Corona Series Part 65
नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे
सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती
करण्याचा प्रयत्न करत आहे. https://ajinkya1030.blogspot.com/
कोरोना, आणि भारतीय पीपीई किट
कोरोनाच्या सुरवातीच्या काळात भारतासारखे प्रगतशील
आणि ईटली सारखे पुढारलेले देश या महामारीसोबात लढण्यासाठी अविश्वासू चीनवर अवलंबून
होते याचा पुरेपूर फायदा उचलत चीन ने खराब वैद्यकीय उपकरणे, किट विविध देशाला दिली. याचा अनुभव भारताला देखील
आला आणि या सगळ्या गोंधळामध्ये वेळ निघून गेला म्हणून कोरोनाचा फैलाव वाढला.
दरम्यानच्या काळात भारताच्या सरकारने आत्मनिर्भर होण्याचा संकल्प केला आहे त्या
नुसार नीती आयोग, अनुदान, शासकीय करामध्ये सूट, ईत्यादी माध्यमातून विविध कंपण्याचे मनोबल
वाढवले आणि त्याचा परिणाम म्हणजे वस्त्र उद्योग मंत्रालयच्या मार्फत आज जाहीर
घोषणा केली भारत हा विश्वामधील दुसर्या क्रमांकाचा पीपीई किटचे उत्पादन करणारा देश
बनला.
पीपीई किट म्हणजे सध्या कोरोना योद्धे बाधित
लोकांच्या संपर्कात येत असताना त्यांना बाधा होऊ नये म्हणून वापरले जाणारे किट
त्यामध्ये गॉगल, मास्क, हेड कवर, हातमोजे, बूटवरील कवर, आणि सारे शरीर झाकले जाईल असा कोट असे सर्व घटक
मिळून एक पीपीई किट बनवले जाते. आतापर्यंत भारत सरकारच्या मधमातून ३०लाख किट हे राज्यांना मोफत देण्यात आले.
हे किट वैश्विक महामारीमध्ये बनवण्यात आले त्यामुळे त्याचा दर्जा टिकवून उत्पादन
करणे फार मोठे आव्हान होते त्यासाठी भारत सरकारने किट तपासणीसाठी लॅब उपलब्ध करून देण्यात
आले आणि तपासणीमध्ये पास झालेल्या कंपण्यासाठी प्रमाणपत्र देण्यात आले. सदर लॅब
मध्ये Synthetic
Blood Penetration testing मशीन बसवण्यात आले या मध्ये हे किट बाधित व्यक्तीचे रक्त शोषून घेऊ शकते का
हे तपासले गेले.
त्यामुळे या किट बाबतीत सुरकक्षेची हमी मिळाली म्हणूच अमेरिका, युरोप मधून देखील भारतीय पीपीई किटची मागणी वाढली
आहे आणि येणार्या काळात आपण याचे मोठे निर्यातदर बनु हीच आत्मनिर्भर्ता १ महिना
आधी आपण आणू शकलो आसतो जर आपण शेजारील धोकेबाज चीनवर अवलबून राहीलो नसतो तर. आज
सर्वच ठिकाणी आत्मनिर्भर होण्याची खूप मोठी संधि भारताला मिळत आणि मिळणार आहे. वाईट गोष्टीत देखील चांगले पहायची सवय ठेवली तर कोरोना
नंतर ही आपण प्रगति करू शकू.
प्रा डॉ अजिंक्य अजित पत्रावळे,
रसायनशास्त्र विभाग,
विवेकानंद कॉलेज कोल्हापूर
https://ajinkya1030.blogspot.com
Nice information sir 👍👍 thanks sir 👍👍
ReplyDelete