Skip to main content

Corona Series Part 64 : कोरोना, आणि व्हिएतनाम

Corona Series Part 64

नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. https://ajinkya1030.blogspot.com/

कोरोना, आणि व्हिएतनाम   

रुग्णसंखे नुसार देशाना क्रमांक दिला असता अमेरिका प्रथम क्रमांकावर आहे तर व्हिएतनाम १४२ क्रमांकावर आहे एकूण लोकसंख्या १० करोड आहे असून चीनशी सोबत सीमा जोडलेला देश आहे. आज पर्यन्त व्हिएतनाममध्ये फक्त ३२४ कोरोना बाधित रुग्ण सापडले असून त्यातील २६३ बरे झाले एकही मृत्युची नोंद नाही. साधारणपणे १९७५ च्या युद्धमुळे जागतिकस्तरावर  वियतनाम चर्चेत आले. दक्षिण आणि उत्तर व्हिएतनाम मिळून नवीन देश निर्माण झाला. नवीन देश झाल्या पासून चीन प्रमाणे एकच पक्षाचे सरकार आहे. व्हिएतनाम चीनचे अनुकरण करणारे कम्यूनिस्ट सरकार असले तरी १९८० पासूनच अर्थव्यवस्था खुली करण्यात आली या मुळे जीडीपी २६१ लाख असून जागतिकस्तरावर ४७ क्रमांकावर आहे. एका अर्थाने व्हिएतनाम प्रगतिपथावर आहे परंतु कोरिया जपान सारखी प्रगति करत नाही. एकूण अर्थव्यवस्थेच्या ५% खर्च आरोग्यवार केला जातो. आरोग्याचा दृष्टीने व्हिएतनाम फार प्रगतशील नाही होचीमीन सारख्या प्रमुख शहारची लोकसंख्या १.१ करोड आहे मात्र अतिडखता विभागातील बेड ची संख्या ९१०ईतकीच आहे, असे असताना देखील कोरोनाच्या या वैश्विक महामारीममध्ये फार मोठे नुकसान न झालेल्या देशात नाव गणले जाते. त्याचे कारण म्हणजे योग्य ठिकाणी योग्य वेळी मर्यादित तपासणी कारट कॉनटॅक्ट पडताळणी करण्यात आली ५ मार्चलाच व्हिएतनाम स्वतचे असे तपासणी किट काढले त्यामुळे दुसर्‍या देशवार निर्भर राहायची गार्ज लागली नाही वेळ वाचला. सर्व विमान तळावर सुरवातीपासून नोदी घेऊन शारीररचे तापमान मोजले जात होते प्रवासाचा तपशील घेतला जात होता आता तर एका गावातून दुसर्‍या गावात जाताना देखील पुरेपूर माहीत गोळा होत आहे, कोरोनाच्या सुरवातीलाच काय केल पाहिजे याचे पुरेपूर आकलन, आर्थिक स्तरावर केलेली काटछाट, व्हिएतनाम नागरिकानी केली नियमांचे पालन आणि लक्ष्यित लॉकडाउन अश्या विविध उपक्रम राबवले. आज व्हिएतनाममध्ये लॉकडाउन उठला असून सर्व आर्थिक घडामोडी देखील सुरळीत चालू झाल्या आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलिया देशाला ते सध्या मास्क आणि किट अश्या गोष्टींनीची मदत करू शकले. व्हिएतनाममध्ये लोकांशी संवाद साधण्यात यश मिळवले कार्टून, संगीत, झिंगल त्याच बरोबर खाजगी कंपनी मध्ये देखील संवाद योग्य पद्धतीने झाला. कम्यूनिस्ट सरकारच्या पक्षाचे कार्यकर्ते त्याच बरोबर निवडणुकीत जसे मतदान कुठे झाले कसे झाले अश्या बातम्या देणारे लोक असतात त्यांचा कोरोनाच्या महामारीत रुग्ण शोधून काडण्यासाठी वापरकरण्यात आला अश्या पद्धतीने व्हिएतनामने कोरोना सांकरमान रोखण्यात यश मिळवले.

