Skip to main content

Corona Series Part 44 : कोरोना, आणि मृत्यूदर


Corona Series Part 44
नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणू चा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. https://ajinkya1030.blogspot.com

कोरोना, आणि मृत्यूदर
      संशोधन आणि आकडेवारी याचा आधार घेत विविध माध्यम, प्रिंट मीडिया मध्ये वेगवेगळी आकडेवारी समोर येत आहे, परंतु थोड्याफार प्रमाणात यात संभ्रम निर्माण होत आहे. एक देशात मृत्यूदर जास्त तर शेजारील देशात कमी अश्या गोष्टीमुळे सामान्य जनतेमध्ये एक भयगंड निर्माण होत आहे. त्याकरिता आज आपण शास्त्रीय दृष्ट्या मृत्यूदर कसा काडला जातो हे पाहूया आणि त्याचे प्रकार ईत्यादी माहिती घेऊ.
मृत्यूदराची आकडेवारी काडत असताना वेगवेगळे सूत्र वापरले जाते 1) Case Fatality Rate (CFR), Mortality Rate आणि 2) Infection Fatality Rate (IFR) असे दोन प्रकार आहेत त्यातील IFR आपणास योग्य महती देतो परंतु हा दर साथ संपल्यानंनतर काडला जातो.  जो काही मृत्यूदराचे आकडे समोर येत आहेत ते सर्व CFRचे आकडे आहेत.
प्रथम आपण CFR पाहूया. बर्‍याच वेळा CFR, IFR आणि Mortality Rate या मधला फरक लक्षात घेऊया.
Case Fatality Rate (CFR) = झालेले मृत्यू / किती लोकांमध्ये संसर्गाची नोंद आहे X १०० या सूत्राचा वापर करून CFR ची नोंद केली जाते.
Mortality Rate = झालेले मृत्यू / प्रती 1लाख लोकांमध्ये संसर्गाची नोंद आहे X १०० या सूत्राचा वापर करून MR ची नोंद केली जाते.
Infection Fatality Rate (IFR) = झालेले मृत्यू / संसर्गाचीची लक्षणे असणारी + संसर्ग आहे परंतु लक्षणे नाही. औषध उपचार किवा रुगाणल्यात देखील नोंद नाही असे सर्व  X १०० या सूत्राचा वापर करून IFR ची नोंद केली जाते.
एक उदाहरणा मधून समजून घेऊ एक ईमारती मध्ये १०० लोक रहातात त्यातील संसर्ग झालेले रुग्णालयात दाखल झालेले रुग्ण १० आहेत आणि १ व्यक्तिचा मृत्यू झाला आहे. CFR (मृत्यूदर) होईल १०%
Case Fatality Rate (CFR) =  X १०० =१०.००%
आता समझा त्याच ईमारती मध्ये १०० लोकांमध्ये सर्वच १०० लोकांना संसर्ग झाला आहे, परंतु त्यातील काही लोक स्वतची रोगरातीकर शक्ति चांगली असल्याने, हलकेसे लक्षणं, आर्थिक अडचणीमुळे अश्या काही कारणास्त्व रुग्णालयात दाखल झाले नाहीत त्यामुळे त्यांची नोंद CFR मध्ये घेतली जात नाही. ईथेही १ व्यक्तिचा मृत्यू झाला आहे, आता IFR (मृत्यूदर) होईल
Infection Fatality Rate (IFR) =   X १०० =१%
वरील दोन्ही उदाहरण पाहता मृत्यूदर कसा बदलत जातो लक्षात आले असेल. त्यामुळे विविध देशामध्ये देखील मृत्यूदराचे आकडे वेगवेगळे आहेत.
आता आपण देशाना २ वर्गामद्धे विभागू १] असे देश ज्या देशात मोठ्या प्रामानात तापासणी झाली नाही, ज्या लोकानमध्ये लक्षणे आहेत त्यांचीच तपासनी केली गेली आहे उदा ईटली (७.२%), नेदरलँड (९.४%), यूके (५.९%) ई. अश्या देशात आपणास मृत्यूदर जास्त असल्याचा आढळून येईल.
२ असे देश ज्या देशात मोठ्या प्रामानात तापासणी झाली आहे, ज्या लोकानमध्ये लक्षणे नाहीत अश्याची देखील तपासनी केली गेली आहे उदा  जर्मनी (०.३%), यूएस (१.५%) दक्षिण कोरिया, सिंगापूर ई. अश्या देशात आपणास मृत्यूदर कमी असल्याचा आढळून येईल.
विविध देशामध्ये मृत्यूदर मोजण्याचे प्रमाण वेग वेगळे आहे. ईटली मध्ये एखादा रुग्ण कोरोना बाधित आहे परंतु मृत्यू मात्र हृदयविकारमुळे झाला तरी तो मृत्यू कोरोनामुळे झालेल्या मृत्यू मध्ये नोंदवला जातो. या उलट अमेरिकेत मात्र मृत्यू कशामुळे झाला आहे हे ठरवण्याची मुभा त्या डॉक्टराना दिली गेली आहे.  जरी तो रुग्ण कोरोना बाधित म्हणून रुग्णालयात आला असेल काही दिवसानी त्याचा मृत्यू झाला तरी हा मृत्यू कोरोंनामुळे झालेल्या मृत्यूदरात नोंदवला जात नाही. जो पर्यन्त वैश्विक महामारी चालू आहे तोपर्यंत CFR नोंदवला जाता आहे परंतु साथीच्या रोगावर अभ्यास करणारे तज्ञाण्याचा अभ्यासानुसार IFR चे आकडे योग्य मृत्यूदाराची नोंद देऊ शकताता. उदा. २००९ साली आलेल्या स्वाइन फ्लूचे उदाहरण पाहू जेव्हा स्वाइन फ्लूचा फैलाव चालू होता तेव्हा विविध देशात मृत्यूदर CFR ०. १% ते ५.१% पर्यन्त गेला होता परंतु सपूर्ण साथ संपल्यावर सर्व रुग्णाची मोजणी करून झाल्यावर हाच मृत्यूदर ०.२% ईतका नोंदवला गेला. आज देखील कोरोनाच्या संदर्भात जरी मृत्यूदराचे आकडे वाढले असतील तरी पुढे मात्र मृत्यूदराचे प्रमाण कमी झालेले दिसेल. 
विविध ठिकाणाहून वाचलेलेल, माध्यमा मधून पाहिलेले मोठे आकडे पाहून घाबरून जाऊ नका कदाचित हे आकडे योग्य असतीलच असे नाही. नकारात्मक बातम्या पाहू / वाचू नका सकारात्मक रहा कोरोनाशी दोन हात करण्यासाठी आपल्याला बळ येईल.

