Corona Series Part 73
नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे
सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती
करण्याचा प्रयत्न करत आहे. https://ajinkya1030.blogspot.com/
कोरोना, आणि Genetic
Strain
कोरोना विषाणूची समस्या सर्वत्र पसरली आहे पण वेगवेगळ्या
देशात किवा देशांतर्गात या विषाणूची लक्षणे, विषाणूचा फैलाव होण्याचा, मृत्यूदर असे किती
तरी घटक आहेत जे विविधता दाखवत आहेत,
तसेच वेगवेगळ्या भागात औषधउपचार देखील वेगळे आहेत. आतापर्यंत ९५ प्रकारच्या लसींची
चाचपणी चालू आहे. एकच विषाणू असून असे वेगळेपण का दिसून येत आहे, याचे कारण असे की वैज्ञानिकाना आतापर्यन्त कोरोनाचे
जगभरात ८ स्ट्रेन सापडले आहेत. स्ट्रेन म्हणजे नक्की काय तर एकाच प्रकारच्या
विषाणूमध्ये त्याच्या अनुवांशिक माहिती असणार्या आरएनएमध्ये कायमस्वरूपी झालेला बदल
यामुळे एकाच जातीच्या विषाणू असून अनेक देशात वेगवेगळी समस्या निर्माण करतो. आरएनएमध्ये
कायमस्वरूपी बदल त्याला mutataion म्हणतात
असे बदल होण्याची कारणे अनेक आहेत प्रदूषण, अतिनील किरणे,
नवीन प्रत तयार होण्याचा प्रक्रियेमधील
बिघाड ईत्यादी. वैज्ञानिक हेच बदल टिपून घेऊन त्याचा अभ्यास करण्यात गुंतले आहेत सारेविश्व
कोरोनावर उपाय शोधण्यात गुंतले आहे म्हणून वैज्ञानिकाना आढळणारे सारे बदल ते इंटरनेटवर
Nextstrain.org
या वेबसाइटवर
अद्ययावत करत आहेत. पर्यावरणाच्या
बदलाप्रमाणे माणसामध्ये देखील असे बदल होतत परंतु कोरोना सारख्या विषाणूमध्ये झालेल
बदल मानवास सोसण्यासारखे नाहीत. इंफ्लुएंजाच्या तुलनेत कोरोना विषाणूचा स्वतमध्ये बदल
घडवण्याचे प्रमाण कमी आणि हळू आहे त्यामुळेच की काय या विषाणूचा फैलावा जोरात होत असला
तरीही मृत्यूदर अधिक नाही. म्हणजेच कोरोना विषाणू एचआयव्ही ईत्यादी ईतका घातक नाही
परंतु फैलाव मोठ्या प्रमाणात होत असल्याने चिंताजनक परिस्थिति निर्माण करतो.
कोरोना विषाणू हा आरएनए विषाणू असून त्याचा जिनोम ३०,००० बेस पेअरनी बनला आहे. मनुष्यामध्ये
३ अब्ज बेस पेअर आहेत म्हणजे मनुष्या तुलनेत किती छोटासा विषाणू
आहे तरी मनुष्याच्या नाकी नऊ आणले आहेत. संशोधनानुसार कोरोना विषाणूच्या जिनोममध्ये ११ वेळा
बदल झालेला आहे. अमेरिकेमधील पूर्व आणि पश्चिम किनार्यावर कोरोना विषाणूचे वेगवेगळे
स्ट्रेन आढळून आले आहेत. पश्चिम किनार्यावरील आणि वॉशिंग्टन मधील स्ट्रेन एकसारखा
असून तो मूळ वुहाण मधील स्ट्रेन पेक्षा ३ स्टेप वेगळा आहे. आता चीन मध्ये कोरोना
विषाणू चे किती स्ट्रेन आहेत हे शी झिंग पिंगच सांगू शकतील किंवा त्यांचा सरकारच्या
लोकांचा माहीत असेल. दिनांक १० जानेवारी २०२० रोजी चीन मधील प्राध्यापक योंग झेन झांग
यांनी चीन मधील कोरोना विषणूचा sequence प्रसिद्ध केला त्याच धर्तीवर आपण ईतर देशातील विषाणू मूळ विषाणू पासून किती
वेगळा आहे याची तुलना करून पाहत आहे. काही वैज्ञानिकांचा निष्कर्षानुसार हा विषाणू
मानवनिर्मित नसावा परंतु प्राण्यांमध्ये कोरोना विषाणू इंजेक्ट करून नंतर तो जाणून
बुजून मानवजाती मध्ये आणला गेल्याची एक शक्यत वर्तवली जाते. (its conspiracy theory) असो, परंतु हा विषाणू मानव शरीरात कसे संक्रमण करतो, किती दिवस राहतो,
या विषाणूचा कच्चा दुवा कोणता, जमेची बाजू कोणती, स्वतमध्ये कसे,
कधी आणि कितपत बदल करू शकतो अश्या गोष्टी
जाणून घेण्यासाठी मूळ विषाणू जो वुहणमधून बाहेर पडला त्याचा अभ्यास करणे गरजेचे आहे.
