Skip to main content

Corona Series Part 46 : कोरोना, आणि अतिनील किरणे

Corona Series Part 46
नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. https://ajinkya1030.blogspot.com

कोरोना, आणि अतिनील किरणे
सूर्या पासून पृथ्वीवर UV A ९५%, B ४.९%, C०.१% अशी 3 प्रकारची अतिनील प्रकाश किरण येतात. याचे वर्गीकरण नमूद केले प्रमाणे.
UV A: ४०० – ३१५ ननोमिटर, सॉफ्ट यूव्ही, ओझोन ने शोषले न जाणारे
UV B: ३१५ – २८० ननोमिटर, मध्यम यूव्ही, ओझोन ने शोषले न जाणारे
UV C: २८० – १०० ननोमिटर, जंतुनाशक, हार्ड यूव्ही, ओझोन ने शोषले जाणारे
UV C नैसर्गिकरित्या जंतुनाशक आहेत म्हणून या पूर्वी २००२-मध्ये सार्स साठी याचा जंतूंनाशक म्हणून वापर केला गेला आहे (Journal of virology Method, १२१/ ०१, ८५-९१). कोरोंना विषाणूला लॉकडाउन नंतर रोखणायसाठी अतिनील प्रकाश किरणाचा वापर चीन, ईसराईल सारखे देश करत आहे. या देशात बस, रेल्वे, विमान अश्या साधन संपत्तीचे निर्जंतुकीकरन UV-C या अतिनील किरणापासून केले जात आहे. याच धर्तीवर डीआरडीओची (LASTEC) Laser Science & Technology Center आणि न्यू एज कंपनी च्या सहकार्याने UV Blaster तयार करण्यात आला आहे. या ब्लास्टरमुळे रुग्णालयात कोरोना बाधित रुग्णांसाठी वापरलेल्या खोल्याचे निर्जंतुकीकरन करण्यात येणार आहे. यूव्ही ब्लास्टर १० मिनीटामध्ये १२ X १२ ची खोली निर्जंतुक करतो. लॉकडाउन नंतर दळनवळनासाठी वापरण्यात येणार्‍या बस, रेल्वेचे डबे, विमान ईत्यादि सर्वांचे निर्जंतुकीकरन करणे एकदम सोपे होणार आहे. हा ब्लास्टर आपण एक सेलफोन किंवा लॅपटॉप च्या सहयाने वापरता येणे शक्य असल्याने मानवाचा अतिनील किरणांशी प्रत्यक्ष सबंध येणार नाही ही जमेची बाजू आहे.
यूव्ही ब्लास्टर मधून निघणारी किरणे मात्र मानवावर पडून चालणार नाही किवा मानवाला निर्जंतुक करण्यासाठी वापरता येणार नाही कारण ही किरणे मानवाचा डीएनएचे नुकसान करतो. तसेच माणवाला त्वचेचे आजार जसे त्वचेचा कर्क रोग, विविध त्वचा रोग होण्यास करणीभूत आहेत. डब्ल्यूएचओ ने देखील अतिनील किरणे निर्जंतुक म्हणून वापरताना काही महत्वाच्या सूचना दिल्या आहेत त्या नुसार कोणत्याही परिस्थिति मध्ये मानवावर वारण्यात मनाई केली आहे या सूचनेचा विचार करून डीआरडीओने यूव्ही ब्लास्टरमध्ये सेन्सर बसवले आहे. हे यंत्र चालू असताना कोणी व्यक्ति संपर्कात आला की या ब्लास्टरचे काम थांबते. या ब्लास्टरमुळे राष्ट्रीय संपत्तीचे निर्जंतुकीकरण करणे एकदम माफक दरात आणि सहज शक्य होईल.

प्रा डॉ अजिंक्य अजित पत्रावळे     
रसायनशास्त्र विभाग
विवेकानंद कॉलेज कोल्हापूर
https://ajinkya1030.blogspot.com

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Corona Series Part 39 : कोरोना, आणि लस निर्मिती मधील भारतीयांचा सहभाग

