Skip to main content

Corona Series Part 51 : कोरोना, आणि निती आयोग


Corona Series Part 51
नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. https://ajinkya1030.blogspot.com

कोरोना, आणि निती आयोग
कोरोना साथीवर नियंत्रय आणायचे सध्या आपल्याकडे 2 प्राथमिक मार्ग आहेत. एक लॉकडाउन आणि दूसरा कमीत कमी वेळेत अधिकाधिक लोकांची तपासणी. लॉकडाउन वरील नियमावली आता शिथिल होत चालली आहे आणि तपासण्याचे प्रमाण देखिल आयसीएमआरने केंद्राच्या मदतीने वाढवले आहे. २५ मार्च रोजी फक्त १६,००० प्रती दिन तपासणी क्षमता ३० एप्रिल पर्यन्त ६०,००० आणि मे पर्यन्त ९५,००० प्रती दिन तपासणी क्षमता भारत सरकारने वाढवली आहे.
आज ११ मे पर्यन्त अमेरिका ३२ करोड लोकसंख्या ९३ लाख तपासणी करून प्रथम स्थानावर आहे, रशिया २१करोड/ ५६.६३लाख, इटली ६.०४ करोड/ २६लाख, ऑस्ट्रेलिया २.५करोड / ८.५५लाख, पाकिस्तान २१ करोड / २.९४लाख.
जगात अमेरिका, स्पेन, इटली, यूके, रशिया, फ्रांस, जर्मनी, तुर्की, कॅनडा आणि भारत हे १० देश आहेत त्यांनी १० लाख तपासण्या पूर्ण केल्या आहेत. कालपर्यंत एकून १६ लाख (लोकसंखेच्या १.२-१.५% हाच टक्का एप्रिल च्या सुरवातीस 0.015% ईतका होता) तपासन्या पूर्ण केल्या विशेष म्हणजे प्रती १ लाख लोकांच्या मागे बाधितांची संख्या ईतर देशाच्या तुलनेने कमी अढळली आहे. तपासन्या वाढल्यामुळे कोरोंनाचा फैलाव होण्यास अडथळा निर्माण करण्यात यश मिळाले, लॉकडाउन पूर्वी रुग्ण ३.५ दिवसात दुप्पट होत होते आता त्यासाठी १२ दिवस लागतात. हे सर्व यश मिळत असले तरी या तपसणी किट आणि वैद्यकीय उपकरणासाठी आपल्या देशाला चीन सारख्या देशावर अवलंबून राहावे लागले, आणि खराब किट घेऊन आपला वेळ गमावून बसलो.  

या घटनेतून शहाणपण घेऊन, सार्‍या भारततातच नाही तर भारताबाहेर भारतीय बनावटीची  तपसणी किट आणि वैद्यकीय उपकरणे पोहोचवण्याचा निर्धार सरकारने नीती आयोगाच्या माध्यमातून केला आहे. त्या करिता प्रायवेट, पब्लिक सेक्टर एकत्रित मिलाप करण्याचे नियोजण नीती आयोगा आणि जैव तंत्रज्ञान विभाग, (डीबीटी)ने केले. त्यात शास्त्रज्ञ, लॅब, रणनीती, प्रक्रिया, संशोधन ईत्यादीचे आदान प्रदान सरकारी संस्था आणि खाजगी कंपनी या मध्ये केले जाईल. या माध्यमातून जुलै-२० पर्यन्त १ करोड भारतीय बनावटीचे तपासणी आणि पीपीई किट तयार केले जातील. मेक इन इंडिया च्या माध्यमातून पुणे येथील एनआयव्ही संस्थेमध्ये आणि zydus गुजरात येथे भारतीय बनावटीचे Enzyme Linked Immunosorbent Assay (ELSA) - कोविड कवच नामक अॅंटीiबॉडी टेस्ट किट तयार करण्यात आले आहे. या मध्ये रोगप्रतिकारशक्ति मध्ये असणार्‍या ५ वेगवेगळ्या immunoglobuline पैकी IgG चे अस्तित्व तपासले जाते. जर IgG अॅंटीiबॉडी असेल तर त्या व्यक्तीस कोरोंनाचे संक्रमण असलायचे समजते. या माध्यमातून आपल्याला पुढेल रणनीती, हॉटस्पॉट ओळखायला देखील मदत होणार आहे.  
लॉकडाउन च्या काळात भारताच्या कानाकोपर्‍यात हे किट पोहोचवण्यासाठी खाजगी कंपण्याची सप्लाय चेन, एफएमसीजीचे नेटवर्क (हिंदुस्तान युनिलिवर), ऑनलाइन अमेझोन, फ्लिपकार्ड ईत्यादी कंपनी देखील या योजने मार्फत जनसेवा करणार आहेत. भारत  बाहेर देखील या उपकरणाचा निर्यात वाडवन्याचा प्रयत्न करून वैद्यकीय आणि आर्थिक परिस्थिति सुधारण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. 
प्रा डॉ अजिंक्य अजित पत्रावळे     
रसायनशास्त्र विभाग
विवेकानंद कॉलेज कोल्हापूर


