Corona Series Part 51
नमस्कार
मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात
घेऊन Social
Media च्या माध्यमातून जनजागृती
करण्याचा प्रयत्न करत आहे. https://ajinkya1030.blogspot.com
कोरोना, आणि निती आयोग
कोरोना
साथीवर नियंत्रय आणायचे सध्या आपल्याकडे 2 प्राथमिक मार्ग आहेत. एक लॉकडाउन आणि
दूसरा कमीत कमी वेळेत अधिकाधिक लोकांची तपासणी. लॉकडाउन वरील नियमावली आता शिथिल
होत चालली आहे आणि तपासण्याचे प्रमाण देखिल आयसीएमआरने केंद्राच्या मदतीने वाढवले आहे.
२५ मार्च रोजी फक्त १६,००० प्रती दिन
तपासणी क्षमता ३० एप्रिल पर्यन्त ६०,०००
आणि मे पर्यन्त ९५,००० प्रती दिन तपासणी क्षमता भारत
सरकारने वाढवली आहे.
आज
११ मे पर्यन्त अमेरिका ३२ करोड लोकसंख्या ९३ लाख तपासणी करून प्रथम स्थानावर आहे, रशिया २१करोड/ ५६.६३लाख, इटली ६.०४ करोड/ २६लाख, ऑस्ट्रेलिया २.५करोड
/ ८.५५लाख, पाकिस्तान २१ करोड / २.९४लाख.
जगात
अमेरिका, स्पेन, इटली, यूके, रशिया, फ्रांस, जर्मनी, तुर्की, कॅनडा आणि भारत हे १० देश आहेत त्यांनी १० लाख
तपासण्या पूर्ण केल्या आहेत. कालपर्यंत एकून १६ लाख (लोकसंखेच्या १.२-१.५% हाच टक्का एप्रिल च्या
सुरवातीस 0.015%
ईतका होता) तपासन्या
पूर्ण केल्या विशेष म्हणजे प्रती १ लाख लोकांच्या मागे बाधितांची संख्या ईतर
देशाच्या तुलनेने कमी अढळली आहे. तपासन्या वाढल्यामुळे कोरोंनाचा फैलाव होण्यास
अडथळा निर्माण करण्यात यश मिळाले, लॉकडाउन
पूर्वी रुग्ण ३.५ दिवसात दुप्पट होत होते आता त्यासाठी १२ दिवस लागतात. हे सर्व यश मिळत असले तरी या तपसणी
किट आणि वैद्यकीय उपकरणासाठी आपल्या देशाला चीन सारख्या देशावर अवलंबून राहावे लागले, आणि खराब किट घेऊन आपला वेळ गमावून बसलो.
या
घटनेतून शहाणपण घेऊन, सार्या भारततातच नाही तर
भारताबाहेर भारतीय बनावटीची तपसणी किट आणि
वैद्यकीय उपकरणे पोहोचवण्याचा निर्धार सरकारने नीती आयोगाच्या माध्यमातून केला
आहे. त्या करिता प्रायवेट, पब्लिक सेक्टर
एकत्रित मिलाप करण्याचे नियोजण नीती आयोगा आणि जैव तंत्रज्ञान विभाग, (डीबीटी)ने केले. त्यात शास्त्रज्ञ, लॅब, रणनीती, प्रक्रिया,
संशोधन ईत्यादीचे आदान प्रदान सरकारी संस्था आणि खाजगी कंपनी या मध्ये केले जाईल.
या माध्यमातून जुलै-२० पर्यन्त १ करोड भारतीय बनावटीचे तपासणी आणि पीपीई किट तयार
केले जातील. मेक इन इंडिया च्या माध्यमातून पुणे येथील एनआयव्ही संस्थेमध्ये आणि zydus गुजरात येथे भारतीय बनावटीचे Enzyme Linked Immunosorbent Assay (ELSA) - कोविड कवच नामक अॅंटीiबॉडी टेस्ट किट तयार
करण्यात आले आहे. या मध्ये रोगप्रतिकारशक्ति मध्ये असणार्या ५ वेगवेगळ्या immunoglobuline पैकी IgG चे अस्तित्व तपासले जाते. जर IgG अॅंटीiबॉडी असेल तर त्या व्यक्तीस कोरोंनाचे संक्रमण असलायचे
समजते. या माध्यमातून आपल्याला पुढेल रणनीती, हॉटस्पॉट ओळखायला देखील मदत होणार आहे.
लॉकडाउन
च्या काळात भारताच्या कानाकोपर्यात हे किट पोहोचवण्यासाठी खाजगी कंपण्याची सप्लाय
चेन, एफएमसीजीचे नेटवर्क (हिंदुस्तान
युनिलिवर), ऑनलाइन अमेझोन, फ्लिपकार्ड ईत्यादी कंपनी देखील या योजने मार्फत
जनसेवा करणार आहेत. भारत बाहेर देखील या
उपकरणाचा निर्यात वाडवन्याचा प्रयत्न करून वैद्यकीय आणि आर्थिक परिस्थिति सुधारण्याचा
प्रयत्न केला जाणार आहे.
प्रा डॉ अजिंक्य अजित पत्रावळे
रसायनशास्त्र विभाग
विवेकानंद कॉलेज
कोल्हापूर
Thanks sir 👍 for this information.... nice information sir..
ReplyDeleteनमस्कार सर, गेले अनेक दिवस
ReplyDeleteआपले कोरोना व्हायरस संदर्भात आपले नाविन्यपूर्ण माहितीपर, संशोधनपर तसेच विविध प्रकारची व्हायरस संबंधीची माहिती, उपाययोजना, जागतिक स्तरापासून स्थानिक स्तरापर्यंत होत असलेले सामाजिक . आर्थिक, वैद्यकीय , धोरणात्मक बदलाबाबत अत्यंत अभ्यासपूर्ण आपले लेख फक्त ज्ञान नाही तर उपाययोजना परिणाम याबाबत अत्यंत उपयुक्त माहिती मिळत आहे
आपण असेच लिहित रहा
जनजागृतीत आपले योगदान निश्चितच दखलपात्र आहे
आपणाला पुनःश्च शुभेच्छा
खूप उपयुक्त आहे
Deleteप्रा.सुनील शिंदे