Skip to main content

Corona Series Part 93 : कोरोना आणि अमेरिका

Corona Series Part 93

नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. https://ajinkya1030.blogspot.com/

 

कोरोना आणि अमेरिका

जगाची आर्थव्यवस्था सांभाळणारा, महासत्ता, विज्ञान आणि तंत्रज्ञानमध्ये सर्वात पुढे असणारा असा नावलौकिक मिळवलेला देश म्हणजे अमेरिका. खर तर नावलौकिका प्रमाणे कोरोनाव्हीआर अमेरिकेमध्ये लवकर नियंत्रण मिळवेल अशी अपेक्ष होती परंतु विपरीत परिस्थिती अमेरिकेमध्ये दिसत आहे आज रोजी बधितांची संख्या २३,५७,३२३ आणि मृत्यू १,२२,२५९ झाले आहेत, संख्या जास्त असण्याचे प्रमुख कारण म्हणजे चाचणी आता पर्यन्त २,८५,०५,६६१ चाचन्या झाल्या आहेत. तसेच या बाबतीत अधिक विश्लेषन करावयाचे झाले तर प्रमुख कारण समोर येते ते नोहेंबरमध्ये असनारी निवडणूक, अति-आत्मविश्वास, अति-तंत्रज्ञानावर अवलंबून राहणे, भोगोलिक परिस्थिती, पर्यटन, वर्ण भेद, लॉक डाउन उठवन्यासाठी आंदोलने अशी कारणे समोर येतील. बहुधा सर्वच प्रगतदेशात कोरोनाचा फैलाव होण्याची काही कारणे सारखीच आहेत.

अमेरिकेचे अध्यक्ष मा. डोनाल्ड ट्रम्प यांनी २०१६ साली सत्ता मिळवली तेव्हा पासून अमेरिका प्रथम, चांगली अर्थव्यवस्था, अधिक नोकऱ्या आणि उत्तम शेअर बाजार अशी अश्वासन दिली आणि त्या दृष्टीने वाटचाल करत ४ वर्ष उलटली आणि निवडणुकीचे बिगुल वाजले असता अचानक कोरोनाची महामारी आली आणि ट्रम्प यांची सारी मेहनत त्यांच्या डोळ्या देखत पाण्यात जाऊ लागली. अर्थव्यवस्था, अमेरिकन शेअर बाजार गडगडला आणि नवीन नोकरी सोडा आहे याच नोकर्‍या सांभाळणे कठीण होऊन बसले. भारताचा तुलनेत अमेरिकन नागरिकांची म्युच्युअल फंड मध्ये अधिक गुंतवणूक आहे शेअर बाजार गडगडला की मिळणारे उत्पन्न घटते. कोरोना आला शेअर बाजार गडगडला त्यामुळे राष्ट्रअध्यक्ष सहित सामान्य जनता निराश नकारात्म विचारा कडे झुकली. यातच संपूर्ण जगात कोरोनामुळे २.५ करोड नोकरी वर गंडातर येनार असून अमेरिकेमध्ये ४०लाख नोकर्‍या गमवल्या आहेत. २००८-०९ च्या मंदीमध्ये २.२ करोड नोकर्‍या गेल्या होत्या. या सार्‍याचा परिणाम कोरोनाचे रुग्ण संख्या आधिक होण्यात झाली.

दुसरे प्रमुख कारण म्हणजे पर्यटन, ईटली, फ्रांस, स्पेन, चीन, अमेरिका, पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेत ते कोरोंनाच्या रुग्न्संखेत देखील पहिल्या ५ मध्ये आहेत. अमेरिका- चीन मध्ये असनार व्यापार त्या निमित्ताने होणारा प्रवास या मुले अमेरिकेत रुग्ण संख्या वाढली. सूक्ष्मपातलीवर पहिले तर अमेरिकेतील न्यू-यॉर्क शहर संक्रमण होण्यामध्ये प्रथम क्र्मांकावर आहे. न्यू-यॉर्क शहरामध्ये होणरा व्यापार, पर्यटन आणि डाउन उठवन्यासाठी आंदोलने अशी प्रमुख कारणे कोरोना वाढीस कारणीभूत ठरली आहेत. तसेच संशोधनामध्ये असे आढळून आले आहेत जिथे तापमान ५ ते १२०C च्या दरम्यान आहे तिथे संक्रमण होण्याच धोका अधिक आहे म्हणून टेक्सस पेक्षा अधिक रुग्ण न्यू-यॉर्क, न्यू-जर्सी, वॉशिंगटन ई. मध्ये आहेत. अमेरिकेत ज्या राज्यात अंदाजे १५०C किंवा आधिक तापमान आहे तिथे संक्रमण कमी आहे. तसेच न्यू-यॉर्कमध्ये लोकसंख्या देखील अधिक आहे एका अर्थाने भारतामधील मुंबई प्रमाणेच अवस्था आहे.

निवडणुका जवळ असल्याने राजकीय आरोप-प्रत्यारोपच्या फेर्‍या मध्ये कोरोनाचा विषाणू अडकला आहे. खरतर सत्ताधारी आणि विरोधी दोन्ही पक्षांनी मिळून काम करणे गरजेचे असताना कोरोनाचे भांडंवल करण्यात येत आहे. या मध्ये कोरोंनाचा जनक चीन देखील दखल घेत डोनाल्ड ट्रम्प यांना अडचणीत आणत आहेत. या सार्‍या भानगडी मध्ये सामान्य जनता होरपळत आहे त्याची दाखल कोण घेणार.....!  

