Skip to main content

Corona Series Part 43 : कोरोना, आणि स्पेनचे लॉकडाउन मधून बाहेर पडण्याचे धोरण


Corona Series Part 43
नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. ईतर देशाचा अभ्यास करून आपल्या देशात लॉकडाउन मधून बाहेर येण्यासाठी आपल्या मते काय उपाय करता येईल?. कुपया https://ajinkya1030.blogspot.com या ब्लॉग वर आपले विचार मांडा.

कोरोना, आणि स्पेनचे लॉकडाउन मधून बाहेर पडण्याचे धोरण
5 महीने कोरोनाचा धुमाकूळ चालू आहे काही देशात थोडीफार परिस्थिति सुधारु लागली आहे. परंतु पूर्णत: नायनाट करणे शक्य नाही तसेच लॉक डाउन देखील तात्पुरती रचणा होती दीर्घकाळ लॉक डाउन मध्ये रहाणे नागरिकांच्या सामाजिक, मानसिक, आर्थिक, वैद्यकीय दृष्ट्या योग्या नाही एकदम सारे लॉकडाउन मध्ये जाणे हे जसे महत्वाचे होते तसे टप्याने बाहेर पडणे देखील महत्वाचे आहे. असे झाले नाही तर कोरोनाची दुसरी अधिक ताकतीची लाट येऊ शकते.
लॉक डाउन करताना भारत स्पेन, इटली, चीन या देशांकडून बरेच काही शिकला आहे म्हणून कोरोना संक्रमण मर्यादित राखण्यास यश मिळत आहे, आणि म्हणून या देशाच्या लॉकडाउन मधून बाहेर पडण्याच्या धोरणाचा अभ्यास करून भारतात कशी रणनीती आखता येईल याचा विचार सूरु झाला आहे. आज आपण स्पेननी आखलेले धोरण पाहूया.
लोकसंखेच्या मानाने युरोपिन देशात कोरोना संक्रमनाचे प्रमान अधिक आहे. स्पेन मध्ये १ मार्च रोजी फक्त ८५ रुग्ण होते परंतु १ एप्रिल पर्यन्त १,०४,११८ रुग्ण आढळून आले. १४ मार्च पासून  ५० पेक्षा आधिक दिवस स्पेन लॉकडाउनमध्ये आहे. ४ मे पासून लॉकडाउन मधून बाहेर येताना ४ टप्यात वर्गीकरन केले आहे. या ४ टप्यात Social Distansingच्या नियमाचे काटेकोर पालन करण्याचे आव्हान केले आहे. 
टप्पा 0 : २६ एप्रिल ते ११ मे. या मध्ये फक्त १ तास लहान मुले आपले आई किवा वडील या पैकी एका बरोबर आपल्या भागात खेळण्यास बाहेर पडू शकततात. गर्दी झाली तर पुढे १ तास ही बाहेर जाता येणार नाही. घरातील केवळ १ व्यक्ति एका वेळी कसरत करण्यासाठी मॉर्निंग वॉक साठी बाहेर पडू शकतो. उपहार गृहामधून फक्त पार्सल सुविधा उपलब्ध होणार आहे.  उद्योग किंवा सेवा काही वेळे पुरत्या चालू होतील जिथे पूर्व नियोजित भेट घेता येऊ शकेल. त्या भेटी मध्ये २ किवा ३ व्यक्ति पेक्षा आधिक लोक असतं कामा नये. जसे की पार्लर, सलून ईत्यादी. सरकारी कार्यालयात देखील नागरिकांच्या कामाची प्राथमिकता ठरवून पूर्व नियोजित वेळ दिला जाईल त्या वेळीच कामकाज होणार आहे. खेळाडू किवा आणि ईतर कोणतेही प्रशिक्षण देखील एक वेळस एकट्याचे होईल. प्रत्येक व्यक्तिला वेळ ठरवून दिला जाईल.
