Skip to main content

Corona Series Part 48 : कोरोना, लॉकडाउन आणि वायु गळती


Corona Series Part 48
नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. https://ajinkya1030.blogspot.com

कोरोना, लॉकडाउन आणि वायु गळती
जवळपास ४५ दिवस कोरोनामुळे भारतता लॉक डाउन आहे अजूनही १७ मे पर्यन्त राहील कोरोनाच्या या प्रादुर्भावमुळे काय काय पाहावं लागेल देव जाणे. जल, वायु प्रदूषणामध्ये घट झाली काही अपवाद वगळता रस्त्यावरील अपघाताचे प्रमाण कमी झाले ईत्यादी सकारात्म्क बदल झाले. पण दुर्घटना एकच होते ती या सर्व सकारात्म्क गोष्टींपेक्षा वरचड ठरुन जाते. काल विशाखापट्टणम मधील आर आर पुराम गावात गोपाळपट्टनम भागातील कंपनीमध्ये वायु गळतीची दुर्दैवी घटना पहाटे १ ते ४ च्या दरम्यान घडली. या वायु गळतीचा आणि कोरोनाच्या लॉकडाउनचा काय सबंध आहे का असा विचार मनात येणं साहजिक आहे. वायु गळतीचे काय दुष्परिणाम आहेत, वायु विषारी होता का असे प्रश्न मनात येत असतील अर्थात न्यूज मीडिया मधून ओवर डोस झाला असेलही परंतु रसायन शास्त्राचा विद्यार्थी म्हणून चर्चा करन महत्वाच वाटत.
१८८४ साली भोपाळ मध्ये मिथिल आयएसओ सायनाईड नावाचा विषारी वायु गळतीची आज पुन्हा एकदा आठवन झाली. विशाखापट्टणम मध्ये एलजी पोलीमर नावाची एक प्लॅस्टिक बनवणारी कंपनी आहे. कंपनी तशी फार जुनी आहे. पूर्वी ती १९६१ साली हिंदुस्तान पोलिमर त्यानंतर एमसी डोवेल याना हस्तांतरित झाली आणि शेवटी दक्षिण कोरिया मधील एलजी ग्रुपने १९९७ साला पासून ही कंपनी चालवत आहेत. या कंपनी मध्ये स्टाईरिन नामक रसायनापासून पोलीस्टाईरिन नावाचे पोलिमर प्लास्टिक बनवले. स्टाईरिन हे रंगहीन, जवल्न्शील द्रव, असून रबर. बॉटल, फॅन, औटोमोबाईल, ईत्यादी वस्तु बनवल्या जातता. द्रव स्टाईरिन हा एक मोनोमर आहे त्याला बाहेरून ऊर्जा देऊन रासायनिक अभिक्रिया केली जाते आणि पोलीस्टाईरिन नावाचे पोलिमर प्लास्टिक बनते या प्रक्रिये मध्ये काही प्रमाणात द्रव स्टाईरिनचे वायु स्टाईरिन मध्ये रूपांतरण होते हाच तो गॅस कंपनी मध्ये बाय प्रॉडक्ट म्हणून टाकी मध्ये साठवला गेला होता. स्टाईरिन हा एक विषारी वायु असून त्वचा डोळे जळजळणे लाल होणे, उलटी, डोकेदूखी, नैराश्य अति प्रामानात मनसाच्या नर्वस सिस्टमवर आघात होतो. सध्या ११ लोक मृत्यूमुखी पडले असून ८००-९०० लोक रुग्णालयात आहेत. कंपनीच्या जावपपास असणारी ५ गावे ३ ते ५ किलोमीटर परीक्षेत्रात गॅस पसरला होता.
 या दुर्घटनेच्या प्राथमिक अहवालामध्ये विशाखापट्टणम पश्चीम विभागाचे एसीपीच्या म्हणण्यानुसार (न्यूज१८) लॉकडाउनच्या काळातील कंपनीमध्ये झालेले दुर्लक्ष, अल्प कामगार,  निष्काळजीपना यामुळे दुर्घटना घडली आहे. Chemical reaction and generate heat inside the tank असे शस्त्रिय कारण समोर आले आहे. लॉकडाउनच्या काळात अशी दुर्घटना घडल्यामुळे आज सारा जग ही बातमी पाहत आहे त्यामुळे औद्योगिक सुरक्षा हा विषय भारतता किती गांभीर्याने घेतला जातो या वर प्रश्न निर्माण होतो.  आज चीन मधून बाहेर पडणारे उद्योग भारतता कडे आशेने पहाहात असताना अशी दुर्दैवी घटना घडणे नवीन उद्योगाचा दृष्टीने घातक आहे. खास करून औषद निर्माण, बल्क ड्रग्स आणि रासायनिक कंपनी. केंद्र सरकारने गांभीर्याने याचा विचार सुरू केला आहे. त्यामुळे आता सर्वच कंपनीमध्ये लॉकडाउनच्या काळातील सुरेक्षेवर भर दिला जाईल आणि अश्या कमपणी मधील सुरक्षेची तपासणी केली जाईल.
सध्या पुण्यातून केंद्राची Chemical Biological Radiological & Nuclear (CBRN) पथक विशाखापट्टणमला पुढील तपासणीसाठी रवाना झाले असून त्यांचा अहवाल आला की नेमके कारण समजून येईल.
लॉकडाउनच्या काळात अशी एक दुर्घटना समोर आली परंतु, बर्‍याच छोट्या मोठ्या कंपनी मध्ये अश्या घटना घडू लागल्या आहेत. कोल्हापुरात देखील इलेक्ट्रिक शॉर्ट सरकिटचा धोका निर्माण होऊन एक व्यक्ति मरण पावला. रसायन, पदार्थ विज्ञान, जैव शास्त्राच्या लॅब मधील उपकरणाची, सोडियम, अल्कोहोल, गॅस ईत्यादीची पुरेपूर काळजी घेऊन अधून मधून सुरक्षा सील तपासून पहावे लागणार आहे, निष्काळजी पना मोठे जीवित आणि वित्त हानी घडवू शकते. कोरोना विषाणूमुळे झालेले अप्रत्यक्ष नुकसान म्हणता येईल.  
प्रा डॉ अजिंक्य अजित पत्रावळे     
रसायनशास्त्र विभाग
विवेकानंद कॉलेज कोल्हापूर


