Skip to main content

Corona Series Part 75 : कोरोना, आणि क्रिकेटचे नियम

Corona Series Part 75

नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. https://ajinkya1030.blogspot.com/

 

कोरोना, आणि क्रिकेटचे नियम

काल थुंकने आणि त्यामुळे कोरोनाच होणारा फैलाव या वर चर्चा केली या मधीलचा एक मोठा भाग म्हणजे खेळ बहूतांशवेळा मैदानी खेळा मध्ये खेळाडू खेळत असताना थुंकताना दिसतील. फुटबॉल, हॉकी असो वा क्रिकेट सगळीकडे सारखाच प्रकार असतो. समाजतील मोठा भाग या खेळाडुंचे अंनुकरन करताना दिसतिल. भारतामध्ये सर्वात लोकप्रिय आणि सर्वात जास्त आर्थिक उलाढाली असणारा खेळ म्हणजे क्रिकेट. कोरोना संकटमधून खेळ देखील वाचले नाहीत सध्या जगभरात कुठेही सामने खेळे जात नाही कारण कोरोनाचा होणारा फैलाव. भारतीय संघ मैदानवर उतरला की अनेक लोकांचे खिसे गरम होतात आणि म्हणून कोरोना असतांनाही भारतता आयपीएल खेळवले जान्यासाठी शेवटच्या क्षणा पर्यन्त प्रयत्न करण्यात आला. प्रेक्षक रहित खेळ काही नियमात बदल करण्याचा विचार आंतराष्ट्रीय स्तरावर सुरू झाला.

आपणास इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल (आयसीसी) म्हणजे क्रिकेटचे प्रमुख संघटना आहे. आयसीसीची स्थापना ईग्रजांकडून १९०९ साली झाली तेव्हा त्याचे नाव इंपेरियल क्रिकेट कोंनफरन्स होते कारण त्याकाळी ब्रिटिशांची कॉलनी असणारे ऑस्ट्रेलिया, साऊथ आफ्रिका, इंग्लंड आदि देशसच क्रिकेट खेळू शकत होते त्यानंतर काही देश स्वतंत्र झाल्यावर १९६५ साली पुन्हा या संस्थेचे नाव इंटरनॅशनल क्रिकेट कोंनफरन्स करण्यात आले. क्रिकेट बघणार्‍या लोकांना आयसीसी ही एकच संघटना जी माहिती आहे या बरोबर एमसीसी Marylebone Cricket Club (MCC) जी संघटना २२० वर्षापासून क्रिकेट साठी काम करते लॉर्डस चे मैदान याच संस्थेच्या मालकीचे आहे. या दोन्ही संस्था मध्ये क्रिकेटचे कोणतेही नियम करणे बदलणे याचा अधिकार फक्त एमसीसीला आहे. आयसीसी कोणताही नवीन नियम करू किवा बदलू शकत नाही. एका अर्थाने एमसीसीला म्हणजे क्रिकेटचे पार्लमेंट असून आयसीसीही एक कार्यकारी मंडळ आहे.  

कोरोना थुंकी मुळे पसरतो हे शास्त्रीय अभ्यासातुन सिद्धं झालाय आणि क्रिकेटमध्ये गोलंदाज चेंडूवर थुंकी किंवा घाम याचा वापर करतता बर्‍याच वेळा कसोटी मध्ये थुंकी किंवा घामाचा वापर अधिक केला जातोय. या एका गोष्टीमुळे कोरोनाचा फैलाव होऊ शकतो. गोलंदाज चेंडूवर थुंकी किंवा घाम वापरण्याचे कारण काय असेल. आपणास माहीत आहे, सुरवातीला नवीन चेंडू त्याचा चकाकी मुले नॉर्मल स्विंग होतो पण चेंडू जसा जसा जुना होईल तसा हा स्विंग कमी होतो आणि म्हणून जसा खेळ पुढे सरकत जातो तसा फलंदाज हा गोलंदाजावर वरचड होऊ शकतो. असे होऊ नये यासाठी चेंडूची चकाकी एक बाजूने कायम राहावी लागते आणि दुसरी बाजू खरबरीत केली जाते यामुळे चेंडू रिर्वस स्विंग होतो. रिर्वस स्विंग करण्यामध्ये पाकिस्तानच्या गोलंदाजांचा हातखंडा होता. थुंकी किंवा घाम वापरणे, पॅंटवर चेंडू एकाच बाजूने घासणे हे क्रिकेटच्या नियमांना धरून आहे परंतु चेंडू कुरतडणे हे नियम बाह्य आहे. कोरोनाच्या वैश्विक महामारीमध्ये थुंकी किंवा घाम गोलंदाज वापरू लागला तर कोरोनाचा संसर्ग होण्यासाठी कारणीभूत तरी शकतो म्हणून आता थुंकी किंवा घाम चेंडूवर लावू नये असा नियमात बदल करणे गरजेचे बनले आहे. क्रिकेटचा चेंडू ऑस्ट्रेलियन कुकाबुरा आणि एसजी या दोन कंपन्या बनवतात सध्या कुकाबुरा कंपनी ने एक प्रकारचे wax बनवले आहे परंतु सध्या कुठेच क्रिकेट खेळेले जात नसल्याने याची उपूक्तता सिद्ध झाली नाही. थुंकी किंवा घाम लावू नये त्याच बरोबर चकाकी आणण्यासाठी कोणत्या गोष्टींचा वापर नियमात धरून केला पाहिजे या बाबतीत सध्या एमसीसी आणि आयसीसी च्या बैठका सुरू आहेत. पण कोरोनाने सार्‍या जागा बरोबर क्रिकेटला देखील विचार करायला लावला आहे.