प्राथमिक टप्पा १: ११ मे ते २४ मे. मोठे मॉल, उद्योग चेंबर सोडून छोटे उद्योग चालू करण्यास मंजूरी दिली जाईल. ईमारतीच्या छतावरील खुली बार, रेस्टोरंट याना मान्यता देताना एकूण संखेच्या फक्त १/३ लोक असतील अशी अट घातली आहे. हॉटेल्स चालू राहतील परंतु हॉटेल मधील सार्वजनिक क्षेत्र मात्र बंद राहील जसे की game, स्वीमिंग टॅंक ई. सर्वत्र मर्यादेचा १/३ जनसंखेची अट असेलच.
मध्यावधी टप्पा २: २५ मे ते ०८ जून. आधी पेक्षा थोडी जास्त व्यावसायिक कृती अमलात आणली जाईल. सिनेमा, नाट्यगृह, संग्रहालाय, उद्याने, प्रदर्शन क्षमतेच्या १/३ ची अट लक्षात घेऊन खुली केली जातील. घरगुती संस्कृतिक कार्यक्रमासाठी ५० लोकांची मर्यादा असेल तर बाहेर हॉलमधील कार्यक्रमासाठी ४०० लोकांची बैठक व्यवस्थे सहित मर्यादा असणार आहे. हॉटेल, बार मध्ये फक्त टेबलवर १ ते २ व्यक्तिना सेवा देण्यात येईल आणि सर्वत्र मर्यादेचा ५०% जनसंखेची अट असेल. प्ले ग्रुप चालू करता येतील त्यात ही ज्यांचे आई वडील घरी असणार आहेत त्यनि ऑनलाइन शिक्षण व ज्यांचे आई वडील घरी राहू शकत नाही अश्याच लहान मुलांना प्ले ग्रुप ला सोडता येणार आहे.  
शेवटचा टप्पा २: नागरिकांना ईतरत्र जाण्यास मुभा असेल. सारी दुकाने, ऑफिस, शाळा ५०% उपस्थितीच्या अटी मध्ये उघडली जातील. समुद्र किनारे देखील मनुष्याचा वावर मर्यादित असेल. रस्त्यावरील सार्वजनिक वाहतूक सुरू केली जाईल. सर्वच व्यवहार सुरू केले असले तरी हे नवीन सामाजिक आयुष्य असणार आहे ठरावीक काळासाठी बंधने ही असणारच आहेत, सरकार स्थानिक प्रशासन ज्या सूचना देईल त्याचे पालन करणे करणे बंधन कारक राहणार आहे. हा शेवटचा टप्पा किती दिवस असेल हे सांगता येणार नाही. कोरोनाच्या आधी जसे स्पेन होते तसे होण्यास दीर्घकाळ जावा लागणार आहे.
भारतता मध्ये ४ मे पासून १७ मे पर्यन्त लॉक डाउन ३ असेल. स्पेन, इटली, व ईतर देशांच्या लॉक डाउन मधून बाहेर पडण्याचे ट्टपे अभ्यासून आपल्या सामाजिक व आर्थिक संस्कृतीला अनुसरून कश्या प्रकारे बाहेर पडावे याचा विचार केला पाहिजे.

