Corona Series Part 53
नमस्कार
मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात
घेऊन Social
Media च्या माध्यमातून जनजागृती
करण्याचा प्रयत्न करत आहे. https://ajinkya1030.blogspot.com
कोरोना, आणि वृद्ध लोक
आजपर्यंतच्या कोरोनावर झालेल्या चर्चेमध्ये वृद्ध लोकांना
अधिक धोका आहे हे समजून आले. त्याचे कारण म्हणजे रोगप्रतिकार शक्ति कमकूवत असणे
असे समजते. परंतु १० वर्षा खाली मुलांची रोगप्रतिकारक शक्ति देखील कमीच असते
त्यांच्या तुलनेत ६० वर्षा पुढील वृद्ध लोकांचे बाधित होण्याचे प्रमाण अधिक आहे. रोगप्रतिकार शक्ति हे एक कारण आहेच पण अजूनही बरीच
दुसरी कारणे देखील असावीत, कोरोनाचा जन्म होऊन
मुळात ४-५ महीने उलटले आहेत, अजूनही बरेच गुपित
बाहेर यायचे आहेत संशोधन पुढे जाईल तसे या गुपितांचा उलघडा होईल.
सामान्यपने कोरोनाची लक्षणे आपणा सर्वांना माहीत झाली आहेत.
(कोरोना भाग ३७ आणि ब्लॉग वर लक्षणे भाग २ पहा) परंतु वृद्ध लोकांमध्ये दिसणारी काही
वेगळी लक्षणे आणि प्राथमिक स्वरुपाची बाधा असताना ही लक्षणे आपण ओळखू शकलो तर आपण
वृद्ध लोकांचा मृत्यू दर कमी करण्यात काही अंशी यशवी ठरू.
वृद्ध लोकांमध्ये
बर्याच वेळा कोणतीही लक्षणे दिसत नाहीत असे असेल तरीही त्यांना कोरोनाची बाधा
झाल्यावर त्यांच्या स्वभावात बदल झालेला आढळून आला आहे. तसेच झोपेच
प्रमाण अधिक झाले आहे आणि बर्याच वेळा भोवळ येऊन बेशुद्ध होतो. भुकेची
तक्रार जसे भूक न लागणे,
चयपचाय क्रियाचा वेग मंदावणे, मनात गोंधळ निर्माण होऊन व्यक्ति गोंधळून जातो, स्वभावत बदल होत असताना काही प्रमाणात त्याचे बोलने
कमी होऊन व्यति अबोल आणि एकटा राहणे पसंत करतो, अशी काहीशी लक्षणे बर्याच वृद्ध लोकांमध्ये आढळून आले आहे.
अशी लक्षणे का दिसत आहेत तर वृद्ध होण्याची प्रक्रिया (aging factor) आणि कोरोंना चे संक्रमण हे एक
त्याचे प्रमुख कारण आहे. येतता त्याच बरोबार एखाद्या आजारा बारोबर संघर्ष करत
असताना anti-bodies तयार होण्याचा वेग मंदावलेला असतो
त्यामुळे रोगप्रतिकार शक्तिची प्रतिक्रिया संथ असते. बरेच संशोधन या बाबतीत चालू आहे पुढे अजून काही
गोष्टींचा उलघडा होणे बाकी आहे. तोपर्यंत आपण आपल्या घरातील वृद्ध लोकांची जास्त
काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे जिवन जगण्याची ईच्छा बर्याच
वेळेला वृद्ध लोकांमध्ये ही ईच्छा कमी होत चाललेली असते त्यामुळे असे लोक आजाराला
मानसिकरित्या बळी पडताता. हे टाळण्यासाठी त्यांना मनातून जिवन जगण्याची ईच्छा
निर्माण करणे हे आपले काम आहे. काळजी घेणे म्हणजे फक्त सुखसोई पुरवणे असे नाही
लॉकडाउन च्या काळात त्यांना तुमचा वेळ हवा आहे पैसा, सुखसोई नको. वृद्ध व्यक्ति तुमच्या सहवासामुळे मानसिकरित्या कोरोंनाशी दोन
हात करणायस तयार होऊ शकतो.
प्रा डॉ अजिंक्य अजित पत्रावळे
रसायनशास्त्र विभाग
विवेकानंद कॉलेज
कोल्हापूर
Nice information sir 👍 thanks sir 👍👍
ReplyDelete👍👍👍 informative
ReplyDelete