Skip to main content

Corona Series Part 47 : कोरोना, औषध शोषण / प्रतिरोधक क्षमता आणि पर्यावरण


Corona Series Part 47
नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. https://ajinkya1030.blogspot.com

कोरोना, औषध शोषण / प्रतिरोधक क्षमता आणि पर्यावरण
आजारी पडल्यावर आपण औषधे घेतो. फ्लू सारखा एकसारखा आजार घरीतल सर्वांना झाला असला तरी प्रत्येक व्यक्तिला डॉक्टर एकसारखीच मात्रा असणारे, एकाच प्रकारचे औषध दिले जाते असे नाही. तसेच व्यक्ति बरा होण्यासाठी लागणारा वेळ वेगवेगळा असण्याची कारणे पुष्कळ आहेत त्यातील एक म्हणजे, त्या व्यक्तिची औषध शोषण क्षमता ती व्यक्ति निहाय वेगळीच असते म्हणूनच एकसारखे औषध जेव्हा 2 व्यक्तिना दिले तरी त्यांना पूर्ण बरे होन्यासाठीचा कालावधी मागे पुढे होतो. वेगवेगळा वेळ का लागतो! ही प्रक्रिया समजून घेत असताना त्याचा प्रतिरोधक क्षमता आणि पर्यावरण याच्याशी असणारा सबंध पाहू.
एक व्यक्ति औषध घेतो त्या नंतर त्या औषधाला शोषण, वितरण, चयापचय आणि निर्मूलन या ४ प्रमुख प्रक्रियेतून जाव लागत. प्रथम औषध शोषले जाऊन रक्त वाहिन्यामधून वितरित केले जाते, जिथे आवशक्यता आहे तिथे चयापचय क्रिये मधून औषध स्वत:चा कमाल दाखवते.
सर्व प्रक्रिये मध्ये १०% ते ९०% औषध वापरले जाते आणि त्या नंतर रासायनिक बदल झालेले रसायन शरीरातून बाहेर टाकण्यासाठी निर्मूलन प्रक्रिये मध्ये पाठवले जाते आणि मानवाच्या विष्ठा, मलमुत्र, घाम या मार्गे शरीरातून बाहेर टाकले जाते. औषधामध्ये प्रतिजैवक, जिवाणू / विषाणू रोधक रसायन व्यक्तिच्या शरीरात जास्त प्रमाणात शोषून घेतली जात नाहीत. काही विषाणू रोधक रसायने तर कमी अधिक प्रमाणात (९०% पर्यन्त) शरीरातून बाहेर टाकली जाताता. कोरोनासाठी वापरली जाणारी औषधे chloroquine, Hydroxychloroquine (HCQ), Favipiravir, Lopinavir, Ritonavir, Rabavirin, Osltamivir (tami flu) ईत्यादी आधी पासून माहीत असणारी औषधे आहेत त्यामुळे याची माहिती उपलब्ध आहे. त्यातील HCQ ईत्यादी दीर्घकाळ वापरामुळे कर्क रोगास करणीभूत ठरतात. त्याच बरोबर Favipiravir सारखी औषधे (Teratogenic) आईकडून अर्भकाकडे परिणाम घडून आणणारे घातक रसायने आहेत. ही सर्व रसायने सांडपाण्यात लवकारत लवकर निष्क्रिय होत नाहीत. 
आता प्रतिरोधक क्षमता आणि पर्यावरण याच्याशी असणारा सबंध पाहू. पुढारलेल्या देशात मानवाच्या शरीरातून बाहेर टाकलेले मूत्र, विष्टा निरूपयोगी गोष्टी त्याच बरोबर वापरात न आलेले विषाणू रोधक औषधे या सांडपाणी प्रक्रिया केंद्रामध्ये येते. येथे याचे निष्क्रियीकरण केले जाते. परंतु भारता सारख्या अनेक देशमध्ये प्रत्येक ठिकाणी मुळातच अशी सांडपाणी प्रक्रिया केंद्रे उपलब्ध नाहीत जिथे आहेत ती असणार्‍या आवशक्यतेच्या अर्ध्यावर आहेत त्यामुळे याचा पर्यावरणावर परिणाम दिसू लागतो.
कोरोना बाधित रुगांचा निरूपयोगी गोष्टी या सांडपाणी मध्ये मिसळत आहेत त्यामुळे करोनाचा विषाणूचे अस्थित्व सांडपाण्यात असणारच आहे. अमेरिका मधील काही शहरामध्ये या सांडपाण्यामद्धे कोरोंना विषाणूची तपासणी केली जाता आहे. त्याचे कारण असे की मोठ्या प्रमाणात विषाणू रोधक औषधे रुगांना दिली जात असल्याने वापर न झालेली औषधे आणि विषाणू असे दोन्ही घटक या सांडपाण्यात एकत्र असतात. तसेच फार्मा कंपनी मध्ये मुदत संपुन गेलेली औषधाची वील्हेवाट लावल्या नंतरचे सांडपाणी (प्रक्रिया केली असले तरीही), असे दुशीत सांडपाणी नाले, नदी, समुद्र मासे, शैवाल, ईत्यादी माध्यमातून अन्न साखळीचा भाग बनतता. विशेष करून विषाणू रोधक औषधाचे निष्क्रियीकरण लवकर होत नाही काही औषधे ही स्निग्ध (चरबी) आणि तेलात विरघळनारी असल्याने असे रसायन सांडपाण्यात विघटन होण्यास बराच कालावधी लागतो. परंतु एथे कोरोना विषाणूच्या क्षमतेच्या तुलनेत औषधाची ताकत मात्र कमी असते कारण शरीरात कोरणाशी दोन हात करत असताना या रसायनाच्या रासायनिक रचनेत, मात्रेत (concentration), फोटोलायसिस, हायड्रोलायसिस, जैव अधोगती, लहान कणात पृथ:क्करण असे बदल झालेला असताता. सततच्या संपर्कामुळे कोरोना विषाणू हा विषाणू रोधक औषधाच रासायनिक अभ्यास करून स्वत:मध्ये प्रतिरोधक क्षमता निर्माण करू शकतात असे झाल्यामुळे वापरत असणारी औषधे वेळेपूर्वी निकामी होऊन कोरोना विषाणू अधिक घातक बनु शकतो. हे टाळणायसाठी प्रत्येक गावातील लोकसंख्या आणि सांडपाणी याचा विचार करून अधिक क्षमता असणारे सांडपाण्यावर प्रक्रिया केंद्र उभे करणे खूप महत्वाचे आहे. त्यामुळे औषधा मध्ये प्रतिरोधक क्षमता निर्माण होण्यास अडथळा होईल आणि पर्यावरनावर होणरे दुष्परिणाम कमी होण्यास मदत होईल. 
प्रा डॉ अजिंक्य अजित पत्रावळे     
रसायनशास्त्र विभाग
विवेकानंद कॉलेज कोल्हापूर

