Corona Series Part 75
नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे
सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती
करण्याचा प्रयत्न करत आहे. https://ajinkya1030.blogspot.com/
कोरोना, आणि क्रिकेटचे नियम
काल थुंकने आणि त्यामुळे कोरोनाच होणारा फैलाव या वर
चर्चा केली या मधीलचा एक मोठा भाग म्हणजे खेळ बहूतांशवेळा मैदानी खेळा मध्ये खेळाडू
खेळत असताना थुंकताना दिसतील. फुटबॉल,
हॉकी असो वा क्रिकेट सगळीकडे सारखाच प्रकार असतो. समाजतील मोठा भाग या खेळाडुंचे
अंनुकरन करताना दिसतिल. भारतामध्ये सर्वात लोकप्रिय आणि सर्वात जास्त आर्थिक
उलाढाली असणारा खेळ म्हणजे क्रिकेट. कोरोना संकटमधून खेळ देखील वाचले नाहीत सध्या
जगभरात कुठेही सामने खेळे जात नाही कारण कोरोनाचा होणारा फैलाव. भारतीय संघ
मैदानवर उतरला की अनेक लोकांचे खिसे गरम होतात आणि म्हणून कोरोना असतांनाही भारतता
आयपीएल खेळवले जान्यासाठी शेवटच्या क्षणा पर्यन्त प्रयत्न करण्यात आला. प्रेक्षक रहित
खेळ काही नियमात बदल करण्याचा विचार आंतराष्ट्रीय स्तरावर सुरू झाला.
आपणास इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल (आयसीसी) म्हणजे क्रिकेटचे
प्रमुख संघटना आहे. आयसीसीची स्थापना ईग्रजांकडून १९०९ साली झाली तेव्हा त्याचे
नाव इंपेरियल क्रिकेट कोंनफरन्स होते कारण त्याकाळी ब्रिटिशांची कॉलनी असणारे ऑस्ट्रेलिया, साऊथ आफ्रिका, इंग्लंड आदि देशसच क्रिकेट खेळू शकत होते त्यानंतर काही देश
स्वतंत्र झाल्यावर १९६५ साली पुन्हा या संस्थेचे नाव इंटरनॅशनल क्रिकेट कोंनफरन्स करण्यात
आले. क्रिकेट बघणार्या लोकांना आयसीसी ही एकच संघटना जी माहिती आहे या बरोबर एमसीसी
Marylebone
Cricket Club
(MCC) जी संघटना २२० वर्षापासून क्रिकेट साठी
काम करते लॉर्डस चे मैदान याच संस्थेच्या मालकीचे आहे. या दोन्ही संस्था मध्ये क्रिकेटचे
कोणतेही नियम करणे बदलणे याचा अधिकार फक्त एमसीसीला आहे. आयसीसी कोणताही नवीन नियम करू किवा बदलू
शकत नाही. एका अर्थाने एमसीसीला म्हणजे क्रिकेटचे पार्लमेंट असून आयसीसीही एक कार्यकारी
मंडळ आहे.
कोरोना थुंकी मुळे पसरतो हे शास्त्रीय अभ्यासातुन सिद्धं
झालाय आणि क्रिकेटमध्ये गोलंदाज चेंडूवर थुंकी किंवा घाम याचा वापर करतता बर्याच वेळा
कसोटी मध्ये थुंकी किंवा घामाचा वापर अधिक केला जातोय. या एका गोष्टीमुळे कोरोनाचा
फैलाव होऊ शकतो. गोलंदाज चेंडूवर थुंकी किंवा घाम वापरण्याचे कारण काय असेल. आपणास
माहीत आहे, सुरवातीला नवीन चेंडू त्याचा चकाकी
मुले नॉर्मल स्विंग होतो पण चेंडू जसा जसा जुना होईल तसा हा स्विंग कमी होतो आणि म्हणून
जसा खेळ पुढे सरकत जातो तसा फलंदाज हा गोलंदाजावर वरचड होऊ शकतो. असे होऊ नये यासाठी
चेंडूची चकाकी एक बाजूने कायम राहावी लागते आणि दुसरी बाजू खरबरीत केली जाते यामुळे
चेंडू रिर्वस स्विंग होतो. रिर्वस स्विंग करण्यामध्ये पाकिस्तानच्या गोलंदाजांचा हातखंडा होता. थुंकी
किंवा घाम वापरणे, पॅंटवर
चेंडू एकाच बाजूने घासणे हे क्रिकेटच्या नियमांना धरून आहे परंतु चेंडू कुरतडणे हे
नियम बाह्य आहे. कोरोनाच्या
वैश्विक महामारीमध्ये थुंकी किंवा घाम गोलंदाज वापरू लागला तर कोरोनाचा संसर्ग होण्यासाठी
कारणीभूत तरी शकतो म्हणून आता थुंकी किंवा घाम चेंडूवर लावू नये असा नियमात बदल करणे
गरजेचे बनले आहे. क्रिकेटचा चेंडू ऑस्ट्रेलियन कुकाबुरा आणि एसजी या दोन कंपन्या
बनवतात सध्या कुकाबुरा कंपनी ने एक प्रकारचे wax बनवले आहे परंतु सध्या कुठेच क्रिकेट खेळेले जात नसल्याने याची
उपूक्तता सिद्ध झाली नाही. थुंकी किंवा घाम लावू नये त्याच बरोबर चकाकी आणण्यासाठी कोणत्या गोष्टींचा वापर
नियमात धरून केला पाहिजे या बाबतीत सध्या एमसीसी आणि आयसीसी च्या बैठका सुरू आहेत.
पण कोरोनाने सार्या जागा बरोबर क्रिकेटला देखील विचार करायला लावला आहे.
प्रा डॉ अजिंक्य अजित पत्रावळे,
रसायनशास्त्र विभाग
विवेकानंद कॉलेज कोल्हापूर
Very nice information sir 👍👌 thanks sir 👍👍
ReplyDelete1st time mention the sport and covind in ur series very informative
ReplyDeleteDeep study sir...
ReplyDeleteCricket ko bhi nahi choda corona ne
ReplyDelete