Corona Series Part 60
नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा
प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती
करण्याचा प्रयत्न करत आहे. https://ajinkya1030.blogspot.com/
कोरोना, चीन विरोध जपान, आणि
भारताचा सहभाग
चीनमधून बाहेर आलेल्या कोरोना विषाणूच्या बाबतीत सारी
माहिती घेण्याची संपूर्ण जगाची मर्जी आहे आणि त्यासाठी अमेरिका, यूरोपियन देश आणि ऑस्ट्रेलिया असे देश मागणी करत
आहेत. मागणी नुसार कोरोना विषाणूच्या उत्पतीची मुळे चीन मधून शोधून काडणे, डब्ल्यूएचओचा चीनसाठी झालेला दुजाभाव आणि तैवानची
डब्ल्यूएचओ मध्ये सहभाग होण्याबाबतीत समर्थन करून चीन विरोधाची भूमिका स्पष्ठ होत
आहे. परंतु, या मध्ये आजपर्यंत आशियाई देशांचा सहभाग दिसत नव्हता
पण काल जपानच्या परराष्ट्र मंत्रीनी जाहीर संगितले जपान कोरोंना विषाणूच्या
संदर्भात चीन मध्ये तपासनी करण्याचा बाजूने आहे. या विषाणूचे मुळ शोधून काडणे अत्यंत
महत्वाचे आहे आणि त्यासाठी चीनमध्ये जाऊन संशोधन आणि तपासनी करणे गरजेचे आहे. २०१८
च्या जी-२० बैठकी नंतर जपान,
अमेरिका, भारत या देशाचा एक समूह बनला होता
JAI त्याची बैठक होऊन, एकत्रित आशियाई क्षेत्रात काम करण्याचे योजले होते
त्याचबरोबर २००७ साली स्थापण झालेल्या परंतु २०१७ पुन्हा चालना मिळालेला ऑस्ट्रेलिया, जपान, अमेरिका आणि भारत समूह Quadrilatrol Sequirty Diaglog (QUARD) ने देखील कोरोंना आणि चीन विरोधात मागणी केली आहे.
असे असेल तरी विशेषतः भारत आजही कोरोना विषाणू आणि
चीन या विषयावर सावध भूमिका मांडत आहे. या बचावात्मक पद्धतीमुळे भारत एकटा पडू
शकतो मुळात भारतावर दबाव वाड्त चालला आहे मागील आठवड्यापासून आपण निरिक्षण केले तर
लक्षात येईल भारताने चीन विरोधात आवाज उठवू नये या साठी चीन भारताला सूचना वजा
धमकी देत आहे मग ते पाक व्याप्त कश्मीर मध्ये पाकिस्तान बरोबर दिमापूर धरण बांधण्यासाठीचा
करार असो किंवा नेपाळ मधील कैलाश माणसरोवरला जाणारा रस्ताच्या विरोधात नेपाळला भारता
विरोधात भूमिका मांडान्यास प्यादा म्हणून उभे केले आहे. सीमेवर भारत चीनी
सैनिकामद्धे होणारी तू,तू – मे,मे असो आणि लडाख मध्ये चीन हैलीकोप्टर चा शिरकाव असो
या सार्याच्या विरोद्धात भारात आपली प्रतिक्रिया देत जरी असला तरी आज तेवडे
पुरेसे नाही. चीन ईतर देशवार आर्थिक निर्बंध लावण्याची धमकी देतो कारण ईतर
देशामधून चीन मध्ये आयात केले जाते भारताकडून चीनचा आयात कमी निर्यात जास्ती आहे
म्हणून व्यापार मध्ये निर्बंध लावले तर चीनचे नुकसान होते म्हणणू, भारतता मात्र तो सीमा भागात तनाव निर्माण करून आशिया
खंडात भारताची वाढत चाललेली ताकत कमी करण्याचा प्रयत्नात असतो. पाकिस्तान भारताची
दुखती नस आहे आणि आता नेपाळ ला देखील भारत विरोधी उभा करण्याचे प्रयत्न यशस्वी
झाले आहेत. या चीनच्या मुत्सद्देगिरी समोर बचावात्मक भूमीच्या सोडून भारताने आक्रमक
भूमिका मांडली पाहिजे त्यासाठी जपान, ऑस्ट्रेलिया सारखे देश जी भूमिका मांडत आहेत त्याल समर्थन देत
आपणही कोरोंना विषाणूच्या संदर्भात माहीती गोळा करण्यासाठी आग्रही भूमिका मांडली
पाहिजे. तसेच
तैवानची डब्ल्यूएचओ मध्ये सहभाग होण्याबाबतीत समर्थन करून चीनला देखील संदेश दिला
पाहिजे कोरोनाच्या महामारीत देखील जर भारतीय सीमेवार त्रास देणार असाल आम्ही देखील
ईट का जवाब पथ्थर से देना जाणते है. भारताने चीन संदर्भातील बचावात्मक भूमिका
मागे टाकून जेव्हा जगातील देश उघडपणे चीन विरोध करत आहेत तेव्हा आक्रमक मुत्सद्देगिरी
करणे भविषाच्या दृष्टीने हिताचे आहे.
प्रा डॉ अजिंक्य अजित पत्रावळे,
रसायनशास्त्र विभाग
विवेकानंद कॉलेज कोल्हापूर
https://ajinkya1030.blogspot.com
छान माहिती देत आहात आपल्या ब्लॉग मधून. जनजागृती करण्यात उपयोगी पडेल. 👍👍
ReplyDeleteखूप छान
ReplyDeleteभारताने . निर्णायक भूमिका घेणे आवश्यक आहे
आपले अभ्यासपूर्ण लेखन ज्ञानाबरोबर आपले विचारही प्रतिबिंत करते आहे
आपले मनःपूर्वक अभिनंदन
प्रा.सुनील शिंदे
Nice anticipation... Yes, china-India trade deficit is more beneficial for China... Despite of this, china is threatening India through its military activities in southern China Sea and in Arabian sea, hidden support to Pakistan in its terrorist activities in India and open anti -India policy on to the international platforms like UNO, NSG, etc. History is the witness, China has always betrayed India and Now as world is looking China as guilty, it's time to teach a painful Lesson to China ...yes Sir, India should take offensive stand against China instead of being defensive this time...
ReplyDeleteNice sir.... 👌👌👍👍
ReplyDeleteNice Sir.... 👌👌👍👍
ReplyDeleteFrom- Ashish Unune
Thanks sir 👍👍 nice information sir 👍
ReplyDelete