Comments

  1. Thanks sir 👍 for this information.... nice information sir..

    ReplyDelete
  2. नमस्कार सर, गेले अनेक दिवस
    आपले कोरोना व्हायरस संदर्भात आपले नाविन्यपूर्ण माहितीपर, संशोधनपर तसेच विविध प्रकारची व्हायरस संबंधीची माहिती, उपाययोजना, जागतिक स्तरापासून स्थानिक स्तरापर्यंत होत असलेले सामाजिक . आर्थिक, वैद्यकीय , धोरणात्मक बदलाबाबत अत्यंत अभ्यासपूर्ण आपले लेख फक्त ज्ञान नाही तर उपाययोजना परिणाम याबाबत अत्यंत उपयुक्त माहिती मिळत आहे
    आपण असेच लिहित रहा
    जनजागृतीत आपले योगदान निश्चितच दखलपात्र आहे
    आपणाला पुनःश्च शुभेच्छा

    ReplyDelete
    Replies
    1. खूप उपयुक्त आहे
      प्रा.सुनील शिंदे

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

Corona Series Part 39 : कोरोना, आणि लस निर्मिती मधील भारतीयांचा सहभाग

Corona Series Part 39       नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणू चा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. कोरोना , आणि लस निर्मिती मधील भारतीयांचा सहभाग जगात असा एक ही देश नसेल जिथे ज्ञानाचा भंडार असणारे भारतीय लोक त्या देशाच्या प्रगतिमध्ये सहभागी नाहीत. कोरोनाच्या लढ्यात तरी हे मागे कशी राहतील. सिरम इंडिया लिमिटेड पुणे स्थित जैव तंत्रज्ञानातील अग्रणी कंपनी आहे यां कंपनीचे वैशिष्ट्य म्हणजे या पूर्वी ही hepatitis, पोलीओ , स्वाइन फ्लू इत्यादि आजारामध्ये लस निर्माण करण्याचे महत्वाचे योगदान आहे. वर्षभरात १.५ अब्ज लसीचे डोस अतिशय माफक दरात तयार करण्याची क्षमता असणारी या कंपनीचे उत्पादन यूरोपियन देशात व संशोधन यूनिट पुणे सारख्या शहरात आहे. भारतामध्ये एक ही नोबेल परितोषिक किवा औषधाचा स्वामित्व हक्क नाही तरीही औषध , लस उत्पादन करण्यात प्रावीण्य , विश्वसनीय नावलौकिक मिळवणारा देश आहे. जावपास ८०% लस आफ्रिका सारख्या देशात पुरवेल जातात. कोरोनाची लस निर्माण करण्यासाठी न्यूयॉर्क मधील codagenic या...

पुन्हा कधीही कोरोना सारख्या महामारीमुळे लेख लिहायची वेळ येऊ नये हीच ईश्वर चरणी प्रार्थना

नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे आज काय लिहावे आणि काय नको समजेनासे झाले आहे. तरी धाडस करून लिहित आहे. काही चुकले तर समजून घ्यावे ही विनंती.   मार्च महिन्यामध्ये जगात नवीन विषाणू ने धुमाकूळ घातला होता सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. शास्त्रज्ञ , संशोधक , मीडिया , नेते , उद्योजक , आणि सामान्य जनता सर्वच नागरिकांना पुढे काय वाहून ठेवले आहे याची कल्पना नव्हती. परिस्थितीचे आकलन होण्याचा आतच लॉकडाउन झाला तेव्हा सुट्टीचा आनंद घेऊया असे समजून काही नागरिक मस्त मजेत होते. हळू हळू परिस्थिती बदलून गंभीर झाली , पण नेमके काय चालू आहे काय करावे आणि काय करू नये याचा अंदाज लागेना. मीडिया मध्ये रोज के भीतीदायक बातमी येऊ लागली कधी विषाणू वर असलेले उपाया येऊ लागले पण शास्त्रीय माहिती सजत नसल्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण होऊ लागले . अश्या मध्ये रसायनशास्त्राचा विद्यार्थी म्हणून कोरोना विषाणूच्या विरोधात   काही काम करावे असे वाटत होते परंतु संशोधन करण्यासाठी काही मर्यादा होत्या याचे भान होते पण शांत बसून चालणार नाही हे लक्षात आले होते. म्हणून मनातून ठरवले आज या संकटकाळी समजासाठी आप...

Corona Series Part 38 : कोरोना, आणि चीनी वैद्यकीय उपकरणे

Corona Series Part 38       नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणू चा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. कोरोना , आणि चीनी वैद्यकीय उपकरणे एखाद्या व्यक्तिच्या मजबूरीचा स्वतच्या फायद्यासाठी कसा उपयोग करून घेता येईल याचे सर्वोत्तम प्रशिक्षण चीनमध्ये मिळते. चीन म्हणजे धोखेबाजी , अविश्वास् याचा अनुभव सर्वांनी घेतला आहे तरी देखिल मजबूरी म्हणून काही व्यवहारीक जुगार चीनशी करावे लागत आहेत. त्यातील एक म्हणजे वैद्यकीय उपकरण खरेदी. नोहेंबर ते फेब्रुवारी च्या दरम्यान चीन मध्ये कोरोना चे संक्रमण जोरावर असल्याने चीन मधील काही प्रांत बंद होते , या विषाणूच्या बाबतीतील माहीत सुरवातीपासूंनच लपवण्यात आल्यामुळे चीन व्यतिरिक्त ईतर जग सुरळीत चालू होते , आणि एकदा हा विषाणू चीन मधून सार्‍या जगात पसरला तेव्हा ईतर देशांची या विषाणू च्या विरोधात लडण्याची तयारी नसल्याने विषाणूचे संक्रमण जलत गतीने पसरू लागले. तेव्हा वैद्यकीय उपकरणे जसे मास्क , तपासणी किट , संरक्षक किट , वेंटीलेटर , ईत्यादी उपकरणाची मागणी आणि ...