Corona Series Part 77
नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे
सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती
करण्याचा प्रयत्न करत आहे. https://ajinkya1030.blogspot.com/
कोरोना, आणि लसीकरण
सर्वांनाच कोरोनावर लस कधी मिळेल असे वाटत आहे. त्यासाठी
शास्त्रज्ञ आटोकाट प्रयत्न करीत आहेत. कोरोना थैमान घालत असताना ईतर जिवाणू आणि
विषाणूनी उन्हाळी सुट्टी घेतली आहे चला कोरोनाच हंगाम चालू आहे आपण मस्त आराम
करूया अस काही एक फसवे चित्र उभे राहत आहे. सत्यता अशी नाही वैश्विक महामारी सोबत या
पूर्वी जे आजार जिवाणू / विषाणू पसरवत होते ते देखील पसरत आहेतच पण सध्या मानवाचे तसेच
आरोग्य विभागाचे सार्यांचे लक्ष सध्या कोरोना विषाणूवर आहे. जग लॉकडाउन असले तरीही
जन्म आणि मृत्यू मात्र चालूच आहेत. जन्माला आलेल्या बाळाला प्रथम दिवसापासूनच या
क्षय, कावीळ, पोलिओ, इंफ्लुएंजा, अंथर्यक्स अश्या आजारांचा धोका असतोच डब्ल्यूएचओच्या अहवाला
नुसार आज 80 दशलक्ष नव्याने जन्माला आलेले बाळ ज्यांचे वय 1 वर्षा पेक्षा कमी आहे.
(आकडा जास्त असू शकतो). यांना वरील आजारांचा धोका आधिक आहे. आणि या आजारणाचा सामना करण्यासाठी मनुष्याने
लस शोधून काढल्या आहेत. लस म्हणजे आजार ज्या विषाणू आणि जिवाणू मुळे होतो त्या विषाणूच्या सुरक्षित आवृत्तीला माणसाचा शरीरात सोडली
जाते आणि अश्या वेळी आपले शरीर अॅंटीबॉडीज बनवते आणि भविषात जेव्हा धोकादायक विषाणूची
आवृत्ती शरीरता प्रवेश करते तेव्हा आपले शरीर त्याला ओळखून प्रतिकार करते. लहान मुलांना
त्यांच्या जन्मापासून काही महीने किंवा वर्षाच्या अंतरावर इंजेक्शन किंवा तोंडावाटे
लसीकरण केले जाते. प्रमुखुयाने त्याचे 2 प्रकार आहेत १ अॅंटीजेन म्हणजे या मध्ये रोग
होणार्या जिवाणू / विषाणूला शरीराने ओळखले पाहिजे. आणि २ (Adjuvant) सहाय्यक; जे शरीराला धोक्याचे संकेत पाठवते आणि रोगप्रतिकारप्रणालीला विषाणूविरुद्ध
तीव्र प्रतिसाद देण्यास मदत करते यावेळी अनुकूल प्रतिकार प्रणाली तयार करते जी
भविष्यात प्रत्यक्ष संक्रमणापासून बचाव करण्यास शरीराला मदत करते.
डब्ल्यूएचओच्या अहवालनुसार प्रत्येक वर्षी लसीकरणाच्या
अभावामुळे २ ते ३ दशलक्ष मुले मरण पावतात. आज कोरोनाच्या वैश्विक महामारीमध्ये या आजाराच्या
लसीकरण अडचणीचे ठरत आहे. ४ जून ला होणारी जागतिक लस शिखर जिथे विविध देशातील आरोग्य आधिकारी आपल्या विचारणाची
आदान प्रदान करत ती देखील पुढे ढकlली आहे. विविध देशांनी, १२९ देशमधील ७० देशमध्ये त्यांचा देशात सुरू असणारे लसीकरण
मोहीम कोरोना विषाणू मुले पुढे ढकलली आहे. कारण, लसीकरण करत असताना कोरोन पसरण्याचा धोका, सामाजिक अंतर ठेवता येणं शक्य नाही, करोना बद्दल असणारी भीती, कोरोनाचा समाजिक प्रसार, त्याच बरोबर प्रगटतशील देशात लसीकरणसाठी असणारी सारी यंत्रणा
सध्या कोरोना विषाणूची माहिती संकलित करणे आणि कोरोना रुग्णाच्या सेवेत लागली आहे.
आफ्रिकामध्ये ५४ देशापैकी
४० पेक्षा आधिक देशांनी आपली सीमा बंद ठेवली आहे आशिया, युरोप खंडात कमी अधिक हीच परिस्थिति आहे त्यामुळे जिथे आवशक्यता आहे तिथे लस पोहोचवली
जात नाही. डब्ल्यूएचओ च्या माध्यमातून लसीकरण मोहीम गरीब आणि प्रगतशील देशात मोफत चालवले
जातता परंतु जागतिक स्तरावर चीन आणि अमेरिका यांच्या राजकरणात, अमेरिकाने डब्ल्यूएचओचे अनुदान थांबवल्याणे लसीकरण मोहीमेवर
फार मोठा परिणाम होणार आहे. कदाचित पोलिओ सारखे नामशेष होत चाललेले आजार सुधा पुन्हा
डोके वर काडू शकतील. या सार्या बाबी लक्षात घेतल्या तर कोरोना ईतकेच कीबहुना त्याहून
अधिक गंभीर परिस्थिति निर्माण होऊ शकते. कोरोना सोबतच लसीकरण मोहीम सुधा चालू करणे
आवशक्य आहे. कोरोनाची लस येईल तेव्हा येईल सध्या प्रत्येक देशाने लसीकरणाची मोहिमेला
अधिक बळकटी देणे गरजेचे आहे.
प्रा डॉ अजिंक्य अजित पत्रावळे,
रसायनशास्त्र विभाग
विवेकानंद कॉलेज कोल्हापूर
Nice sir 👍
ReplyDeleteNice information sir 👍👍 thanks sir 👍👍
ReplyDeleteVaccination is also must
ReplyDeleteKadhi yenar vaccin
ReplyDelete