पण चीन या मध्ये आडकाठी घालत आहे. चीन असे का करतो हे आपण जानता. नसेल माहीत तर पुढे कधी तरी या संदर्भात चर्चा होईल.
तोपर्यंत वाचत रहा,
घरी सुरक्षित रहा.
प्रा डॉ अजिंक्य अजित पत्रावळे,
रसायनशास्त्र विभाग
विवेकानंद कॉलेज कोल्हापूर
Nice sir
ReplyDeleteDeep study sir
ReplyDeleteVery good sir
ReplyDeleteDeep study sir ....
ReplyDeleteNice information sir 👍👍 thanks sir 👍👍
ReplyDeleteअभिनंदन अजिंक्य👌👌
ReplyDeleteकोविड-१९ चे तू खूप छान विवेचन केलेस आणि करत आहेस.तुझी लेखमाला /ब्लॉग पण खूप गाजत आहे.जनजागृतीचे जे व्रत तू घेतले आहेस त्याबद्दल तुझे करावे तेवढे कौतुक कमीच आहे.परवा पेपर मध्ये पण तुझी बातमी वाचली.विशेषतः आमचा विद्यार्थी म्हणून आम्हाला तुझा खूप अभिमान वाटतोय.तुझ्या यशाची कमान अशीच चढत जावो,हीच सद्दीच्छा🌹🌹🌹
अभिनंदन अजिंक्य ��������
ReplyDeleteकोविड-१९ चे तू खूप छान विवेचन केलेस आणि करत आहेस.तुझी लेखमाला /ब्लॉग पण खूप गाजत आहे.जनजागृतीचे जे व्रत तू घेतले आहेस त्याबद्दल तुझे करावे तेवढे कौतुक कमीच आहे.परवा पेपर मध्ये पण तुझी बातमी वाचली.विशेषतः आमचा विद्यार्थी म्हणून आम्हाला तुझा खूप अभिमान वाटतोय.तुझ्या यशाची कमान अशीच चढत जावो,हीच सद्दीच्छा��������
अभिनंदन अजिंक्य👌👌
ReplyDeleteकोविड-१९ चे तू खूप छान विवेचन केलेस आणि करत आहेस.तुझी लेखमाला /ब्लॉग पण खूप गाजत आहे.जनजागृतीचे जे व्रत तू घेतले आहेस त्याबद्दल तुझे करावे तेवढे कौतुक कमीच आहे.परवा पेपर मध्ये पण तुझी बातमी वाचली.विशेषतः आमचा विद्यार्थी म्हणून आम्हाला तुझा खूप अभिमान वाटतोय.तुझ्या यशाची कमान अशीच चढत जावो,हीच सद्दीच्छा🌹🌹🌹
- डॉ. क्रांती पाटील
Khip chan
ReplyDeleteChan
ReplyDelete