प्रा डॉ अजिंक्य अजित पत्रावळे,

रसायनशास्त्र विभाग

विवेकानंद कॉलेज कोल्हापूर

 


Comments

  1. Very nice information sir 👍👌 thanks sir 👍👍

    ReplyDelete
  2. 1st time mention the sport and covind in ur series very informative

    ReplyDelete
  3. Cricket ko bhi nahi choda corona ne

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Corona Series Part 39 : कोरोना, आणि लस निर्मिती मधील भारतीयांचा सहभाग

Corona Series Part 39       नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणू चा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. कोरोना , आणि लस निर्मिती मधील भारतीयांचा सहभाग जगात असा एक ही देश नसेल जिथे ज्ञानाचा भंडार असणारे भारतीय लोक त्या देशाच्या प्रगतिमध्ये सहभागी नाहीत. कोरोनाच्या लढ्यात तरी हे मागे कशी राहतील. सिरम इंडिया लिमिटेड पुणे स्थित जैव तंत्रज्ञानातील अग्रणी कंपनी आहे यां कंपनीचे वैशिष्ट्य म्हणजे या पूर्वी ही hepatitis, पोलीओ , स्वाइन फ्लू इत्यादि आजारामध्ये लस निर्माण करण्याचे महत्वाचे योगदान आहे. वर्षभरात १.५ अब्ज लसीचे डोस अतिशय माफक दरात तयार करण्याची क्षमता असणारी या कंपनीचे उत्पादन यूरोपियन देशात व संशोधन यूनिट पुणे सारख्या शहरात आहे. भारतामध्ये एक ही नोबेल परितोषिक किवा औषधाचा स्वामित्व हक्क नाही तरीही औषध , लस उत्पादन करण्यात प्रावीण्य , विश्वसनीय नावलौकिक मिळवणारा देश आहे. जावपास ८०% लस आफ्रिका सारख्या देशात पुरवेल जातात. कोरोनाची लस निर्माण करण्यासाठी न्यूयॉर्क मधील codagenic या...

पुन्हा कधीही कोरोना सारख्या महामारीमुळे लेख लिहायची वेळ येऊ नये हीच ईश्वर चरणी प्रार्थना

नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे आज काय लिहावे आणि काय नको समजेनासे झाले आहे. तरी धाडस करून लिहित आहे. काही चुकले तर समजून घ्यावे ही विनंती.   मार्च महिन्यामध्ये जगात नवीन विषाणू ने धुमाकूळ घातला होता सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. शास्त्रज्ञ , संशोधक , मीडिया , नेते , उद्योजक , आणि सामान्य जनता सर्वच नागरिकांना पुढे काय वाहून ठेवले आहे याची कल्पना नव्हती. परिस्थितीचे आकलन होण्याचा आतच लॉकडाउन झाला तेव्हा सुट्टीचा आनंद घेऊया असे समजून काही नागरिक मस्त मजेत होते. हळू हळू परिस्थिती बदलून गंभीर झाली , पण नेमके काय चालू आहे काय करावे आणि काय करू नये याचा अंदाज लागेना. मीडिया मध्ये रोज के भीतीदायक बातमी येऊ लागली कधी विषाणू वर असलेले उपाया येऊ लागले पण शास्त्रीय माहिती सजत नसल्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण होऊ लागले . अश्या मध्ये रसायनशास्त्राचा विद्यार्थी म्हणून कोरोना विषाणूच्या विरोधात   काही काम करावे असे वाटत होते परंतु संशोधन करण्यासाठी काही मर्यादा होत्या याचे भान होते पण शांत बसून चालणार नाही हे लक्षात आले होते. म्हणून मनातून ठरवले आज या संकटकाळी समजासाठी आप...

Corona Series Part 38 : कोरोना, आणि चीनी वैद्यकीय उपकरणे

Corona Series Part 38       नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणू चा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. कोरोना , आणि चीनी वैद्यकीय उपकरणे एखाद्या व्यक्तिच्या मजबूरीचा स्वतच्या फायद्यासाठी कसा उपयोग करून घेता येईल याचे सर्वोत्तम प्रशिक्षण चीनमध्ये मिळते. चीन म्हणजे धोखेबाजी , अविश्वास् याचा अनुभव सर्वांनी घेतला आहे तरी देखिल मजबूरी म्हणून काही व्यवहारीक जुगार चीनशी करावे लागत आहेत. त्यातील एक म्हणजे वैद्यकीय उपकरण खरेदी. नोहेंबर ते फेब्रुवारी च्या दरम्यान चीन मध्ये कोरोना चे संक्रमण जोरावर असल्याने चीन मधील काही प्रांत बंद होते , या विषाणूच्या बाबतीतील माहीत सुरवातीपासूंनच लपवण्यात आल्यामुळे चीन व्यतिरिक्त ईतर जग सुरळीत चालू होते , आणि एकदा हा विषाणू चीन मधून सार्‍या जगात पसरला तेव्हा ईतर देशांची या विषाणू च्या विरोधात लडण्याची तयारी नसल्याने विषाणूचे संक्रमण जलत गतीने पसरू लागले. तेव्हा वैद्यकीय उपकरणे जसे मास्क , तपासणी किट , संरक्षक किट , वेंटीलेटर , ईत्यादी उपकरणाची मागणी आणि ...