Corona Series Part 55
नमस्कार
मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात
घेऊन Social
Media च्या माध्यमातून जनजागृती
करण्याचा प्रयत्न करत आहे. https://ajinkya1030.blogspot.com
कोरोना
आणि आरोग्य सेतु
चीन
मध्ये कोरोना पसरत चालला होता तेव्हा चीनकडे असणार्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर
करत चीनने स्मार्ट फोन वर विविध नवीन अॅप्लिकेशन काढले आणि याचा वापर करून
चीनने कोरोनाचे समुदाय परिवर्तन रोखले. हे
करत असताना व्यक्तिगत लोकाच्या हालचाली वर नजर ठेवली गेली होती चीन मध्ये
कम्यूनिस्ट सरकार आहे तिथे लोकशाही नाही त्यामुळे चालून गेले. भारतामध्ये देखील
आरोग्य सेतु नामक अॅप्लिकेशन सरकारने तयार केले. भारतात लोकशाही आहे एथे चीन सारखी
लोकांच्यावर नजर ठेवली जात नाही परंतु कोणत्याही एक गोष्टीचा वापर मात्र राजकारण
करण्यासाठी केला जातो. त्रुटि असतील तर त्या पूर्ण करायलाच हव्यात.
पॅन
इंडियाच्या माध्यमातून २ एप्रिल रोजी भारतता आरोग्य सेतु हे अॅप्लिकेशन अस्तीत्वात
आणले ते मुळातच लोकांना कोरोना पासून बचाव होण्या करिता, लोकांना हॉटस्पॉट ओळखू यावा त्याच बरोबर बाधित व्यक्तिच्या संपर्कात येऊ नये
आणि जरी आलोच तर त्याची माहिती मिळावी या करिता. सदर अॅप्लिकेशन सोबत काही तक्रारी
येऊ लागल्या. नागरिकाच्या माहिती लीक होऊ शकते वगैरे. परंतु या मूळचे सरकारने ११
मे रोजी इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्फॉर्मेशन मंत्रालय यांनी आरोग्य सेतु
अॅप्लिकेशनच्या बाबातिल मार्गदर्शक तत्वे जाहीर केली. भारत खुल्या पद्धतींनी विचार
करणारा देश आहे आरोगी सेतु मात्र खुल्या पद्धतींची अॅप्लिकेशन नाही या वरील डेटा
सर्वांना वापरता येत नाही त्यामुळे पारदर्शकपनाचा आभाव आहे असे वाटू शकते. सरकारी
काही नियमांचा आधारावर सरकारा कोणालाही हा डेटा सामायिक करू शकते पण कोणत्या
आधारावर हे संगितले गेले नाही परंतु हा डेटा योग्य कारण दिले तर केंद्र सरकारच्या
आणि राज्य सरकारच्या सर्व मंत्रालयाला मागणी नुसार दिला जाणार आहे. त्याच बरोबर
विद्यापीठ आणि संशोधन केंद्रांना मागणी नुसार दिला जाणार आहे. परंतु चुकून डेटाची
चोरी झालीच तेव्हा मात्र सरकार जबाबदार नसणार आहे हा एक नकरात्मक मुद्दा आहे. या
सेतु मधला सर्वच्या सर्व डेटा सरकार वापरणार नाही फक्त रेडझोन मधील डेटा सध्या
लक्ष केन्द्रित आहे. या अॅप्लिकेशनमध्ये कोणत्या प्रकारचा डेटा आहे हे पाहू.
डेमोग्राफिक
डेटा : नाव, फोन नंबर, लिंग, व्यवसाय, प्रवास
कॉनटॅक्ट
डेटा : व्यक्तीच्या सपर्कात कोणी कोरोंना बाधित व्यक्ति आली असेल किंवा आपण
एखाद्या हॉटस्पॉट क्षेत्रात असलो. व्यक्तीचे भोगोलिक स्थान ईत्यादी.
सेल्फ
अससेसमेंट डेटा: व्यक्तिचे व्यसन, आजारपण, लक्षणे ईत्यादी.
लोकेशन
डेटा : अक्षांश आणि रेखाउंश नुसार व्यक्तीचे भोगोलिक स्थान.
हा
डेटा ईतर ठिकाणी देत असताना Deidentification च्या
स्वरुपात असणार आहे म्हणजे व्यक्ति चा डेमोग्राफिक डेटाला कोडिंग केले जाऊन त्याला
एक नंबर दिला जाणार आहे. डेटा दिल्यापासून १८० दिवसा नंतर नष्ट करणे बंधनकारक
असणार आहे. अडचन एकच आहे डेटाचोरी करणार्यांना deidntification चे डिकोडिंग करणे फारसे अवघड काम वाटत नाही. तसेच
आजही भारता मध्ये डेटाचोरीचा संदर्भातील कायदा पार्लमेंट मध्ये पारित झाला नाही.
आरोगी सेतु हे कोरोनाचा काळात एक महत्वाचे अॅप्लिकेशन नक्कीच आहे, परंतु भारतामध्ये एखादी गोष्ट लागू केली की त्याचे
काम संपले तरी ती लागूच असते असे न होता कोरोंनाची साथ संपल्यावर या अॅप्लिकेशनचे
काम थांबवले पाहिजे.
प्रा डॉ अजिंक्य अजित पत्रावळे
रसायनशास्त्र विभाग
विवेकानंद कॉलेज
कोल्हापूर
https://ajinkya1030.blogspot.com
Nice information 👍👍
ReplyDeleteNice information sir 👍👍 thanks sir 👍👍
ReplyDeleteVery nice information sir..❤
ReplyDeletevery good and informative sir..thank you sir for this nice information.
ReplyDelete