Skip to main content

Corona Series Part 52: कोरोना, आणि Remdesiver

Corona Series Part 52
नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. https://ajinkya1030.blogspot.com

कोरोना, आणि Remdesiver
Chloroquine, Hydroxychloroquine (HCQ), Remdesiver (RMD), Favipiravir, Lopinavir, Ritonavir, Rabavirin, Avicon, Osltamivir (Tami flu) अशी २५०-हून अधिक औषधाची तपासणी सध्या विविध देशातल्या विविध लॅब मध्ये चालू आहे. यातिल काही औषधे काही भागात चांगल्या पद्धतीने गुणकारी ठरली असली तरी सार्वत्रिक समानता दिसून येत नाही त्यामुळे कोणत्याही औषधाला कोरोना वरील रामबाण औषध तूर्तास तरी म्हणता येणारा नाही. सध्या या औषधाच्या स्पर्धेत HCQ हे आघाडीवार असून त्याचा खालोखाल २०१३ Hepatitus-C साठी Gilead Scienfiic यांनी संशोधन केलेले आणि नंतर २०१४-२०१६ दरम्यान ईबोलासाठी  क्लिनिकल चाचणी करण्यामधील एक ड्रग Remdesiver (RMD) या रसायनाचा नंबर लागतो.  प्राथमिक स्वरुपात RMD ईबोलावर प्रभावी ठरले नाही. परंतु SARS, MERS या विषाणूवर हा ड्रग समाधानकारक निकाल देत होते आणि म्हणूच २३ एप्रिल २०२० रोजी या औषधाची कोरोनासाठी प्राथमिक चाचणी करण्यात आली परंतु ही चाचणी म्हणावी ईतकी सफल ठरली नाही. त्यामागोमाग २९ एप्रिल ला Lancet मध्ये संशोधन प्रकाशित झाले ईथेही हे औषध फार प्रभावी ठरनार नाही असा अनुमान लावण्यात आला. परंतु ३० एप्रिल रोजी अमरिकेतील नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ इन्फेक्टीसियस डीसीझचे संचालक, डॉ अॅंथनी फौसी यांच्या संशोधनानुसार हे औषध कोरोनामध्ये लागणारा रीकवरी टाइम १४/१५ दिवसापासून ११ दिवसावर आणतो असे लक्षात आले आणि १ मे रोजी यूएसएफडीएने या औषधास आपत्कालीन वापरास मान्यत दिली. या पुढे या औषधाचा प्रवास चालू झाला अजूनही बर्‍याच तपासन्या चालू आहेत. असे असेल तरी आता हे औषध देखील HCQ सारखे कोरोना बाधित लोकांवर उपचारासाठी वापरले जाते. हे औषध कसे काम करते ते पाहू.
कोरोना विषाणू सर्वप्रथम मानसाच्या शरीरातील पेशीमध्ये प्रवेश करतो आणि त्यांनतर स्वत:ची प्रतिकृती बनवतो. या प्रतिकृती बनवण्याच्या कार्यात त्याला RNA-dependent RNA polymerase (RdRP) नामक एन्झाइमची मदत घ्यावी लागते. RMD हे औषध या एन्झाइम ची जागा घेते आणि ईथेच कोरोना विषाणूची फसगत होते. विषाणू औषध आणि एन्झाइम या मधला फरक समजून घेण्यास असमर्थ ठरत आणि विषाणूची प्रतिकृती बनायची प्रक्रिया थांबते. या मुळे होणारी बाधा वाढत नाही पुढे आपली रोगप्रतिकारक शक्ति या विषाणूला ओळखून अॅंटीबॉडीज बनवते आणि विषाणूचा नायनाट होऊन आपणास बरे वाटते.
RMD या औषधावर सार्‍या जगात खास करून युरोप, अमेरिका, जपान, चीन सारख्या देशात  संशोधन सुरू आहे. जपानमध्ये ५३ रुग्णाचा अभ्यास करून एक संशोधन लेख प्रसिद्ध झाला. या मध्ये अभ्यासले जाणारे रुग्णाची ऑक्सिजनची क्षमता फारच कमी होती. त्यांना १० दिवसा मध्ये १ल्या दिवसही २००एमजी एव्हडी RMDची मात्रा डेली आणि पुढे ९ दिवास १०० एमजी. त्यानंतर केलेल्या निरिक्षणात ६८% लोक वेंटिलेटरची गरज भासली नाही. ऑक्सिजन घेण्याची क्षमता वाढली. ४७% लोकांना रुग्णालयातून घरी पाठवले गेले. परंतु १३% (०७) लोक मात्र मृत्यूमुखी पडले. या शोधामधून गुणकारी औषध म्हणून नावाजले असले तरी या प्रक्रिये मध्ये काही त्रुटि पुढे आलाय एक म्हणजे या औषधाचा गुण तपासणायसाठी समांतर control sample लावण्यात आले नाही त्याच बरोबर रुग्णांना फक्त एकच औषध दिले गेले नव्हते. तय याच औषधामुळे त्यांना बरे वाटत आहे का हा एक प्रश्न निर्माण होतो. असे असले तरी या औषधामध्ये शास्त्रज्ञांना आशेच किरण दिसत आहे, म्हणून जगात ६ ठिकाणी phase III clinical trials चालू आहेत. त्यातील अमेरिका, चीनमध्ये २ ठिकाणी अतिशय आजारी आणि काही प्रमानात आजारी असणार्‍यानवर प्रयोग सुरू आहे. भारता मध्ये आयसीएमआरच्या मार्गदर्शनानुसार हे औषध भारतीय कंपन्याना तयार करण्यास संगितले आहे, आणि औषद्निर्मिती नंतर वापर केला जाईल. येणार्‍या काळात हे औषध कोरोनावर अधिक प्रभावी ठरावे ईतकीच अपेक्षा. 