Corona Series Part 39       नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणू चा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. कोरोना , आणि लस निर्मिती मधील भारतीयांचा सहभाग जगात असा एक ही देश नसेल जिथे ज्ञानाचा भंडार असणारे भारतीय लोक त्या देशाच्या प्रगतिमध्ये सहभागी नाहीत. कोरोनाच्या लढ्यात तरी हे मागे कशी राहतील. सिरम इंडिया लिमिटेड पुणे स्थित जैव तंत्रज्ञानातील अग्रणी कंपनी आहे यां कंपनीचे वैशिष्ट्य म्हणजे या पूर्वी ही hepatitis, पोलीओ , स्वाइन फ्लू इत्यादि आजारामध्ये लस निर्माण करण्याचे महत्वाचे योगदान आहे. वर्षभरात १.५ अब्ज लसीचे डोस अतिशय माफक दरात तयार करण्याची क्षमता असणारी या कंपनीचे उत्पादन यूरोपियन देशात व संशोधन यूनिट पुणे सारख्या शहरात आहे. भारतामध्ये एक ही नोबेल परितोषिक किवा औषधाचा स्वामित्व हक्क नाही तरीही औषध , लस उत्पादन करण्यात प्रावीण्य , विश्वसनीय नावलौकिक मिळवणारा देश आहे. जावपास ८०% लस आफ्रिका सारख्या देशात पुरवेल जातात. कोरोनाची लस निर्माण करण्यासाठी न्यूयॉर्क मधील codagenic या...

पुन्हा कधीही कोरोना सारख्या महामारीमुळे लेख लिहायची वेळ येऊ नये हीच ईश्वर चरणी प्रार्थना

नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे आज काय लिहावे आणि काय नको समजेनासे झाले आहे. तरी धाडस करून लिहित आहे. काही चुकले तर समजून घ्यावे ही विनंती.   मार्च महिन्यामध्ये जगात नवीन विषाणू ने धुमाकूळ घातला होता सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. शास्त्रज्ञ , संशोधक , मीडिया , नेते , उद्योजक , आणि सामान्य जनता सर्वच नागरिकांना पुढे काय वाहून ठेवले आहे याची कल्पना नव्हती. परिस्थितीचे आकलन होण्याचा आतच लॉकडाउन झाला तेव्हा सुट्टीचा आनंद घेऊया असे समजून काही नागरिक मस्त मजेत होते. हळू हळू परिस्थिती बदलून गंभीर झाली , पण नेमके काय चालू आहे काय करावे आणि काय करू नये याचा अंदाज लागेना. मीडिया मध्ये रोज के भीतीदायक बातमी येऊ लागली कधी विषाणू वर असलेले उपाया येऊ लागले पण शास्त्रीय माहिती सजत नसल्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण होऊ लागले . अश्या मध्ये रसायनशास्त्राचा विद्यार्थी म्हणून कोरोना विषाणूच्या विरोधात   काही काम करावे असे वाटत होते परंतु संशोधन करण्यासाठी काही मर्यादा होत्या याचे भान होते पण शांत बसून चालणार नाही हे लक्षात आले होते. म्हणून मनातून ठरवले आज या संकटकाळी समजासाठी आप...

Corona Series Part 38 : कोरोना, आणि चीनी वैद्यकीय उपकरणे

Corona Series Part 38       नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणू चा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. कोरोना , आणि चीनी वैद्यकीय उपकरणे एखाद्या व्यक्तिच्या मजबूरीचा स्वतच्या फायद्यासाठी कसा उपयोग करून घेता येईल याचे सर्वोत्तम प्रशिक्षण चीनमध्ये मिळते. चीन म्हणजे धोखेबाजी , अविश्वास् याचा अनुभव सर्वांनी घेतला आहे तरी देखिल मजबूरी म्हणून काही व्यवहारीक जुगार चीनशी करावे लागत आहेत. त्यातील एक म्हणजे वैद्यकीय उपकरण खरेदी. नोहेंबर ते फेब्रुवारी च्या दरम्यान चीन मध्ये कोरोना चे संक्रमण जोरावर असल्याने चीन मधील काही प्रांत बंद होते , या विषाणूच्या बाबतीतील माहीत सुरवातीपासूंनच लपवण्यात आल्यामुळे चीन व्यतिरिक्त ईतर जग सुरळीत चालू होते , आणि एकदा हा विषाणू चीन मधून सार्‍या जगात पसरला तेव्हा ईतर देशांची या विषाणू च्या विरोधात लडण्याची तयारी नसल्याने विषाणूचे संक्रमण जलत गतीने पसरू लागले. तेव्हा वैद्यकीय उपकरणे जसे मास्क , तपासणी किट , संरक्षक किट , वेंटीलेटर , ईत्यादी उपकरणाची मागणी आणि ...