Corona Series Part 43
नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा
प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती
करण्याचा प्रयत्न करत आहे. ईतर देशाचा अभ्यास करून आपल्या देशात लॉकडाउन मधून बाहेर
येण्यासाठी आपल्या मते काय उपाय करता येईल?. कुपया https://ajinkya1030.blogspot.com या ब्लॉग वर आपले विचार मांडा.
कोरोना, आणि स्पेनचे लॉकडाउन मधून बाहेर पडण्याचे धोरण
5
महीने कोरोनाचा धुमाकूळ चालू आहे काही देशात थोडीफार परिस्थिति सुधारु लागली आहे.
परंतु पूर्णत: नायनाट करणे शक्य नाही तसेच लॉक
डाउन देखील तात्पुरती रचणा होती दीर्घकाळ लॉक डाउन मध्ये रहाणे नागरिकांच्या
सामाजिक, मानसिक, आर्थिक, वैद्यकीय दृष्ट्या योग्या नाही एकदम
सारे लॉकडाउन मध्ये जाणे हे जसे महत्वाचे होते तसे टप्याने बाहेर पडणे देखील
महत्वाचे आहे. असे झाले नाही तर कोरोनाची दुसरी अधिक ताकतीची लाट येऊ शकते.
लॉक
डाउन करताना भारत स्पेन, इटली, चीन या देशांकडून बरेच काही शिकला आहे म्हणून कोरोना
संक्रमण मर्यादित राखण्यास यश मिळत आहे,
आणि म्हणून या देशाच्या लॉकडाउन मधून बाहेर पडण्याच्या धोरणाचा अभ्यास करून भारतात
कशी रणनीती आखता येईल याचा विचार सूरु झाला आहे. आज आपण स्पेननी आखलेले धोरण
पाहूया.
लोकसंखेच्या
मानाने युरोपिन देशात कोरोना संक्रमनाचे प्रमान अधिक आहे. स्पेन मध्ये १ मार्च
रोजी फक्त ८५ रुग्ण होते परंतु १ एप्रिल पर्यन्त १,०४,११८ रुग्ण आढळून आले. १४ मार्च पासून ५० पेक्षा आधिक दिवस स्पेन लॉकडाउनमध्ये आहे. ४
मे पासून लॉकडाउन मधून बाहेर येताना ४ टप्यात वर्गीकरन केले आहे. या ४ टप्यात Social Distansingच्या नियमाचे काटेकोर पालन
करण्याचे आव्हान केले आहे.
टप्पा
0 : २६ एप्रिल ते ११ मे. या मध्ये फक्त १ तास लहान मुले
आपले आई किवा वडील या पैकी एका बरोबर आपल्या भागात खेळण्यास बाहेर पडू शकततात. गर्दी
झाली तर पुढे १ तास ही बाहेर जाता येणार नाही. घरातील केवळ १ व्यक्ति एका वेळी
कसरत करण्यासाठी मॉर्निंग वॉक साठी बाहेर पडू शकतो. उपहार गृहामधून फक्त पार्सल
सुविधा उपलब्ध होणार आहे. उद्योग किंवा
सेवा काही वेळे पुरत्या चालू होतील जिथे पूर्व नियोजित भेट घेता येऊ शकेल. त्या
भेटी मध्ये २ किवा ३ व्यक्ति पेक्षा आधिक लोक असतं कामा नये. जसे की पार्लर, सलून ईत्यादी. सरकारी कार्यालयात देखील नागरिकांच्या
कामाची प्राथमिकता ठरवून पूर्व नियोजित वेळ दिला जाईल त्या वेळीच कामकाज होणार
आहे. खेळाडू किवा आणि ईतर कोणतेही प्रशिक्षण देखील एक वेळस एकट्याचे होईल.
प्रत्येक व्यक्तिला वेळ ठरवून दिला जाईल.
प्राथमिक
टप्पा १: ११ मे ते २४ मे. मोठे मॉल, उद्योग चेंबर सोडून छोटे उद्योग
चालू करण्यास मंजूरी दिली जाईल. ईमारतीच्या छतावरील खुली बार, रेस्टोरंट याना मान्यता देताना एकूण संखेच्या फक्त
१/३ लोक असतील अशी अट घातली आहे. हॉटेल्स चालू राहतील परंतु हॉटेल मधील सार्वजनिक क्षेत्र मात्र बंद राहील जसे
की game, स्वीमिंग टॅंक ई. सर्वत्र
मर्यादेचा १/३ जनसंखेची अट असेलच.
मध्यावधी टप्पा २: २५ मे ते ०८ जून.
आधी पेक्षा थोडी जास्त व्यावसायिक कृती अमलात आणली जाईल. सिनेमा, नाट्यगृह, संग्रहालाय,
उद्याने, प्रदर्शन क्षमतेच्या १/३ ची अट
लक्षात घेऊन खुली केली जातील. घरगुती संस्कृतिक कार्यक्रमासाठी ५० लोकांची मर्यादा असेल तर बाहेर हॉलमधील
कार्यक्रमासाठी ४०० लोकांची बैठक व्यवस्थे सहित मर्यादा असणार आहे. हॉटेल, बार मध्ये फक्त टेबलवर १ ते २ व्यक्तिना सेवा देण्यात
येईल आणि सर्वत्र मर्यादेचा ५०% जनसंखेची अट असेल. प्ले ग्रुप चालू करता
येतील त्यात ही ज्यांचे आई वडील घरी असणार आहेत त्यनि ऑनलाइन शिक्षण व ज्यांचे आई
वडील घरी राहू शकत नाही अश्याच लहान मुलांना प्ले ग्रुप ला सोडता येणार आहे.
शेवटचा टप्पा २: नागरिकांना ईतरत्र जाण्यास मुभा असेल. सारी दुकाने, ऑफिस, शाळा ५०% उपस्थितीच्या अटी मध्ये उघडली जातील. समुद्र किनारे देखील मनुष्याचा वावर मर्यादित असेल.
रस्त्यावरील सार्वजनिक वाहतूक सुरू केली जाईल. सर्वच व्यवहार सुरू केले असले तरी
हे नवीन सामाजिक आयुष्य असणार आहे ठरावीक काळासाठी बंधने ही असणारच आहेत, सरकार स्थानिक प्रशासन ज्या सूचना देईल त्याचे पालन
करणे करणे बंधन कारक राहणार आहे. हा शेवटचा टप्पा किती दिवस असेल हे सांगता येणार
नाही. कोरोनाच्या आधी जसे स्पेन होते तसे होण्यास दीर्घकाळ जावा लागणार आहे.
भारतता मध्ये ४ मे पासून १७ मे पर्यन्त लॉक डाउन ३ असेल. स्पेन, इटली,
व ईतर
देशांच्या लॉक डाउन मधून बाहेर पडण्याचे ट्टपे अभ्यासून आपल्या सामाजिक व आर्थिक
संस्कृतीला अनुसरून कश्या प्रकारे बाहेर पडावे याचा विचार केला पाहिजे.
प्रा डॉ अजिंक्य अजित पत्रावळे
रसायनशास्त्र
विभाग
विवेकानंद
कॉलेज कोल्हापूर
Nice sir
ReplyDeleteNice information
Deletenice information sir 👍..Thanks sir 👍 for this information...
ReplyDeleteNice sir👍👍
ReplyDelete