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Corona Series Part 39 : कोरोना, आणि लस निर्मिती मधील भारतीयांचा सहभाग

Corona Series Part 39       नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणू चा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. कोरोना , आणि लस निर्मिती मधील भारतीयांचा सहभाग जगात असा एक ही देश नसेल जिथे ज्ञानाचा भंडार असणारे भारतीय लोक त्या देशाच्या प्रगतिमध्ये सहभागी नाहीत. कोरोनाच्या लढ्यात तरी हे मागे कशी राहतील. सिरम इंडिया लिमिटेड पुणे स्थित जैव तंत्रज्ञानातील अग्रणी कंपनी आहे यां कंपनीचे वैशिष्ट्य म्हणजे या पूर्वी ही hepatitis, पोलीओ , स्वाइन फ्लू इत्यादि आजारामध्ये लस निर्माण करण्याचे महत्वाचे योगदान आहे. वर्षभरात १.५ अब्ज लसीचे डोस अतिशय माफक दरात तयार करण्याची क्षमता असणारी या कंपनीचे उत्पादन यूरोपियन देशात व संशोधन यूनिट पुणे सारख्या शहरात आहे. भारतामध्ये एक ही नोबेल परितोषिक किवा औषधाचा स्वामित्व हक्क नाही तरीही औषध , लस उत्पादन करण्यात प्रावीण्य , विश्वसनीय नावलौकिक मिळवणारा देश आहे. जावपास ८०% लस आफ्रिका सारख्या देशात पुरवेल जातात. कोरोनाची लस निर्माण करण्यासाठी न्यूयॉर्क मधील codagenic या...

