Skip to main content

Corona Series Part 65: कोरोना, आणि भारतीय पीपीई किट

Corona Series Part 65

नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. https://ajinkya1030.blogspot.com/

कोरोना, आणि भारतीय पीपीई किट

कोरोनाच्या सुरवातीच्या काळात भारतासारखे प्रगतशील आणि ईटली सारखे पुढारलेले देश या महामारीसोबात लढण्यासाठी अविश्वासू चीनवर अवलंबून होते याचा पुरेपूर फायदा उचलत चीन ने खराब वैद्यकीय उपकरणे, किट विविध देशाला दिली. याचा अनुभव भारताला देखील आला आणि या सगळ्या गोंधळामध्ये वेळ निघून गेला म्हणून कोरोनाचा फैलाव वाढला. दरम्यानच्या काळात भारताच्या सरकारने आत्मनिर्भर होण्याचा संकल्प केला आहे त्या नुसार नीती आयोग, अनुदान, शासकीय करामध्ये सूट,  ईत्यादी माध्यमातून विविध कंपण्याचे मनोबल वाढवले आणि त्याचा परिणाम म्हणजे वस्त्र उद्योग मंत्रालयच्या मार्फत आज जाहीर घोषणा केली भारत हा विश्वामधील दुसर्‍या क्रमांकाचा पीपीई किटचे उत्पादन करणारा देश बनला.

पीपीई किट म्हणजे सध्या कोरोना योद्धे बाधित लोकांच्या संपर्कात येत असताना त्यांना बाधा होऊ नये म्हणून वापरले जाणारे किट त्यामध्ये गॉगल, मास्क, हेड कवर, हातमोजे, बूटवरील कवर, आणि सारे शरीर झाकले जाईल असा कोट असे सर्व घटक मिळून एक पीपीई किट बनवले जाते. आतापर्यंत भारत सरकारच्या मधमातून ३०लाख किट हे राज्यांना मोफत देण्यात आले. हे किट वैश्विक महामारीमध्ये बनवण्यात आले त्यामुळे त्याचा दर्जा टिकवून उत्पादन करणे फार मोठे आव्हान होते त्यासाठी भारत सरकारने किट तपासणीसाठी लॅब उपलब्ध करून देण्यात आले आणि तपासणीमध्ये पास झालेल्या कंपण्यासाठी प्रमाणपत्र देण्यात आले. सदर लॅब मध्ये Synthetic Blood Penetration testing मशीन बसवण्यात आले या मध्ये हे किट बाधित व्यक्तीचे रक्त शोषून घेऊ शकते का हे तपासले गेले. त्यामुळे या किट बाबतीत सुरकक्षेची हमी मिळाली म्हणूच अमेरिका, युरोप मधून देखील भारतीय पीपीई किटची मागणी वाढली आहे आणि येणार्‍या काळात आपण याचे मोठे निर्यातदर बनु हीच आत्मनिर्भर्ता १ महिना आधी आपण आणू शकलो आसतो जर आपण शेजारील धोकेबाज चीनवर अवलबून राहीलो नसतो तर. आज सर्वच ठिकाणी आत्मनिर्भर होण्याची खूप मोठी संधि भारताला मिळत आणि मिळणार आहे. वाईट गोष्टीत देखील चांगले पहायची सवय ठेवली तर कोरोना नंतर ही आपण प्रगति करू शकू.

प्रा डॉ अजिंक्य अजित पत्रावळे,

रसायनशास्त्र विभाग,

विवेकानंद कॉलेज कोल्हापूर

https://ajinkya1030.blogspot.com

 


Comments

  1. Nice information sir 👍👍 thanks sir 👍👍

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

पुन्हा कधीही कोरोना सारख्या महामारीमुळे लेख लिहायची वेळ येऊ नये हीच ईश्वर चरणी प्रार्थना

नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे आज काय लिहावे आणि काय नको समजेनासे झाले आहे. तरी धाडस करून लिहित आहे. काही चुकले तर समजून घ्यावे ही विनंती.   मार्च महिन्यामध्ये जगात नवीन विषाणू ने धुमाकूळ घातला होता सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. शास्त्रज्ञ , संशोधक , मीडिया , नेते , उद्योजक , आणि सामान्य जनता सर्वच नागरिकांना पुढे काय वाहून ठेवले आहे याची कल्पना नव्हती. परिस्थितीचे आकलन होण्याचा आतच लॉकडाउन झाला तेव्हा सुट्टीचा आनंद घेऊया असे समजून काही नागरिक मस्त मजेत होते. हळू हळू परिस्थिती बदलून गंभीर झाली , पण नेमके काय चालू आहे काय करावे आणि काय करू नये याचा अंदाज लागेना. मीडिया मध्ये रोज के भीतीदायक बातमी येऊ लागली कधी विषाणू वर असलेले उपाया येऊ लागले पण शास्त्रीय माहिती सजत नसल्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण होऊ लागले . अश्या मध्ये रसायनशास्त्राचा विद्यार्थी म्हणून कोरोना विषाणूच्या विरोधात   काही काम करावे असे वाटत होते परंतु संशोधन करण्यासाठी काही मर्यादा होत्या याचे भान होते पण शांत बसून चालणार नाही हे लक्षात आले होते. म्हणून मनातून ठरवले आज या संकटकाळी समजासाठी आप...

Corona Series Part 1 : Clinical Trails starts on Corona

Corona Series Part 1 Corona धोका लक्षात घेता social media द्वारे जनजागृती करणे गरजेचे झाले आहे त्या माध्यमातून एक प्रयत्न करत आहे कृपया msg पूर्ण वाचून आपल्याला योग्य वाटल्यास पुढे पाठवा कोरोना जनजागृती मोहीम Clinical Trails starts on Corona जवळपास जगामध्ये 20 संस्था ह्या आजारावर vaccine बनवण्याचा प्रयन्त करत आहेत . जानेवारी 2020 मध्ये चीन मध्ये शास्त्रज्ञांनी कोरोना virus चे genetic मटेरियल चे sequencing चे decoding केले , अमेरिकेतील सरकारी संस्थामधील शास्त्रज्ञानी ह्या अभ्यासच फायदा घेत पुढे कांम चालू केले   1) (NIAID) National Institute of Allergy and Infection 2) Moderna Inc ह्या दोन संस्था मागील काही वर्षे MERS,   SARS- 1 वर काम करत आहेत त्यांना जेव्हा sequencing of gentic information of corona 2   मिळाली त्यांनी vaccine बनवण्याचे काम अहो रात्र चालू केले. अमेरिकेतील north washington जिथे मायक्रोसॉफ्ट चे बिल गेट्स व अनेक it कंपनीच्या चे केंद्र स्थान आहे अश्या शहरामध्ये Kiaser Permannente Washington Health Reseaech Institute (KPWHRI) मध्ये संशोधकांन...

Corona Series Part 100 : कोरोना आणि DRDO

Corona Series Part 100 नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. https://ajinkya1030.blogspot.com/   कोरोना आणि DRDO १९५८ मध्ये तांत्रिक विकास संस्था आणि भारतीय आयुध निर्मिती संचालनालयाच्या संरक्षण विज्ञान संस्थेमध्ये या संस्थेची स्थापना करण्यात आली. हे भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) जी लष्कराच्या संशोधन आणि विकासाची संस्था आहे. एकूण ५२ प्रयोगशाळां , ज्याद्वारे एरोनॉटिक्स , आर्मेट्स , इलेक्ट्रॉनिक्स , लँड कॉम्बॅट इंजिनिअरिंग , जीवन विज्ञान , साहित्य , क्षेपणास्त्रे आणि नौदल प्रणाली अशा विविध क्षेत्रांचा समावेश असलेले संरक्षण तंत्रज्ञान विकसित करण्यात गुंतलेले आहे. या संघटनेत संरक्षण संशोधन आणि विकास सेवा (डीआरडीएस) चे सुमारे ५ , ००० शास्त्रज्ञ आणि इतर २५ , ००० वैज्ञानिक , तांत्रिक आणि सहाय्यक कर्मचारी यांचा समावेश आहे. अशी नावा रूपाला आलेली लष्करी संस्था कोरोंना सारख्या महामारीत देखील देशसेवेचे आपले...