Corona Series Part 50
नमस्कार
मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात
घेऊन Social
Media च्या माध्यमातून जनजागृती
करण्याचा प्रयत्न करत आहे. https://ajinkya1030.blogspot.com
कोरोना सोबात जगायला शिकले पाहिजे
विज्ञान आणि तंत्रज्ञानमध्ये आज बर्यापैकी प्रगति केली
आहे. याचा वापर करत आपण जलद गतिने जगाला शिकतोय एखादी अडचण आली तरी ती जलद सोडवली
जाते. आज ९५ वेगवेगळ्या कोरोनाची लस बंनंन्याच्या स्पर्धेत आहेत. फाइझर सारखी
कंपनी, ऑक्सफोर्ड सारख्या विद्यापीठा
मध्ये चालू असणार्या संशोधनानुसार सेप्टेंबर अखेर लस मिळू शकेल. मानवाच्या
ईतिहासात मागील २०० वर्षापासून लस काम करत आली आहे. मागील शतकात मात्र विज्ञान आणि
तंत्रज्ञानमधील प्रगतिमुळे लस निर्मितीचे काम जलद झाले आहे. कोरोनाचेच पहा डिसेंबर
मध्ये कोरोनाचा जन्म झाला जानेवारी मध्ये चीन मधील शास्त्रज्ञांनी त्याला डी कोड
केले त्याचा सिकवेंस जगाल सांगितला मार्च अखेर काही प्रमाणात लस निर्मितीचे काम
सुरू झाले. ईतिहासात डोकावले तर आज पर्यन्त कमीत कमी ५ वर्ष ईतका कमी कालावधी
एखादी लस निर्मिती करणायसा लागला आहे. परंतु कोरोनाच्या बाबातित अनेक धाडसी निर्णय
घेतले जसे in vivo
(जनावरांन वरील
तपासणी) प्रक्रिया वगळली ईत्यादी. परंतु यामुळे काही महीने कमी झाले वर्ष नाही.
क्लिनिकल ट्रायल्स मध्ये लसजन्या रसायन मागे पडणायचे प्रमाण अधिक आहे. साधारणपणे phase I -३७%, phase II
-६५-६९%, phase
III -४०-४२% लस निकामी
होते आणि आपल्या हाती अपयश येते. या सगळ्या तपासणी फेरी मधून लस पुढे गेली तरी
प्रत्येक्ष जनतेमध्ये त्याचा राग रंग वेगळा असू शकतो.
एक उदाहरण म्हणजे डेंगी वरील लस फ्रांस मधील सोनोफी नावच्या
कंपनीने २०१५ साली पहिली लस काढली परंतु जेव्हा ही लस मोठ्या प्रमाणात लोकान
देण्यात आली तेव्हा या लसीमुळे आजाराची लक्षणे अधिक बळावली. त्यामुळे या लसीचा
वापर थांबला. एचआयव्ही विषाणू येऊन जवळपास ४० वर्ष झाली, ३२ दशलक्ष लोक गेले फक्त आपण एचआयव्ही झाल्या नंतर आजारचा फैलाव थोपवून
धरण्यात यश मिळाले आहे. तेव्हा ही या वर २
वर्षात लस येणार होती आज पर्यन्त आणू शकलो नाही कारण एचआयव्ही मध्ये होणारे बदल हा
विषाणू मानसाच्या शरीरात असताना देखील बादल घडवून आणू शकतो. मलेरिया आज पर्यन्त २३
करोड रुग्ण सापडले आहेत. सर्दी, खोखला या साठी आज
पर्यन्त लस आणू शकलो नाही.
एक अर्थाने लस आणि औषधे यायची तेव्हा येतील आज आपल्याला
कोरोना सोबात जगायला शिकले पाहिजे त्याकरिता आपल्याकडे दूसरा मार्ग असणे
आवशक्य आहे. आपले आयुष्य कोरोना मध्ये HCQ,
Remdesivier
ईत्यादी औषधे वापरुन आपण कोरोनाचा फैलाव थोपवून धरला आसला तरी तो सार्वत्रिक
एकसारखा उपाय दाखवत नाही त्यासाठी जागतिक स्तरावर तपासणी चालू आहे. रोजच्या आयुष्यात
बदल करणे अनिवार्य झाले आहे. उन्हाळ्यामद्धे या विशानूचा प्रभाव कमी असला तरी
पावसाळा आणि हिवाळा या दोन्हीही ऋतु मध्ये 2री, 3री लाट येऊ शकते. त्यासाठी प्रत्येक व्यक्तिने वैयक्तिक स्वच्छतेवर भर ठेवून
स्वतःची नीट काळजी घेतली तरी कोरोनाचा फैलाव थांबेल. सामाजिक एकत्रिकरन जसे लग्न, राजकीय प्रचार फेर्या, हॉटेल बार, पब, मैदाने, बगीचा, मॉल्स, प्रार्थनास्थळे, अश्या सर्वच ठिकाणी जमत असताना सामाजिक अंतर कसे
राखता येईल याचे नियोजन करता आले पाहिजे. मास्क, हँडग्लौज, ईत्यादिच्या वापरा बाबत स्वतहून पुढाकार घेतला पाहिजे. सार्वजनिक ठिकाणी थुकणे, उघड्यावर शौचास किवा मलमूत्र विसर्जन टाळणे. ईत्यादी सर्वच गोष्टी कोरोंना
असो वा नसो प्रत्येक व्यक्तिने विशेष लक्ष ठेऊन जबदारीने वागणे शिकले पाहिजे.
प्रा डॉ अजिंक्य अजित पत्रावळे
रसायनशास्त्र विभाग
विवेकानंद कॉलेज
कोल्हापूर
Nice information sir 👍 thanks sir 👍👍
ReplyDelete👍👍👍🙏
ReplyDeleteThank you sir for information.. 👍👍
ReplyDeleteVery nise sir.but sir now lockdown is open and people is servive is every Where then then how we can control the virus.
ReplyDelete