Corona Series Part 56 : कोरोना, आणि ई-शिक्षण

Corona Series Part 56 नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. आजचा विषय विस्तृत मांडला आहे.   या विषया बाबतीत आपण आपले मत ब्लॉगवर जरूर कळवावे ही विनंती.     https://ajinkya1030.blogspot.com   कोरोना , आणि ई-शिक्षण मार्च महिन्यापासन कोरोनाचा प्रभाव दिसू लागला शेवटच्या आठवड्यापासून शाळा , कॉलेज लॉकडाउनच्या काळापासून आज पर्यन्त बंद करण्यात आल्या. भितीदायक वातावरणामध्ये १० , १२वी च्या परीक्षा घेण्यात आल्या. शैक्षणिक वर्ष २०१९-२० चे कार्य संपत आले होते परंतु लेखी आणि मौखिक परीक्षा राहिल्या होत्या . आणि आता यूजीसीच्या मार्गदर्शंनानुसार त्या राहूनच जातील. किंवा काही अंशी तात्पुरती योजना राबवून काही ना काही मार्ग काडला जाईल.   नैसर्गिक आपत्ती महापुर , वैश्विक महामारी मधून शैक्षणिक क्षेत्रा समोर नवीन आव्हान उभे राहिले आहे. खाजगी , काही सरकारी शाळा , कॉलेजने देखील तात्पुरती सोय करण्यासाठी ऑनलाइन तास झूम , गूगल क्लासरूम , गूगल डॉक , यू ट्यूब , व्हाट्स अप...

पुन्हा कधीही कोरोना सारख्या महामारीमुळे लेख लिहायची वेळ येऊ नये हीच ईश्वर चरणी प्रार्थना

नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे आज काय लिहावे आणि काय नको समजेनासे झाले आहे. तरी धाडस करून लिहित आहे. काही चुकले तर समजून घ्यावे ही विनंती.   मार्च महिन्यामध्ये जगात नवीन विषाणू ने धुमाकूळ घातला होता सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. शास्त्रज्ञ , संशोधक , मीडिया , नेते , उद्योजक , आणि सामान्य जनता सर्वच नागरिकांना पुढे काय वाहून ठेवले आहे याची कल्पना नव्हती. परिस्थितीचे आकलन होण्याचा आतच लॉकडाउन झाला तेव्हा सुट्टीचा आनंद घेऊया असे समजून काही नागरिक मस्त मजेत होते. हळू हळू परिस्थिती बदलून गंभीर झाली , पण नेमके काय चालू आहे काय करावे आणि काय करू नये याचा अंदाज लागेना. मीडिया मध्ये रोज के भीतीदायक बातमी येऊ लागली कधी विषाणू वर असलेले उपाया येऊ लागले पण शास्त्रीय माहिती सजत नसल्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण होऊ लागले . अश्या मध्ये रसायनशास्त्राचा विद्यार्थी म्हणून कोरोना विषाणूच्या विरोधात   काही काम करावे असे वाटत होते परंतु संशोधन करण्यासाठी काही मर्यादा होत्या याचे भान होते पण शांत बसून चालणार नाही हे लक्षात आले होते. म्हणून मनातून ठरवले आज या संकटकाळी समजासाठी आप...