Corona Series Part 52
नमस्कार
मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात
घेऊन Social
Media च्या माध्यमातून जनजागृती
करण्याचा प्रयत्न करत आहे. https://ajinkya1030.blogspot.com
कोरोना, आणि Remdesiver
Chloroquine, Hydroxychloroquine (HCQ), Remdesiver (RMD), Favipiravir, Lopinavir, Ritonavir, Rabavirin, Avicon, Osltamivir (Tami flu) अशी २५०-हून अधिक औषधाची तपासणी सध्या विविध देशातल्या
विविध लॅब मध्ये चालू आहे. यातिल काही औषधे काही भागात चांगल्या पद्धतीने गुणकारी
ठरली असली तरी सार्वत्रिक समानता दिसून येत नाही त्यामुळे कोणत्याही औषधाला कोरोना
वरील रामबाण औषध तूर्तास तरी म्हणता येणारा नाही. सध्या या औषधाच्या स्पर्धेत HCQ हे आघाडीवार असून त्याचा खालोखाल २०१३ Hepatitus-C साठी Gilead Scienfiic यांनी संशोधन केलेले आणि नंतर २०१४-२०१६ दरम्यान ईबोलासाठी क्लिनिकल चाचणी करण्यामधील एक ड्रग Remdesiver (RMD) या
रसायनाचा नंबर लागतो.
प्राथमिक स्वरुपात RMD ईबोलावर प्रभावी ठरले नाही. परंतु SARS, MERS या विषाणूवर हा ड्रग समाधानकारक निकाल देत होते आणि म्हणूच २३ एप्रिल २०२०
रोजी या औषधाची कोरोनासाठी प्राथमिक चाचणी करण्यात आली परंतु ही चाचणी म्हणावी
ईतकी सफल ठरली नाही. त्यामागोमाग २९ एप्रिल ला Lancet मध्ये संशोधन प्रकाशित झाले ईथेही हे औषध फार प्रभावी ठरनार नाही असा अनुमान
लावण्यात आला. परंतु ३० एप्रिल रोजी अमरिकेतील नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ
इन्फेक्टीसियस डीसीझचे संचालक, डॉ अॅंथनी फौसी यांच्या संशोधनानुसार हे औषध कोरोनामध्ये लागणारा रीकवरी टाइम
१४/१५ दिवसापासून ११ दिवसावर आणतो असे लक्षात आले आणि १ मे रोजी यूएसएफडीएने या
औषधास आपत्कालीन वापरास मान्यत दिली. या पुढे या औषधाचा प्रवास चालू झाला अजूनही बर्याच
तपासन्या चालू आहेत. असे असेल तरी आता हे औषध देखील HCQ सारखे कोरोना बाधित लोकांवर उपचारासाठी वापरले जाते. हे औषध कसे काम करते ते
पाहू.
कोरोना विषाणू सर्वप्रथम मानसाच्या शरीरातील पेशीमध्ये
प्रवेश करतो आणि त्यांनतर स्वत:ची प्रतिकृती बनवतो. या प्रतिकृती बनवण्याच्या
कार्यात त्याला RNA-dependent
RNA polymerase (RdRP) नामक एन्झाइमची मदत घ्यावी लागते. RMD हे औषध या एन्झाइम ची जागा घेते आणि ईथेच कोरोना
विषाणूची फसगत होते. विषाणू औषध आणि एन्झाइम या मधला फरक समजून घेण्यास असमर्थ ठरत
आणि विषाणूची प्रतिकृती बनायची प्रक्रिया थांबते. या मुळे होणारी बाधा वाढत नाही पुढे आपली
रोगप्रतिकारक शक्ति या विषाणूला ओळखून अॅंटीबॉडीज बनवते आणि विषाणूचा नायनाट होऊन आपणास
बरे वाटते.
RMD या औषधावर सार्या जगात खास करून युरोप, अमेरिका, जपान, चीन सारख्या देशात संशोधन सुरू आहे. जपानमध्ये
५३ रुग्णाचा अभ्यास करून एक संशोधन लेख प्रसिद्ध झाला. या मध्ये अभ्यासले जाणारे
रुग्णाची ऑक्सिजनची क्षमता फारच कमी होती. त्यांना १० दिवसा मध्ये १ल्या दिवसही
२००एमजी एव्हडी RMDची मात्रा डेली आणि पुढे ९ दिवास
१०० एमजी. त्यानंतर केलेल्या निरिक्षणात ६८% लोक वेंटिलेटरची गरज भासली नाही.
ऑक्सिजन घेण्याची क्षमता वाढली. ४७% लोकांना रुग्णालयातून घरी पाठवले गेले. परंतु
१३% (०७) लोक मात्र मृत्यूमुखी पडले. या शोधामधून गुणकारी औषध म्हणून नावाजले असले
तरी या प्रक्रिये मध्ये काही त्रुटि पुढे आलाय एक म्हणजे या औषधाचा गुण
तपासणायसाठी समांतर control
sample लावण्यात
आले नाही त्याच बरोबर रुग्णांना फक्त एकच औषध दिले गेले नव्हते. तय याच औषधामुळे
त्यांना बरे वाटत आहे का हा एक प्रश्न निर्माण होतो. असे असले तरी या औषधामध्ये
शास्त्रज्ञांना आशेच किरण दिसत आहे, म्हणून जगात ६
ठिकाणी phase III
clinical trials चालू
आहेत. त्यातील अमेरिका, चीनमध्ये २ ठिकाणी
अतिशय आजारी आणि काही प्रमानात आजारी असणार्यानवर प्रयोग सुरू आहे. भारता मध्ये
आयसीएमआरच्या मार्गदर्शनानुसार हे औषध भारतीय कंपन्याना तयार करण्यास संगितले आहे, आणि औषद्निर्मिती नंतर वापर केला जाईल. येणार्या
काळात हे औषध कोरोनावर अधिक प्रभावी ठरावे ईतकीच अपेक्षा.
प्रा डॉ अजिंक्य अजित पत्रावळे
रसायनशास्त्र विभाग
विवेकानंद कॉलेज
कोल्हापूर
https://ajinkya1030.blogspot.com
Nice information sir 👍👍 thanks sir 👍👍
ReplyDelete