Skip to main content

Corona Series Part 60 : कोरोना, चीन विरोध जपान, आणि भारताचा सहभाग

Corona Series Part 60

नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. https://ajinkya1030.blogspot.com/

 

कोरोना, चीन विरोध जपान, आणि भारताचा सहभाग

चीनमधून बाहेर आलेल्या कोरोना विषाणूच्या बाबतीत सारी माहिती घेण्याची संपूर्ण जगाची मर्जी आहे आणि त्यासाठी अमेरिका, यूरोपियन देश आणि ऑस्ट्रेलिया असे देश मागणी करत आहेत. मागणी नुसार कोरोना विषाणूच्या उत्पतीची मुळे चीन मधून शोधून काडणे, डब्ल्यूएचओचा चीनसाठी झालेला दुजाभाव आणि तैवानची डब्ल्यूएचओ मध्ये सहभाग होण्याबाबतीत समर्थन करून चीन विरोधाची भूमिका स्पष्ठ होत आहे. परंतु, या मध्ये आजपर्यंत आशियाई देशांचा सहभाग दिसत नव्हता पण काल जपानच्या परराष्ट्र मंत्रीनी जाहीर संगितले जपान कोरोंना विषाणूच्या संदर्भात चीन मध्ये तपासनी करण्याचा बाजूने आहे. या विषाणूचे मुळ शोधून काडणे अत्यंत महत्वाचे आहे आणि त्यासाठी चीनमध्ये जाऊन संशोधन आणि तपासनी करणे गरजेचे आहे. २०१८ च्या जी-२० बैठकी नंतर जपान, अमेरिका, भारत या देशाचा एक समूह बनला होता JAI त्याची बैठक होऊन, एकत्रित आशियाई क्षेत्रात काम करण्याचे योजले होते त्याचबरोबर २००७ साली स्थापण झालेल्या परंतु २०१७ पुन्हा चालना मिळालेला ऑस्ट्रेलिया, जपान, अमेरिका आणि भारत समूह Quadrilatrol Sequirty Diaglog (QUARD) ने देखील कोरोंना आणि चीन विरोधात मागणी केली आहे.  

असे असेल तरी विशेषतः भारत आजही कोरोना विषाणू आणि चीन या विषयावर सावध भूमिका मांडत आहे. या बचावात्मक पद्धतीमुळे भारत एकटा पडू शकतो मुळात भारतावर दबाव वाड्त चालला आहे मागील आठवड्यापासून आपण निरिक्षण केले तर लक्षात येईल भारताने चीन विरोधात आवाज उठवू नये या साठी चीन भारताला सूचना वजा धमकी देत आहे मग ते पाक व्याप्त कश्मीर मध्ये पाकिस्तान बरोबर दिमापूर धरण बांधण्यासाठीचा करार असो किंवा नेपाळ मधील कैलाश माणसरोवरला जाणारा रस्ताच्या विरोधात नेपाळला भारता विरोधात भूमिका मांडान्यास प्यादा म्हणून उभे केले आहे. सीमेवर भारत चीनी सैनिकामद्धे होणारी तू,तू – मे,मे असो आणि लडाख मध्ये चीन हैलीकोप्टर चा शिरकाव असो या सार्‍याच्या विरोद्धात भारात आपली प्रतिक्रिया देत जरी असला तरी आज तेवडे पुरेसे नाही. चीन ईतर देशवार आर्थिक निर्बंध लावण्याची धमकी देतो कारण ईतर देशामधून चीन मध्ये आयात केले जाते भारताकडून चीनचा आयात कमी निर्यात जास्ती आहे म्हणून व्यापार मध्ये निर्बंध लावले तर चीनचे नुकसान होते म्हणणू, भारतता मात्र तो सीमा भागात तनाव निर्माण करून आशिया खंडात भारताची वाढत चाललेली ताकत कमी करण्याचा प्रयत्नात असतो. पाकिस्तान भारताची दुखती नस आहे आणि आता नेपाळ ला देखील भारत विरोधी उभा करण्याचे प्रयत्न यशस्वी झाले आहेत. या चीनच्या मुत्सद्देगिरी समोर बचावात्मक भूमीच्या सोडून भारताने आक्रमक भूमिका मांडली पाहिजे त्यासाठी जपान, ऑस्ट्रेलिया सारखे देश जी भूमिका मांडत आहेत त्याल समर्थन देत आपणही कोरोंना विषाणूच्या संदर्भात माहीती गोळा करण्यासाठी आग्रही भूमिका मांडली पाहिजे. तसेच तैवानची डब्ल्यूएचओ मध्ये सहभाग होण्याबाबतीत समर्थन करून चीनला देखील संदेश दिला पाहिजे कोरोनाच्या महामारीत देखील जर भारतीय सीमेवार त्रास देणार असाल आम्ही देखील ईट का जवाब पथ्थर से देना जाणते है. भारताने चीन संदर्भातील बचावात्मक भूमिका मागे टाकून जेव्हा जगातील देश उघडपणे चीन विरोध करत आहेत तेव्हा आक्रमक मुत्सद्देगिरी करणे भविषाच्या दृष्टीने हिताचे आहे.

 

प्रा डॉ अजिंक्य अजित पत्रावळे,

रसायनशास्त्र विभाग

विवेकानंद कॉलेज कोल्हापूर

https://ajinkya1030.blogspot.com


Comments

  1. छान माहिती देत आहात आपल्या ब्लॉग मधून. जनजागृती करण्यात उपयोगी पडेल. 👍👍

    ReplyDelete
  2. खूप छान
    भारताने . निर्णायक भूमिका घेणे आवश्यक आहे
    आपले अभ्यासपूर्ण लेखन ज्ञानाबरोबर आपले विचारही प्रतिबिंत करते आहे

    आपले मनःपूर्वक अभिनंदन
    प्रा.सुनील शिंदे

    ReplyDelete
  3. Nice anticipation... Yes, china-India trade deficit is more beneficial for China... Despite of this, china is threatening India through its military activities in southern China Sea and in Arabian sea, hidden support to Pakistan in its terrorist activities in India and open anti -India policy on to the international platforms like UNO, NSG, etc. History is the witness, China has always betrayed India and Now as world is looking China as guilty, it's time to teach a painful Lesson to China ...yes Sir, India should take offensive stand against China instead of being defensive this time...