 

प्रा डॉ अजिंक्य अजित पत्रावळे,

रसायनशास्त्र विभाग

विवेकानंद कॉलेज कोल्हापूर

 


Comments

  1. Bhartatil condition bari ahe mg tyamanane

    ReplyDelete
  2. Nice information sir 👍👍 thanks sir 👍👍

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Corona Series Part 39 : कोरोना, आणि लस निर्मिती मधील भारतीयांचा सहभाग

Corona Series Part 39       नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणू चा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. कोरोना , आणि लस निर्मिती मधील भारतीयांचा सहभाग जगात असा एक ही देश नसेल जिथे ज्ञानाचा भंडार असणारे भारतीय लोक त्या देशाच्या प्रगतिमध्ये सहभागी नाहीत. कोरोनाच्या लढ्यात तरी हे मागे कशी राहतील. सिरम इंडिया लिमिटेड पुणे स्थित जैव तंत्रज्ञानातील अग्रणी कंपनी आहे यां कंपनीचे वैशिष्ट्य म्हणजे या पूर्वी ही hepatitis, पोलीओ , स्वाइन फ्लू इत्यादि आजारामध्ये लस निर्माण करण्याचे महत्वाचे योगदान आहे. वर्षभरात १.५ अब्ज लसीचे डोस अतिशय माफक दरात तयार करण्याची क्षमता असणारी या कंपनीचे उत्पादन यूरोपियन देशात व संशोधन यूनिट पुणे सारख्या शहरात आहे. भारतामध्ये एक ही नोबेल परितोषिक किवा औषधाचा स्वामित्व हक्क नाही तरीही औषध , लस उत्पादन करण्यात प्रावीण्य , विश्वसनीय नावलौकिक मिळवणारा देश आहे. जावपास ८०% लस आफ्रिका सारख्या देशात पुरवेल जातात. कोरोनाची लस निर्माण करण्यासाठी न्यूयॉर्क मधील codagenic या...

Corona Series Part 56 : कोरोना, आणि ई-शिक्षण

Corona Series Part 56 नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. आजचा विषय विस्तृत मांडला आहे.   या विषया बाबतीत आपण आपले मत ब्लॉगवर जरूर कळवावे ही विनंती.     https://ajinkya1030.blogspot.com   कोरोना , आणि ई-शिक्षण मार्च महिन्यापासन कोरोनाचा प्रभाव दिसू लागला शेवटच्या आठवड्यापासून शाळा , कॉलेज लॉकडाउनच्या काळापासून आज पर्यन्त बंद करण्यात आल्या. भितीदायक वातावरणामध्ये १० , १२वी च्या परीक्षा घेण्यात आल्या. शैक्षणिक वर्ष २०१९-२० चे कार्य संपत आले होते परंतु लेखी आणि मौखिक परीक्षा राहिल्या होत्या . आणि आता यूजीसीच्या मार्गदर्शंनानुसार त्या राहूनच जातील. किंवा काही अंशी तात्पुरती योजना राबवून काही ना काही मार्ग काडला जाईल.   नैसर्गिक आपत्ती महापुर , वैश्विक महामारी मधून शैक्षणिक क्षेत्रा समोर नवीन आव्हान उभे राहिले आहे. खाजगी , काही सरकारी शाळा , कॉलेजने देखील तात्पुरती सोय करण्यासाठी ऑनलाइन तास झूम , गूगल क्लासरूम , गूगल डॉक , यू ट्यूब , व्हाट्स अप...

पुन्हा कधीही कोरोना सारख्या महामारीमुळे लेख लिहायची वेळ येऊ नये हीच ईश्वर चरणी प्रार्थना

नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे आज काय लिहावे आणि काय नको समजेनासे झाले आहे. तरी धाडस करून लिहित आहे. काही चुकले तर समजून घ्यावे ही विनंती.   मार्च महिन्यामध्ये जगात नवीन विषाणू ने धुमाकूळ घातला होता सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. शास्त्रज्ञ , संशोधक , मीडिया , नेते , उद्योजक , आणि सामान्य जनता सर्वच नागरिकांना पुढे काय वाहून ठेवले आहे याची कल्पना नव्हती. परिस्थितीचे आकलन होण्याचा आतच लॉकडाउन झाला तेव्हा सुट्टीचा आनंद घेऊया असे समजून काही नागरिक मस्त मजेत होते. हळू हळू परिस्थिती बदलून गंभीर झाली , पण नेमके काय चालू आहे काय करावे आणि काय करू नये याचा अंदाज लागेना. मीडिया मध्ये रोज के भीतीदायक बातमी येऊ लागली कधी विषाणू वर असलेले उपाया येऊ लागले पण शास्त्रीय माहिती सजत नसल्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण होऊ लागले . अश्या मध्ये रसायनशास्त्राचा विद्यार्थी म्हणून कोरोना विषाणूच्या विरोधात   काही काम करावे असे वाटत होते परंतु संशोधन करण्यासाठी काही मर्यादा होत्या याचे भान होते पण शांत बसून चालणार नाही हे लक्षात आले होते. म्हणून मनातून ठरवले आज या संकटकाळी समजासाठी आप...