Corona Series Part 44
नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणू
चा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती
करण्याचा प्रयत्न करत आहे. https://ajinkya1030.blogspot.com
कोरोना, आणि मृत्यूदर
संशोधन आणि आकडेवारी याचा आधार घेत विविध माध्यम, प्रिंट मीडिया मध्ये वेगवेगळी आकडेवारी समोर येत आहे, परंतु थोड्याफार प्रमाणात यात संभ्रम निर्माण होत आहे.
एक देशात मृत्यूदर जास्त तर शेजारील देशात कमी अश्या गोष्टीमुळे सामान्य जनतेमध्ये
एक भयगंड निर्माण होत आहे. त्याकरिता आज आपण शास्त्रीय दृष्ट्या मृत्यूदर कसा काडला
जातो हे पाहूया आणि त्याचे प्रकार ईत्यादी माहिती घेऊ.
मृत्यूदराची
आकडेवारी काडत असताना वेगवेगळे सूत्र वापरले जाते 1) Case Fatality Rate (CFR), Mortality Rate आणि 2) Infection Fatality Rate (IFR) असे
दोन प्रकार आहेत त्यातील IFR आपणास
योग्य महती देतो परंतु हा दर साथ संपल्यानंनतर काडला जातो. जो काही मृत्यूदराचे आकडे समोर येत आहेत ते
सर्व CFRचे आकडे आहेत.
प्रथम
आपण CFR पाहूया. बर्याच वेळा CFR, IFR आणि Mortality Rate
या मधला फरक लक्षात घेऊया.
Case
Fatality Rate (CFR)
= झालेले मृत्यू / किती लोकांमध्ये संसर्गाची नोंद आहे X १०० या सूत्राचा वापर करून CFR ची
नोंद केली जाते.
Mortality
Rate = झालेले मृत्यू /
प्रती 1लाख लोकांमध्ये संसर्गाची नोंद आहे X १०० या सूत्राचा वापर करून MR ची नोंद केली
जाते.
Infection
Fatality Rate (IFR) = झालेले मृत्यू / संसर्गाचीची लक्षणे असणारी +
संसर्ग आहे परंतु लक्षणे नाही. औषध उपचार किवा रुगाणल्यात देखील नोंद नाही असे
सर्व X १०० या सूत्राचा वापर करून IFR ची
नोंद केली जाते.
एक
उदाहरणा मधून समजून घेऊ एक ईमारती मध्ये १०० लोक रहातात त्यातील संसर्ग झालेले
रुग्णालयात दाखल झालेले रुग्ण १० आहेत आणि १ व्यक्तिचा मृत्यू झाला आहे. CFR (मृत्यूदर) होईल १०%
Case
Fatality Rate (CFR)
=
X १०० =१०.००%
आता
समझा त्याच ईमारती मध्ये १०० लोकांमध्ये सर्वच १०० लोकांना संसर्ग झाला आहे, परंतु त्यातील काही लोक स्वतची रोगरातीकर शक्ति
चांगली असल्याने,
हलकेसे लक्षणं, आर्थिक अडचणीमुळे अश्या काही कारणास्त्व रुग्णालयात
दाखल झाले नाहीत त्यामुळे त्यांची नोंद CFR मध्ये घेतली जात नाही. ईथेही १ व्यक्तिचा मृत्यू झाला आहे, आता IFR
(मृत्यूदर) होईल
Infection
Fatality Rate (IFR) =
X १०० =१%
वरील दोन्ही उदाहरण पाहता मृत्यूदर कसा बदलत जातो लक्षात आले असेल. त्यामुळे विविध देशामध्ये देखील
मृत्यूदराचे आकडे वेगवेगळे आहेत.
आता
आपण देशाना २ वर्गामद्धे विभागू १] असे देश ज्या देशात मोठ्या प्रामानात
तापासणी झाली नाही, ज्या लोकानमध्ये लक्षणे आहेत त्यांचीच तपासनी केली गेली आहे उदा ईटली (७.२%), नेदरलँड (९.४%), यूके (५.९%) ई. अश्या देशात आपणास मृत्यूदर जास्त असल्याचा आढळून
येईल.
२
असे देश ज्या देशात मोठ्या प्रामानात तापासणी झाली आहे, ज्या लोकानमध्ये लक्षणे नाहीत अश्याची देखील तपासनी
केली गेली आहे उदा जर्मनी (०.३%), यूएस (१.५%) दक्षिण कोरिया, सिंगापूर ई. अश्या देशात आपणास मृत्यूदर कमी असल्याचा आढळून येईल.
विविध
देशामध्ये मृत्यूदर मोजण्याचे प्रमाण वेग वेगळे आहे. ईटली मध्ये एखादा रुग्ण
कोरोना बाधित आहे परंतु मृत्यू मात्र हृदयविकारमुळे झाला तरी तो मृत्यू कोरोनामुळे
झालेल्या मृत्यू मध्ये नोंदवला जातो. या उलट अमेरिकेत मात्र मृत्यू कशामुळे झाला
आहे हे ठरवण्याची मुभा त्या डॉक्टराना दिली गेली आहे. जरी तो रुग्ण कोरोना बाधित म्हणून रुग्णालयात आला
असेल काही दिवसानी त्याचा मृत्यू झाला तरी हा मृत्यू कोरोंनामुळे झालेल्या
मृत्यूदरात नोंदवला जात नाही. जो पर्यन्त वैश्विक महामारी चालू आहे तोपर्यंत CFR नोंदवला जाता आहे परंतु साथीच्या रोगावर अभ्यास
करणारे तज्ञाण्याचा अभ्यासानुसार IFR चे
आकडे योग्य मृत्यूदाराची नोंद देऊ शकताता. उदा. २००९ साली आलेल्या स्वाइन फ्लूचे
उदाहरण पाहू जेव्हा स्वाइन फ्लूचा फैलाव चालू होता तेव्हा विविध देशात मृत्यूदर CFR ०. १% ते ५.१% पर्यन्त गेला होता परंतु सपूर्ण साथ
संपल्यावर सर्व रुग्णाची मोजणी करून झाल्यावर हाच मृत्यूदर ०.२% ईतका नोंदवला
गेला. आज देखील कोरोनाच्या संदर्भात जरी मृत्यूदराचे आकडे वाढले असतील तरी पुढे
मात्र मृत्यूदराचे प्रमाण कमी झालेले दिसेल.
विविध
ठिकाणाहून वाचलेलेल, माध्यमा मधून पाहिलेले मोठे आकडे
पाहून घाबरून जाऊ नका कदाचित हे आकडे योग्य असतीलच असे नाही. नकारात्मक बातम्या
पाहू / वाचू नका सकारात्मक रहा कोरोनाशी दोन हात करण्यासाठी आपल्याला बळ येईल.
प्रा डॉ अजिंक्य अजित पत्रावळे
रसायनशास्त्र
विभाग
विवेकानंद
कॉलेज कोल्हापूर
Very significant scientific information
ReplyDeleteNice sir👍👍
ReplyDeleteThanks sir 👍 for this information 👍 nice 👍👍
ReplyDelete