Skip to main content

Corona Series Part 50 : कोरोना सोबात जगायला शिकले पाहिजे


Corona Series Part 50
नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. https://ajinkya1030.blogspot.com

कोरोना सोबात जगायला शिकले पाहिजे
विज्ञान आणि तंत्रज्ञानमध्ये आज बर्‍यापैकी प्रगति केली आहे. याचा वापर करत आपण जलद गतिने जगाला शिकतोय एखादी अडचण आली तरी ती जलद सोडवली जाते. आज ९५ वेगवेगळ्या कोरोनाची लस बंनंन्याच्या स्पर्धेत आहेत. फाइझर सारखी कंपनी, ऑक्सफोर्ड सारख्या विद्यापीठा मध्ये चालू असणार्‍या संशोधनानुसार सेप्टेंबर अखेर लस मिळू शकेल. मानवाच्या ईतिहासात मागील २०० वर्षापासून लस काम करत आली आहे. मागील शतकात मात्र विज्ञान आणि तंत्रज्ञानमधील प्रगतिमुळे लस निर्मितीचे काम जलद झाले आहे. कोरोनाचेच पहा डिसेंबर मध्ये कोरोनाचा जन्म झाला जानेवारी मध्ये चीन मधील शास्त्रज्ञांनी त्याला डी कोड केले त्याचा सिकवेंस जगाल सांगितला मार्च अखेर काही प्रमाणात लस निर्मितीचे काम सुरू झाले. ईतिहासात डोकावले तर आज पर्यन्त कमीत कमी ५ वर्ष ईतका कमी कालावधी एखादी लस निर्मिती करणायसा लागला आहे. परंतु कोरोनाच्या बाबातित अनेक धाडसी निर्णय घेतले जसे in vivo (जनावरांन वरील तपासणी) प्रक्रिया वगळली ईत्यादी. परंतु यामुळे काही महीने कमी झाले वर्ष नाही. क्लिनिकल ट्रायल्स मध्ये लसजन्या रसायन मागे पडणायचे प्रमाण अधिक आहे. साधारणपणे phase I -३७%, phase II -६५-६९%, phase III -४०-४२% लस निकामी होते आणि आपल्या हाती अपयश येते. या सगळ्या तपासणी फेरी मधून लस पुढे गेली तरी प्रत्येक्ष जनतेमध्ये त्याचा राग रंग वेगळा असू शकतो.
एक उदाहरण म्हणजे डेंगी वरील लस फ्रांस मधील सोनोफी नावच्या कंपनीने २०१५ साली पहिली लस काढली परंतु जेव्हा ही लस मोठ्या प्रमाणात लोकान देण्यात आली तेव्हा या लसीमुळे आजाराची लक्षणे अधिक बळावली. त्यामुळे या लसीचा वापर थांबला. एचआयव्ही विषाणू येऊन जवळपास ४० वर्ष झाली, ३२ दशलक्ष लोक गेले फक्त आपण एचआयव्ही झाल्या नंतर आजारचा फैलाव थोपवून धरण्यात यश मिळाले आहे. तेव्हा ही या वर २ वर्षात लस येणार होती आज पर्यन्त आणू शकलो नाही कारण एचआयव्ही मध्ये होणारे बदल हा विषाणू मानसाच्या शरीरात असताना देखील बादल घडवून आणू शकतो. मलेरिया आज पर्यन्त २३ करोड रुग्ण सापडले आहेत. सर्दी, खोखला या साठी आज पर्यन्त लस आणू शकलो नाही.
एक अर्थाने लस आणि औषधे यायची तेव्हा येतील आज आपल्याला कोरोना सोबात जगायला शिकले पाहिजे त्याकरिता आपल्याकडे दूसरा मार्ग असणे आवशक्य आहे. आपले आयुष्य कोरोना मध्ये HCQ, Remdesivier ईत्यादी औषधे वापरुन आपण कोरोनाचा फैलाव थोपवून धरला आसला तरी तो सार्वत्रिक एकसारखा उपाय दाखवत नाही त्यासाठी जागतिक स्तरावर तपासणी चालू आहे. रोजच्या आयुष्यात बदल करणे अनिवार्य झाले आहे. उन्हाळ्यामद्धे या विशानूचा प्रभाव कमी असला तरी पावसाळा आणि हिवाळा या दोन्हीही ऋतु मध्ये 2री, 3री लाट येऊ शकते. त्यासाठी प्रत्येक व्यक्तिने वैयक्तिक स्वच्छतेवर भर ठेवून स्वतःची नीट काळजी घेतली तरी कोरोनाचा फैलाव थांबेल. सामाजिक एकत्रिकरन जसे लग्न, राजकीय प्रचार फेर्‍या, हॉटेल बार, पब, मैदाने, बगीचा, मॉल्स, प्रार्थनास्थळे, अश्या सर्वच ठिकाणी जमत असताना सामाजिक अंतर कसे राखता येईल याचे नियोजन करता आले पाहिजे. मास्क, हँडग्लौज, ईत्यादिच्या  वापरा बाबत स्वतहून पुढाकार घेतला पाहिजे. सार्वजनिक ठिकाणी थुकणे, उघड्यावर शौचास किवा मलमूत्र विसर्जन टाळणे. ईत्यादी सर्वच गोष्टी कोरोंना असो वा नसो प्रत्येक व्यक्तिने विशेष लक्ष ठेऊन जबदारीने वागणे शिकले पाहिजे. 
प्रा डॉ अजिंक्य अजित पत्रावळे     
रसायनशास्त्र विभाग
विवेकानंद कॉलेज कोल्हापूर

