Skip to main content

Corona Series Part 73: कोरोना, आणि Genetic Strain

Corona Series Part 73

नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. https://ajinkya1030.blogspot.com/

 

कोरोना, आणि Genetic Strain

कोरोना विषाणूची समस्या सर्वत्र पसरली आहे पण वेगवेगळ्या देशात किवा देशांतर्गात या विषाणूची लक्षणे, विषाणूचा फैलाव होण्याचा, मृत्यूदर असे किती तरी घटक आहेत जे विविधता दाखवत आहेत, तसेच वेगवेगळ्या भागात औषधउपचार देखील वेगळे आहेत. आतापर्यंत ९५ प्रकारच्या लसींची चाचपणी चालू आहे. एकच विषाणू असून असे वेगळेपण का दिसून येत आहे, याचे कारण असे की वैज्ञानिकाना आतापर्यन्त कोरोनाचे जगभरात ८ स्ट्रेन सापडले आहेत. स्ट्रेन म्हणजे नक्की काय तर एकाच प्रकारच्या विषाणूमध्ये त्याच्या अनुवांशिक माहिती असणार्‍या आरएनएमध्ये कायमस्वरूपी झालेला बदल यामुळे एकाच जातीच्या विषाणू असून अनेक देशात वेगवेगळी समस्या निर्माण करतो. आरएनएमध्ये कायमस्वरूपी बदल त्याला mutataion म्हणतात असे बदल होण्याची कारणे अनेक आहेत प्रदूषण, अतिनील किरणे, नवीन प्रत तयार होण्याचा प्रक्रियेमधील बिघाड ईत्यादी. वैज्ञानिक हेच बदल टिपून घेऊन त्याचा अभ्यास करण्यात गुंतले आहेत सारेविश्व कोरोनावर उपाय शोधण्यात गुंतले आहे म्हणून वैज्ञानिकाना आढळणारे सारे बदल ते इंटरनेटवर Nextstrain.org या वेबसाइटवर अद्ययावत करत आहेत. पर्यावरणाच्या बदलाप्रमाणे माणसामध्ये देखील असे बदल होतत परंतु कोरोना सारख्या विषाणूमध्ये झालेल बदल मानवास सोसण्यासारखे नाहीत. इंफ्लुएंजाच्या तुलनेत कोरोना विषाणूचा स्वतमध्ये बदल घडवण्याचे प्रमाण कमी आणि हळू आहे त्यामुळेच की काय या विषाणूचा फैलावा जोरात होत असला तरीही मृत्यूदर अधिक नाही. म्हणजेच कोरोना विषाणू एचआयव्ही ईत्यादी ईतका घातक नाही परंतु फैलाव मोठ्या प्रमाणात होत असल्याने चिंताजनक परिस्थिति निर्माण करतो.

 

 

 

कोरोना विषाणू हा आरएनए विषाणू असून त्याचा जिनोम ३०,००० बेस पेअरनी बनला आहे. मनुष्यामध्ये ३ अब्ज बेस पेअर आहेत म्हणजे मनुष्या तुलनेत किती छोटासा विषाणू आहे तरी मनुष्याच्या नाकी नऊ आणले आहेत. संशोधनानुसार कोरोना विषाणूच्या जिनोममध्ये ११ वेळा बदल झालेला आहे. अमेरिकेमधील पूर्व आणि पश्चिम किनार्‍यावर कोरोना विषाणूचे वेगवेगळे स्ट्रेन आढळून आले आहेत. पश्चिम किनार्‍यावरील आणि वॉशिंग्टन मधील स्ट्रेन एकसारखा असून तो मूळ वुहाण मधील स्ट्रेन पेक्षा ३ स्टेप वेगळा आहे. आता चीन मध्ये कोरोना विषाणू चे किती स्ट्रेन आहेत हे शी झिंग पिंगच सांगू शकतील किंवा त्यांचा सरकारच्या लोकांचा माहीत असेल. दिनांक १० जानेवारी २०२० रोजी चीन मधील प्राध्यापक योंग झेन झांग यांनी चीन मधील कोरोना विषणूचा sequence प्रसिद्ध केला त्याच धर्तीवर आपण ईतर देशातील विषाणू मूळ विषाणू पासून किती वेगळा आहे याची तुलना करून पाहत आहे. काही वैज्ञानिकांचा निष्कर्षानुसार हा विषाणू मानवनिर्मित नसावा परंतु प्राण्यांमध्ये कोरोना विषाणू इंजेक्ट करून नंतर तो जाणून बुजून मानवजाती मध्ये आणला गेल्याची एक शक्यत वर्तवली जाते. (its conspiracy theory) असो, परंतु हा विषाणू मानव शरीरात कसे संक्रमण करतो, किती दिवस राहतो, या विषाणूचा कच्चा दुवा कोणता, जमेची बाजू कोणती, स्वतमध्ये कसे, कधी आणि कितपत बदल करू शकतो अश्या गोष्टी जाणून घेण्यासाठी मूळ विषाणू जो वुहणमधून बाहेर पडला त्याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. पण चीन या मध्ये आडकाठी घालत आहे. चीन असे का करतो हे आपण जानता.  नसेल माहीत तर पुढे कधी तरी या संदर्भात चर्चा होईल. तोपर्यंत वाचत रहा, घरी सुरक्षित रहा.

