Skip to main content

Corona Series Part 53 : कोरोना, आणि वृद्ध लोक


Corona Series Part 53
नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. https://ajinkya1030.blogspot.com



कोरोना, आणि वृद्ध लोक
आजपर्यंतच्या कोरोनावर झालेल्या चर्चेमध्ये वृद्ध लोकांना अधिक धोका आहे हे समजून आले. त्याचे कारण म्हणजे रोगप्रतिकार शक्ति कमकूवत असणे असे समजते. परंतु १० वर्षा खाली मुलांची रोगप्रतिकारक शक्ति देखील कमीच असते त्यांच्या तुलनेत ६० वर्षा पुढील वृद्ध लोकांचे बाधित होण्याचे प्रमाण अधिक आहे. रोगप्रतिकार शक्ति हे एक कारण आहेच पण अजूनही बरीच दुसरी कारणे देखील असावीत, कोरोनाचा जन्म होऊन मुळात ४-५ महीने उलटले आहेत, अजूनही बरेच गुपित बाहेर यायचे आहेत संशोधन पुढे जाईल तसे या गुपितांचा उलघडा होईल.
सामान्यपने कोरोनाची लक्षणे आपणा सर्वांना माहीत झाली आहेत. (कोरोना भाग ३७ आणि ब्लॉग वर लक्षणे भाग २ पहा) परंतु वृद्ध लोकांमध्ये दिसणारी काही वेगळी लक्षणे आणि प्राथमिक स्वरुपाची बाधा असताना ही लक्षणे आपण ओळखू शकलो तर आपण वृद्ध लोकांचा मृत्यू दर कमी करण्यात काही अंशी यशवी ठरू.
 वृद्ध लोकांमध्ये बर्‍याच वेळा कोणतीही लक्षणे दिसत नाहीत असे असेल तरीही त्यांना कोरोनाची बाधा झाल्यावर त्यांच्या स्वभावात बदल झालेला आढळून आला आहे. तसेच झोपेच प्रमाण अधिक झाले आहे आणि बर्‍याच वेळा भोवळ येऊन बेशुद्ध होतो. भुकेची तक्रार जसे भूक न लागणे, चयपचाय क्रियाचा वेग मंदावणे, मनात गोंधळ निर्माण होऊन व्यक्ति गोंधळून जातो, स्वभावत बदल होत असताना काही प्रमाणात त्याचे बोलने कमी होऊन व्यति अबोल आणि एकटा राहणे पसंत करतो, अशी काहीशी लक्षणे बर्‍याच वृद्ध लोकांमध्ये आढळून आले आहे.
अशी लक्षणे का दिसत आहेत तर वृद्ध होण्याची प्रक्रिया (aging factor) आणि कोरोंना चे संक्रमण हे एक त्याचे प्रमुख कारण आहे. येतता त्याच बरोबार एखाद्या आजारा बारोबर संघर्ष करत असताना anti-bodies तयार होण्याचा वेग मंदावलेला असतो त्यामुळे रोगप्रतिकार शक्तिची प्रतिक्रिया संथ असते.  बरेच संशोधन या बाबतीत चालू आहे पुढे अजून काही गोष्टींचा उलघडा होणे बाकी आहे. तोपर्यंत आपण आपल्या घरातील वृद्ध लोकांची जास्त काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे जिवन जगण्याची ईच्छा बर्‍याच वेळेला वृद्ध लोकांमध्ये ही ईच्छा कमी होत चाललेली असते त्यामुळे असे लोक आजाराला मानसिकरित्या बळी पडताता. हे टाळण्यासाठी त्यांना मनातून जिवन जगण्याची ईच्छा निर्माण करणे हे आपले काम आहे. काळजी घेणे म्हणजे फक्त सुखसोई पुरवणे असे नाही लॉकडाउन च्या काळात त्यांना तुमचा वेळ हवा आहे पैसा, सुखसोई नको. वृद्ध व्यक्ति तुमच्या सहवासामुळे मानसिकरित्या कोरोंनाशी दोन हात करणायस तयार होऊ शकतो.
प्रा डॉ अजिंक्य अजित पत्रावळे     
रसायनशास्त्र विभाग
विवेकानंद कॉलेज कोल्हापूर


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Corona Series Part 39 : कोरोना, आणि लस निर्मिती मधील भारतीयांचा सहभाग