Comments

  1. Nice information sir 👍 thanks sir 👍👍

    ReplyDelete
  2. Thank you sir for information.. 👍👍

    ReplyDelete
  3. Very nise sir.but sir now lockdown is open and people is servive is every Where then then how we can control the virus.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Corona Series Part 39 : कोरोना, आणि लस निर्मिती मधील भारतीयांचा सहभाग

Corona Series Part 39       नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणू चा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. कोरोना , आणि लस निर्मिती मधील भारतीयांचा सहभाग जगात असा एक ही देश नसेल जिथे ज्ञानाचा भंडार असणारे भारतीय लोक त्या देशाच्या प्रगतिमध्ये सहभागी नाहीत. कोरोनाच्या लढ्यात तरी हे मागे कशी राहतील. सिरम इंडिया लिमिटेड पुणे स्थित जैव तंत्रज्ञानातील अग्रणी कंपनी आहे यां कंपनीचे वैशिष्ट्य म्हणजे या पूर्वी ही hepatitis, पोलीओ , स्वाइन फ्लू इत्यादि आजारामध्ये लस निर्माण करण्याचे महत्वाचे योगदान आहे. वर्षभरात १.५ अब्ज लसीचे डोस अतिशय माफक दरात तयार करण्याची क्षमता असणारी या कंपनीचे उत्पादन यूरोपियन देशात व संशोधन यूनिट पुणे सारख्या शहरात आहे. भारतामध्ये एक ही नोबेल परितोषिक किवा औषधाचा स्वामित्व हक्क नाही तरीही औषध , लस उत्पादन करण्यात प्रावीण्य , विश्वसनीय नावलौकिक मिळवणारा देश आहे. जावपास ८०% लस आफ्रिका सारख्या देशात पुरवेल जातात. कोरोनाची लस निर्माण करण्यासाठी न्यूयॉर्क मधील codagenic या...

Corona Series Part 56 : कोरोना, आणि ई-शिक्षण

Corona Series Part 56 नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. आजचा विषय विस्तृत मांडला आहे.   या विषया बाबतीत आपण आपले मत ब्लॉगवर जरूर कळवावे ही विनंती.     https://ajinkya1030.blogspot.com   कोरोना , आणि ई-शिक्षण मार्च महिन्यापासन कोरोनाचा प्रभाव दिसू लागला शेवटच्या आठवड्यापासून शाळा , कॉलेज लॉकडाउनच्या काळापासून आज पर्यन्त बंद करण्यात आल्या. भितीदायक वातावरणामध्ये १० , १२वी च्या परीक्षा घेण्यात आल्या. शैक्षणिक वर्ष २०१९-२० चे कार्य संपत आले होते परंतु लेखी आणि मौखिक परीक्षा राहिल्या होत्या . आणि आता यूजीसीच्या मार्गदर्शंनानुसार त्या राहूनच जातील. किंवा काही अंशी तात्पुरती योजना राबवून काही ना काही मार्ग काडला जाईल.   नैसर्गिक आपत्ती महापुर , वैश्विक महामारी मधून शैक्षणिक क्षेत्रा समोर नवीन आव्हान उभे राहिले आहे. खाजगी , काही सरकारी शाळा , कॉलेजने देखील तात्पुरती सोय करण्यासाठी ऑनलाइन तास झूम , गूगल क्लासरूम , गूगल डॉक , यू ट्यूब , व्हाट्स अप...

पुन्हा कधीही कोरोना सारख्या महामारीमुळे लेख लिहायची वेळ येऊ नये हीच ईश्वर चरणी प्रार्थना

नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे आज काय लिहावे आणि काय नको समजेनासे झाले आहे. तरी धाडस करून लिहित आहे. काही चुकले तर समजून घ्यावे ही विनंती.   मार्च महिन्यामध्ये जगात नवीन विषाणू ने धुमाकूळ घातला होता सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. शास्त्रज्ञ , संशोधक , मीडिया , नेते , उद्योजक , आणि सामान्य जनता सर्वच नागरिकांना पुढे काय वाहून ठेवले आहे याची कल्पना नव्हती. परिस्थितीचे आकलन होण्याचा आतच लॉकडाउन झाला तेव्हा सुट्टीचा आनंद घेऊया असे समजून काही नागरिक मस्त मजेत होते. हळू हळू परिस्थिती बदलून गंभीर झाली , पण नेमके काय चालू आहे काय करावे आणि काय करू नये याचा अंदाज लागेना. मीडिया मध्ये रोज के भीतीदायक बातमी येऊ लागली कधी विषाणू वर असलेले उपाया येऊ लागले पण शास्त्रीय माहिती सजत नसल्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण होऊ लागले . अश्या मध्ये रसायनशास्त्राचा विद्यार्थी म्हणून कोरोना विषाणूच्या विरोधात   काही काम करावे असे वाटत होते परंतु संशोधन करण्यासाठी काही मर्यादा होत्या याचे भान होते पण शांत बसून चालणार नाही हे लक्षात आले होते. म्हणून मनातून ठरवले आज या संकटकाळी समजासाठी आप...