 

प्रा डॉ अजिंक्य अजित पत्रावळे,

रसायनशास्त्र विभाग,

विवेकानंद कॉलेज कोल्हापूर

https://ajinkya1030.blogspot.com


Comments

  1. Nice information sir 👍👍 thanks sir 👍👍

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Corona Series Part 39 : कोरोना, आणि लस निर्मिती मधील भारतीयांचा सहभाग

Corona Series Part 39       नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणू चा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. कोरोना , आणि लस निर्मिती मधील भारतीयांचा सहभाग जगात असा एक ही देश नसेल जिथे ज्ञानाचा भंडार असणारे भारतीय लोक त्या देशाच्या प्रगतिमध्ये सहभागी नाहीत. कोरोनाच्या लढ्यात तरी हे मागे कशी राहतील. सिरम इंडिया लिमिटेड पुणे स्थित जैव तंत्रज्ञानातील अग्रणी कंपनी आहे यां कंपनीचे वैशिष्ट्य म्हणजे या पूर्वी ही hepatitis, पोलीओ , स्वाइन फ्लू इत्यादि आजारामध्ये लस निर्माण करण्याचे महत्वाचे योगदान आहे. वर्षभरात १.५ अब्ज लसीचे डोस अतिशय माफक दरात तयार करण्याची क्षमता असणारी या कंपनीचे उत्पादन यूरोपियन देशात व संशोधन यूनिट पुणे सारख्या शहरात आहे. भारतामध्ये एक ही नोबेल परितोषिक किवा औषधाचा स्वामित्व हक्क नाही तरीही औषध , लस उत्पादन करण्यात प्रावीण्य , विश्वसनीय नावलौकिक मिळवणारा देश आहे. जावपास ८०% लस आफ्रिका सारख्या देशात पुरवेल जातात. कोरोनाची लस निर्माण करण्यासाठी न्यूयॉर्क मधील codagenic या...

पुन्हा कधीही कोरोना सारख्या महामारीमुळे लेख लिहायची वेळ येऊ नये हीच ईश्वर चरणी प्रार्थना

नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे आज काय लिहावे आणि काय नको समजेनासे झाले आहे. तरी धाडस करून लिहित आहे. काही चुकले तर समजून घ्यावे ही विनंती.   मार्च महिन्यामध्ये जगात नवीन विषाणू ने धुमाकूळ घातला होता सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. शास्त्रज्ञ , संशोधक , मीडिया , नेते , उद्योजक , आणि सामान्य जनता सर्वच नागरिकांना पुढे काय वाहून ठेवले आहे याची कल्पना नव्हती. परिस्थितीचे आकलन होण्याचा आतच लॉकडाउन झाला तेव्हा सुट्टीचा आनंद घेऊया असे समजून काही नागरिक मस्त मजेत होते. हळू हळू परिस्थिती बदलून गंभीर झाली , पण नेमके काय चालू आहे काय करावे आणि काय करू नये याचा अंदाज लागेना. मीडिया मध्ये रोज के भीतीदायक बातमी येऊ लागली कधी विषाणू वर असलेले उपाया येऊ लागले पण शास्त्रीय माहिती सजत नसल्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण होऊ लागले . अश्या मध्ये रसायनशास्त्राचा विद्यार्थी म्हणून कोरोना विषाणूच्या विरोधात   काही काम करावे असे वाटत होते परंतु संशोधन करण्यासाठी काही मर्यादा होत्या याचे भान होते पण शांत बसून चालणार नाही हे लक्षात आले होते. म्हणून मनातून ठरवले आज या संकटकाळी समजासाठी आप...

Corona Series Part 38 : कोरोना, आणि चीनी वैद्यकीय उपकरणे

Corona Series Part 38       नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणू चा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. कोरोना , आणि चीनी वैद्यकीय उपकरणे एखाद्या व्यक्तिच्या मजबूरीचा स्वतच्या फायद्यासाठी कसा उपयोग करून घेता येईल याचे सर्वोत्तम प्रशिक्षण चीनमध्ये मिळते. चीन म्हणजे धोखेबाजी , अविश्वास् याचा अनुभव सर्वांनी घेतला आहे तरी देखिल मजबूरी म्हणून काही व्यवहारीक जुगार चीनशी करावे लागत आहेत. त्यातील एक म्हणजे वैद्यकीय उपकरण खरेदी. नोहेंबर ते फेब्रुवारी च्या दरम्यान चीन मध्ये कोरोना चे संक्रमण जोरावर असल्याने चीन मधील काही प्रांत बंद होते , या विषाणूच्या बाबतीतील माहीत सुरवातीपासूंनच लपवण्यात आल्यामुळे चीन व्यतिरिक्त ईतर जग सुरळीत चालू होते , आणि एकदा हा विषाणू चीन मधून सार्‍या जगात पसरला तेव्हा ईतर देशांची या विषाणू च्या विरोधात लडण्याची तयारी नसल्याने विषाणूचे संक्रमण जलत गतीने पसरू लागले. तेव्हा वैद्यकीय उपकरणे जसे मास्क , तपासणी किट , संरक्षक किट , वेंटीलेटर , ईत्यादी उपकरणाची मागणी आणि ...