प्रा डॉ अजिंक्य अजित पत्रावळे,

रसायनशास्त्र विभाग

विवेकानंद कॉलेज कोल्हापूर


Comments

  1. Nice information sir 👍👍 thanks sir 👍👍

    ReplyDelete
  2. अभिनंदन अजिंक्य👌👌
    कोविड-१९ चे तू खूप छान विवेचन केलेस आणि करत आहेस.तुझी लेखमाला /ब्लॉग पण खूप गाजत आहे.जनजागृतीचे जे व्रत तू घेतले आहेस त्याबद्दल तुझे करावे तेवढे कौतुक कमीच आहे.परवा पेपर मध्ये पण तुझी बातमी वाचली.विशेषतः आमचा विद्यार्थी म्हणून आम्हाला तुझा खूप अभिमान वाटतोय.तुझ्या यशाची कमान अशीच चढत जावो,हीच सद्दीच्छा🌹🌹🌹

    ReplyDelete
  3. अभिनंदन अजिंक्य ��������
    कोविड-१९ चे तू खूप छान विवेचन केलेस आणि करत आहेस.तुझी लेखमाला /ब्लॉग पण खूप गाजत आहे.जनजागृतीचे जे व्रत तू घेतले आहेस त्याबद्दल तुझे करावे तेवढे कौतुक कमीच आहे.परवा पेपर मध्ये पण तुझी बातमी वाचली.विशेषतः आमचा विद्यार्थी म्हणून आम्हाला तुझा खूप अभिमान वाटतोय.तुझ्या यशाची कमान अशीच चढत जावो,हीच सद्दीच्छा��������

    ReplyDelete
  4. अभिनंदन अजिंक्य👌👌
    कोविड-१९ चे तू खूप छान विवेचन केलेस आणि करत आहेस.तुझी लेखमाला /ब्लॉग पण खूप गाजत आहे.जनजागृतीचे जे व्रत तू घेतले आहेस त्याबद्दल तुझे करावे तेवढे कौतुक कमीच आहे.परवा पेपर मध्ये पण तुझी बातमी वाचली.विशेषतः आमचा विद्यार्थी म्हणून आम्हाला तुझा खूप अभिमान वाटतोय.तुझ्या यशाची कमान अशीच चढत जावो,हीच सद्दीच्छा🌹🌹🌹
    - डॉ. क्रांती पाटील

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Corona Series Part 102 : कोरोना आणि ब्ल्युबोनिक प्लेग