प्रा डॉ अजिंक्य अजित पत्रावळे     
रसायनशास्त्र विभाग
विवेकानंद कॉलेज कोल्हापूर

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Corona Series Part 39 : कोरोना, आणि लस निर्मिती मधील भारतीयांचा सहभाग

Corona Series Part 39       नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणू चा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. कोरोना , आणि लस निर्मिती मधील भारतीयांचा सहभाग जगात असा एक ही देश नसेल जिथे ज्ञानाचा भंडार असणारे भारतीय लोक त्या देशाच्या प्रगतिमध्ये सहभागी नाहीत. कोरोनाच्या लढ्यात तरी हे मागे कशी राहतील. सिरम इंडिया लिमिटेड पुणे स्थित जैव तंत्रज्ञानातील अग्रणी कंपनी आहे यां कंपनीचे वैशिष्ट्य म्हणजे या पूर्वी ही hepatitis, पोलीओ , स्वाइन फ्लू इत्यादि आजारामध्ये लस निर्माण करण्याचे महत्वाचे योगदान आहे. वर्षभरात १.५ अब्ज लसीचे डोस अतिशय माफक दरात तयार करण्याची क्षमता असणारी या कंपनीचे उत्पादन यूरोपियन देशात व संशोधन यूनिट पुणे सारख्या शहरात आहे. भारतामध्ये एक ही नोबेल परितोषिक किवा औषधाचा स्वामित्व हक्क नाही तरीही औषध , लस उत्पादन करण्यात प्रावीण्य , विश्वसनीय नावलौकिक मिळवणारा देश आहे. जावपास ८०% लस आफ्रिका सारख्या देशात पुरवेल जातात. कोरोनाची लस निर्माण करण्यासाठी न्यूयॉर्क मधील codagenic या...

Corona Series Part 56 : कोरोना, आणि ई-शिक्षण

Corona Series Part 56 नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. आजचा विषय विस्तृत मांडला आहे.   या विषया बाबतीत आपण आपले मत ब्लॉगवर जरूर कळवावे ही विनंती.     https://ajinkya1030.blogspot.com   कोरोना , आणि ई-शिक्षण मार्च महिन्यापासन कोरोनाचा प्रभाव दिसू लागला शेवटच्या आठवड्यापासून शाळा , कॉलेज लॉकडाउनच्या काळापासून आज पर्यन्त बंद करण्यात आल्या. भितीदायक वातावरणामध्ये १० , १२वी च्या परीक्षा घेण्यात आल्या. शैक्षणिक वर्ष २०१९-२० चे कार्य संपत आले होते परंतु लेखी आणि मौखिक परीक्षा राहिल्या होत्या . आणि आता यूजीसीच्या मार्गदर्शंनानुसार त्या राहूनच जातील. किंवा काही अंशी तात्पुरती योजना राबवून काही ना काही मार्ग काडला जाईल.   नैसर्गिक आपत्ती महापुर , वैश्विक महामारी मधून शैक्षणिक क्षेत्रा समोर नवीन आव्हान उभे राहिले आहे. खाजगी , काही सरकारी शाळा , कॉलेजने देखील तात्पुरती सोय करण्यासाठी ऑनलाइन तास झूम , गूगल क्लासरूम , गूगल डॉक , यू ट्यूब , व्हाट्स अप...

पुन्हा कधीही कोरोना सारख्या महामारीमुळे लेख लिहायची वेळ येऊ नये हीच ईश्वर चरणी प्रार्थना

नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे आज काय लिहावे आणि काय नको समजेनासे झाले आहे. तरी धाडस करून लिहित आहे. काही चुकले तर समजून घ्यावे ही विनंती.   मार्च महिन्यामध्ये जगात नवीन विषाणू ने धुमाकूळ घातला होता सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. शास्त्रज्ञ , संशोधक , मीडिया , नेते , उद्योजक , आणि सामान्य जनता सर्वच नागरिकांना पुढे काय वाहून ठेवले आहे याची कल्पना नव्हती. परिस्थितीचे आकलन होण्याचा आतच लॉकडाउन झाला तेव्हा सुट्टीचा आनंद घेऊया असे समजून काही नागरिक मस्त मजेत होते. हळू हळू परिस्थिती बदलून गंभीर झाली , पण नेमके काय चालू आहे काय करावे आणि काय करू नये याचा अंदाज लागेना. मीडिया मध्ये रोज के भीतीदायक बातमी येऊ लागली कधी विषाणू वर असलेले उपाया येऊ लागले पण शास्त्रीय माहिती सजत नसल्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण होऊ लागले . अश्या मध्ये रसायनशास्त्राचा विद्यार्थी म्हणून कोरोना विषाणूच्या विरोधात   काही काम करावे असे वाटत होते परंतु संशोधन करण्यासाठी काही मर्यादा होत्या याचे भान होते पण शांत बसून चालणार नाही हे लक्षात आले होते. म्हणून मनातून ठरवले आज या संकटकाळी समजासाठी आप...