Corona Series Part 46
नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा
प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती
करण्याचा प्रयत्न करत आहे. https://ajinkya1030.blogspot.com
कोरोना, आणि अतिनील
किरणे
सूर्या पासून पृथ्वीवर UV A ९५%, B ४.९%, C०.१% अशी 3 प्रकारची अतिनील प्रकाश किरण येतात. याचे वर्गीकरण नमूद केले
प्रमाणे.
UV A: ४०० – ३१५ ननोमिटर, सॉफ्ट यूव्ही, ओझोन ने शोषले न जाणारे
UV B: ३१५ – २८० ननोमिटर, मध्यम यूव्ही, ओझोन ने शोषले न जाणारे
UV C: २८० – १०० ननोमिटर, जंतुनाशक, हार्ड यूव्ही, ओझोन ने शोषले जाणारे
UV C नैसर्गिकरित्या जंतुनाशक आहेत म्हणून या पूर्वी २००२-मध्ये सार्स साठी याचा जंतूंनाशक
म्हणून वापर केला गेला आहे (Journal of virology Method, १२१/ ०१, ८५-९१). कोरोंना विषाणूला लॉकडाउन नंतर रोखणायसाठी अतिनील प्रकाश किरणाचा वापर चीन, ईसराईल सारखे देश करत आहे. या देशात बस, रेल्वे, विमान अश्या साधन संपत्तीचे निर्जंतुकीकरन UV-C या अतिनील किरणापासून केले जात आहे. याच धर्तीवर डीआरडीओची (LASTEC) Laser Science & Technology
Center आणि न्यू
एज कंपनी च्या सहकार्याने UV Blaster तयार
करण्यात आला आहे. या ब्लास्टरमुळे रुग्णालयात कोरोना बाधित रुग्णांसाठी वापरलेल्या
खोल्याचे निर्जंतुकीकरन करण्यात येणार आहे. यूव्ही ब्लास्टर १० मिनीटामध्ये १२ X १२ ची खोली निर्जंतुक करतो. लॉकडाउन नंतर
दळनवळनासाठी वापरण्यात येणार्या बस,
रेल्वेचे डबे, विमान ईत्यादि सर्वांचे निर्जंतुकीकरन
करणे एकदम सोपे होणार आहे. हा ब्लास्टर आपण एक सेलफोन किंवा लॅपटॉप च्या सहयाने
वापरता येणे शक्य असल्याने मानवाचा अतिनील किरणांशी प्रत्यक्ष सबंध येणार नाही ही
जमेची बाजू आहे.
यूव्ही ब्लास्टर मधून निघणारी किरणे मात्र मानवावर पडून
चालणार नाही किवा मानवाला निर्जंतुक करण्यासाठी वापरता येणार नाही कारण ही किरणे
मानवाचा डीएनएचे नुकसान करतो. तसेच माणवाला त्वचेचे आजार जसे त्वचेचा कर्क रोग, विविध त्वचा रोग होण्यास करणीभूत आहेत. डब्ल्यूएचओ
ने देखील अतिनील किरणे निर्जंतुक म्हणून वापरताना काही महत्वाच्या सूचना दिल्या
आहेत त्या नुसार कोणत्याही परिस्थिति मध्ये मानवावर वारण्यात मनाई केली आहे या
सूचनेचा विचार करून डीआरडीओने यूव्ही ब्लास्टरमध्ये सेन्सर बसवले आहे. हे यंत्र
चालू असताना कोणी व्यक्ति संपर्कात आला की या ब्लास्टरचे काम थांबते. या
ब्लास्टरमुळे राष्ट्रीय संपत्तीचे निर्जंतुकीकरण करणे एकदम माफक दरात आणि सहज शक्य
होईल.
प्रा डॉ अजिंक्य अजित पत्रावळे
रसायनशास्त्र विभाग
विवेकानंद
कॉलेज कोल्हापूर
https://ajinkya1030.blogspot.com
Nice information Sir ...
ReplyDeleteNice information sir 👍👍 thanks sir 👍
ReplyDelete