प्रा डॉ अजिंक्य अजित पत्रावळे     
रसायनशास्त्र विभाग
विवेकानंद कॉलेज कोल्हापूर

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Corona Series Part 39 : कोरोना, आणि लस निर्मिती मधील भारतीयांचा सहभाग

Corona Series Part 39       नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणू चा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. कोरोना , आणि लस निर्मिती मधील भारतीयांचा सहभाग जगात असा एक ही देश नसेल जिथे ज्ञानाचा भंडार असणारे भारतीय लोक त्या देशाच्या प्रगतिमध्ये सहभागी नाहीत. कोरोनाच्या लढ्यात तरी हे मागे कशी राहतील. सिरम इंडिया लिमिटेड पुणे स्थित जैव तंत्रज्ञानातील अग्रणी कंपनी आहे यां कंपनीचे वैशिष्ट्य म्हणजे या पूर्वी ही hepatitis, पोलीओ , स्वाइन फ्लू इत्यादि आजारामध्ये लस निर्माण करण्याचे महत्वाचे योगदान आहे. वर्षभरात १.५ अब्ज लसीचे डोस अतिशय माफक दरात तयार करण्याची क्षमता असणारी या कंपनीचे उत्पादन यूरोपियन देशात व संशोधन यूनिट पुणे सारख्या शहरात आहे. भारतामध्ये एक ही नोबेल परितोषिक किवा औषधाचा स्वामित्व हक्क नाही तरीही औषध , लस उत्पादन करण्यात प्रावीण्य , विश्वसनीय नावलौकिक मिळवणारा देश आहे. जावपास ८०% लस आफ्रिका सारख्या देशात पुरवेल जातात. कोरोनाची लस निर्माण करण्यासाठी न्यूयॉर्क मधील codagenic या...