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

पुन्हा कधीही कोरोना सारख्या महामारीमुळे लेख लिहायची वेळ येऊ नये हीच ईश्वर चरणी प्रार्थना

नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे आज काय लिहावे आणि काय नको समजेनासे झाले आहे. तरी धाडस करून लिहित आहे. काही चुकले तर समजून घ्यावे ही विनंती.   मार्च महिन्यामध्ये जगात नवीन विषाणू ने धुमाकूळ घातला होता सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. शास्त्रज्ञ , संशोधक , मीडिया , नेते , उद्योजक , आणि सामान्य जनता सर्वच नागरिकांना पुढे काय वाहून ठेवले आहे याची कल्पना नव्हती. परिस्थितीचे आकलन होण्याचा आतच लॉकडाउन झाला तेव्हा सुट्टीचा आनंद घेऊया असे समजून काही नागरिक मस्त मजेत होते. हळू हळू परिस्थिती बदलून गंभीर झाली , पण नेमके काय चालू आहे काय करावे आणि काय करू नये याचा अंदाज लागेना. मीडिया मध्ये रोज के भीतीदायक बातमी येऊ लागली कधी विषाणू वर असलेले उपाया येऊ लागले पण शास्त्रीय माहिती सजत नसल्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण होऊ लागले . अश्या मध्ये रसायनशास्त्राचा विद्यार्थी म्हणून कोरोना विषाणूच्या विरोधात   काही काम करावे असे वाटत होते परंतु संशोधन करण्यासाठी काही मर्यादा होत्या याचे भान होते पण शांत बसून चालणार नाही हे लक्षात आले होते. म्हणून मनातून ठरवले आज या संकटकाळी समजासाठी आप...

Corona Series Part 1 : Clinical Trails starts on Corona

Corona Series Part 1 Corona धोका लक्षात घेता social media द्वारे जनजागृती करणे गरजेचे झाले आहे त्या माध्यमातून एक प्रयत्न करत आहे कृपया msg पूर्ण वाचून आपल्याला योग्य वाटल्यास पुढे पाठवा कोरोना जनजागृती मोहीम Clinical Trails starts on Corona जवळपास जगामध्ये 20 संस्था ह्या आजारावर vaccine बनवण्याचा प्रयन्त करत आहेत . जानेवारी 2020 मध्ये चीन मध्ये शास्त्रज्ञांनी कोरोना virus चे genetic मटेरियल चे sequencing चे decoding केले , अमेरिकेतील सरकारी संस्थामधील शास्त्रज्ञानी ह्या अभ्यासच फायदा घेत पुढे कांम चालू केले   1) (NIAID) National Institute of Allergy and Infection 2) Moderna Inc ह्या दोन संस्था मागील काही वर्षे MERS,   SARS- 1 वर काम करत आहेत त्यांना जेव्हा sequencing of gentic information of corona 2   मिळाली त्यांनी vaccine बनवण्याचे काम अहो रात्र चालू केले. अमेरिकेतील north washington जिथे मायक्रोसॉफ्ट चे बिल गेट्स व अनेक it कंपनीच्या चे केंद्र स्थान आहे अश्या शहरामध्ये Kiaser Permannente Washington Health Reseaech Institute (KPWHRI) मध्ये संशोधकांन...

Corona Series Part 100 : कोरोना आणि DRDO

Corona Series Part 100 नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. https://ajinkya1030.blogspot.com/   कोरोना आणि DRDO १९५८ मध्ये तांत्रिक विकास संस्था आणि भारतीय आयुध निर्मिती संचालनालयाच्या संरक्षण विज्ञान संस्थेमध्ये या संस्थेची स्थापना करण्यात आली. हे भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) जी लष्कराच्या संशोधन आणि विकासाची संस्था आहे. एकूण ५२ प्रयोगशाळां , ज्याद्वारे एरोनॉटिक्स , आर्मेट्स , इलेक्ट्रॉनिक्स , लँड कॉम्बॅट इंजिनिअरिंग , जीवन विज्ञान , साहित्य , क्षेपणास्त्रे आणि नौदल प्रणाली अशा विविध क्षेत्रांचा समावेश असलेले संरक्षण तंत्रज्ञान विकसित करण्यात गुंतलेले आहे. या संघटनेत संरक्षण संशोधन आणि विकास सेवा (डीआरडीएस) चे सुमारे ५ , ००० शास्त्रज्ञ आणि इतर २५ , ००० वैज्ञानिक , तांत्रिक आणि सहाय्यक कर्मचारी यांचा समावेश आहे. अशी नावा रूपाला आलेली लष्करी संस्था कोरोंना सारख्या महामारीत देखील देशसेवेचे आपले...