Skip to main content

Corona Series Part 77 : कोरोना, आणि लसीकरण

Corona Series Part 77

नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. https://ajinkya1030.blogspot.com/

 

कोरोना, आणि लसीकरण

सर्वांनाच कोरोनावर लस कधी मिळेल असे वाटत आहे. त्यासाठी शास्त्रज्ञ आटोकाट प्रयत्न करीत आहेत. कोरोना थैमान घालत असताना ईतर जिवाणू आणि विषाणूनी उन्हाळी सुट्टी घेतली आहे चला कोरोनाच हंगाम चालू आहे आपण मस्त आराम करूया अस काही एक फसवे चित्र उभे राहत आहे. सत्यता अशी नाही वैश्विक महामारी सोबत या पूर्वी जे आजार जिवाणू / विषाणू पसरवत होते ते देखील पसरत आहेतच पण सध्या मानवाचे तसेच आरोग्य विभागाचे सार्‍यांचे लक्ष सध्या कोरोना विषाणूवर आहे. जग लॉकडाउन असले तरीही जन्म आणि मृत्यू मात्र चालूच आहेत. जन्माला आलेल्या बाळाला प्रथम दिवसापासूनच या क्षय, कावीळ, पोलिओ, इंफ्लुएंजा, अंथर्‍यक्स अश्या आजारांचा धोका असतोच डब्ल्यूएचओच्या अहवाला नुसार आज 80 दशलक्ष नव्याने जन्माला आलेले बाळ ज्यांचे वय 1 वर्षा पेक्षा कमी आहे. (आकडा जास्त असू शकतो). यांना वरील आजारांचा धोका आधिक आहे. आणि या आजारणाचा सामना करण्यासाठी मनुष्याने लस शोधून काढल्या आहेत. लस म्हणजे आजार ज्या विषाणू आणि जिवाणू मुळे होतो त्या  विषाणूच्या सुरक्षित आवृत्तीला माणसाचा शरीरात सोडली जाते आणि अश्या वेळी आपले शरीर अॅंटीबॉडीज बनवते आणि भविषात जेव्हा धोकादायक विषाणूची आवृत्ती शरीरता प्रवेश करते तेव्हा आपले शरीर त्याला ओळखून प्रतिकार करते. लहान मुलांना त्यांच्या जन्मापासून काही महीने किंवा वर्षाच्या अंतरावर इंजेक्शन किंवा तोंडावाटे लसीकरण केले जाते. प्रमुखुयाने त्याचे 2 प्रकार आहेत १ अॅंटीजेन म्हणजे या मध्ये रोग होणार्‍या जिवाणू / विषाणूला शरीराने ओळखले पाहिजे. आणि २ (Adjuvant) सहाय्यक; जे शरीराला धोक्याचे संकेत पाठवते आणि रोगप्रतिकारप्रणालीला विषाणूविरुद्ध तीव्र प्रतिसाद देण्यास मदत करते यावेळी अनुकूल प्रतिकार प्रणाली तयार करते जी भविष्यात प्रत्यक्ष संक्रमणापासून बचाव करण्यास शरीराला मदत करते.

डब्ल्यूएचओच्या अहवालनुसार प्रत्येक वर्षी लसीकरणाच्या अभावामुळे २ ते ३ दशलक्ष मुले मरण पावतात. आज कोरोनाच्या वैश्विक महामारीमध्ये या आजाराच्या लसीकरण अडचणीचे ठरत आहे. ४ जून ला होणारी जागतिक लस शिखर जिथे विविध देशातील आरोग्य आधिकारी आपल्या विचारणाची आदान प्रदान करत ती देखील पुढे ढकlली आहे. विविध देशांनी, १२९ देशमधील ७० देशमध्ये त्यांचा देशात सुरू असणारे लसीकरण मोहीम कोरोना विषाणू मुले पुढे ढकलली आहे. कारण, लसीकरण करत असताना कोरोन पसरण्याचा धोका, सामाजिक अंतर ठेवता येणं शक्य नाही, करोना बद्दल असणारी भीती, कोरोनाचा समाजिक प्रसार, त्याच बरोबर प्रगटतशील देशात लसीकरणसाठी असणारी सारी यंत्रणा सध्या कोरोना विषाणूची माहिती संकलित करणे आणि कोरोना रुग्णाच्या सेवेत लागली आहे. आफ्रिकामध्ये ५४ देशापैकी ४० पेक्षा आधिक देशांनी आपली सीमा बंद ठेवली आहे आशिया, युरोप खंडात कमी अधिक हीच परिस्थिति आहे त्यामुळे जिथे आवशक्यता आहे तिथे लस पोहोचवली जात नाही. डब्ल्यूएचओ च्या माध्यमातून लसीकरण मोहीम गरीब आणि प्रगतशील देशात मोफत चालवले जातता परंतु जागतिक स्तरावर चीन आणि अमेरिका यांच्या राजकरणात, अमेरिकाने डब्ल्यूएचओचे अनुदान थांबवल्याणे लसीकरण मोहीमेवर फार मोठा परिणाम होणार आहे. कदाचित पोलिओ सारखे नामशेष होत चाललेले आजार सुधा पुन्हा डोके वर काडू शकतील. या सार्‍या बाबी लक्षात घेतल्या तर कोरोना ईतकेच कीबहुना त्याहून अधिक गंभीर परिस्थिति निर्माण होऊ शकते. कोरोना सोबतच लसीकरण मोहीम सुधा चालू करणे आवशक्य आहे. कोरोनाची लस येईल तेव्हा येईल सध्या प्रत्येक देशाने लसीकरणाची मोहिमेला अधिक बळकटी देणे गरजेचे आहे.