प्रा डॉ अजिंक्य अजित पत्रावळे     
रसायनशास्त्र विभाग
विवेकानंद कॉलेज कोल्हापूर
https://ajinkya1030.blogspot.com

Comments

  1. Nice information sir 👍👍 thanks sir 👍👍

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Corona Series Part 39 : कोरोना, आणि लस निर्मिती मधील भारतीयांचा सहभाग

Corona Series Part 39       नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणू चा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. कोरोना , आणि लस निर्मिती मधील भारतीयांचा सहभाग जगात असा एक ही देश नसेल जिथे ज्ञानाचा भंडार असणारे भारतीय लोक त्या देशाच्या प्रगतिमध्ये सहभागी नाहीत. कोरोनाच्या लढ्यात तरी हे मागे कशी राहतील. सिरम इंडिया लिमिटेड पुणे स्थित जैव तंत्रज्ञानातील अग्रणी कंपनी आहे यां कंपनीचे वैशिष्ट्य म्हणजे या पूर्वी ही hepatitis, पोलीओ , स्वाइन फ्लू इत्यादि आजारामध्ये लस निर्माण करण्याचे महत्वाचे योगदान आहे. वर्षभरात १.५ अब्ज लसीचे डोस अतिशय माफक दरात तयार करण्याची क्षमता असणारी या कंपनीचे उत्पादन यूरोपियन देशात व संशोधन यूनिट पुणे सारख्या शहरात आहे. भारतामध्ये एक ही नोबेल परितोषिक किवा औषधाचा स्वामित्व हक्क नाही तरीही औषध , लस उत्पादन करण्यात प्रावीण्य , विश्वसनीय नावलौकिक मिळवणारा देश आहे. जावपास ८०% लस आफ्रिका सारख्या देशात पुरवेल जातात. कोरोनाची लस निर्माण करण्यासाठी न्यूयॉर्क मधील codagenic या...

Corona Series Part 56 : कोरोना, आणि ई-शिक्षण

Corona Series Part 56 नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. आजचा विषय विस्तृत मांडला आहे.   या विषया बाबतीत आपण आपले मत ब्लॉगवर जरूर कळवावे ही विनंती.     https://ajinkya1030.blogspot.com   कोरोना , आणि ई-शिक्षण मार्च महिन्यापासन कोरोनाचा प्रभाव दिसू लागला शेवटच्या आठवड्यापासून शाळा , कॉलेज लॉकडाउनच्या काळापासून आज पर्यन्त बंद करण्यात आल्या. भितीदायक वातावरणामध्ये १० , १२वी च्या परीक्षा घेण्यात आल्या. शैक्षणिक वर्ष २०१९-२० चे कार्य संपत आले होते परंतु लेखी आणि मौखिक परीक्षा राहिल्या होत्या . आणि आता यूजीसीच्या मार्गदर्शंनानुसार त्या राहूनच जातील. किंवा काही अंशी तात्पुरती योजना राबवून काही ना काही मार्ग काडला जाईल.   नैसर्गिक आपत्ती महापुर , वैश्विक महामारी मधून शैक्षणिक क्षेत्रा समोर नवीन आव्हान उभे राहिले आहे. खाजगी , काही सरकारी शाळा , कॉलेजने देखील तात्पुरती सोय करण्यासाठी ऑनलाइन तास झूम , गूगल क्लासरूम , गूगल डॉक , यू ट्यूब , व्हाट्स अप...

पुन्हा कधीही कोरोना सारख्या महामारीमुळे लेख लिहायची वेळ येऊ नये हीच ईश्वर चरणी प्रार्थना

नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे आज काय लिहावे आणि काय नको समजेनासे झाले आहे. तरी धाडस करून लिहित आहे. काही चुकले तर समजून घ्यावे ही विनंती.   मार्च महिन्यामध्ये जगात नवीन विषाणू ने धुमाकूळ घातला होता सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. शास्त्रज्ञ , संशोधक , मीडिया , नेते , उद्योजक , आणि सामान्य जनता सर्वच नागरिकांना पुढे काय वाहून ठेवले आहे याची कल्पना नव्हती. परिस्थितीचे आकलन होण्याचा आतच लॉकडाउन झाला तेव्हा सुट्टीचा आनंद घेऊया असे समजून काही नागरिक मस्त मजेत होते. हळू हळू परिस्थिती बदलून गंभीर झाली , पण नेमके काय चालू आहे काय करावे आणि काय करू नये याचा अंदाज लागेना. मीडिया मध्ये रोज के भीतीदायक बातमी येऊ लागली कधी विषाणू वर असलेले उपाया येऊ लागले पण शास्त्रीय माहिती सजत नसल्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण होऊ लागले . अश्या मध्ये रसायनशास्त्राचा विद्यार्थी म्हणून कोरोना विषाणूच्या विरोधात   काही काम करावे असे वाटत होते परंतु संशोधन करण्यासाठी काही मर्यादा होत्या याचे भान होते पण शांत बसून चालणार नाही हे लक्षात आले होते. म्हणून मनातून ठरवले आज या संकटकाळी समजासाठी आप...