Corona Series Part 102 नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे.   कोरोना आणि ब्ल्युबोनिक प्लेग कोरोन सोबत अनेक विषाणूचा फैलाव कमी अधिक प्रमानात होत आहे परंतु १३००च्या दशकातील महाभयंकर रोग ब्ल्युबोनिक प्लेग जो जिवाणू मुळे होतो त्याचा फैलावा होतानाची काही उदाहरणे समोर आली आहेत. १३००च्या काळात युरोप   खंडामधील अर्ध्याहून अधिक लोकसंख्या या प्लेग मुळे नाहीशी झाली (जवळपास ५ करोड ) म्हणूनच याला ब्लॅक डेथ असे म्हंटले जाते. एकदा का प्लेग झाला की व्यक्ति जास्तीतजास्त ४८ तास जगत असे. २०२० साली हा आजार पुन्हा बळावला आहे आणि साहजिकच या आजारचा केंद्र बिन्दु दूसरा तिसरा कोणताही देश नसून चीनच आहे. चीन म्हणजे रोगराई पसरवणार्‍या जिवाणू विषाणू चे माहेर घरच आहे. १९४९ साली माऊ जिदोंगने रोगराई मुक्त चीन हे चीनसाठी पाहिलेले स्वप्न साकारत चीन ने आपल्या दारातील रोगराईची घाण दुसर्‍याच्या दारात अलगद सरकवण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यात ते यश मिळवत आहेत. चीन मधील इंनर मंगोलीया नावाचा स्वायत प...

पुन्हा कधीही कोरोना सारख्या महामारीमुळे लेख लिहायची वेळ येऊ नये हीच ईश्वर चरणी प्रार्थना

नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे आज काय लिहावे आणि काय नको समजेनासे झाले आहे. तरी धाडस करून लिहित आहे. काही चुकले तर समजून घ्यावे ही विनंती.   मार्च महिन्यामध्ये जगात नवीन विषाणू ने धुमाकूळ घातला होता सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. शास्त्रज्ञ , संशोधक , मीडिया , नेते , उद्योजक , आणि सामान्य जनता सर्वच नागरिकांना पुढे काय वाहून ठेवले आहे याची कल्पना नव्हती. परिस्थितीचे आकलन होण्याचा आतच लॉकडाउन झाला तेव्हा सुट्टीचा आनंद घेऊया असे समजून काही नागरिक मस्त मजेत होते. हळू हळू परिस्थिती बदलून गंभीर झाली , पण नेमके काय चालू आहे काय करावे आणि काय करू नये याचा अंदाज लागेना. मीडिया मध्ये रोज के भीतीदायक बातमी येऊ लागली कधी विषाणू वर असलेले उपाया येऊ लागले पण शास्त्रीय माहिती सजत नसल्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण होऊ लागले . अश्या मध्ये रसायनशास्त्राचा विद्यार्थी म्हणून कोरोना विषाणूच्या विरोधात   काही काम करावे असे वाटत होते परंतु संशोधन करण्यासाठी काही मर्यादा होत्या याचे भान होते पण शांत बसून चालणार नाही हे लक्षात आले होते. म्हणून मनातून ठरवले आज या संकटकाळी समजासाठी आप...

Corona Series Part 1 : Clinical Trails starts on Corona

Corona Series Part 1 Corona धोका लक्षात घेता social media द्वारे जनजागृती करणे गरजेचे झाले आहे त्या माध्यमातून एक प्रयत्न करत आहे कृपया msg पूर्ण वाचून आपल्याला योग्य वाटल्यास पुढे पाठवा कोरोना जनजागृती मोहीम Clinical Trails starts on Corona जवळपास जगामध्ये 20 संस्था ह्या आजारावर vaccine बनवण्याचा प्रयन्त करत आहेत . जानेवारी 2020 मध्ये चीन मध्ये शास्त्रज्ञांनी कोरोना virus चे genetic मटेरियल चे sequencing चे decoding केले , अमेरिकेतील सरकारी संस्थामधील शास्त्रज्ञानी ह्या अभ्यासच फायदा घेत पुढे कांम चालू केले   1) (NIAID) National Institute of Allergy and Infection 2) Moderna Inc ह्या दोन संस्था मागील काही वर्षे MERS,   SARS- 1 वर काम करत आहेत त्यांना जेव्हा sequencing of gentic information of corona 2   मिळाली त्यांनी vaccine बनवण्याचे काम अहो रात्र चालू केले. अमेरिकेतील north washington जिथे मायक्रोसॉफ्ट चे बिल गेट्स व अनेक it कंपनीच्या चे केंद्र स्थान आहे अश्या शहरामध्ये Kiaser Permannente Washington Health Reseaech Institute (KPWHRI) मध्ये संशोधकांन...