Corona Series Part 56 : कोरोना, आणि ई-शिक्षण

Corona Series Part 56 नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. आजचा विषय विस्तृत मांडला आहे.   या विषया बाबतीत आपण आपले मत ब्लॉगवर जरूर कळवावे ही विनंती.     https://ajinkya1030.blogspot.com   कोरोना , आणि ई-शिक्षण मार्च महिन्यापासन कोरोनाचा प्रभाव दिसू लागला शेवटच्या आठवड्यापासून शाळा , कॉलेज लॉकडाउनच्या काळापासून आज पर्यन्त बंद करण्यात आल्या. भितीदायक वातावरणामध्ये १० , १२वी च्या परीक्षा घेण्यात आल्या. शैक्षणिक वर्ष २०१९-२० चे कार्य संपत आले होते परंतु लेखी आणि मौखिक परीक्षा राहिल्या होत्या . आणि आता यूजीसीच्या मार्गदर्शंनानुसार त्या राहूनच जातील. किंवा काही अंशी तात्पुरती योजना राबवून काही ना काही मार्ग काडला जाईल.   नैसर्गिक आपत्ती महापुर , वैश्विक महामारी मधून शैक्षणिक क्षेत्रा समोर नवीन आव्हान उभे राहिले आहे. खाजगी , काही सरकारी शाळा , कॉलेजने देखील तात्पुरती सोय करण्यासाठी ऑनलाइन तास झूम , गूगल क्लासरूम , गूगल डॉक , यू ट्यूब , व्हाट्स अप...

पुन्हा कधीही कोरोना सारख्या महामारीमुळे लेख लिहायची वेळ येऊ नये हीच ईश्वर चरणी प्रार्थना

नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे आज काय लिहावे आणि काय नको समजेनासे झाले आहे. तरी धाडस करून लिहित आहे. काही चुकले तर समजून घ्यावे ही विनंती.   मार्च महिन्यामध्ये जगात नवीन विषाणू ने धुमाकूळ घातला होता सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. शास्त्रज्ञ , संशोधक , मीडिया , नेते , उद्योजक , आणि सामान्य जनता सर्वच नागरिकांना पुढे काय वाहून ठेवले आहे याची कल्पना नव्हती. परिस्थितीचे आकलन होण्याचा आतच लॉकडाउन झाला तेव्हा सुट्टीचा आनंद घेऊया असे समजून काही नागरिक मस्त मजेत होते. हळू हळू परिस्थिती बदलून गंभीर झाली , पण नेमके काय चालू आहे काय करावे आणि काय करू नये याचा अंदाज लागेना. मीडिया मध्ये रोज के भीतीदायक बातमी येऊ लागली कधी विषाणू वर असलेले उपाया येऊ लागले पण शास्त्रीय माहिती सजत नसल्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण होऊ लागले . अश्या मध्ये रसायनशास्त्राचा विद्यार्थी म्हणून कोरोना विषाणूच्या विरोधात   काही काम करावे असे वाटत होते परंतु संशोधन करण्यासाठी काही मर्यादा होत्या याचे भान होते पण शांत बसून चालणार नाही हे लक्षात आले होते. म्हणून मनातून ठरवले आज या संकटकाळी समजासाठी आप...