    ReplyDelete
  4. Nice sir.... 👌👌👍👍

    ReplyDelete
  5. Nice Sir.... 👌👌👍👍
    From- Ashish Unune

    ReplyDelete
  6. Thanks sir 👍👍 nice information sir 👍

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Corona Series Part 39 : कोरोना, आणि लस निर्मिती मधील भारतीयांचा सहभाग

Corona Series Part 39       नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणू चा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. कोरोना , आणि लस निर्मिती मधील भारतीयांचा सहभाग जगात असा एक ही देश नसेल जिथे ज्ञानाचा भंडार असणारे भारतीय लोक त्या देशाच्या प्रगतिमध्ये सहभागी नाहीत. कोरोनाच्या लढ्यात तरी हे मागे कशी राहतील. सिरम इंडिया लिमिटेड पुणे स्थित जैव तंत्रज्ञानातील अग्रणी कंपनी आहे यां कंपनीचे वैशिष्ट्य म्हणजे या पूर्वी ही hepatitis, पोलीओ , स्वाइन फ्लू इत्यादि आजारामध्ये लस निर्माण करण्याचे महत्वाचे योगदान आहे. वर्षभरात १.५ अब्ज लसीचे डोस अतिशय माफक दरात तयार करण्याची क्षमता असणारी या कंपनीचे उत्पादन यूरोपियन देशात व संशोधन यूनिट पुणे सारख्या शहरात आहे. भारतामध्ये एक ही नोबेल परितोषिक किवा औषधाचा स्वामित्व हक्क नाही तरीही औषध , लस उत्पादन करण्यात प्रावीण्य , विश्वसनीय नावलौकिक मिळवणारा देश आहे. जावपास ८०% लस आफ्रिका सारख्या देशात पुरवेल जातात. कोरोनाची लस निर्माण करण्यासाठी न्यूयॉर्क मधील codagenic या...

पुन्हा कधीही कोरोना सारख्या महामारीमुळे लेख लिहायची वेळ येऊ नये हीच ईश्वर चरणी प्रार्थना

नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे आज काय लिहावे आणि काय नको समजेनासे झाले आहे. तरी धाडस करून लिहित आहे. काही चुकले तर समजून घ्यावे ही विनंती.   मार्च महिन्यामध्ये जगात नवीन विषाणू ने धुमाकूळ घातला होता सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. शास्त्रज्ञ , संशोधक , मीडिया , नेते , उद्योजक , आणि सामान्य जनता सर्वच नागरिकांना पुढे काय वाहून ठेवले आहे याची कल्पना नव्हती. परिस्थितीचे आकलन होण्याचा आतच लॉकडाउन झाला तेव्हा सुट्टीचा आनंद घेऊया असे समजून काही नागरिक मस्त मजेत होते. हळू हळू परिस्थिती बदलून गंभीर झाली , पण नेमके काय चालू आहे काय करावे आणि काय करू नये याचा अंदाज लागेना. मीडिया मध्ये रोज के भीतीदायक बातमी येऊ लागली कधी विषाणू वर असलेले उपाया येऊ लागले पण शास्त्रीय माहिती सजत नसल्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण होऊ लागले . अश्या मध्ये रसायनशास्त्राचा विद्यार्थी म्हणून कोरोना विषाणूच्या विरोधात   काही काम करावे असे वाटत होते परंतु संशोधन करण्यासाठी काही मर्यादा होत्या याचे भान होते पण शांत बसून चालणार नाही हे लक्षात आले होते. म्हणून मनातून ठरवले आज या संकटकाळी समजासाठी आप...

Corona Series Part 38 : कोरोना, आणि चीनी वैद्यकीय उपकरणे

Corona Series Part 38       नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणू चा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. कोरोना , आणि चीनी वैद्यकीय उपकरणे एखाद्या व्यक्तिच्या मजबूरीचा स्वतच्या फायद्यासाठी कसा उपयोग करून घेता येईल याचे सर्वोत्तम प्रशिक्षण चीनमध्ये मिळते. चीन म्हणजे धोखेबाजी , अविश्वास् याचा अनुभव सर्वांनी घेतला आहे तरी देखिल मजबूरी म्हणून काही व्यवहारीक जुगार चीनशी करावे लागत आहेत. त्यातील एक म्हणजे वैद्यकीय उपकरण खरेदी. नोहेंबर ते फेब्रुवारी च्या दरम्यान चीन मध्ये कोरोना चे संक्रमण जोरावर असल्याने चीन मधील काही प्रांत बंद होते , या विषाणूच्या बाबतीतील माहीत सुरवातीपासूंनच लपवण्यात आल्यामुळे चीन व्यतिरिक्त ईतर जग सुरळीत चालू होते , आणि एकदा हा विषाणू चीन मधून सार्‍या जगात पसरला तेव्हा ईतर देशांची या विषाणू च्या विरोधात लडण्याची तयारी नसल्याने विषाणूचे संक्रमण जलत गतीने पसरू लागले. तेव्हा वैद्यकीय उपकरणे जसे मास्क , तपासणी किट , संरक्षक किट , वेंटीलेटर , ईत्यादी उपकरणाची मागणी आणि ...