Corona Series Part 39       नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणू चा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. कोरोना , आणि लस निर्मिती मधील भारतीयांचा सहभाग जगात असा एक ही देश नसेल जिथे ज्ञानाचा भंडार असणारे भारतीय लोक त्या देशाच्या प्रगतिमध्ये सहभागी नाहीत. कोरोनाच्या लढ्यात तरी हे मागे कशी राहतील. सिरम इंडिया लिमिटेड पुणे स्थित जैव तंत्रज्ञानातील अग्रणी कंपनी आहे यां कंपनीचे वैशिष्ट्य म्हणजे या पूर्वी ही hepatitis, पोलीओ , स्वाइन फ्लू इत्यादि आजारामध्ये लस निर्माण करण्याचे महत्वाचे योगदान आहे. वर्षभरात १.५ अब्ज लसीचे डोस अतिशय माफक दरात तयार करण्याची क्षमता असणारी या कंपनीचे उत्पादन यूरोपियन देशात व संशोधन यूनिट पुणे सारख्या शहरात आहे. भारतामध्ये एक ही नोबेल परितोषिक किवा औषधाचा स्वामित्व हक्क नाही तरीही औषध , लस उत्पादन करण्यात प्रावीण्य , विश्वसनीय नावलौकिक मिळवणारा देश आहे. जावपास ८०% लस आफ्रिका सारख्या देशात पुरवेल जातात. कोरोनाची लस निर्माण करण्यासाठी न्यूयॉर्क मधील codagenic या...

पुन्हा कधीही कोरोना सारख्या महामारीमुळे लेख लिहायची वेळ येऊ नये हीच ईश्वर चरणी प्रार्थना

नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे आज काय लिहावे आणि काय नको समजेनासे झाले आहे. तरी धाडस करून लिहित आहे. काही चुकले तर समजून घ्यावे ही विनंती.   मार्च महिन्यामध्ये जगात नवीन विषाणू ने धुमाकूळ घातला होता सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. शास्त्रज्ञ , संशोधक , मीडिया , नेते , उद्योजक , आणि सामान्य जनता सर्वच नागरिकांना पुढे काय वाहून ठेवले आहे याची कल्पना नव्हती. परिस्थितीचे आकलन होण्याचा आतच लॉकडाउन झाला तेव्हा सुट्टीचा आनंद घेऊया असे समजून काही नागरिक मस्त मजेत होते. हळू हळू परिस्थिती बदलून गंभीर झाली , पण नेमके काय चालू आहे काय करावे आणि काय करू नये याचा अंदाज लागेना. मीडिया मध्ये रोज के भीतीदायक बातमी येऊ लागली कधी विषाणू वर असलेले उपाया येऊ लागले पण शास्त्रीय माहिती सजत नसल्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण होऊ लागले . अश्या मध्ये रसायनशास्त्राचा विद्यार्थी म्हणून कोरोना विषाणूच्या विरोधात   काही काम करावे असे वाटत होते परंतु संशोधन करण्यासाठी काही मर्यादा होत्या याचे भान होते पण शांत बसून चालणार नाही हे लक्षात आले होते. म्हणून मनातून ठरवले आज या संकटकाळी समजासाठी आप...

Corona Series Part 38 : कोरोना, आणि चीनी वैद्यकीय उपकरणे

Corona Series Part 38       नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणू चा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. कोरोना , आणि चीनी वैद्यकीय उपकरणे एखाद्या व्यक्तिच्या मजबूरीचा स्वतच्या फायद्यासाठी कसा उपयोग करून घेता येईल याचे सर्वोत्तम प्रशिक्षण चीनमध्ये मिळते. चीन म्हणजे धोखेबाजी , अविश्वास् याचा अनुभव सर्वांनी घेतला आहे तरी देखिल मजबूरी म्हणून काही व्यवहारीक जुगार चीनशी करावे लागत आहेत. त्यातील एक म्हणजे वैद्यकीय उपकरण खरेदी. नोहेंबर ते फेब्रुवारी च्या दरम्यान चीन मध्ये कोरोना चे संक्रमण जोरावर असल्याने चीन मधील काही प्रांत बंद होते , या विषाणूच्या बाबतीतील माहीत सुरवातीपासूंनच लपवण्यात आल्यामुळे चीन व्यतिरिक्त ईतर जग सुरळीत चालू होते , आणि एकदा हा विषाणू चीन मधून सार्‍या जगात पसरला तेव्हा ईतर देशांची या विषाणू च्या विरोधात लडण्याची तयारी नसल्याने विषाणूचे संक्रमण जलत गतीने पसरू लागले. तेव्हा वैद्यकीय उपकरणे जसे मास्क , तपासणी किट , संरक्षक किट , वेंटीलेटर , ईत्यादी उपकरणाची मागणी आणि ...