Corona Series Part 59
नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा
प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती
करण्याचा प्रयत्न करत आहे. https://ajinkya1030.blogspot.com/
कोरोना, ऑस्ट्रेलियाचा चीन विरोध आणि भारताचा सहभाग
१९४०च्या दशकापासून अमेरिका, कॅनडा, यूनाइटेड किंगडम, ऑस्ट्रेलिया, न्यूझिलँड या देशांनी मिळून (Five Eyes) एक
संघटन उभे केले. विवध देशातील चाललेल्या घडामोडी वर ही संघटना लक्ष ठेऊन असते. सध्या
कोरोंनाच्या बाबतीत विविध बातम्या बाहेर येत आहेत यामधील सत्य शोधण्या करिता हा
समूह वुहाण मधील लॅब मध्ये तपासणी करण्याची मागणी करीत आहे. परंतु चीन मात्र
परवानगी द्यायची सोडून या देशांना लक्ष करून धमकावयाचा प्रकार करीत आहे. वरील सर्व
देशामधील ऑस्ट्रेलिया, न्यूझिलँड आर्थिकदृष्ट्या फार
सक्षम नाहीत. ऑस्ट्रेलियाची अर्थव्यवस्था चीन वरील निर्यातीवर अवलंबून आहे. ऑस्ट्रेलिया
– चीन यांचा व्यवहार पहिला तर तो २०० अब्ज डॉलर एवढा आहे. ऑस्ट्रेलिया – अमेरिका, जपान, भारत यांच्या
बरोबरचा व्यवहार अनुक्रमे ७७, ७० ३० अब्ज डॉलर आहे.
या वरुण आपल्याला कल्पना येईल ऑस्ट्रेलियाची चीन वरील निर्भरता. ऑस्ट्रेलियाच्या
अर्थव्यवस्थेमध्ये शिक्षणक्षेत्राचा (३७.०६ अब्ज डॉलर, अर्थव्यवस्थेच्या ३०%) मोठा हातभार लागतो. चीन, भारत, नेपाळ, या देशातून विद्यार्थी शिकण्यास जाताना लाखो रुपये फी देताता. या मध्ये देखील
चीनि विद्यार्थी १२ अब्ज डॉलर रूपये आणि भारत ५.५ अब्ज डॉलर रूपये ऑस्ट्रेलिया
सरकारला देऊ करतता. या सार्या गोष्टीचा फायदा घेत चीन ऑस्ट्रेलियाला धमकी देत
आहे. ऑस्ट्रेलिया सतत वुहाणमध्ये कोरोना विषाणूच्या तपासणीची मागणी केली तर चीन
आर्थिक प्रथिबंध लावू शकेल असण्या प्रकारे चीन दबावतंत्राचे राजकारण करू लागला
आहे. ऑस्ट्रेलिया मधील चीनचे राजदूत म्हणतात जर एक आव्हान चीनी नागरिकांना केले
तर आमचे सर्व नागरिक ऑस्ट्रेलियातून येणार्या सार्या गोष्टीचा त्याग करतील असे
देशभक्त्त चीन मध्ये आहेत. देशभक्त जरी नसले तरी चीनी सरकार ऑस्ट्रेलिया मधील
सार्या वस्तु वापरणार्या सोबत दंडात्मक कारवाई करू शकतील.
अश्या वातावरणामध्ये ऑस्ट्रेलिया दबावात येऊन तपासणी
करण्याची मागणी मागे घेऊ शकतील.परंतु,
असे घडताना दिसत नाही ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन आणि परराष्ट्रा मंत्री
Maries Pahye यांनी अतिशय चाणाक्ष पद्धतींनी
परिस्थिति हताळली आहे. ते म्हणले चीनचे असे वागणे योग्य नाही. आर्थिक गोष्टी आणि
कोरोंनाची उत्तपती हे दोन्ही वेगळे विषय आहेत काही झाले तरी ऑस्ट्रेलिया या
धमक्यांना न जुमानता मागणी करत राहील. ऑस्ट्रेलियाच्या या धाडसी निर्णायचे स्वगातच
केले पाहिजे. आणि भारताने देखील ऑस्ट्रेलियाच्या भूमिकेचे समर्थन करण्यासाठी येऊ
घातलेल्या ७३व्या दोन दिवसीय World Health Assamble (WHA)च्या बैठकीमध्ये १९४ देशामधील
भारतासहित १२० देशांनी ऑस्ट्रेलियाने आणलेल्या विषयाचे समर्थन केले. बैठक ऑनलाइन
होत असून सार्या देशातील आरोग्य मंत्री उपस्थित असणार आहेत, या बैठकीतूनच चीन मध्ये तपासणीची मान्यता देणायसाठी
चीनवर दबाव आणता येईल. या विषयाचा विरोधात आपले विध्वंसक शेजारी आणि चीनी
दाबबवत असणारे नेपाळ मात्र विरोधात मतदान करतील. या बैठकीमध्ये मान्यता मिळाली
तरी सार्या जगाला चीन विरोधात आणि कोरोनाचे मुळ शोध्यण्यासाठी लागणारे पुरावे
मिळतील यात शंका आहे कारण आतापर्यंत चीन ने पुरावे नष्ट देखील केले आहेत. तरीही
सार्या जगाने चीन विरोधात घेतलेली ही भूमिका योग्यच आहे याचा अंदाज आल्यामुळेच
कोरोंनाचे पुरावे नष्ट झाल्याचे चीन ने मान्य केले. काही असले तरी आता चीन विरोधात
सार्या जगाने एकत्र येऊन लढा दिला पाहिजे भारताने देखील मवाळ भूमिका सोडून जाहीररित्या
चीन विरोधात आपली भूमिका मांडली पाहिजे.
प्रा डॉ अजिंक्य अजित पत्रावळे,
रसायनशास्त्र विभाग
विवेकानंद कॉलेज कोल्हापूर
https://ajinkya1030.blogspot.com
Series is very informative.
ReplyDeletekeep it up.
Try to bring a book.