प्रा डॉ अजिंक्य अजित पत्रावळे,

रसायनशास्त्र विभाग

विवेकानंद कॉलेज कोल्हापूर


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

पुन्हा कधीही कोरोना सारख्या महामारीमुळे लेख लिहायची वेळ येऊ नये हीच ईश्वर चरणी प्रार्थना

नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे आज काय लिहावे आणि काय नको समजेनासे झाले आहे. तरी धाडस करून लिहित आहे. काही चुकले तर समजून घ्यावे ही विनंती.   मार्च महिन्यामध्ये जगात नवीन विषाणू ने धुमाकूळ घातला होता सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. शास्त्रज्ञ , संशोधक , मीडिया , नेते , उद्योजक , आणि सामान्य जनता सर्वच नागरिकांना पुढे काय वाहून ठेवले आहे याची कल्पना नव्हती. परिस्थितीचे आकलन होण्याचा आतच लॉकडाउन झाला तेव्हा सुट्टीचा आनंद घेऊया असे समजून काही नागरिक मस्त मजेत होते. हळू हळू परिस्थिती बदलून गंभीर झाली , पण नेमके काय चालू आहे काय करावे आणि काय करू नये याचा अंदाज लागेना. मीडिया मध्ये रोज के भीतीदायक बातमी येऊ लागली कधी विषाणू वर असलेले उपाया येऊ लागले पण शास्त्रीय माहिती सजत नसल्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण होऊ लागले . अश्या मध्ये रसायनशास्त्राचा विद्यार्थी म्हणून कोरोना विषाणूच्या विरोधात   काही काम करावे असे वाटत होते परंतु संशोधन करण्यासाठी काही मर्यादा होत्या याचे भान होते पण शांत बसून चालणार नाही हे लक्षात आले होते. म्हणून मनातून ठरवले आज या संकटकाळी समजासाठी आप...

Corona Series Part 1 : Clinical Trails starts on Corona

Corona Series Part 1 Corona धोका लक्षात घेता social media द्वारे जनजागृती करणे गरजेचे झाले आहे त्या माध्यमातून एक प्रयत्न करत आहे कृपया msg पूर्ण वाचून आपल्याला योग्य वाटल्यास पुढे पाठवा कोरोना जनजागृती मोहीम Clinical Trails starts on Corona जवळपास जगामध्ये 20 संस्था ह्या आजारावर vaccine बनवण्याचा प्रयन्त करत आहेत . जानेवारी 2020 मध्ये चीन मध्ये शास्त्रज्ञांनी कोरोना virus चे genetic मटेरियल चे sequencing चे decoding केले , अमेरिकेतील सरकारी संस्थामधील शास्त्रज्ञानी ह्या अभ्यासच फायदा घेत पुढे कांम चालू केले   1) (NIAID) National Institute of Allergy and Infection 2) Moderna Inc ह्या दोन संस्था मागील काही वर्षे MERS,   SARS- 1 वर काम करत आहेत त्यांना जेव्हा sequencing of gentic information of corona 2   मिळाली त्यांनी vaccine बनवण्याचे काम अहो रात्र चालू केले. अमेरिकेतील north washington जिथे मायक्रोसॉफ्ट चे बिल गेट्स व अनेक it कंपनीच्या चे केंद्र स्थान आहे अश्या शहरामध्ये Kiaser Permannente Washington Health Reseaech Institute (KPWHRI) मध्ये संशोधकांन...

Corona Series Part 100 : कोरोना आणि DRDO

Corona Series Part 100 नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. https://ajinkya1030.blogspot.com/   कोरोना आणि DRDO १९५८ मध्ये तांत्रिक विकास संस्था आणि भारतीय आयुध निर्मिती संचालनालयाच्या संरक्षण विज्ञान संस्थेमध्ये या संस्थेची स्थापना करण्यात आली. हे भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) जी लष्कराच्या संशोधन आणि विकासाची संस्था आहे. एकूण ५२ प्रयोगशाळां , ज्याद्वारे एरोनॉटिक्स , आर्मेट्स , इलेक्ट्रॉनिक्स , लँड कॉम्बॅट इंजिनिअरिंग , जीवन विज्ञान , साहित्य , क्षेपणास्त्रे आणि नौदल प्रणाली अशा विविध क्षेत्रांचा समावेश असलेले संरक्षण तंत्रज्ञान विकसित करण्यात गुंतलेले आहे. या संघटनेत संरक्षण संशोधन आणि विकास सेवा (डीआरडीएस) चे सुमारे ५ , ००० शास्त्रज्ञ आणि इतर २५ , ००० वैज्ञानिक , तांत्रिक आणि सहाय्यक कर्मचारी यांचा समावेश आहे. अशी नावा रूपाला आलेली लष्करी संस्था कोरोंना सारख्या महामारीत देखील देशसेवेचे आपले...