Corona Series Part 47
नमस्कार
मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात
घेऊन Social
Media च्या माध्यमातून जनजागृती
करण्याचा प्रयत्न करत आहे. https://ajinkya1030.blogspot.com
कोरोना, औषध शोषण / प्रतिरोधक क्षमता आणि पर्यावरण
आजारी पडल्यावर आपण औषधे घेतो. फ्लू सारखा एकसारखा आजार
घरीतल सर्वांना झाला असला तरी प्रत्येक व्यक्तिला डॉक्टर एकसारखीच मात्रा असणारे, एकाच प्रकारचे औषध दिले जाते असे नाही. तसेच व्यक्ति
बरा होण्यासाठी लागणारा वेळ वेगवेगळा असण्याची कारणे पुष्कळ आहेत त्यातील एक
म्हणजे, त्या व्यक्तिची औषध शोषण क्षमता ती व्यक्ति निहाय वेगळीच असते म्हणूनच एकसारखे औषध जेव्हा 2 व्यक्तिना दिले तरी
त्यांना पूर्ण बरे होन्यासाठीचा कालावधी मागे पुढे होतो. वेगवेगळा वेळ का लागतो!
ही प्रक्रिया समजून घेत असताना त्याचा प्रतिरोधक क्षमता आणि पर्यावरण याच्याशी असणारा सबंध पाहू.
एक व्यक्ति औषध घेतो त्या नंतर त्या औषधाला शोषण, वितरण, चयापचय आणि निर्मूलन या ४ प्रमुख प्रक्रियेतून जाव लागत. प्रथम औषध शोषले जाऊन रक्त
वाहिन्यामधून वितरित केले जाते, जिथे आवशक्यता आहे
तिथे चयापचय क्रिये मधून औषध स्वत:चा कमाल दाखवते.
सर्व प्रक्रिये मध्ये १०% ते ९०% औषध वापरले जाते आणि त्या
नंतर रासायनिक बदल झालेले रसायन शरीरातून बाहेर टाकण्यासाठी निर्मूलन प्रक्रिये
मध्ये पाठवले जाते आणि मानवाच्या विष्ठा,
मलमुत्र, घाम या मार्गे शरीरातून बाहेर टाकले
जाते. औषधामध्ये प्रतिजैवक, जिवाणू / विषाणू
रोधक रसायन व्यक्तिच्या शरीरात जास्त प्रमाणात शोषून घेतली जात नाहीत. काही विषाणू
रोधक रसायने तर कमी अधिक प्रमाणात (९०% पर्यन्त) शरीरातून बाहेर टाकली जाताता.
कोरोनासाठी वापरली जाणारी औषधे chloroquine, Hydroxychloroquine (HCQ), Favipiravir,
Lopinavir, Ritonavir, Rabavirin, Osltamivir (tami flu)
ईत्यादी आधी पासून माहीत असणारी औषधे आहेत त्यामुळे याची माहिती उपलब्ध आहे. त्यातील
HCQ ईत्यादी दीर्घकाळ वापरामुळे कर्क
रोगास करणीभूत ठरतात. त्याच बरोबर Favipiravir सारखी
औषधे (Teratogenic) आईकडून अर्भकाकडे परिणाम घडून
आणणारे घातक रसायने आहेत. ही सर्व रसायने सांडपाण्यात लवकारत लवकर निष्क्रिय
होत नाहीत.
आता प्रतिरोधक क्षमता आणि पर्यावरण याच्याशी असणारा सबंध
पाहू. पुढारलेल्या देशात मानवाच्या शरीरातून बाहेर टाकलेले मूत्र, विष्टा
निरूपयोगी गोष्टी त्याच बरोबर वापरात न आलेले विषाणू रोधक औषधे या सांडपाणी
प्रक्रिया केंद्रामध्ये येते. येथे याचे निष्क्रियीकरण केले जाते. परंतु भारता सारख्या अनेक देशमध्ये
प्रत्येक ठिकाणी मुळातच अशी सांडपाणी प्रक्रिया केंद्रे उपलब्ध नाहीत जिथे आहेत ती
असणार्या आवशक्यतेच्या अर्ध्यावर आहेत त्यामुळे याचा पर्यावरणावर परिणाम दिसू
लागतो.
कोरोना बाधित रुगांचा निरूपयोगी गोष्टी या सांडपाणी मध्ये मिसळत आहेत त्यामुळे करोनाचा विषाणूचे अस्थित्व सांडपाण्यात
असणारच आहे. अमेरिका मधील काही शहरामध्ये या सांडपाण्यामद्धे कोरोंना विषाणूची
तपासणी केली जाता आहे. त्याचे कारण असे की मोठ्या प्रमाणात विषाणू रोधक औषधे
रुगांना दिली जात असल्याने वापर न झालेली औषधे आणि विषाणू असे दोन्ही घटक या
सांडपाण्यात एकत्र असतात. तसेच फार्मा कंपनी मध्ये मुदत संपुन गेलेली औषधाची
वील्हेवाट लावल्या नंतरचे सांडपाणी (प्रक्रिया केली असले तरीही), असे दुशीत सांडपाणी नाले, नदी, समुद्र मासे, शैवाल, ईत्यादी माध्यमातून अन्न साखळीचा भाग बनतता. विशेष करून विषाणू रोधक औषधाचे निष्क्रियीकरण
लवकर होत नाही काही औषधे ही स्निग्ध (चरबी) आणि तेलात विरघळनारी असल्याने असे
रसायन सांडपाण्यात विघटन होण्यास बराच कालावधी लागतो. परंतु एथे कोरोना विषाणूच्या
क्षमतेच्या तुलनेत औषधाची ताकत मात्र कमी असते कारण शरीरात कोरणाशी दोन हात करत
असताना या रसायनाच्या रासायनिक रचनेत, मात्रेत (concentration), फोटोलायसिस,
हायड्रोलायसिस,
जैव
अधोगती, लहान कणात पृथ:क्करण असे बदल
झालेला असताता. सततच्या
संपर्कामुळे कोरोना विषाणू हा विषाणू रोधक औषधाच रासायनिक अभ्यास करून स्वत:मध्ये प्रतिरोधक
क्षमता निर्माण करू शकतात असे झाल्यामुळे वापरत असणारी औषधे वेळेपूर्वी निकामी
होऊन कोरोना विषाणू अधिक घातक बनु शकतो. हे टाळणायसाठी प्रत्येक गावातील लोकसंख्या आणि सांडपाणी याचा विचार करून अधिक क्षमता
असणारे सांडपाण्यावर प्रक्रिया केंद्र उभे करणे खूप महत्वाचे आहे. त्यामुळे औषधा
मध्ये प्रतिरोधक क्षमता निर्माण होण्यास अडथळा होईल आणि पर्यावरनावर
होणरे दुष्परिणाम कमी होण्यास मदत होईल.
प्रा डॉ अजिंक्य अजित पत्रावळे
रसायनशास्त्र विभाग
विवेकानंद
कॉलेज कोल्हापूर
👍👍
ReplyDeleteNice information sir 👍👍 thanks sir 👍👍
ReplyDeleteImportant Information for Students
ReplyDeletethanks for msg
Delete