Corona Series Part 48
नमस्कार
मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात
घेऊन Social
Media च्या माध्यमातून जनजागृती
करण्याचा प्रयत्न करत आहे. https://ajinkya1030.blogspot.com
कोरोना, लॉकडाउन आणि वायु गळती
जवळपास ४५ दिवस कोरोनामुळे भारतता लॉक डाउन आहे
अजूनही १७ मे पर्यन्त राहील कोरोनाच्या या प्रादुर्भावमुळे काय काय पाहावं लागेल
देव जाणे. जल, वायु प्रदूषणामध्ये घट झाली काही
अपवाद वगळता रस्त्यावरील अपघाताचे प्रमाण कमी झाले ईत्यादी सकारात्म्क बदल झाले.
पण दुर्घटना एकच होते ती या सर्व सकारात्म्क गोष्टींपेक्षा वरचड ठरुन जाते. काल
विशाखापट्टणम मधील आर आर पुराम गावात गोपाळपट्टनम भागातील कंपनीमध्ये वायु गळतीची दुर्दैवी
घटना पहाटे १ ते ४ च्या दरम्यान घडली. या वायु गळतीचा आणि कोरोनाच्या लॉकडाउनचा काय सबंध आहे का असा विचार मनात येणं साहजिक आहे. वायु गळतीचे काय
दुष्परिणाम आहेत, वायु विषारी होता का असे प्रश्न
मनात येत असतील अर्थात न्यूज मीडिया मधून ओवर डोस झाला असेलही परंतु रसायन शास्त्राचा
विद्यार्थी म्हणून चर्चा करन महत्वाच वाटत.
१८८४ साली भोपाळ मध्ये मिथिल आयएसओ सायनाईड नावाचा
विषारी वायु गळतीची आज पुन्हा एकदा आठवन झाली. विशाखापट्टणम मध्ये एलजी पोलीमर
नावाची एक प्लॅस्टिक बनवणारी कंपनी आहे. कंपनी तशी फार जुनी आहे. पूर्वी ती १९६१
साली हिंदुस्तान पोलिमर त्यानंतर एमसी डोवेल याना हस्तांतरित झाली आणि शेवटी
दक्षिण कोरिया मधील एलजी ग्रुपने १९९७ साला पासून ही कंपनी चालवत आहेत. या कंपनी मध्ये
स्टाईरिन नामक रसायनापासून पोलीस्टाईरिन नावाचे पोलिमर प्लास्टिक बनवले. स्टाईरिन हे
रंगहीन, जवल्न्शील द्रव, असून रबर. बॉटल, फॅन, औटोमोबाईल, ईत्यादी वस्तु बनवल्या जातता. द्रव स्टाईरिन हा एक मोनोमर आहे त्याला बाहेरून ऊर्जा
देऊन रासायनिक अभिक्रिया केली जाते आणि पोलीस्टाईरिन नावाचे पोलिमर प्लास्टिक बनते
या प्रक्रिये मध्ये काही प्रमाणात द्रव स्टाईरिनचे वायु स्टाईरिन मध्ये रूपांतरण होते
हाच तो गॅस कंपनी मध्ये बाय प्रॉडक्ट म्हणून टाकी मध्ये साठवला गेला होता. स्टाईरिन
हा एक विषारी वायु असून त्वचा डोळे जळजळणे लाल होणे, उलटी, डोकेदूखी, नैराश्य अति प्रामानात मनसाच्या नर्वस सिस्टमवर आघात होतो. सध्या ११ लोक मृत्यूमुखी
पडले असून ८००-९०० लोक रुग्णालयात आहेत. कंपनीच्या जावपपास असणारी ५ गावे ३ ते ५ किलोमीटर
परीक्षेत्रात गॅस पसरला होता.
या दुर्घटनेच्या प्राथमिक अहवालामध्ये विशाखापट्टणम पश्चीम विभागाचे
एसीपीच्या म्हणण्यानुसार (न्यूज१८) लॉकडाउनच्या काळातील कंपनीमध्ये झालेले दुर्लक्ष, अल्प कामगार, निष्काळजीपना यामुळे दुर्घटना घडली
आहे. Chemical
reaction and generate heat inside the tank असे शस्त्रिय कारण समोर आले आहे. लॉकडाउनच्या काळात अशी दुर्घटना
घडल्यामुळे आज सारा जग ही बातमी पाहत आहे त्यामुळे औद्योगिक सुरक्षा हा विषय
भारतता किती गांभीर्याने घेतला जातो या वर प्रश्न निर्माण होतो. आज चीन मधून बाहेर पडणारे उद्योग भारतता कडे
आशेने पहाहात असताना अशी दुर्दैवी घटना घडणे नवीन उद्योगाचा दृष्टीने घातक आहे. खास
करून औषद निर्माण,
बल्क ड्रग्स आणि रासायनिक कंपनी. केंद्र
सरकारने गांभीर्याने याचा विचार सुरू केला आहे. त्यामुळे आता सर्वच कंपनीमध्ये लॉकडाउनच्या
काळातील सुरेक्षेवर भर दिला जाईल आणि अश्या कमपणी मधील सुरक्षेची तपासणी केली जाईल.
सध्या पुण्यातून केंद्राची Chemical Biological Radiological & Nuclear (CBRN) पथक विशाखापट्टणमला पुढील तपासणीसाठी रवाना झाले असून त्यांचा अहवाल आला की नेमके
कारण समजून येईल.
लॉकडाउनच्या काळात अशी एक दुर्घटना समोर आली परंतु, बर्याच छोट्या मोठ्या कंपनी मध्ये अश्या घटना घडू लागल्या
आहेत. कोल्हापुरात देखील इलेक्ट्रिक शॉर्ट सरकिटचा धोका निर्माण होऊन एक व्यक्ति मरण
पावला. रसायन, पदार्थ विज्ञान, जैव शास्त्राच्या लॅब मधील उपकरणाची, सोडियम, अल्कोहोल, गॅस ईत्यादीची पुरेपूर काळजी घेऊन अधून
मधून सुरक्षा सील तपासून पहावे लागणार आहे, निष्काळजी पना मोठे जीवित आणि वित्त हानी घडवू शकते. कोरोना विषाणूमुळे झालेले
अप्रत्यक्ष नुकसान म्हणता येईल.
प्रा डॉ अजिंक्य अजित पत्रावळे
रसायनशास्त्र विभाग
विवेकानंद कॉलेज
कोल्हापूर
very good all articles..Sir.
ReplyDeleteVery nice information sir 👍👍 thanks sir 👍
ReplyDelete