारी
चीन असा एक देश आहे जिथे चिनी कम्यूनिस्ट सरकार सत्य
काय आहे हे कोनलाही कळूच देत नाहीत सार्या गोष्टी लपवून ठेवणे त्यांना अतिशय
प्रिय आहे. चीनी नागरिकांना देखील सरकार विरोधात बोलण्याचे स्वातंत्र्य नाही हाच
नियम ते सार्या जगाला लागू करू पाहतात. ईतिहासामधील बरीच उदाहरणे देता येतील पण
आज आपण सध्या चालू असणार्या वैश्विक महामारी मधील आकडेवारी पाहू.
कोणत्या देशात कोरोनाचे किती रुग्ण झाले आहेत हे
पाहणायसाठी जेव्हा गूगल करतो तेव्हा जॉन होप्किंसन यूनिवर्सिटी मधील डेटा ट्रॅकर च्या
माध्यमातून आपल्याला रुग्णाची संख्या समजते. चीन मधील रुग्णाची संख्या पहिली तर ती
८२,९१९ दाखवते परंतु १ महिन्यापूर्वी
देखील ही आकडेवारी तेवढीच आहे याचे कारण चीन सरकारने जाहीर केलेली कोणतीही माहीत
अमेरिकेच्या सर्वरसाठी असेस होत नाही. काल परवा दैनिका मध्ये कोरोना रुग्णाच्या
संखेत भारत चीनच्या पुढे अशी बातमी होती. परंतु ही बातमी सत्य आहे असे समजणे योग्य
होणार नाही. कारण चीन मधील सैनिक विद्यापीठाने (National University of Defence Technology) कोरोना बाधितांची आकडेवारी जाहीर
केली ही संख्या गुगलवर दिसते त्यापेक्षा ८ पटीने जास्त आहे. चीनने पुरस्कृत केलेले
Zhan Hais हे या विद्यापीठामधील सूचना आणि
प्रसार विभागाचे प्रमुख असून चीनी कम्यूनिस्ट सरकारच्या मर्जी मधील एक व्यक्ति
आहेत. यांच्या परीक्षणानुसार ६.४०,००० रुग्ण कोरोंना
बाधित आहेत. या विद्यापीठाने रेखांश आणि अक्षांशचा वापर करत लोकांचे स्थान नाकी
करून ही आकडेवारी काढली त्या साठी त्यांनी सिटी स्कॅन चा वापर केला. मिळालेली
माहीत ही विश्वसनीय असण्याचे कारण चीनमध्ये लॉकडाउन च्या काळात चीन सैन्यदल पुढाकार
घेऊन रस्त्यावर उतरून सारी कामे करत होती आणि या विद्यापीठाचे चीनी सरकार बरोबर
असणारी जवळीक या दोन्ही गोष्टी मुळे समोर आलेली आकडेवारी खरी असावी असे वाटते.
परतू पुढे जाऊन ही माहीत देखील चीनने लपवली होती.
साधारणपणे रुग्णाच्या संखेचा आलेख पहिला तर तो वर चढत
जातो आणि संथ गतीने खाली येतो. आता चीन मध्ये मात्र ११ फेब्रुबारी पासून आज
पर्यंतचा आलेख पाहिला तर हा सामानी नाही याचे कारणं असे की ११, १३,१४ फेब्रुबारी रोजी
रुग्णाची संख्य अचानक खाली गेलेली दिसेल जवळपास २ ते ३००० रुघ परंतु १२
फेब्रुवारीला मात्र रुग्णाची संख्य १४,६००
एवढी प्रचंड वाढलेली दिसते. या दिवशी सिटि स्कॅनचे परीक्षण चीनी नागरिकान समोर चीन
ने आणून पहिले ईतका मोठा आकड पाहिल्यावर लगेचच परीक्षणाची आकडेवारी जाहीर करायची
थांबवली गेली असावी. ७ मार्च पासून चीन मध्ये १ रुग्णाची नोंद नाही परंतु या
परीक्षणामध्ये मात्र १४ आणि १७ मार्च ला १ रुग्ण दाखवण्यात आला आहे. या सर्व गोष्टीतून एक समजून येईल चीनमध्ये आपण
कल्पना करतोय त्याही पेक्षा जास्त रुग्ण संख्या असावी फक्त ती लपवली जाते किंवा
अनुकूल परिस्थिति पाहून हळू हळू प्रसिद्ध केली जात आहे.
चीनमधील रुग्णाची खरी संख्या कळणे महत्वाचे आहे कारण
चीन मधूनच या विषणूचा फैलाव झाला सुरवातीचा काळात कशा पद्धतीने विषाणूची बाधा
मानवास झाली, लक्षणे, यंत्रणा, मृत्यूदर, असया प्रकारची शास्त्रीय माहिती मिळू शकेल जी पुढे लस बनवण्यात अतिशय उपयुक्त
आहे. परंतु चीनच्या या फसवेगिरी मुळे चीन
ला या विषाणू पासून सार्या जगाची सुटका व्हावी असे वाटत नाही.
प्रा डॉ अजिंक्य अजित पत्रावळे,
रसायनशास्त्र विभाग, विवेकानंद कॉलेज कोल्हापूर
https://ajinkya1030.blogspot.com
Comments
Post a Comment